Success Story:- एखादा छोटासा व्यवसाय सुरू करून तो यशाच्या शिखरापर्यंत नेण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्यामध्ये जिद्द, प्रयत्नातील सातत्य आणि कुठल्याही विपरीत परिस्थितीशी दोन हात करून त्या परिस्थितीतून मार्ग काढत पुढे जाणे महत्त्वाचे असते अगदी त्याचप्रमाणे व्यावसायिक नियोजन आणि व्यवसायाची व्यवस्थित स्ट्रॅटेजी असणे देखील तितकेच गरजेचे असते.
या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही तुमची छोटीशी कल्पना देखील एखाद्या व्यवसायात रूपांतरित करून त्या माध्यमातून मोठे व्यवसायिक साम्राज्य उभे करू शकतात व अशा प्रकारचे अनेक उदाहरणे आपल्याला भारतात पाहायला मिळतात. अगदी याच पद्धतीने जर आपण केरळमधील चार बालपणीच्या मित्रांची यशोगाथा पाहिली तर ती खरच प्रेरणादायी अशीच आहे. हे चौघेजण एकत्र आले व त्यांनी व्यवसाय सुरू करून लाखो रुपये कमवण्याची किमया साध्य केली आहे.
बालपणीचे मित्र एकत्र आले आणि सुरू केला फुलवा नावाचा स्टार्टअप
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केरळ राज्यातील कोझिकोड जिल्हा जर आपण पाहिला तर तो हलव्यासाठी खूप प्रसिद्ध आहे व याच ठिकाणी शाबास अहमद एनसी, सानू मोहम्मद सी, इरफान सफर एस आणि थेसरीप अली पिके हे चार मित्र म्हटले म्हणजे यांचा सगळ्यांना आवडता पदार्थ म्हणजे हलवा होता व त्यामधूनच त्यांनी प्रेरणा घेतली व स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला.
या स्टार्टअपच्या माध्यमातून ते हलव्याचे तब्बल 24 प्रकार बॉक्समध्ये पॅक करून जगातील अनेक देशांमध्ये पुरवतात. हलवा हा खूप प्रसिद्ध असून अनेक रंगांमध्ये तो तयार केला जात असतो. परंतु केरळच्या व्यतिरिक्त इतर राज्यातील व जगातील लोकांना हलव्याची ओळख व्हावी व त्यांना देखील हलवा खायला मिळावा या उद्देशाने या चौघांनी फुलवा नावाचा स्टार्टअप सुरू केला आणि हलवा बनवून विकायला सुरुवात केली.
साधारणपणे त्यांनी फुलवा या स्टार्टअपची सुरुवात 2023 मध्ये केली व वर्षभरात जवळपास 84 लाख रुपयांची कमाई या माध्यमातून केली. हे चौघेजण त्यांच्या फुलवा स्टार्टअपच्या किंवा ब्रँडच्या अंतर्गत सुखे खोबरे तसेच टरबूज इत्यादी पासून बनवलेले हलवे तयार करतात व पारंपारिक चवीचे हलवे देखील तयार करतात. ऑनलाइन प्लेटफॉर्मवर हलवा घ्यायचा असेल तर तो उपलब्ध आहे.
फुलवा हलवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपूर्ण देशात आणि जगात देखील पाठवला जातो. या चौघा मित्रांनी तयार केलेला फुलव्याचे ग्राहक तुर्की पासून तर युके, जर्मनी तसेच यूएई मध्ये देखील आहेत.
त्यांनी सुरुवात केली होती तेव्हा त्यांना पहिल्याच महिन्यामध्ये 300 पेक्षा जास्त ऑर्डर मिळाल्या होत्या व त्यांचा हा व्यवसाय आता खूप चांगल्या प्रकारे विस्तारला असून त्यासाठी त्यांचे प्लॅनिंग देखील कामी आली आहे.
आजमीतिला या चारही मित्रांनी सुरू केलेला हा व्यवसाय खूप वेगात वाढत असून कोझिकोड हलवा विकून ते त्या माध्यमातून लाखो रुपये कमवत असून खूप कमी कालावधीमध्ये फुलवा नावाचा त्यांचा हा हलव्याचा स्टार्टअप नावारुपास आलेला आहे.