Tax Saving Tips: तुम्ही देखील नोकरदार आहात आणि तुम्हाला टॅक्स वाचायचा आहे का? ‘या’ पर्यायांचा वापर करा आणि 1.5 लाख रुपयापर्यंत टॅक्स वाचवा

Tax Saving Tips:- भारतामध्ये करदात्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर असून त्यातल्या त्यात जे पगारदार व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी कर वाचवणे हे एक मोठे आव्हान ठरते. बरेच जण आयकर भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत कर वाचवण्याचा विचार करत असतात.

परंतु यासाठी तुम्हाला अगोदरच नियोजन करून ठेवणे गरजेचे असते व अशा प्रकारे जर तुम्ही अगोदर नियोजन करून ठेवले तर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पैसे वाचवू शकतात.असे काही पर्याय आहेत की त्या पर्यायांचा वापर करून तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचा टॅक्स वाचवू शकतात.

आता तुम्ही योग्य वेळेला अशा पर्यायांचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे या लेखात आपण असे महत्त्वाचे पर्याय बघणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही टॅक्स सहजपणे वाचू शकतात.

 हे पर्याय वापरा आणि टॅक्स वाचवा

1- मुदत ठेव अर्थात फिक्स डिपॉझिट जर तुम्ही पाच वर्षाच्या मुदतीत एफडीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला दीड लाख रुपये पर्यंत कर सवलत मिळू शकते. आपल्याला माहित आहे की सध्या फिक्स डिपॉझिट वर सात ते आठ टक्के इतका व्याजदर मिळत आहे. तसे पाहायला गेले तर एफडीवर मिळणारे व्याज हे करपात्र आहे. परंतु आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत फिक्स डिपॉझिट वर कर कपात उपलब्ध आहे.

2- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ योजना पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ योजनेवर देखील करबचत लाभ उपलब्ध आहे. या योजनेचा लॉक इन कालावधी हा पंधरा वर्षाचा असतो व त्याचे व्याजदर प्रत्येक तिमाहीमध्ये बदलतात. गुंतवणूक केल्यानंतर जे व्याज मिळते ते करमुक्त आहे.

3- इक्विटी लिंक्ड बचत योजनाELSS अर्थात इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम हा देखील गुंतवणुकी करिता एक उत्तम पर्याय असून याचा लॉक इन पिरेड तीन वर्षाचा आहे. यामध्ये कॅपिटल गेन टॅक्स लागू आहे. परंतु यामध्ये एका आर्थिक वर्षात एक लाख रुपयांची पूर्तता करमुक्त आहे. परंतु जर एक लाख रुपये पेक्षा जास्त असेल तर त्यावर दहा टक्के दराने कर आकारला जातो.

4- एनसीएस अर्थात राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना या योजनेमध्ये पाच वर्षापर्यंत निश्चित व्याज उपलब्ध आहे व त्यावर वार्षिक 6.8 टक्के व्याज मिळते. तुम्हाला जर जोखीम मुक्त गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही यात गुंतवणूक करू शकता व या माध्यमातून तुम्ही एका आर्थिक वर्षाकरिता दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर लाभाचा दावा करू शकतात.

5- लाइफ इन्शुरन्स पॉलिसी अर्थात जीवन विमा आजकाल विम्याला खूप महत्त्व असून तुम्ही जर विमा उतरवला असेल तर आयुर्वेमा पॉलिसीसह तुम्ही एका वर्षाला दीड लाख रुपयापर्यंत कर वाचवू शकतात.

6- राष्ट्रीय पेन्शन सिस्टम अर्थात एनपीएस नॅशनल पेन्शन सिस्टम एक महत्त्वाची योजना असून यामध्ये तुम्ही निवृत्तीसाठी पैसे गुंतवू शकतात व गुंतवलेल्या रकमेवर तुम्ही वार्षिक दोन लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकतात. एवढेच नाही तर यामध्ये आयकर कायदा कलम  80CCD(1B) अंतर्गत पन्नास हजार रुपयांचा अतिरिक्त कर देखील वाचवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe