पाच कोरोना रुग्ण आढळल्याने 25 जुलैपर्यंत गाव लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे पाच कोरोना रुग्ण आढळल्याने १८ जुलैपासून २५ जुलैपर्यंत गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय तालुका प्रशासनाने घेतला आहे. दवाखाने, अौषध दुकाने व दूध वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद असतील, अशी माहिती सरपंच काशिनाथ लवांडे, उपसरपंच फिरोज पठाण व ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब सावंत यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग … Read more

माझ्या नावाचे बनावट ट्विटर अकाउंट हे विरोधकांचे षडयंत्र : स्नेहलता कोल्हे

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :-माझ्या नावाने बनावट ट्विटर अकाउं‌ट तयार करून ट्विट केल्याचे प्रकार हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे खच्चीकरण करण्यासाठी विरोधकांनी रचलेले षडयंत्र आहे, असा आरोप भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केला. माझ्या नावाने बनावट ट्विटर अकाउंट तयार केल्याचे माझ्या निदर्शनास आले असून त्याद्वारे मी कोणतीही पोस्ट … Read more

दिवसभरात शहरात कोरोनाने घेतले तीन बळी

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- नगर शहरातील आडते बाजार येथील एका 60 वर्षीय व्यापाऱ्याचा औरंगाबाद रोड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला मुकुंद नगर मधील दर्गा दायरा येथील 44 वर्षीय पुरुषाचा नालेगाव चौकातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता नगर शहरात कोरोनाने बळी घेतलेल्यांची संख्या ११ अकरा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये कला रात्री ८ वाजता आणखी १८ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. भिंगार ०२, नगर शहर ०५, श्रीरामपूर ०३, श्रीगोंदा ०३ (घोगरगाव ०२ सांगवी दुमाल ०१),, कर्जत ०१ ( नांदगाव), राहुरी ०१ (गुहा), अकोले ०३ अशा रुग्णाचा समावेश आहे. उपचार सुरू असलेले रुग्ण:६१६ … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा लेटेस्ट अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 (7.45 PM):- अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी २९ रुग्ण बाधित आढळून आले. याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ३१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता १४२१ इतकी झाली असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ५९४ इतकी झाली आहे. आज … Read more

कोरोनाचा आता पार्ले जी कंपनीत शिरकाव!

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- नाशिकमधील एका नामांकित बिस्किट उत्पादक कंपनीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पार्ले जी कंपनीतील सहा कामगारांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. संबंधित कामगार काम करीत असलेला विभाग आता प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात कोरोना व्हायरसनं आता थैमान घातलंय. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांसोबतच आता राज्यातील इतर … Read more

डल्ला मारण्याची सवय असलेल्या विरोधकांना जनतेचा आवाज कल्ला वाटणे स्वाभाविकच – माजी महापौर अभिषेक कळमकर

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- करदात्यांच्या पैशातून त्यांनाच सोयीसुविधा पुरवताना काम दर्जेदार होणे महत्त्वाचे असते. दुर्देवाने विरोधकांना फक्त ठेकेदाराकडून मिळणार्‍या मलिद्याचीच चिंता असते. तपोवन, बोल्हेगाव रस्त्याच्या कामाबाबत शिवसेनेनेे सर्वप्रथम आवाज उठवून राज्य सरकारकडे तक्रार केली. त्यामुळे सरकारने तातडीने चौकशी समिती नेमली. यादरम्यान ठेकेदाराचे बिलही थांबवण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असून त्यांनी पूर्णपणे … Read more

सायंकाळी सात ते पहाटे पाचपर्यंत व्यक्तींच्या हालचालींवर प्रतिबंध

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-   अहमदनगर महानगरपालिका हद्दीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक आदेशाची मुदत वाढविली आहे. यापूर्वी दिनांक 17 जुलैपर्यंत असणारे प्रतिबंध आता दिनांक 31 जुलै रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार … Read more

पाकिस्तानातील प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर उस्मानाबाद-अहमदनगर मार्गे पोहोचला पाक सीमेवर, नंतर झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- प्रेमासाठी वाट्टेल ते करणारे अनेक बहाद्दर या समाजात आहेत. प्रेमात सगळं काही माफ असत असे म्हणत प्रेमासाठी कोणत्याही थराला जाण्याचा विचार अनेक प्रेमवेडे करत असतात. असाच एक प्रेमवेडा तरुण उस्मानाबाद येथून चक्क पाकिस्तानात असलेल्या प्रेयसीला भेटायला निघाला होता. यासाठी त्याने उस्मानाबाद ते अहमदनगर असा सायकलवरून तर अहमदनगर ते पाक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-  अहमदनगर शहरातील केडगाव येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता नगर शहरातील कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या नऊ झाली आहे नगर शहरात ह्या आधी कापड बाजारातील व्यापारी व २४ वर्षीय मुलाचा कोरोना ने बळी घेतला होता. तसेच गंज बाजारातील ३५ वर्षीय युवा व्यापाराचाही कोरोना ने बळी … Read more

कोरोनाचा विस्फोट: ‘हे’ शहर केले लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-  कोरोनाचा विस्फोट झाल्याने तालुक्यात एकाच दिवशी बेचाळीस कोरोना बाधीत रुग्ण सापडले. पाथर्डी शहर लाँकडाऊन केले आहे. तालुक्यातील त्रिभुवनवाडी, कोल्हार, आगखांड, पिपंळगावटप्पा, शिक्षक काँलनी, तिसगाव येथे रुग्ण सापडेलला भाग सिल केला आहे. प्रशासनातील महसुल, आरोग्य व पोलिस विभागाच्या अधिका-यांच्या कामातही आता अस्थिरता येत आहे. नागरीकामधे कोरोनाची भिती असली तरी नियम … Read more

जिल्हा पुरवठा विभागातही कोरोनाचा शिरकाव

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. शहरातही अनेक रुग्ण वाढले आहेत. कोरोनाने आता शासकीय कार्यालये विळख्यात घेण्यास सुरवात केली आहे. महापालिका, जिल्हा परिषद त्यापाठोपाठ माजी खा. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना घुसला. आता त्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये कोरोनाने शिरकावं केल्याने खळबळ उडाली आहे. येथील … Read more

सर्वसामान्यांना झटका! बँकेतून पैसे काढण्यासाठी द्यावा लागणार चार्ज

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-  बँक ऑफ महाराष्ट्रने किमान शिल्लक रक्कम मर्यादा वाढविली बँक ऑफ महाराष्ट्रच्या मेट्रो आणि शहरी भागातील बचत खातेधारकांना आता त्यांच्या खात्यात किमान मासिक सरासरी 2 हजार रुपये शिल्लक ठेवावी लागणार आहे. याआधी १५०० ची मर्यादा होती. आता जर 2000 रुपये न ठेवल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. जर तेव्हढी रक्कम नसेल … Read more

वाळूच्या ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- वाळूच्या ट्रॅक्टरने एका मोटारसायकलला धडक दिल्याने एकाच मृत्यू झाल्याची घटना जामखेड तालुक्यातील अरणगाव – कवडगाव रस्त्यावर शिंदेवस्ती (अरणगाव) परिसरात घडली. महेश हरिदास झांबरे ( हिंगणी, ता. आष्टी, जि. बीड) असे मृताचे नाव आहे. यात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर अरणगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केले जात आहेत. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- राहुरी तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. पहिल्या घटनेत ताहराबाद येथे राहणाऱ्या संपत बर्डे (वय ३५) या तरूणाचा १५ जुलै रोजी अज्ञात कारणाने मृत्यू झाला. तर दुस-या घटनेत वांबोरी येथील शुभम् ढगे (वय २२) तरुणाचा १४ जुलै रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला. संपत पोपट बर्डे हा तरूण … Read more

कोरोनाच्या संकटकाळात ‘ह्या’ आजारांविषयी दिलासादायक माहिती समोर; डॉक्टर म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- सध्या कोरोनाने देशभर धुमाकूळ घातला आहे. अहमदनगर जिल्ह्यात तर कोरोनाने चांगलाच विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. परंतु इतर डेंग्यू , मलेरिया आदी आजारांबाबत काही दिलासादायक गोष्टी समोर आल्या असून डॉ.रजनी खुणे यांनी याबाबत विस्तृत माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नगर जिल्ह्यात यंदा डेंग्यूच्या रुग्णात घट झाली असून मलेरियाही … Read more

महाविद्यालयांची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू; ‘ही’ आहे शेवटची तारीख

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- काल बारावीचा निकाल जाहीर झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या संकटाचा सामना करत अंतिमतः हा निकाल देण्यात आला. या निकालानंतर शहरातील सर्व नामांकित महाविद्यालयांनी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. शुक्रवारपासूनच विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येणार असून जुलै महिना अखेरपर्यंत अर्ज भरण्यास महाविद्यालयांकडून मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे … Read more

स्वतःच्या मुलांना परीक्षेसाठी बाहेर पाठवालं का ? आ. रोहित पवारांचा घणाघात

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा घ्यायची की नाही, हा मुद्दा सध्या विविध पातळ्यांवर चर्चेत आहे. हा मुद्दा आता केवळ शिक्षण क्षेत्र किंवा सरकार, पालक-विद्यार्थी यांच्यापुरता न राहाता लोकप्रतिनिधींकडेही याबद्दल पालक विचारणा करू लागले आहे. त्यामुळे याच्यावर आ.रोहित पवार यांनी टीका केली आहे. ते म्हणतात ‘स्वत: ऑनलाइन बैठका घेता अन् मुलांना … Read more