मनरेगातून विकासकामांसह रोजगारनिर्मितीला चालना

अमरावती, दि. 18 : लॉकडाऊनचा पार्श्वभूमीवर विविध भागात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामांना सुरुवात केली असून, वैयक्तिक लाभाच्या तसेच सामूहिक विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. गत दोन आठवड्यात या मनुष्यबळ उपस्थितीत लक्षणीय वाढ झाली आहे. आजमितीला जिल्ह्यात 668 ग्रामपंचायतींमध्ये  तीन हजारांवर कामे सुरू असून, 67 हजार 27 मनुष्यबळ उपस्थिती आहे, असे … Read more

राज्यात ५ हजार १८९ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती सुरू

मुंबई दि.18 : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10 हजार 791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तीपैकी 5 हजार 189 अनुज्ञप्ती सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. राज्य शासनाने 3 मे, 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर  मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील 33 जिल्ह्यात … Read more

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सूचनेनंतर तेलंगणात अडकलेले २८ कामगार स्वगावी रवाना

चंद्रपूर दि. 18 मे : लॉकडाऊनच्या काळामध्ये जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील अनेक कामगार तेलंगणामध्ये अडकलेले होते. त्यापैकी आज दुपारी 2 वाजता गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील 28 कामगार चंद्रपुरात दाखल झाले होते ते आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे सूचनेनंतर एसटी बसने त्यांच्या स्वगावी पोहोचविण्यात आले. तेलंगणा राज्यातून आलेले कामगार हे गोंदिया जिल्ह्यातील विविध तालुक्यातील असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या ठिकाणाहून त्यांच्या स्वगावी परत जाण्यासाठी एसटी बसची … Read more

लॉकडाऊन काळात ३९५ सायबर गुन्हे दाखल; २११ जणांना अटक

मुंबई दि. १८ – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पावले उचलली असून राज्यात ३९५ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे. टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन … Read more

शून्य गाठलाय… आता हवा निश्चय!

आज जिल्हा शासकीय रुग्णालयातून अखेरचा कोविड रुग्ण संसर्गमुक्त होऊन बाहेर पडत असताना रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर सर्वात जास्त आनंद दिसत होता आणि ते स्वाभाविक देखील होते. करोनाविरुद्धच्या या युद्धातील पहिल्या टप्प्यात त्यांनी यश मिळवून 19 रुग्णांना त्यापासून दूर नेत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले होते. साधारण एक महिन्यापूर्वी जिल्ह्यात पहिला कोविड रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यात काळजीचे वातावरण निर्माण … Read more

सर्व-समन्वयाने-नाशिक-जिल

वर्धा, दि. 18  : एकाच दिवशी 3  कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या वर्धा जिल्ह्यात आज जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या संकल्पनेतून घरी रहा कोरोना  योद्धा व्हा हे  विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. यामध्ये  जिल्हाधिकारी यांच्याप्रमाणेच खासदार,  आमदारांसोबतच  इतर लोकप्रतिनिधींनी सुद्धा गृह विलगीकरणातील कुटुंबांच्या घरी भेट देऊन घरी रहा कोरोना योद्धा व्हा, असे आवाहन केले. इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्ती कोरोना बाधित आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर  गृह विलगीकरणातील व्यक्तींनी बाहेर … Read more

सर्व समन्वयाने नाशिक जिल्ह्याची स्थिती नियंत्रणात

नाशिक, दि. 18 : गेल्या दहा-पंधरा दिवसातील चांगल्या प्रयत्नांमुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. कोरोना विरोधातील लढाई ही दीर्घकाळ चालणारी आहे, येणाऱ्या काळात कोरोना रुग्ण दाखल होतील त्यासोबतच ते कोरोनामुक्त होत राहतील, ही निरंतर चालणारी प्रक्रिया असेल. त्यामुळे कोराना विरोधातील लढा त्यासोबतच सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन व्यवहार व अर्थकारण सुरु ठेवण्यासाठी … Read more

राज्यात मे महिन्यात आतापर्यंत ४८ लाख ५३ हजार ९३५ क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई .दि. 18 :-  राज्यातील 52 हजार 422 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. मे 2020 मध्ये आतापर्यंत  राज्यातील 1 कोटी 24 लाख 95 हजार 852 शिधापत्रिका धारकांना 48 लाख 53 हजार 935 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्यात … Read more

निस्वार्थ भावनेने मानधन न घेता संकट काळात उभे राहिलेल्या माजी सैनिकांचा विचार व्हावा

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :-  कोरोना महामारीच्या संकट काळात निस्वार्थ भावनेने मानधन न घेता पोलिस दल व आरोग्य सेवेच्या मदतीसाठी उभे राहिलेले माजी सैनिकांना विमा संरक्षण देऊन त्यांना शासनाच्या सेवेत समावून घेण्याची मागणी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे … Read more

त्या वैद्यकीय अधिकार्‍याकडून जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांना त्रास देण्यास सुरुवात

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी देण्यात आलेले संरक्षण कीट पळविणार्‍या निवासी वैद्यकीय अधिकार्‍याचे निलंबन करुन कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी घरीच अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप मुरंबीकर यांनी शनिवार दि.16 मे रोजी नाशिक विभागीय आरोग्य उपसंचालकांचे … Read more

दारूड्यांकडून महिलेस मारहाण

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- दारूच्या नशेत महिलेच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. भिंगारमधील इंदिरानगर झोपडपट्टीत शनिवारी (दि. 16) ही घटना घडली. याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात विशाल साबळे, करण साबळे, सिदान साबळे (सर्व रा. भिंगार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मारहाणीत रेणुका अविनाश भिंगारदिवे (वय 27, रा. इंदिरानगर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’ 7 जण कोरोनामुक्त, जिल्हयात आतापर्यंत 49 रुग्णांची कोरोनावर मात !

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. आज जिल्ह्यातील एकूण ०७ जण कोरोनामुक्त झाले. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील या ०७ कोरोना बाधित रुग्णांना आज बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त … Read more

कोरोनाचा पुण्यात कहर; एकाच दिवसात दोनशे नवे रुग्ण

पुणे महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच असून मुंबई खालोखाल पुण्यातही कोरोनाचे जास्त रुग्ण सापडत आहेत. रविवारी दिवसभरात नव्या २०१ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. हे बाब पुण्याची चिंता वाढवणारी आहे. सध्या रोज दीड हजार लोकांची तपासणी होत असल्याने रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यात याआधी सर्वाधिक १६६ आणि त्यानंतर शनिवार २०२ रुग्ण सापडले होते. … Read more

पुण्यातील अभियंत्याने तयार केला कोरोनाला दूर ठेवणारा एअर प्रेशर हेडबँड

पुणेः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तज्ञ् अनेक उपायांचा अवलंब करत आहेत. मास्क, सॅनिटायझर आदी गोष्टींचा अवलंब केला जात आहे. आता पुण्यातील अभियंता व डॉक्टर्सने मिळून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पॉझिटिव्ह एअर प्रेशर हेडबँडची निर्मिती केली आहे. इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर सुनीत दोशी आणि सिंहगड डेंटल कॉलेजचे प्राचार्य डॉ. समीर पाटील यांनी या अभिनव हेडबँडची निर्मिती केली आहे. हवेच्या … Read more

पुण्यातील रुग्णसंख्या चार हजारांवर;जाणून घ्या अपडेट्स

पुणे पुण्यात कोरोनाने आपला कहर सुरूच ठेवला आहे. लॉक डाऊन असूनही रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पुण्यात एकूण रुग्णांची संख्या ४,०१८ झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृतांची संख्या २११ पर्यंत पोहोचली आहे. तसेच शहरातील फक्त ५३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. शहरातील खासगी; तसेच सरकारी रुग्णालयात गेल्या २४ तासांत ९ रुग्णांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू … Read more

नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

पिंपरी चिंचवड जवळील थेरगाव घाट येथे पवना नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (१५ मे) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा मृतदेश आढळून आला असून मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. महिलेचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे आहे. वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना नदीपात्रात … Read more

धक्कादायक! पुण्यातून आलात, मग गावात ‘नो एंट्री’

पुणे सध्या लॉक डाऊनमध्ये अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या मूळ गावी सॊडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परंतु पुण्यातील बिहारी मजुरांवर वेगळेच संकट आले आहे. ते पुण्यात असल्याने त्यांना त्यांच्या राज्याने प्रवेश नाकारला आहे. पुणे विभागातून विविध राज्यांत आतापर्यंत ६८ हजार ५५३ प्रवासी रेल्वेने रवाना झाले आहेत. त्यासाठी १७ मे पर्यंत एकूण ५३ रेल्वे धावल्या आहेत. मात्र, यात … Read more

कोल्हापूरमध्येही चिंताजनक वातावरण; एका दिवसात आठ जणांना कोरोनाची लागण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्येही चिंताजनक वातावरण तयार झाले आहे. कोल्हापुरात एकाच दिवशी ८ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. एकूण रुग्णसंख्या आता ४४ वर गेली आहे. मुंबई,पुणे,सोलापूर आदी रेडझोन मधुन कोल्हापूरात येणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, गेल्या शनिवारीपासुन कोरोनाची ही येथे संख्या वाढत आहे. मुंबई आणि सोलापूर वरून कोल्हापूरात आलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे आज … Read more