कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच उत्तम पर्याय – गृहमंत्री अनिल देशमुख

जळगाव, (जिमाका) दि. 28 : कोरोनाची साखळी तोडून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच उत्तम पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याची कोरोनाचा परिस्थिती जाणून घेण्यासाठी गृहमंत्री यांनी आढावा बैठक घेतली यावेळी ते बोलत होते. … Read more

अमळनेरकरांनो, घरातच रहा, सुरक्षित रहा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. प्रशासनाच्या उपाययोजनांना नागरिकांच्या सहकार्याची जोड आवश्यक आहे. याकरीता नागरिकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत घरात राहून सुरक्षित रहावे. जेणेकरुन आपण कोरोनाचा प्रादुर्भाव निश्चितपणे रोखू शकू, असा आशावाद पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी … Read more

कोटा येथे अडकलेले 32 विद्यार्थी रायगडकडे रवाना

अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका) :  राजस्थान येथील कोटा येथे आय.आय.टी., मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी गेले होते. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणीच अडकले होते. त्यांना परत गावाकडे आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. पालकमंत्री कु.तटकरे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माहितीचे संरक्षण, चांगले इंटरनेट नेटवर्क यांची पूर्तता करण्याचे मोठे आव्हान

मुंबई दि.२८ :-   कोरोनामुळे भविष्यात निदान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तरी घरातूनच काम करणे (वर्क फ्रॉम होम) हे नित्याची  गोष्ट होऊन जाईल. त्यामुळे राज्यातील माहितीचे संरक्षण आणि सुरक्षा, चांगले इंटरनेट नेटवर्क यांची पूर्तता करण्याचे मोठे आव्हान  असेल. या सर्वांचा विचार करुन या संदर्भातील पायाभूत सुविधा उभारणे व घरातून काम करण्याच्या नियमांची चौकट तयार करण्यावर भर दिला … Read more

न्या. दीपांकर दत्ता यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई, दि. २८: कोलकाता उच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. मंगळवारी सायंकाळी (दि. २८) राजभवन येथे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी न्या. दीपांकर दत्ता  यांना पदाची शपथ दिली. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी न्या. दीपांकर दत्ता यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना … Read more

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर १३ हजार ४४८ उद्योगांना परवाने

मुंबई, दि २७ – लॉकडाऊननंतर उद्योग विभागाने काही अटी व शर्तींसह उद्योग सुरू करण्यासाठी परवाने जारी केले असून २० ते २७ एप्रिल दरम्यान १३ हजार ४४८ उद्योगांना परवाने जारी करण्यात आल्याचे उद्योग विभागाने कळविले आहे. केंद्र शासनाने २० एप्रिलपासून लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केले व काही अटी शर्थींवर उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचना … Read more

‘कोरोना’शी लढणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनासाठी करवसुलीच्या टक्केवारीची अट शिथील

मुंबई, दि. २८ – राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना २०२० – २१ या चालू आर्थिक वर्षात करवसुलीवर आधारित वेतन न देता त्यांना किमान वेतन देण्याचा निर्णय राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. गावांमधील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी योद्ध्याप्रमाणे काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना चालू वर्षी करवसुलीशी निगडीत वेतन न देता किमान … Read more

धान विक्रीत मुदतवाढ मिळालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ

मुंबई, दि.२८: विदर्भातील धान खरेदी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत वाढवून ही मुदत केंद्र शासनाच्या वतीने ३० एप्रिलपर्यंत वाढवून आली असून ३० एप्रिलपर्यंत धान विक्री करणाऱ्या विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.त्यामुळे विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना … Read more

लॉकडाऊनच्या काळात ३०७ सायबर गुन्हे दाखल

मुंबई दि. २८ – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पावले उचलली असून राज्यात ३०७ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाजमाध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये  ज्या ३०७ गुन्ह्यांची  नोंद झाली आहे त्यापैकी १३ … Read more

नगर-मनमाड महामार्गावरील हॉटेलला लागलेल्या आगीत सात लाखांचे नुकसान !

अहमदनगर Live24  :- शिर्डीत नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या हॉटेल वत्सलास भर दुपारी अचानक आग लागल्याने सात लाखांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. लॉकडाऊन असल्याने हॉटेल बंद असल्याने यात कोणी जखमी झाले नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, १७ मार्चपासून साईमंदिर बंद झाल्याने लॉकडाऊनमुळे शहरातील सर्व हॉटेल बंद आहेत. हॉटेल वत्सला … Read more

अमरावती जिल्ह्यात स्थानिक लॅबच्या मान्यतेचा मार्ग मोकळा

अमरावती, दि. 28 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामधील कोरोना चाचणी लॅबमधून तपासण्यात आलेले कोरोनाचे नमुने एम्सच्या नमुन्याशी जुळले आहेत. तसा अहवालही एम्सने दिल्लीच्या आयसीएमआरला पाठविला आहे. त्यामुळे आता लॅब सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून सातत्याने लॅब लवकर कार्यान्वित होण्याकरीता पाठपुरावा होत आहे. विद्यापीठाच्या सीआयसीमध्ये तयार करण्यात आलेल्या लॅबमध्ये 2 मशीन उपलब्ध … Read more

भारतीय निर्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत उद्योगमंत्र्यांचा संवाद

मुंबई, दि. 28; देखभाल दुरुस्ती व कर्मचाऱ्यांचे पगार वितरित करण्यासाठी निर्यात व्यवसायिकांचे कार्यालये सुरू करण्यासाठीची मागणी कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीपुढे ठेवून त्यावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. भारतीय निर्यात फेडरेशनच्या (फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट) पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर … Read more

राज्यातील राष्ट्रीय महामार्गांसाठी २० हजार कोटी द्या

नांदेड दि. २८ – राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या महामार्गाच्या निर्मितीसाठी अनेक अडचणी येत आहेत, काही प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात यावी व त्यासोबतच राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जलद गतीने होण्यासाठी २० हजार कोटी रूपयांचा निधी केंद्र सरकारने राज्यातील राष्ट्रीय महामार्गास … Read more

प्रभागनिहाय कम्युनिटी किचन सुरु करा

मुंबई, दि. २८ : लॉकडाऊन आदेशामुळे बंद झालेल्या उद्योग व व्यवसायातील प्रभावित कामगार, परराज्यातील विस्थापित कामगार व बेघर व्यक्ती यांच्या दोन वेळच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ‘कम्युनिटी किचन’ हा उपक्रम राबवला जातोय. ह्या उपक्रमात अधिक सुसूत्रता यावी, खाद्यपदार्थांच्या वाहतुकीसाठी लागणारा वेळ वाचावा व लोकांना ताजं अन्न मिळावं यासाठी प्रभागनिहाय कम्युनिटी किचन सुरु करण्याचे … Read more

पुणे विभागात 19 हजार 534 गरजूंना शिवभोजन थाळी

पुणे, दि.28 : शासनाच्या निर्देशानुसार पुणे विभागात कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर गरीब व गरजू लोकांना अन्न मिळावे म्हिणून शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली आहे. पुणे विभागात 19 हजार 534 गरजू नागरिकांनी या थाळीचा लाभ घेतला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुणे जिल्ह्यात 7 हजार 500, सातारा 2 हजार 500, सांगली 2 हजार … Read more

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला

मुंबई दि.२८:- राज्य शासनाच्या गट ‘ड’ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी मे महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला असून ‘राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघा’चे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने यांनी त्यासंबंधीचे पत्र आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात उतरुन लढत आहेत. … Read more

‘या’ 3 तालुक्यातच राहिले कोरोना रुग्ण, बाकी अहमदनगर जिल्हा करोनामुक्त !

अहमदनगर Live24 :- जिल्ह्यात आजवर 43 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील 24 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात करोनाबाधित एकूण 17 रुग्ण असून हे सर्व बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यात जामखेड तालुक्यातील 11, संगमनेरमधील चार, तर नेवाशाती दोन रुग्णांचा समावेश आहे. जामखेड, संगमनेर, नेवासे वगळता जिल्हा करोना मुक्त … Read more

पुणे विभागातील 243 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे, दि.28 : पुणे विभागातील 243  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1  हजार 563  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1  हजार 231  आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 89  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 53  रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. विभागात 1 हजार … Read more