कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध – आरोग्यमंत्री

औरंगाबाद, दि. 26 (जिमाका) : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. सर्व यंत्रणांच्या सहाय्याने ह्या परिस्थितीचा सामना करणे गरजेचे आहे.  औरंगाबाद शहरातील सध्या असलेल्या कंटेटमेंट झोन परिसरातील आरोग्य विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना PPE kit (personal Protection Equipment) अधिकाधिक उपलब्ध करून देण्यात … Read more

जाणून घ्या राज्यासह तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स

मुंबई :- आज राज्यात कोरोनाबाधीत ४४० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ८०६८ झाली आहे. आज ११२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११८८ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६५३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख १६ हजार ३४५ नमुन्यांपैकी … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘झुलवाकार’ उत्तम बंडू तुपे यांना श्रद्धांजली

मुंबई दि. २६ : समाजातील उपेक्षित, वंचित वर्गाच्या वेदनांना साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम ‘झुलवाकार’ उत्तम बंडू तुपे यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे केले. त्यांच्या निधनाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा साहित्यिक वारसा पुढे नेणारा महान साहित्यिक हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तम तुपे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात … Read more

अहमदनगरकर आता तरी सावध व्हा : फक्त एका व्यक्तीमुळे दहा जणांना झालाय कोरोना !

अहमदनगर : कोरोनाचा सामुदायिक प्रसार कसा झपाट्याने होऊ शकतो, याचे उदाहरण जामखेडमध्ये पहायला मिळाले आहे. जामखेड तालुक्यात एका बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या दहा जणांना लागण झाल्याचे आतापर्यंत उघड झाले आहे.  एकट्या जामखेड शहरातील बाधीत रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे जामखेडमध्ये तबलिगी लोकांमुळे प्रथम करोनाचा शिरकाव झाला. सुरुवातीच्या टप्प्यातील रुग्ण बरे होऊन घरी गेले. मात्र, … Read more

मालेगावातील एकाच वेळी तीन रुग्णांची कोरोनामुक्ती

 मालेगाव येथील मन्सुरा रुग्णालयातील तीन कोरोना बाधित रुग्ण हे उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा देवून आज घरी सोडण्यात आले, मालेगाव शहरातून प्रथमच एकाच वेळी तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांचा आरोग्य प्रशासनावरील विश्वास वाढुन नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. मन्सुरा हॉस्पिटल … Read more

राज्यात ६५ लाख ९५ हजार ४८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई, दि. 26 : राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि.1 ते 26 एप्रिल 2020 या सव्वीस दिवसात राज्यातील 1 कोटी 53 लाख 64 हजार 769 शिधापत्रिकाधारकांना तब्बल 65 लाख 55 हजार 480 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली … Read more

महात्मा बसवेश्वर यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. २६ : महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी पुष्पहार अर्पण करुन मंत्रालयात आज अभिवादन केले. यावेळी सचिव अंशु सिन्हा, उपसचिव नितीन खेडकर, अवर सचिव महेश वाव्हळ यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यांनीही अभिवादन केले.

अहमदनगर ब्रेकिंग : सारीसदृश आजाराने एकाचा मृत्यू

अहमदनगर :- पारनेर तालुक्यातील हंगे येथील शेतमजुराचा काल सारीसदृश आजाराने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गणेश वासू (मूळ रा. वाशिम) असे मृत्यू झालेल्या शेतमजुराचे नाव आहे. नगर येथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. पारनेर तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. मात्र, तालुक्यात सारीचा प्रवेश झाला आहे. मूकबधिर असलेला गणेश वासू हा आजारी पडल्याने त्याला पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयात … Read more

३ मे नंतर लॉकडाऊनचे काय होणार ? पहा काय म्हणाले मुख्यमंत्री …

मुंबई, दि. २६ : ३ मे नंतर राज्यातील लॉकडाऊनबाबत त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. उद्या (सोमवारी) पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्येदेखील यादृष्टीने चर्चा होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्वधर्मियांनी देशाप्रती कर्तव्य आणि माणुसकीची भावना दाखवून जो संयम पाळला तसाच तो पुढे देखील पाळला तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण निश्चित जिंकूत, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी … Read more

महात्मा बसवेश्वरांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

मुंबई, दि २६ : लोकशाही मुल्यांचे अग्रणी पुरस्कर्ते, जाती अंतासाठी, स्त्री उत्थानासाठी आणि कर्मकांड विरहित समाज निर्मितीसाठी आयुष्य वेचणारे महात्मा बसवेश्वर यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अभिवादन केले. तसेच अक्षय्यतृतीयेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री श्री.ठाकरे संदेशात म्हणतात, महात्मा बसवेश्वर यांनी अनुभवमंटप संकल्पनेतून लोकशाही मुल्यांना अधिष्ठान प्राप्त करून दिले. समाज कर्मकांड विरहित असावा. स्त्रियांनाही बरोबरीचे … Read more

लाॅकडाऊनच्या काळातही प्रवरेची ज्ञानगंगा पोहचली घरोघरी !

लोणी :- लाॅकडाऊनच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक टाळण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या टिचर्स अॅकॅडमीने तयार केलेल्या अभ्यासक्रमाचा लाभ संस्थेतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील सुमारे २३ हजार विद्यार्थ्यांसह इतरही शैक्षणिक संस्थांमधील सुमारे २२ हजार विध्यार्थ्यांना झाल्याने ई लर्निग शिक्षणाचा नवा प्रवरा पॅटर्न ४५ हजार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना संकटाच्या काळात दिलासा देणारा ठरला. कोव्हीड १९ चे भयग्रस्त … Read more

आनंददायी बातमी : आणखी एकजण कोरोनामुक्त

कोल्हापूर, दि. २६: जिल्ह्यातील पहिल्या दोन कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर आज शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील कोरोनामुक्त तरूणाला येथील सीपीआरमधून डिस्चार्ज देण्यात आला. या तरूणाचे दोन्ही कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोना मुक्त झाला. टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात त्याला घरी सोडण्यात आले. ही जिल्ह्यासाठी आणखी एक आनंददायी बातमी ठरली आहे. दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमाहून परतलेल्या शाहूवाडी तालुक्यातील … Read more

कोरोना प्रतिबंध जनजागृतीसाठी शिक्षकाचे स्वयंस्फूर्तीने दररोज ८ तास !

अहमदनगर :- जिल्हा प्रशासन व नगर तहसील कार्यालयाच्या आपत्ती प्राधिकरण समितीच्या भरारी पथकामध्ये  तसेच WHO व  UNICEF तसेच भारत सरकारच्या ऑनलाईन स्वयंसेवा प्रक्रियेमध्ये येथील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते तथा जगातील सर्वाधिक पारितोषिक विजेते कलाकार डॉ. अमोल बागुल गेल्या महिनाभरापासून  स्वयंस्फूर्तीने दररोज ८ तास आपले योगदान देत आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखीलेश कुमार … Read more

निवारागृहांमध्ये स्थलांतरित कामगारांसाठी समाधानकारक सुविधा

कागलमधील श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलमधील स्थलांतरित कामगारांसाठी निवारागृहाबरोबरच कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश अशा परराज्यातील १३५ आणि राज्यातील २५ कामगारांची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी कम्युनिटी किचनमध्ये निवारागृहातील कामगारांबरोबरच अन्य ठिकाणच्या कामगारांसाठी जेवण बनविण्यात येत आहे. जेवण बनवणाऱ्या स्वयंपाकी महिला तसेच इतर कर्मचारी सामाजिक अंतराबरोबरच मास्कचाही वापर करत … Read more

कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात तरुणाईचा प्रतिसाद

नंदुरबार, दि.26 : कोविड-19 विरुद्धच्या लढ्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील तरुणाईने ‘जोश-ए-वतन बढाए जा’ या भावनेने मोठ्या प्रमाणत ‘ॲण्टी कोविड फोर्स’साठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. सोबत एनसीसी विद्यार्थी, शिक्षक आणि नेहरु युवा केंद्राच्या सदस्यांनीदेखील यात सहभाग घेतला आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असल्याने सुरक्षेवर बराच ताण पडतो. शिवाय या संकटाच्या … Read more

कोरोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच रुग्ण बरे होण्यासाठी प्रयत्न करा

सोलापूर, दि. २६ : सोलापुरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याबरोबरच कोरोनाने बाधित रुग्ण बरे होण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिल्या. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भरणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस … Read more

अक्षय तृतीयेनिमित्त गोड भात वाटून शिवसेनेने केले गोरगरिबांचे तोंड गोड

अहमदनगर :- अक्षय तृतीयेचा सण साजरा करताना नगरकर लॉकडाऊन मुळे घरीच राहून हा सण साजरा करतायेत . यादिवशी घराघरात आमरस आणि पूरण पोळीचा बेत असतो . पण ज्यांच हातावर पोट आहे त्याच्या घरात गेल्या ३५ दिवसापासून साधी चूल देखील पेटू शकली नाही.अश्यांच्या आयुष्यात दोन क्षण समाधानाचे यावेत यासाठी नगर शहर शिवसेनेच्या वतीने सुरु असलेल्या अन्न … Read more

कोविड-१९ संदर्भात राज्यात आतापर्यंत ७२ हजार गुन्हे दाखल

मुंबई, दि.२६ : राज्यात सर्वत्र  सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत कलम १८८ नुसार ७२,६९८ गुन्हे दाखल झाले असून १५,४३४ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ७४ लाख ४३ हजार ३९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती गृह विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे. … Read more