संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांना जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 :-  दिल्लीतील तबलिगी जमातच्या मरकज येथील कार्यक्रमानंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी लेख लिहिला होता. त्याचा राग मनात धरून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुद्ध शुक्रवारी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तुम्ही तबलीग जमातविषयी लिहू नका; अन्यथा हात-पाय तोडून टाकू, जिवंत ठेवणार नाही अशा धमक्या भोस यांना … Read more

मोठी बातमी ; अहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ कारखाने सुरू होणार

अहमदनगर Live24 :- सरकारने लॉकडाऊन काळात जे उद्योग सुरू करण्याबाबत सवलत दिली आहे, असे कारखाने चालू करण्यासाठी कोणत्याही लेखी पूर्वपरवानगी आवश्यक नसल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शुक्रवारी सांगितले. त्यामुळे विविध जीवनावश्यक वस्तू व शेतीशी निगडित उत्पादने सुरू होऊ शकतील. अन्न व संबंधित वस्तू, साखर, दुग्धशाळा, पशुखाद्य आणि चारा युनिट, औषध, लस, सॅनिटायझर्स, साबण आणि डिटर्जंट्स, … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘सारी’ची चिंता वाढली !

अहमदनगर :- जिल्ह्यात सारी रोगाने मात्र वाढवली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सारीचे ४२ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २८ कोरोना रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी तिघांना घरी सोडण्यात आले आहे. १३ एप्रिलनंतर एकही रुग्ण आढळलेला नाही. दुसरीकडे सारीचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. दरम्यान, शुक्रवारी कोरोनाबाधित नऊ जणांचे लाळेचे नमुने १४ दिवसांनंतर तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘तुला करोना झाला आहे’ म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

अहमदनगर Live24 :- अकोले तालुक्यातील खानापूर परिसरात एका अल्पवयीन मुलीची छेडछाड काढण्यात आली. तुला कोरोना झाला आहे. चल तुला घरी सोडवितो. असे म्हणत तिला मिठी मारली. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात विनयभंग व पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा काही तासात तपास करुन पोलिसांनी अजिंक्य दामोदर मालुंजकर (रा. उंचकडक खुर्द) यास अटक केली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २४ परदेशी नागरिकांना अटक !

अहमदनगर :-  कायद्याचे उल्लंघन करून अहमदनगर जिल्ह्यात वास्तव केल्याप्रकरणी २४ परदेशी नागरिकांना अटक शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच अन्य ५ परदेशी नागरिकांना नंतर अटक करण्यात येणार आहे. सिव्हिल हास्पिटलमधून सोडल्यानंतर २४ परदेशी नागरिक व ५ भारतीयांना अटक करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांना शनिवारी न्यालयासमोर हजर केले जाणार दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये … Read more

लॉकडाउन च्या काळात मूड अप करणारी मुखवटे, अहमदनगर आणि फक्त मराठी वाहिनीची ” रसिका मित्रहो ” मैफल

                 मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण भारतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. अनेकांना अनेक अडचणी आल्या, सुरुवातीच्या आठवड्यात अनेकांना समजलंच नाही आपल्याबरोबर नेमकं काय होतंय? घरात बसण्याची सुटलेली सवय आणि अशा काही काळात आपल्याला बाहेर जाता येत नाहीये यामुळे गेलेला मूड…                 … Read more

‘घरात राहतो तशा सुविधा मिळाल्या’

लॉकडाऊन घोषित झाला आणि घराकडे जाण्याची ओढ लागली. भविष्याची चिंता मनात होतीच पण घरी पोहोचता आले नाही तर काय? हा प्रश्न जास्त कठीण होता. तसा आमचा प्रवास सुरू झाला. महाराष्ट्राच्या सीमेवर आम्हाला थांबविण्यात आल्यानंतर मोठी समस्या समोर आल्यासारखे वाटले, पण इथे घरात राहतो तशा सुविधा मिळाल्या आणि माणसांची वागणूक चांगली असल्याने घरापासून असलेला दुरावाही सुसह्य … Read more

प्रशासनाच्या ‘पॉझीटीव्हीटी’ पुढे.. कोरोना झाला ‘निगेटीव्ह’..!

बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असताना जिल्ह्यालाही आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या कोरोनाबाधीत रूग्णाचा अहवाल मृत्यूनंतर पॉझीटीव्ह आल्यानंतर जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले. त्यानंतर प्रशासनाने पॉझीटीव्ह रूग्णाच्या हायरीस्क व लो रिस्क संपर्कातील सर्वांना ताब्यात घेत त्यांचे विलगीकरण केले. त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. सदर मृत रूग्णाच्या निकट संपर्कातील … Read more

योग्य उपचार आणि सगळ्यांच्या शुभेच्छांनी संकटातून बाहेर पडल्याचा आनंद….‌

“परवा आई बरी होऊन घरी आल्यावर काकूने तिचे औक्षण करुन घरात स्वागत केले. तो क्षण म्हणजे गेल्या ३० मार्च पासून सोळा-सतरा दिवस ज्या काळजीत, धावपळीत, भीतीत आम्ही सगळे कुटुंबिय मानसिक ताण सहन करत होतो त्याचा समाधानी विसावा होता. वेळेत चाचणी करुन योग्य उपचार मिळाल्याने आणि सर्व नातेवाईक, आप्तांच्या शुभेच्छा, आईबाबांच्या चांगल्या वागण्याचे संचित या सगळ्या … Read more

शिक्षक बनले स्वयंपाकी!

वर्धा, दि. 17 : कोरोनामुळे अनेक स्थलांतरीत मजुरांना धर्मशाळेत आश्रय घ्यावा लागला आहे. त्यांची व्यवस्था करण्यासाठी शासनासोबतच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेऊन आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या या संकटसमयी शिक्षकांनी असेच माणुसकीचे दर्शन घडवत स्वतः स्वयंपाक तयार करून या निराश्रितांना मायेचे दोन घास भरवण्याचे काम करीत आहेत. जिल्ह्यात स्थलांतरीत मजुरांचा आकडा आठ … Read more

मंत्रिमंडळ उपसमितीकडून महत्त्वाचे निर्णय

मुंबई, दि. 17 : महाराष्ट्र कोरोनाविरुद्धची लढाई लढत असतानाच आर्थिक स्तरावरही आता महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात स्थावर खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरु करुन त्यांची नोंदणी पूर्ववत ऑनलाईन पद्धतीने करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आरोग्यविषयक कामांची गरज लक्षात घेऊन चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन योजनेचा 25 टक्के निधी आरोग्यविषयक कामांकडे वळवण्यात येणार आहे. आरोग्य विभाग, … Read more

कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्राला आर्थिक सहकार्य करावे

मुंबई, दि. 17 : कोरोनाविरुद्धचा लढा महाराष्ट्र सर्व आघाड्यांवर पूर्ण क्षमतेने लढेल आणि जिंकेलही, त्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक आघाडीवर महाराष्ट्राला सहकार्य करावे, अशी विनंती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना येणे असणारी जीएसटीची थकबाकी मिळावी, जीएसटीची पुढील रक्कम दरमहा वेळेवर मिळावी, राज्याच्या उत्पन्नातील अपेक्षित … Read more

लॉकडाऊनच्या काळात सायबरचे २२७ गुन्हे दाखल

मुंबई दि. 17 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात 227 गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य सोशल मीडिया (social media) वर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र सुरु

मुंबई दि. 17 : अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर धाडसत्र सुरु आहे. काल दिनांक 16 एप्रिल 2020 रोजी राज्यात 124 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून 22 लाख 22 हजार रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 24 मार्च 2020 ते 16 एप्रिल 2020 पर्यंत राज्यात 2 हजार 933 … Read more

हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांकडून हेक्टरी ११.२९ क्विंटल हरभरा खरेदी होणार

मुंबई दि. १७: रब्बी हंगाम २०२० चा कापणी अहवाल शासनाने स्वीकारला आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यात हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांचा हरभरा ६.५० क्विंटल ऐवजी आता ११.२९ क्विंटल खरेदी केला जाणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच लातूर जिल्ह्यात रब्बी हमीभाव केंद्र उशीराने सुरू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ०४ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह

अहमदनगर :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी रात्री १३ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात ०४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.तर, उर्वरित ०९ अहवाल नाकारण्यात आले असून ते जिल्हा रुग्णलयाकडे परत पाठविण्यात आले आहेत. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish … Read more

राज्यात ४९ लाख ८६ हजार ३६५ क्विंटल अन्नधान्याचे वाटप – मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई, दि.17 : राज्यातील 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि.1 ते 17 एप्रिल 2020 या सतरा दिवसात राज्यातील 1 कोटी 41 लाख 43 हजार 626 शिधापत्रिका धारकांना तब्बल 49 लाख 86 हजार 365 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन … Read more

लॉकडाऊन कालावधीत राज्यात आतापर्यंत ५० हजार गुन्हे दाखल

मुंबई, दि.17 : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.22 मार्च 17 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 49,756 गुन्हे दाखल झाले आहेत तर 10,276 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 32,424 वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबर वर 70, … Read more