Samsung Galaxy S24 Ultra वर मोठी ऑफर ! तब्बल 34,458 ने स्वस्त, किंमत 1 लाखांच्या खाली

Samsung Galaxy S24 Ultra हा Samsung च्या S-सिरीजमधील सर्वात अॅडव्हान्स्ड आणि पॉवरफुल स्मार्टफोन आहे. अत्याधुनिक AI फीचर्स, शक्तिशाली Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, 200MP कॅमेरा आणि जबरदस्त QHD+ AMOLED डिस्प्ले यांसारख्या वैशिष्ट्यांसह हा फोन मोबाईल टेक्नोलॉजीमध्ये आघाडीवर आहे हा स्मार्टफोन प्रोफेशनल ग्रेड फोटोग्राफी, गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी एक उत्तम पर्याय आहे. त्याचा One UI 7 सह … Read more

रिझर्व्ह बँक व्याजदर कपात करण्याची शक्यता ; महागाई कमी होण्याचा परिणाम

१० मार्च २०२५ नवी दिल्ली: जानेवारीमध्ये देशातील महागाईचा दर ५.२२ टक्क्यांवरून ४.३१ टक्क्यांवर घसरला. सलग चार महिने महागाई ५ टक्क्यांपेक्षा जास्त राहिल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेच्या स्वीकारार्ह ४ टक्क्यांच्या लक्ष्याजवळ गेली. यामुळे संभाव्य दर कपातीची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सध्या रेपो दर ६.२५ टक्के आहे, असे मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडच्या अहवालामध्ये म्हटले आहे. बाजारातील परिस्थिती … Read more

गुंतवणुकीच्या बाबतीत चांदीची चमक कायम ! यावर्षी दिला ‘इतक्या’ टक्के परतावा

१० मार्च २०२५ नवी दिल्ली : जागतिक अनिश्चिततेच्या काळात, चांदीदेखील गुंतवणूकदारांना आकर्षित करीत आहे आणि यावर्षी आतापर्यंत सुमारे ११ टक्के परतावा दिला आहे. पुढील दोन-तीन वर्षांत चांदी परताव्याच्या बाबतीत चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीमध्ये जास्त चढ-उतार असल्याच्या कारणाने गुंतवणूक मालमत्ता तसेच औद्योगिक धातू म्हणून उपयुक्त आणि आकर्षक आहे. … Read more

सुजय विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं ! शिर्डीत लूट थांबणार भाविकांसाठी नवी नियमावली, दुकानदाऱ्या…

शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर शहरात कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. परिणामी, आता अतिक्रमण काढण्याची मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे, बेघरांसाठी निवास व्यवस्थेवर भर दिला जात आहे, तसेच साईभक्तांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सक्रिय झाले आहे. साईभक्तांकडून अनावश्यक शुल्क आकारणे, फसवणूक, चुकीचे व्यवहार, तसेच अवाजवी किमती लावणे या प्रकारांना आळा घालण्यासाठी दुकानदारांसाठी नवीन नियमावली तयार केली … Read more

बाळासाहेब थोरात आक्रमक ! म्हणाले निळवंडे प्रकल्पाचा लढा जिंकला, पण आता अपर तहसीलसाठी…

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे स्थापन करण्यात आलेले अपर तहसील कार्यालय अनेक गावांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील तळेगाव दिघे, घारगाव, साकुर आणि अन्य गावांतील नागरिकांना अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने जनतेच्या सोयीचा विचार न करता निर्णय घेतला असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटी सदस्य बाळासाहेब थोरात यांनी केली. अपर तहसील कार्यालये जनतेसाठी … Read more

ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय! शिव्या बंदी आणि विधवा सन्मान कायदा करण्याची मागणी”

कुकाणे-सौंदाळे ग्रामपंचायतीने ग्रामसभेत शिव्या बंदी आणि विधवा महिलांच्या सन्मानासाठी ठराव मंजूर केला आहे. मात्र, या निर्णयाला शासनाची अधिकृत मान्यता मिळावी आणि संपूर्ण राज्यात अमलात यावा, यासाठी सौंदाळे ग्रामपंचायतीचे सरपंच शरदराव आरगडे यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उपोषण सुरू केले आहे. ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता गावातील सिद्धेश्वर मंदिराच्या सभामंडपात त्यांनी हे बेमुदत उपोषण सुरू … Read more

Railway News | वंदे भारत धावली आता हायड्रोजन ट्रेन देखील रुळावर येणार ! ‘या’ मार्गावर सुरू होणार देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन

Railway News

Railway News : ब्रिटिश काळात सुरू झालेल्या भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा गेल्या काही वर्षांमध्ये पूर्णपणे बदलला आहे. खरे तर भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच मोठी आहे. रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात विस्तारलेले आहे आणि यामुळे देशातील कोणत्याही कोपऱ्यात जायचे म्हटले की सर्वप्रथम रेल्वेचे नाव ओठांवर येते. रेल्वे प्रवासाला पसंती दाखवण्याचे दुसरे मोठे कारण असे … Read more

हिंदूची भुमिका घेतल्यानेच माझा विजय : आ. कर्डिले

१० मार्च २०२५ अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीत हिंदुची भूमिका घेतल्यामुळे माझा नगर राहुरी पाथर्डी मतदार संघात माझा विजय झाला. गावात राजकारण गट तट असू द्या मात्र प्रत्येकानी हिंदुची भूमिका बजवावी नाही तर येणारा भविष्यकाळ हा धोक्याचा असणार आहे असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी केले. कापुरवाडी (ता. आहिल्यानगर ) येथील सरपंच सचिन दुसुंगे यांनी आ. … Read more

शिर्डीतील गर्दी घटली ! साईभक्त का होत आहेत दूर? भाविकांमध्ये चिंता वाढली

देशभरातील प्रमुख २१ तीर्थस्थळांवर भाविकांची गर्दी वाढत आहे, मात्र शिर्डीत अपेक्षेप्रमाणे वाढ होत नसल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. शिर्डीतील व्यावसायिक, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त करत उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी चिंतन बैठक घेतली. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार सुरेश चव्हाणके यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मते, साईबाबांविषयी चालू असलेल्या अपप्रचाराचा परिणाम शिर्डीच्या अर्थव्यवस्थेवर … Read more

बिबट्याचा थरार! उसाच्या शेतातून बाहेर पडत वृद्धावर हल्ला, 3 तरुण जखमी

अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर जवळील कोहंडी शिवारात रविवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. ऊस तोडण्यापूर्वी शेतकऱ्याने उसाचे क्षेत्र जाळल्याने, त्यात लपलेला बिबट्या अचानक धावत बाहेर आला. समोर झाडाखाली बसलेल्या यशवंत रामा कचरे (वय ६५) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो पुढे पळाला, मात्र परत माघारी फिरत त्याने राजू रामचंद्र परते (वय २५), कैलास प्रकाश … Read more

जास्त तेल खाल्ल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम! तुमच्या कुटुंबात किती तेल वापरले जाते?

अन्न शिजवण्यासाठी तेलाचा वापर अपरिहार्य आहे, परंतु त्याचा अतिवापर आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतो. आहारतज्ज्ञांच्या मते, चार सदस्यांच्या कुटुंबासाठी महिन्याला दोन लिटरपेक्षा कमी तेलाचा वापर योग्य आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणी आणि दुकानदार, गृहिणी यांच्याशी संवाद साधल्यानंतर एका कुटुंबात सरासरी पाच लिटरपर्यंत तेल वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतात वाढता लठ्ठपणा देशभरात लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत … Read more

नगर तालुक्यात धर्मांतर करणारी टोळी सक्रिय ? रोख रक्कमेसह लग्न करून देण्याची दिली जाते हमी

१० मार्च २०२५ चिचोंडी पाटील: ग्रामीण भागातील अनेक तरूणांचे विवाह रखडलेले आहेत. त्याचसोबत अनेकजण आर्थिक विवंचनेत आहेत. नेमका याच संधीचा पुरेपुर फायदा घेत नगर तालुक्यात धर्मांतर करणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. यांच्याकडून अशा तरूणांना त्याचा विवाह लावून देण्यासह आर्थिक मदत देण्याचे आश्वसन देत धर्मांतर करण्यास भाग पाडत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नगर तालुका तसा … Read more

अहिल्यानगरमध्ये सात लाख रेशन बंद होण्याचा धोका ! तुमचं रेशन कार्ड वैध आहे का?

अहिल्यानगरमध्ये रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी (Know Your Customer) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाने १५ मार्च २०२५ ही अंतिम मुदत जाहीर केली असून, या तारखेनंतर ई-केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांना रेशन मिळणार नाही. जिल्ह्यातील सुमारे ७ लाख १२ हजार ४८५ कार्डधारकांपैकी फक्त ६८ टक्केच लाभार्थ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांनी तातडीने ई-केवायसी करणे आवश्यक … Read more

Ahilyanagar Breaking : गोरक्षकांना धमक्या; ठाकरे गटाचे साजन पाचपुते यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

श्रीगोंदे तालुक्यातील कोकणगाव येथे गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने १४ गोवंश जनावरांची सुटका केली. या जनावरांना कत्तलीसाठी डांबून ठेवण्यात आले होते. मात्र, गोरक्षकांनी पोलिसांना माहिती देताच स्थानिक नागरिकांनी गोंधळ घातला आणि जनावरे सोडण्यास विरोध केला. इतकेच नव्हे, तर गोरक्षकांना धमक्या देत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्यासह सात जणांवर गुन्हा … Read more

अकोले तालुक्यात महिला अत्याचाराच्या घटनांत मोठी वाढ : सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

१० मार्च २०२५ अकोले : अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सन २०२३ मध्ये ५६ गुन्हे दखल झाले होते, तर २०२४ मध्ये ही संख्या ८५ वर पोहोचली आहे. यामध्ये बलात्कार, विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. अकोले पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण ७९ गावे येतात. पोलिस ठाण्याच्या … Read more

अहिल्यानगर मध्ये थंडी संपली, आता उन्हाचा कहर सुरू! 10 मार्चपासून तापमान 40 अंशांवर

अहिल्यानगरमध्ये गेल्या १८ दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. रविवारी शहरातील दिवसाचे तापमान ३७ अंश सेल्सियसवर पोहोचले, तर पुढील दोन दिवसांत ४० अंश सेल्सियसपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. तापमानात झपाट्याने वाढ नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात शहराचे दिवसाचे तापमान १० अंश सेल्सियसपर्यंत खाली गेले होते. … Read more

यंदा शाळांच्या उन्हाळी सुट्टया १५ दिवसांनी घटल्या ! शिक्षकांसमोर ४ दिवसांत निकाल देण्याचे आव्हान

१० मार्च २०२५ शहापुरः दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात परीक्षा होऊन विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टया दिल्या जात होत्या. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ मे नंतर शैक्षणिक सुट्टया लागत होत्या. मात्र यंदा पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकर सुरू होणार आहेत. परंतु त्यानंतर अर्थात एप्रिलच्या उत्तरार्धात मूल्यमापन चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे विद्याथ्यर्थ्यांना २५ … Read more

विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची खेळी ! अजित पवारांचा अहिल्यानगरमधून उमेदवार ?

Maharashtra Politics : महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिपद वाटपावरून अनेक असंतोष उफाळले होते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही हे चित्र पाहायला मिळाले. काही नेत्यांना मंत्रीपद मिळाले नाही, तर काहींना मिळालेले खाते समाधानकारक नव्हते. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजीनाट्य सुरूच होते. आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही हीच डोकेदुखी पुन्हा समोर येण्याची शक्यता होती. अजित पवारांची रणनीती या … Read more