अहमदनगर ब्रेकिंग : आईने केली मुलीसह आत्महत्या, मुलीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी केला गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा : स्वत:च्या पोटच्या सहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडवून तिचा खून केल्याप्रकरणी मयत सुमन उर्फ मीना गणेश आढाव, हिच्या विरोधात बेलवंडी पोलिस स्टेशनला पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:च्या मुलीच्याच खून प्रकरणी मृत्यू पावलेल्या आई विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाल्याची ही विचित्र घटना … Read more

वासुंदे परिसराचा चेहरामोहरा बदलणार : आ. लंके

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर : पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील आदिवासी गोपाळदरा व परिसरात आदिवासी ठाकर व भिल्ल समाजाचे प्रमाण मोठे असून,  गेल्या ५० वर्षांपासून त्यांचे प्रश्न आजतागायत कायम आहेत, त्यामुळे यापुढील काळात वासुंदे व परिसरातील आदिवासी पट्टयाचा चेहरामोहरा बदलविण्याचे सूतोवाच आमदार नीलेश लंके यांनी केले. वासुंदे (ता. पारनेर) येथील ठाकरवाडी व गोपाळदरा येथील … Read more

दोन लाखांच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली आहे. हे करत असताना एकाही शेतकऱ्याला रांगेत उभे राहून फॉर्म भरण्याची गरज पडली नाही. दोन लाखांच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचाही प्रश्न सुटणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. संगमनेर येथील मालपाणी लॉन्समध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने … Read more

जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन करण्यात आला आहे. यामध्ये मोहिते-पाटील कुटुंबातील दोन सदस्यांसह सहा जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे. या जिल्हा परिषद सदस्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान न करता भाजप आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं. यामुळे पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत या सहा सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे. सोलापूर … Read more

विषारी औषध गेल्याने महिलेचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर : श्रीरामपूर तालक्यातील पढेगाव येथील रतन सखदेव पवार, वय ६० वर्ष या महिलेच्या पोटात काहीतरी विषारी औषध गेल्याने तिला आत्मामलिक हॉस्पिटल कोकमठाण, कोपरगाव येथे उपचारासाठी जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना ७ जानेवारीच्या रात्री रतन सुखदेव पवार या महिलेचा मृत्यू झाला. आत्मा मलिक हॉस्पिटल कोकमठाण … Read more

आई-वडिलांची पदे गेल्याने विखे कुटुंबाचे नव्हे तर सर्वसामान्यांचे नुकसान- खासदार डॉ. सुजय विखे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणात आपल्या आई – वडिलांची पदे गेल्याने विखे कुटुंबाचे नुकसान झाले नसून सर्वसामान्यांचे नुकसान झाल्याचा दावा खासदार डॉ . सुजय विखे यांनी केला. नगरपालिकेच्या कार्यालयात आयोजित केलेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर होते. आपण देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून घरकुल योजनेतील … Read more

नातेवाईकाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून फोडले डोके

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासा : नेवासा बु. येथे राहणारे अशोक बहिरू तोडमल, वय ३१ या तरुणास घर बांधकाम करु नको, असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली व डोक्यात कुऱ्हाड व लाकडी दांड्याने मारहाण करुन डोके फोडले. जखमी अशोक बहिरु तोडमल या तरुणाने नेवासा पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी बहिरु सयाजी तोडमल, संदीप बहिरु … Read more

अल्पवयीन मुलीस घरुन पळवले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ राहुरी:  येथील जुना कणगर रोड परिसरात वस्ती भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील १६ वर्ष ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला संदीप नावाच्या आरोपीने  काहीतरी फूस लावून अज्ञात कारणासाठी घरुन पळवून नेले . याप्रकरणी मुलीचे वडील यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अल्पवयीन मुलीस पळविणारा आरोपी संदीप शिवाजी माळी रा . सरोदे वस्ती , राहुरी … Read more

बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टीकेबद्दल फडणवीस म्हणतात…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टीकेला योग्यवेळी उत्तर देईल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी म्हटले आहे. हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले…. नगर येथे शनिवारी दिलेल्या धावत्या भेटीत रखडलेल्या जिल्हाध्यक्ष नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर चर्चा न झाल्याने कार्यकर्त्यांचा मात्र हिरमोड … Read more

घरात घुसून तरुणीचा विनयभग

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुक्यातील निंबाळे परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्ष वयाच्या तरुणीस आरोपी रमजान इब्राहीम पठाण , रा . तळेगाव , ता . संगमनेर याने फोन करुन फोनवर लज्जा उत्पन्न होईल , असे बोलून तरुणीच्या घरी कोणी नसताना घरात घुसून तिला धरुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला. ४ जानेवारी … Read more

या कार चालकाला पोलिसांनी केलाय 27 लाखांचा दंड कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदाबाद येथे एका महागड्या पोर्शे स्पोर्ट्स कारच्या मालकाला वाहतूक पोलिसांनी तब्बल 27 लाखांचा दंड ठोठावला आहे. देशातील सर्वाधिक दंडाची ही रक्कम आहे. RTO @cotguj slaps a fine of total INR 27.68 Lakh on Porsche Car which was detained during a routine check by Ahmedabad Traffic West Police for not having … Read more

हृदयद्रावक ; मुलांचे पोट भरण्यासाठी आईने स्वताच्या डोक्यावरचे केस विकून घेतलं जेवण !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- आईच प्रेम काय असतं हे या बातमीचे हेडलाईन वाचून तुम्हाला कळालेच असेल.स्वताच्या मुलांना एका वेळेचे जेवण देण्यासाठी या माउलीने चक्क स्वताच्या डोक्यावरील केलं कापून विकले आहेत…  IndiaTimes ने दिलेल्या वृत्तानुसार महिलेने चिमुकल्यांसाठी केस कापून मिळवलेल्या पैशात जेवण विकत घेतलं. तामिळनाडू राज्यातील सेलममध्ये ही घटना घडली. पोटचा गोळा भुकेनं व्याकूळ असेल … Read more

अजय देवगनच्या तान्हाजी सिनेमाबाबत उदयनराजे भोसले म्हणाले…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- तान्हाजी : द अनसंग वॉरिअर या सिनेमाने पहिल्याच दिवशी लक्षवेधी कमाई केली आहे. आकड्यांमध्ये बोलायचं झाल तर सिनेमाने पहिल्या दिवशी 16 करोड रुपयांची कमाई केली. एवढंच नव्हे तर या सिनेमांना थोडं राजकीय वलय देखील निर्माण झालं होतं. याचा फायदा आणि फटका दोघांनाही झाला आहे. अजय देवगनच्या समर्थनाकरता भाजपचे अनेक नेते … Read more

स्वीकृत नगरसेवक पदावरून अहमदनगर शहर भाजपात ‘आर्थिक’ वाद !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर महानगर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून अहमदनगर शहर भाजपात चांगलेच वाद झाल्याचे समोर आले आहे. पक्षाकडून एक नाव आले, अन् स्वतःच्या अधिकारातच महापालिकेच्या दोन पदाधिकार्‍यांनी दुसर्‍याचाच अर्ज दाखल केल्याने भाजपमध्ये चांगलीच रणधुमाळी निर्माण झाली. हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले…. रात्री … Read more

नगरसेवक गुंड आहेत काय ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महापालिकेची महासभा सुरू झाली आणि द्विवेदींनी स्वीकृत नगरसेवकपदांसाठी आलेल्या पाचही प्रस्तावांची छाननी केली असून, कागदपत्रांच्या त्रुटी असल्याने हे पाचही प्रस्ताव अमान्य करत तशी शिफारस महापौरांना करीत असल्याचे स्पष्ट केल्यावर महासभेत सन्नाटा पसरला व सर्वच नगरसेवक सुन्न झाले. अखेर आयुक्तांनी अमान्य केलेल्या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब करणेच महापौर वाकळेंनी पसंत केले. पण त्यानंतर भाजप, … Read more

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचे दिल्लीत झाले हाल, करावा लागला या गोष्टींचा सामना !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिल्लीत त्रास झाला, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा त्याना चांगलाच फटका बसला. आचारसंहितेचे कारण देत महाराष्ट्र सदनाने थोरात यांना वाहन नाकारले. त्यामुळे थोरात यांची गैरसोय झाली. मात्र बाळासाहेब थोरात यांच्याकडून महाराष्ट्र सदनात राहण्यासाठी मात्र राजशिष्टाचारानुसार केवळ ५०० रुपये शुल्क घेण्यात आले. थोरात पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी आले होते. विमानतळ … Read more

तरुणीला अश्लिल हातवारे करत जिवे ठार मारण्याची धमकी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पाथर्डी शहरात इंदिरानगर परिसरात एक १८ वर्षाची तरुणी तिच्या घरासमोर उभी असताना १२.३० च्या सुमारास आरोपी महेंद्र सुरेश अरगडे,रा.सपकाळ वस्ती,शिरसाठवाडी पाथर्डी हा तेथे आला व सदर तरुणीकडे पाहून अश्लिल हातवारे करुन लज्जा उत्पन्न होईल,असे वर्तन करुन तरुणीची आई आली असता तिला व तरुणीला शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कॉलेजला गेलेल्या तरुणीला फूस लावून पळवून नेले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर तालुक्यात कॉलेजला गेलेल्या तरुणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली,या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  भोकर परिसरात राहणार्या एका कुटुंबातील १६ वर्ष वयाची अल्पवयीन तरुणी ८ जानेवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता एसटी बसने श्रीरामपूर येथील कॉलेजला जाते, असे सांगून घरातून गेली, परंतु ती रोजच्या प्रमाणे कॉलेज संपल्यानंतर … Read more