वाळू तस्करांना दणका तब्बल ६४ लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीगोंदा : पोलिसांनी सध्या वाळूतस्करांकडे आपला मोर्चा वळवला असून, गत दोन दिवसात पोलिसांनी चोरटी वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर,चार ट्रक, एक डंपर जवळपास १७ ब्रास वाळू असा एकूण ६३ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या फिर्यादीवरून चोरटी वाळू वाहतूक केल्याप्रकरणी सात जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर … Read more

अरे बापरे ! ह्या देशात वर्षभरात तिसऱ्यांदा निवडणूक !

जेरुसलेम : राजकीय अस्थिरतेच्या गर्तेत अडकलेल्या इस्त्रायलमध्ये वर्षभराच्या कालावधीत तिसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. स्पष्ट बहुमताअभावी कोणत्याही पक्षाला निर्धारित वेळेत सरकार स्थापन करता न आल्यामुळे २ मार्च रोजी पुन्हा निवडणूक घेण्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. सप्टेंबरमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या पक्षासह कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे याठिकाणी त्रिशंकू अवस्था निर्माण झाली … Read more

अवघ्या 16 वर्षांची ही मुलगी ठरली ‘पर्सन ऑफ द इअर’

न्यूयॉर्क : हवामान बदलाच्या विरोधात लढा देणाऱ्या स्वीडनच्या १६ वर्षीय ग्रेटा थनबर्गला अमेरिकेच्या ‘टाइम’ मासिकाने यंदाची ‘पर्सन ऑफ द इअर’ म्हणून घोषित केले आहे. हा बहुमान मिळवणारी ग्रेटा ही सर्वात तरुण व्यक्ती बनली आहे. जगप्रसिद्घ ‘टाइम’कडून १९२७ पासून ‘पर्सन ऑफ द इअर’ निवडण्यात येतो. शालेय विद्यार्थिनी असलेल्या ग्रेटाने हवामान बदलाविरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे. … Read more

आवर्तन पाहिजे असेल तर थकीत पाणीपट्टी भरा !

कोपरगाव : गोदावरी उजव्या कालव्याला रब्बी आवर्तन सुटणार असून, आधी थकीत पाणीपट्टी भरण्याची सक्ती केल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे. रब्बी आवर्तन नसल्याने पाटबंधारे विभागाकडून पाणी मागणीचा ७ नंबर फॉर्म भरून घेतले जात आहेत. मात्र, ज्यांची थकीत पाणीपट्टी असेल त्यांना पाणीपट्टी भरणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजीची पसरली आहे. कोपरगाव तालुक्यातील … Read more

सावधान ! महागडी चारचाकी स्वस्तात देवून ऑनलाईन गंडा घालणारे रॅकेट सक्रीय 

अहमदनगर :- अत्यंत कमी वापरलेली महागडी चारचाकी स्वस्तात देतो. म्हणून ऑनलाईन गंडा घालणारे रॅकेट सक्रीय झाले आहे.या रॅकेटने अनेकांना गंडा घातला असून, नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही स्वस्तातल्या गाडीच्या अमिषाने अनेकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे ऑनलाईन गुन्हेगार स्वत: लष्करात सेवेत असल्याचे भासवत आहेत. संगमनेर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील एका युवकाला चारचाकी घ्यायची … Read more

कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांना मिळाले हे मंत्रीपद !

संगमनेर : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांची महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात महत्त्वाच्या अशा महसूल, ऊर्जा व शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी मिळाल्याने गुरुवारी (दि.१२) सायंकाळी संगमनेरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकच जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. ना. थोरात यांनी यापूर्वी महसूल खात्याची जबाबदारी सक्षमपणे सांभाळताना या खात्याला लोकाभिमुख व गतिमान केले होते. … Read more

टेम्पो पलटी होवून तीन मजूर जागीच ठार

संगमनेर : तालुक्यातील आश्वी परिसरातील हंगेवाडी व ओझर रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्यामध्ये मालवाहू कापसाचा टेम्पो पलटी होवून तीन मजूर जागीच ठार झाले. गुरुवारी (दि. १२) दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास घडली आहे. शेख परवेज शेख नासिर (वय २१, इस्लामपुरा, जामनेर, जि. जळगाव), शेख जुनेद शेख भिकन (वय १९, बिस्मील्ला नगर, जामनेर, जि.जळगाव), शेख फरहान … Read more

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास अटक

वृत्तसंस्था :- अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यामुळे ती गर्भवती झाल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील नगर कोतवाली पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. कोतवाली परिसरात एका व्यक्तीने २६ नोव्हेंबर रोजी केलेल्या तक्रारीत बालेंद्र राजपूत याने १६ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला, त्यामुळे ती गर्भवती झाली असल्याचा आरोप केला असल्याची माहिती महोबाचे पोलीस अधीक्षक मणिलाल पाटीदार … Read more

अखेर राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा !

नवी दिल्ली :- सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अयोध्येतील वादग्रस्त भूखंडप्रकरणी देण्यात आलेल्या ऐतिहासिक निर्णयाला आव्हान देणाऱ्या सर्वच १८ फेरविचार याचिका फेटाळून लावल्या. यामुळे राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असणारा हा खटला अधिकृतरीत्या बंद झाला असून, अयोध्येतील २.७७ एक्करच्या वादग्रस्त भूखंडावर राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गत ९ नोव्हेंबर रोजी अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक न्यायनिवाडा केला … Read more

काँग्रेस आघाडीचे सरकार आले, तर सर्वात आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी !

झारखंड :- केंद्रातील मोदी सरकार हे मूठभर भांडवलदारांसाठी काम करत असल्याची जोरदार टीका पुन्हा एकदा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी झारखंडमधील सभेत बोलताना केली. त्याचबरोबर राज्यात जर काँग्रेस आघाडीचे सरकार आले, तर सर्वात पहिले शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला जिंकून देण्याचे आवाहन करत, राहुल गांधी यांनी मोदी … Read more

भारतातील ही अभिनेत्री ठरली दशकातील सर्वात आकर्षक महिला

लंडन :- बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट यंदाची, तर अभिनेत्री दीपिका पादुकोण ही दशकातील सर्वात आकर्षक महिला ठरली आहे. ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये बुधवारी जारी करण्यात आलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात या दोघींना हा बहुमान देण्यात आला. ब्रिटिश साप्ताहिक वृत्तपत्र ‘ईस्टर्न आय’ने आशियातील सर्वात आकर्षक महिलांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार २०२० च्या ऑस्करसाठी भारताकडून पाठविण्यात आलेल्या ‘गली बॉय’ … Read more

भारतीय जनता पक्ष माझ्या बापाचा,तो सोडणार नाही !

बीड :- भारतीय जनता पार्टी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी कार्यालयातून बाहेर काढून घराघरात पोहोचवली. त्यासाठी वाट्टेल तो संघर्ष केला. यामुळे हा पक्ष माझ्या बापाचा असून आपण तो सोडणार नाही, अशी भूमिका माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केली. याचबरोबर पक्षातील काही लोकांना आपण पक्षात नसावे, असे वाटत असेल तर तो निर्णय मात्र त्यांनी घ्यावा, असा … Read more

निळवंडे प्रकल्पाबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला हा निर्णय

मुंबई :- निळवंडे धरणाचे काम येत्या जूनअखेर पूर्ण करून धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध होईल यासाठी ‘निळवंडे’ प्रकल्पाच्या कामाला अधिक गती देऊन, कालबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्याचे आदेश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. आज मंत्रालयात ऊर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे-2) संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रकल्पाचा पूर्ण आढावा घेऊन प्रकल्पाच्या कामात काय … Read more

पंचायत समिती पाथर्डीच्या सभापतिपदी सुभाष केकाण?

पाथर्डी : पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटासाठी निघाले. एकूण दहा सदस्य असलेल्या सभागृहात आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. त्या ठरवतील तोच सभापती होईल. नागरिकांचा मागास प्रवर्ग गटात अकोला गणाचे सदस्य सुभाष केकाण एकमेव आहेत. पंचायत समिती गणावर या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभुत्व होते. राजळेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत … Read more

डॉ. वंदना मुरकुटे यांची पंचायत समितीच्या सभापती पदी वर्णी लागणार

श्रीरामपूर : पुढील अडीच वर्षांसाठी पं. स. सभापतिपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाल्याने टाकळीभान गणातील डॉ. वंदना मुरकुटे यांची या पदी वर्णी लागणार आहे. पंचायत समितीत चार महिला तर चार पुरुष सदस्य आहेत. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत दोन्ही गटांचे चार सदस्य निवडून आले. सभापतिपद खुले असल्याने चिठ्ठी टाकून दीपक पटारे यांची लॉटरी लागली. आरक्षण सोडतीत नागरिकांचा … Read more

थोरात कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत केला जल्लोष

संगमनेर: बाळासाहेब थोरात यांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात महसूल, ऊर्जा व शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी मिळाल्याने कार्यकर्त्यांनी आतषबाजी करून ‘यशोधन’समोर गुरुवारी जल्लोष केला. थोरात यांनी यापूर्वी महसूल खात्याची जबाबदारी सक्षमपणे सांभाळताना या खात्याला लोकाभिमुख व गतिमान केले होते. महसूल विभाग हायटेक बनवताना ऑनलाईन सात-बारासह पारदर्शी व चांगल्या कामातून या विभागाची लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली … Read more

संतापजनक : डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्या बालिकेचा मृत्यू

अहमदनगर: जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्या बालिकेचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे यांना या घटनेबाबत विचारले असता, त्यांनी सुटीवर असल्याचे सांगितले. रूग्णालयात संपर्क केला असता या घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. राहुरी तालुक्यातील जांभळी भागातील वावरथ येथे ऊसतोडणी कामगार अनिल शंकर राठोड यांच्या अक्षरा (४) या मुलीला … Read more

माझे लग्न का करत नाही म्हणत जन्मदात्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण खून

सातारा : माझ्यापेक्षा लहान मुलांची लग्ने झाली. माझे लग्न का करत नाही, असे म्हणत मुलाने चक्क आपल्या जन्मदात्या आईला कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालत निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याती मोराळे या गावात घडली. वडूज पोलिसांनी मुलगा किरण शहाजी शिंदे (२८) याला ताब्यात घेतले आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास आरोपी किरण शिंदे … Read more