मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत !

मुंबई :- राज्यातील सत्तापेचाचा निर्णय आणखी तसाच कायम आहे. तर देवेंद्र फडणवीस सरकारला आपली बाजू न्यायालयात मांडण्यासाठी आणखी 24 तासांचा अवधी मिळाला आहे.  शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला असून त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ झालीय. १६२ आमदारांच्या सह्यांचं पत्र महाआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना दिलं. … Read more

आणि आमदार म्हणाले अजित पवार यांच्याकडून फोन आले….

मुंबई : आपलेच सरकार स्थापन होणार आहे त्यामुळे काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही असा दिलासा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला आहे.  खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना ‘रेडीसाँ’ या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. दोन्ही नेत्यांनी संयुक्तरीत्या या आमदारांशी संवाद साधला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनीही … Read more

अजित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट !

मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या कार्यकर्त्यांसमोर आपण भाजपला का पाठिंबा दिला याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. भेटायला गेलेल्या कार्यकर्त्यांनी ही माहिती एका मराठी वृतावाहीनीला दिली आहे. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठका होऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. मला आता शब्द फिरवायला सांगितला जात आहे, असं अजित पवारांनी बारामतीतील … Read more

Maharashtra Politics Live Updates : फडणवीस सरकारला दिलासा !

मुंबई : महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच आता वेगळं वळण घेत आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कोर्टात आहे. शनिवारी झालेल्या शपथविधीविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी संयुक्त याचिका दाखल केली होती. यासंदर्भात सोमावरी सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू आहे  Live Updates जवळपास दीडतास युक्तीवाद झाल्यानंतर कोर्टाने विश्वासदर्शक ठरावाचा निर्णय मंगळवारी 10.30 पर्यंत राखीव ठेवला विश्वासदर्शक ठराव तातडीने … Read more

नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक !

जामखेड :- तालुक्यातील धोंडपारगाव येथील जि. प. शाळेचा (दत्तवाडी) मुख्याध्यापक संभाजी कोंडीबा सरोदे (राहणार जामखेड) याने नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. न्यायालयाने त्यास २६ पर्यंत पोलिस कोठडी दिली. शनिवारी सायंकाळी पाच वाजता सरोदे नान्नजहून जामखेडकडे कारने येत होता. राजेवाडीफाटा येथे त्याच्या शाळेतील विद्यार्थिनी रस्त्याच्या बाजूला घरासमोर … Read more

राहुरीत दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे ठार

राहुरी :- तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे ठार झाले. शनिवारी मध्यरात्री दीड-दोनच्या सुमारास नगर-मनमाड मार्गावर या घटना घडल्या आहेत. पहिला अपघात राहुरी फॅक्टरी येथील संख्येश्वर पेट्रोल पंपाजवळ झाला. रमेशकुमार थापा (वय २१, नेपाळ) हा तरूण मोटरसायकलीवरून (एमएच १७ एए ७९९६) राहुरीकडून लोणीच्या दिशेने जात होता. राहुरी फॅक्टरी येथे अज्ञात वाहनाची धडक बसून रमेशकुमार जागीच ठार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नववीतील विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस अटक !

पारनेर :- विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या अविनाश वामन मधे (२० वर्षे, म्हसोबा झाप) याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलीवर अत्याचार होण्याची पंधरा दिवसांतील ही तिसरी घटना आहे. मधे हा दुचाक्या चोरीतील आरोपी असल्याची माहितीही पुढे आली. २२ नोव्हेंबरला ही मुलगी मैत्रीणीबरोबर पवळदरा येथून शाळेत निघाली असता घाटात अविनाश दुचाकीवरून आला. … Read more

नगर-दौंड महामार्गावर अपघातात एक जागीच ठार

श्रीगोंदे :- तालुक्यातील नगर-दौंड महामार्गावर विसापूर फाट्याजवळ टाटा सफारी वाहनाचा वेग चालकाला आवरता न आल्याने वाहन उलटून चालक जागीच ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाले. महानुभाव पंथाच्या लोकांना धार्मिक कार्यासाठी नगरहून फलटणकडे घेऊन जाणाऱ्या टाटा सफारी (एमएच १६. एजे ५०६७) वाहनाचा रविवारी सकाळी ७ च्या सुमारास विसापूरफाट्या जवळ अपघात होऊन वाहनचालक चंदन किसन शिंदे … Read more

प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी !

रांची :- राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यास प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल, असे आश्वासन काँग्रेस पक्षाने झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जारी केलेल्या जाहीरनाम्यात दिले आहे. झारखंडचे काँग्रेसचे प्रभारी आर. पी. एन. सिंह यांनी रविवारी येथे जाहीरनामा जारी करताना सांगितले की, जर राज्यात झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील काँग्रेस, झामुमो आणि राजद आघाडीचे सरकार स्थापन झाले … Read more

सुप्रिया सुळे लवकरच मोदी मंत्रिमंडळात, तर शरद पवार होवू शकतात राष्ट्रपती !

नवी दिल्ली :- राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं असलं तरी सत्तानाट्य अद्याप संपलेलं नाही. दरम्यान राज्यातील भाजप सरकारच्या स्थापनेत शरद पवार यांची मूकसंमती असल्याचा दावा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक दिलीप देवधर यांनी शरद पवार २०२२ मध्ये एनडीए त्यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी देत बक्षीस देईल, असे वक्तव्य केले आहे. … Read more

४० वर्षांपूर्वी वसंतदादांना काय त्रास झाला असेल याची अनुभूती शरद पवारांना आली असेल…

मुंबई :- अजित पवार यांनी शरद पवारांच्या विरोधात बंड करत भाजपशी हातमिळवणी केल्याने सर्वांना धक्का बसला आहे. ‘जे पेरले तेच उगवले; स्वत: शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजिर खुपसला होता. त्याचीच ही पुनरावृत्ती आहे’,  महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवारांनी सत्ता स्थापन केली होती.आता पुतणे अजित पवार यांनीच शरद पवारांच्या … Read more

राष्ट्रवादीने आमदारांना दिल्ली आणि हरियाणातून आणलं परत!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार वगळता सर्वच आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत, संपर्काबाहेर असलेल्या राष्ट्रवादीच्या चारही  आमदार मुंबईत दाखल झाले आहेत असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. हरियाणातील गुरुग्राममध्ये वास्तव्याला असलेले आमदार अनिल भाईदास पाटील आणि दौलत दरोडा यांना राष्ट्रवादी च्या नेत्यांनी काल रात्री विमानाने मुंबईला आणल. तसेच  आमदार नितीन पवारही काल मुंबईत दाखल झाले. आमदार … Read more

जिल्ह्यातील ‘हे’ आमदार शरद पवार यांच्यासोबत

अहमदनगर – राज्याच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भूकंप झाला. त्याचे धक्के राष्ट्रवादी कॉग्रेसला मोठ्या प्रमाणात बसले. राजकीय विश्वच हादरून गेले. त्याला कारणही तसेच आहे.  भाजपाने राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतली. सत्तास्थापनेवेळी अजित पवार यांच्या बरोबर राष्ट्रवादीतील 11 आमदार गेल्याचे … Read more

आमदार निलेश लंकेना भेटताच उद्धव ठाकरे म्हणाले …ओळखता आले नाही पण…

मुंबई – ज्या तालुका प्रमुखाची दोन वर्षापूर्वी पक्षातून हकालपट्टी केली. त्याच व्यक्तीची म्हणजेच पारनेर नगर चे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पाठीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुकाची थाप दिली. आणि त्यांच्या साधेपणा व संघटन कौशल्याचे तोंड भरून स्तुती केली. रविवारी रेनी सन्स या मुंबईतील हॉटेलमध्ये हा क्षण इतर आमदारांना अनुभवायला मिळाला. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग … Read more

राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना डांबून ठेवलं नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

मुंबई : “भाजपने आमच्या  4 आमदारांना डांबून ठेवलं आहे,” असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी  भाजपा वर केलाय. “भाजपने जे  आमचे आमदार डांबून ठेवले आहेत त्यांच्याशी आम्ही सातत्याने संपर्क करत आहोत.” असेही नवाब मलिक म्हणाले. राष्ट्रवादीचे सर्व आमदार सध्या रेनेसन्स हॉटेलमध्ये आहेत. मात्र नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना सुरक्षेच्या कारणात्सव रेनेसन्स हॉटेलमधील मुक्काम हलवा … Read more

अजित पवारांचं वक्तव्य खोटं आणि दिशाभूल करणारं

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत असल्याचं दिसत आहे.  उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांनी आपण राष्ट्रवादीतच आहोत आणि भाजपसोबत मिळून सत्तास्थापन करण्याचं ट्वीट केलं. ‘भाजपशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अजित पवार यांचं वक्तव्य खोटं आणि दिशाभूल करणारं आहे’, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवारांनी ट्विटरवरुन राष्ट्रवादीसोबत असल्याचा दावा केल्यानंतर … Read more

जलसंपदा विभागाची परीक्षा अखेर पुढे ढकलली

औरंगाबाद : राज्याच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाची २५ व २६ नोव्हेंबर २०१९ रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हजारो परीक्षार्थींना यामुळे दिलासा मिळाला असून आ.सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. राज्याच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदांची व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीकरिता एकाच दिवशी परीक्षा होणार होती.  त्यामुळे … Read more

माजी मुख्यमंत्र्यांकडे सापडल्या २६ लाखांच्या जुन्या नोटा

इम्फाळ : मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांच्या घरावर केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय) टाकलेल्या धाडीत तीन वर्षांपूर्वी चलनातून बाद करण्यात आलेल्या २६.४९ लाख रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह आणि इतर लोकांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातच सिंह यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकलेला आहे. याबाबतच्या माहितीनुसार, मणिपूरमधील … Read more