पोटनिवडणुकीचा खर्च ‘त्या’ उमेदवारांकडून वसूल करावा

जामखेड : सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले आमदार, खासदार नगरसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वत: राजीनामा दिल्यास दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवारास विज़यी घोषित करावे तसेच अशा मतदारसंघात सरकारी खर्चातून पुन्हा निवडणूक घेऊ नये, यदा कदाचित पोटनिवडणूक घेण्याची वेळ आल्यास राज़ीनामा दिलेल्या उमेदवाराकडून पोटनिवडणुकीचा खर्च वसूल केला ज़ावा अशी मागणी महाराष्ट्र धडाका आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. महारुद्र … Read more

शेतीच्या वादातून बेदम मारहाण 

अहमदनगर : नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाईचे येथे शेतातील पाईप कोणी काढले असे विचारल्याचा राग येवून ८ जणांनी शिवीगाळ, दमदाटी करत कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बाळासाहेब भगवंत मगर (वय ६७, रा. जेऊर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या शेतातील पाण्याचे पाईप काढलेले दिसल्याने त्यांनी पाण्याचे पाईप कोणी … Read more

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

श्रीरामपूर : वडिलांनी बोलाविले असल्याचे सांगून येथील एका शाळेत सहावीत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. टिळकनगर येथील संविधान कॉलनीत काल दुपारी हा प्रकार घडला. ही अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरी असता एक तरुण तोंडाला रुमाल बांधून लाल टी शर्ट व काळी जीन्स पॅन्ट परिधान करून दुचाकीवरून मुलीच्या घरी आला. तुला तुझ्या … Read more

तरुणाचा गळा आवळून खून 

सोलापूर : माळशिरस येथे एका तरुणाचा गळा आवळून खून झाल्याची घटना दि. १० नोव्हेंबर रोजी रात्री घडली असून योगेश औदुंबर गुरव (वय २३, रा.माळशिरस) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत माळशिरस पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत तीन ते चार जणांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. योगेश हा १० नोव्हेंबर रोजी बाजारतळ येथील आपल्या घरातून … Read more

सर्वात मोठा तुळशी विवाह उत्साहात

अकोले : आकर्षक रंगित लग्नपत्रिका, त्यात प्रमुख उपस्थित अतिथी, कार्यवाहक, आशिर्वाद देणाऱ्यांची आणि प्रेक्षकांची भली मोठी यादी, सोबत मामा व मित्र परिवाराचा उल्लेख, घरोघरी जाऊन दिलेले प्रत्यक्ष निमंत्रण, सनईचे मंजुळ सूर, ढोल ताशांचा नाद, आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी, मान्यवरांचे सत्कार, वऱ्हाडी मंडळीची लगबग, नटलेल्या करवल्यांची लुडबुड, स्वागतासाठी दरवाजात उभे असणारे यजमान, अंगावर शिंपडले जाणारे … Read more

एका चुकीमुळे वडील-मुलगी उकळत्या तेलात होरपळली

झाशी : मध्य प्रदेशातील झाशी येथील सिपरी बाजार भागातील अंगावर शहारे उभे करणारी घटना सीसीटीव्ही फुटेजमुळे समोर आली आहे. झाले असे की, मिठाईच्या दुकानाबाहेर स्कूटीवर पुढे बसलेल्या मुलीने अचानक गाडीचे सेल्फ बटन दाबले. त्यामुळे स्कूटी थेट दुकानात घुसली. जिलेबीचा पाक आणि उकळत्या तेलात मुलगी आणि तिचे वडील जाऊन पडले. त्यामुळे मुलगी आणि वडील गंभीररीत्या भाजले. … Read more

हातात रायफल घेऊन लग्नात !

गुवाहाटी : केंद्र सरकार एकीकडे ईशान्य भारतातील नागा बंडखोरांशी ऐतिहासिक शांतता करार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशातच नागा संघटनेचा प्रमुख किलो किलोन्सरचा पुत्र बोहोतो किबा याने आपल्या लग्नात चक्क हातात रायफल घेतल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे बोहोतो किबासोबत त्याच्या नववधूनेसुद्धा हातात बंदूक घेतल्याचे समोर आले आहे. ही दृश्ये पाहून … Read more

नवजात अर्भकाचे बोट कापल्याने मृत्यू

उत्तर प्रदेश :- हरदोईच्या सरकारी रुग्णालयातील परिचारिकेने ६-६ बोटे असलेल्या नवजात अर्भकाचे एक-एक बोट कापल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मृत बालकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून परिचारिकेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हरदोईतील बाढ करेंखा गावातील लक्ष्मी नामक महिलेला शनिवारी रात्री प्रसूतीवेदना सुरू … Read more

आज रात्री 8.30 वाजे पर्यंत मुदत असूनही लगेच राष्ट्रपती राजवट लागू का केली ?

मुंबई :- सत्ता स्थापनेचा पेच सुटू न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपालांनी जो प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला होता त्या प्रस्तावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केल्याचं समजतं आहे. मुदतीत सत्ता स्थापनेचा दावा करण्यास राष्ट्रवादी असमर्थ असल्याचा निष्कर्ष काढत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती. त्यावर अखेर राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं. आज सकाळपासूनच आजच … Read more

ब्रेकिंग : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू !

मुंबई :- विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील कोणत्याच पक्षाला बहुमत सिद्ध करता आलेले नाही. त्यामुळे आता राज्यामध्ये राष्ट्रपती लागवट लागू झाली आहे. दिलेल्या मुदतीमध्ये राज्यामध्ये कोणत्याच पक्षाला सत्ता स्थापन करता आली नाही तर राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्याचा निर्णय घेतला जातो. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. … Read more

राष्ट्रपती राजवट लागू होणार म्हणजे नक्की काय ???

राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. जर राष्ट्रवादीही सत्तास्थापनेसाठी बहुमत सिद्ध करु शकली नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. आज आपण जाणून घेवू या राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे नेमकं काय, त्याचे सामान्य नागरिकांवर काय परिणाम होऊ शकतात आणि महाराष्ट्रात कधी आणि का राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली? आणि त्याबद्दलची … Read more

बनावट सातबारा तयार करुन फसवणूक

अहमदनगर :- बनावट कागपत्र तयार करुन भूविकास बँक व महसुल कर्मचार्‍यांनी संगनमतीने वडिलोपार्जित साडे नऊ एकर शेतजमीन बनावट सातबारा तयार करुन फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी नंदू विधाते यांनी केला आहे. चार वर्षापासून वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील न्याय मिळत नसल्याने उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नंदू विधाते यांचे वडिल नाना उर्फ वसंत विधाते यांच्या मालकीची … Read more

११ कांदा व्यापाऱ्यांवर धाडी!

नाशिक : कांद्याची होणारी साठेबाजी. शंभरी पार करणारे दर आणि निर्माण होणारी संभाव्य कृत्रिम टंचाई या बाबी तपासण्यासाठी सोमवारी (दि. ११) आयकर विभागाच्या पथकाने जिल्ह्यातील ३ बाजार समित्यांमधील ११ कांदा व्यापाऱ्यांच्या चाळींवर धाडी टाकत त्याचे व्यवहार तपासले. यात लासगाव येथील ४, येवल्यातील ३ आणि पिंपळगावमधील ४ व्यापाऱ्यांचा समावेश आसल्याची चर्चा आहे. या छापासत्राने व्यापाऱ्यांचे धाबे … Read more

राजकारण कळत नाही, असे मी म्हणायचो, पण विधानसभेनंतर मला कळले आहे की येथे…..

अहमदनगर :- शहरातील उड्डाणपुलासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या पुलात बाधीत होणाऱ्या खासगी मालमत्ताधारकांना २५ नोव्हेंबरपर्यंत हमीपत्र भरून देण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. हमीपत्र भरून दिल्यामुळे मालमत्ताधारकांना सुमारे २५ टक्के आर्थिक नुकसान टाळता येणार आहे, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी सोमवारी दिली. उड्डाणपुलाच्या भूसंपादन प्रक्रियेतील मालमत्ताधारकांची बैठक खासदार विखे यांनी बोलावली होती. … Read more

व्यापारी कुटुंबातील तिघांची आत्महत्या

विरुधुनगर :- दक्षिण तामिळनाडूमधील पेरियावाकुलम येथे व्यापारी कुटुंबातील व्यावसायिक त्याची पत्नी व मुलाने विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एन इनबामूर्ती (६९) त्यांचा मुलगा एन कन्नन (४०) गाेदामात मृतावस्थेत आढळून आले. पत्नी आई थिलागावती (६१) बेशुद्धावस्थेत आढळून आले. घटनेच्या वेळी कन्ननची पत्नी व मुलगा घराबाहेर हाेते. कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. … Read more

घरगुती वादातून भररस्त्यात पत्नीवर धारदार शस्त्रांचे घाव

नागपूर ;- घरगुती वादातून पतीने पत्नीला रस्त्यावर गाठत तिच्यावर धारदार शस्त्रांचे घाव घालत तिला गंभीररीत्या जखमी केल्याची थरारक घटना सोमवारी दुपारी नागपुरातील कॅनल रोड या रहदारीच्या मार्गावर घडली. या घटनेमुळे प्रत्यक्षदर्शींमध्ये घबराट पसरून पळापळ झाली. मोनाली सचिन तोटे असे या जखमी महिलेचे नाव असून तिला धंतोली परिसरातील केअर रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले … Read more

त्या तरुणाची दोन दिवसांनंतरही ओळख पटली नाही

राहुरी :- मुळा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या तरुणाची ओळख दोन दिवसांनंतरही पटू शकलेली नाही. हा तरुण शनिवारी दुपारी मुळा धरणाच्या प्रवेशद्वाराशेजारच्या दत्त मंदिराजवळ थांबला होता. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह उजवा कालव्याच्या पंपहाऊसलगत पाण्यावर तरंगताना आढळला. गावकऱ्यांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. ओळख पटवण्यासाठी मृतदेह राहुरी येथील शवविच्छेदन केंद्रात ठेवण्यात आला आहे. पोलिस … Read more

जीवघेण्या हल्ल्यानंतरही आरोपीवर कारवाई नाही,पाचपुतेंची तक्रार

अहमदनगर :- नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील हॉटेलमध्ये मी झोपलेलो असताना अज्ञात व्यक्तीने खुनी हल्ला केला. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हल्ला होतानाचे चित्रीकरण पोलिसांना दिले आहे, पण गुन्हा घडून २२ दिवस झाले, तरी कोणतीही कारवाई पोलिसांनी केलेली नाही. या घटनेुळे आमचे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले असून चौकशी करण्यास गेल्यास पोलिस … Read more