राहुल गांधींनी देश सोडल्याने काँग्रेसची दैना

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची समीक्षा करणे गरजेचे होते; परंतु राहुल गांधी यांनी ऐनवेळी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतरही आम्ही त्यांच्याबद्दल निष्ठा दाखविली. त्यामुळेच पक्षाची दैना झाली, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी पक्षाची दयनीय स्थिती बुधवारी उजागर केली आहे. काँग्रेस सध्या अडचणीत आहे. अशावेळी निवडणूक जिंकणे तर सोडाच, … Read more

काँग्रेसचा निवडणुकीवर बहिष्कार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आणल्यानंतर राज्यात होऊ घातलेल्या गटविकास परिषदेच्या (बीडीसी) निवडणुकीवर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. राज्य प्रशासनाची उदासीन भूमिका आणि वरिष्ठ नेत्यांना नजरकैदेत ठेवल्याचा हवाला देत काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने जम्मू-काश्मीरला उद्ध्वस्त केले, असा आरोपसुद्धा काँग्रेसने केला आहे. जम्मू-काश्मिरात येत्या २४ ऑक्टोबर रोजी बीडीसी निवडणूक होत आहे. गेल्या … Read more

नैराश्यातून पित्याकडून दोन मुलांची हत्या

मुंबई : क्षयरोगाने ग्रासलेल्या पित्याला आपला मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. आपल्याशिवाय मुलांच्या भवितव्याचे काय होणार? ही विवंचना त्याला सतावू लागली. परिणामी नैराश्यातून त्याने दोन्ही मुलांची हत्या करत स्वत:चेही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याला वेळीच रोखत अटक केली. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे घाटकोपरमध्ये खळबळ उडाली आहे. घाटकोपरमधील इंदिरानगर विभागात वाहनचालक असलेला चंद्रकांत मोहिते … Read more

शरद पवार म्हणतात काँग्रेस, राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाहीच!

जळगाव : आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येण्यावाचून पर्याय नाही. भविष्यात दोन्ही पक्ष एकमेकांत विलीन होतील, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच केले होते. या वक्तव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी जळगावात खंडन केले. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आम्ही एकत्र काम करत आहोत. सुशीलकुमार शिंदे त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या संदर्भात … Read more

राहुल गांधी बँकॉकला गेले

धुळे : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची वाटचाल पराभवाकडे होत आहे. पराभवाचे खापर आपल्या माथी फुटू नये म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी बँकॉकला निघून गेले आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने आपल्या सत्ता काळात जनतेशी खोटारडेपणा केला. विकासाला खरी दिशा पंतप्रधान मोदींनी दिली आहे, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत महायुती उमेदवारांच्या … Read more

वैभवशाली अहमदनगरच्या विकासासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष हाच सक्षम पर्याय – डॉ.कॉ.भालचंद्र कांगो

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वैयक्तिक दोषी नसताना ईडी मार्फत चौकशी लावून त्यांना गुन्ह्यामध्ये गोवण्यासाठी वेळप्रसंगी कायद्याची व्याख्या बदलली गेली. मुख्यमंत्री, अमित शहा, पंतप्रधान यांनी जर घोटाळे केले असतील तर तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांना दोषी धरणार का असा सवालही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो यांनी आज नगर येथे पत्रकारांशी … Read more

संग्राम जगताप यांना मोठा धक्का अभिषेक कळमकर शिवसेनेत !

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू माजी आमदार दादा कळमकर यांचे पुतणे, नगर शहराचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त धक्का देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधले. रात्री उशिरा झालेल्या या नाट्यमय प्रवेशामुळे नगर शहराच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अभिषेक कळमकर राष्ट्रवादीपासून … Read more

विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका

जामखेड : लंकेत सोन्याच्या विटा आहेत. पण त्या तुमच्या कामाच्या नाहीत. त्यामुळे तुम्हाला रामाचे राज्य पाहिजे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे विकासकामे करून मते मागत आहेत. विरोधकांनी काय काम केले? विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले. कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ नान्नज (ता. … Read more

सुजय यांनी उलगडले विखे घराण्याच्या राजकारणाचे रहस्य !

अहमदनगर: आमदारकीसाठी इच्छुक असणा-या सगळ्यांना शब्द द्या, पण कुणाला शब्द दिला ते दुस-याला सांगू नका. गत पन्नास वर्षे आम्ही हेच केले, असे विधान करत भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी विखे घराण्याच्या राजकारणाचे रहस्यच बुधवारी नगर येथे उलगडले. विखे यांच्या या विधानाने व्यासपीठावरील उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. नगर शहरात उद्धव ठाकरे यांच्या सभेत ते बोलत होते. … Read more

‘जिओ’ वापरकर्त्यांनो…फुकट कॉल विसरा

मुंबई: ‘जिओ’द्वारे लागू करण्यात येणरे हे शुल्क ‘जिओ’ ते ‘जिओ’ कॉल केल्यास, ‘जिओ’ ते स्थिरभाष दूरध्वनीवर (लॅण्डलाईन) कॉल केल्यास किंवा ‘जिओ’च्या इंटरनेटसेवेवरील व्हॉट्सअप किंवा तत्सम ध्वनीसंदेश (व्हॉईस कॉल) संपर्क सेवा पुरवणाऱ्या सुविधांसाठी लागू नसेल. याशिवाय, ‘जिओ’च्या वापरकर्त्यांना भरावे लागणाऱ्या या शुल्काची परतफेड कंपनीकडून इंटरनेट डेटा सेवेच्या शुल्कातून भरून दिले जाईल. म्हणजेच, तेवढ्या पैशांचा अधिकचा डेटा वापरकर्त्यांना उपलब्ध होईल. दरम्यानस ‘जिओ’वर येणारे (इनकमिंग) … Read more

राज्याच्या राजकारणात युवा जोश!

मुंबई  : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडीकडून अनेक तरुण मैदानात उतरले आहेत. या युवा नेत्यांना जनतेकडून काय प्रतिसाद मिळणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र, राज्याच्या राजकारणात अनुभवी नेत्यांसोबतच युवा नेत्यांची गरज आहे. अशावेळी अनेक युवा नेते आपले नशिब आजमावत आहेत. आजची युवा नेते तंत्रस्नेही असल्याने त्यांचा वावर सोशल मीडियात पाहायला मिळत आहे. त्यामुळे … Read more

काँग्रेस-राष्ट्रवादी पहिल्यापासूनच पराभवाने खचलेत- मुख्यमंत्री

धुळे : निवडणूक सुरु झाली आहे, काही दिवसांवर मतदान आले आहे. पण निवडणुकीत मजाच येत नाही. कारण समोर कोणी दिसतच नाही. आपले सर्व पहेलवान तेल लाऊन मैदानात उतरलेत. मात्र, समोर दुसरा पहेलवानच दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नेते पहिल्यापासूनच पराजयाच्या मानसिकतेने खचले आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. धुळे ग्रामीणमधील नेर येथे ते … Read more

पाच वर्षांत नगर शहराचा बिहार झाला….

अहमदनगर :- गेल्या  ३० ते ३५ वर्षांपासून शिवसेनेचे विचार घेऊन काम केले. प्लॉट, खंडणी, दहशत २५ वर्षे बंद होती, पण मागील पाच वर्षांत शहराचा चेहरा बदलून त्याचा बिहार झाला आहे.अशी टीका माजी आमदार अनिल राठोड यांनी केली.   नंदनवन लॉन येथे आयोजित प्रचार सभेत राठोड बोलत होते, शहराला संरक्षण देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. विकास हा … Read more

नगर शहरातील गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय मी राहणार नाही !

नगर :- शहरातील गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय मी राहणार नाही. कसले गुंड, कोण गुंड? या गुंडांची तुमच्या पायाशी उभे राहण्याचीही लायकी नाही. एका बाजूला आपले अनिल राठोड व दुसऱ्या बाजूला जो गुंड असेल त्याने याद राखावे, यापुढे गुंडागर्दी केली, तर बोलून दाखवणार नाही, करून दाखवेन, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

निष्क्रिय लोकप्रतिनिधीला घरचा रस्ता दाखवण्याची योग्य वेळ आली आहे !

राहुरी :- विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी मतदार संघात भेटी – गाठी तसेच प्रचार दौरा सुरू करुन त्यात तालुक्यातील प्रश्नांवर उजेड टाकतानाच विकासावर भर देवून त्याबाबत मतदारांना जागृत करत असल्याने त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तनपुरेंनी काल देसवंडी, तमनर आखाडा, गोटुंबे आखाडा, उंबरे, ब्राम्हणी आदी ठिकाणच्या गावात जावून बैठका घेतल्या. … Read more

अहमदनगर जिल्हयातुन हे ५३ अपक्ष उमेदवार ठरणार डोकेदुखी ?

नगर  – विधानसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही नशीब आजमावत आहेत. नगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना या अपक्षांचे आव्हान राहणार आहे. या वेळी तब्बल ५३ अपक्ष उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. याव्यतिरिक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही चार मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. दोन मतदारसंघांत एमआयएम पक्षाचे उमेदवार आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएम … Read more

शरद पवारांचे हेलिकॉप्टर बिघडते तेव्हा…

पारनेर :- मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉग्रेस – कॉग्रेस आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचार सभेसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी (८ ऑक्टोबर) पारनेर येथे आले होते. पारनेरमधील सभा संपल्यानंतर जळगावला उड्डाण घेण्याण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. बिघाड झालेल्या हेलिकॉप्टरचे उड्डाण होऊ न शकल्याने दुसरे हेलिकॉप्टर पारनेर येथील हेलिपॅडवर मागविण्यात आले. त्यानंतर पवार … Read more

पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार

अहमदनगर :- राज्याचे लक्ष वेधले गेलेल्या कर्जत -जामखेड मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप,आर पी आय, व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार पालकमंत्री ना प्रा राम शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सिद्धटेक येथे शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी ११वाजता होणार आहे अशी माहिती पालकमंत्री ना राम शिंदे यांचे उमेदवार प्रतिनिधी … Read more