मला पाठबळ देवून राज्यात नवा इतिहास घडवा – राधाकृष्ण विखे पाटील

राहाता :- तीस वर्षाच्या राजकीय प्रवासात मतदारसंघाचा सर्वांगिण विकास साधताना मी कुठेही कमी पडलो नाही. मतदार संघाचा चेहरामोहरा बदलतानाच सर्वसामान्य माणसाचे हित जोपासण्याचे काम केले. भविष्यात रोजगार निर्मिती बरोबरच पश्चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेला वळविणे, निळवंडे धरणाचे पाणी जिरायती भागात उपलब्ध करून देणे आणि गोदावरी कालव्यांच्या कामाचा अजेंडाच आपल्या समोर आहे. हे काम करण्यासाठी मला पाठबळ … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच देशात आर्थिक मंदी

राहुरी – शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे जास्त गेले, तर भाजप सरकार महागाई वाढवते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अशा चुकीच्या धोरणामुळेच देशात आर्थिक मंदी आली, असा घणाघाती आरोप माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी केला. राहुरीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गाडगेबाबा व्यापारी संकुल रस्त्यावर आयोजित सभेत पाटील बोलत होते. ते … Read more

आ. राहुल जगताप यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर श्रीगोंद्यात उलटसुलट चर्चेला ऊत

श्रीगोंदे:- राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भावनिक होऊन आपले समर्थक व कार्यकर्त्यांची माफी मागितली. ‘मी आपली मनापासून माफी मागतो’ अशी पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर टाकली आहे. ही पोस्ट सध्या वेगाने व्हायरल होत आहे. भाजपचे उमेदवार म्हणून बबनराव पाचपुते यांचे नाव जाहीर होताच मतदारसंघातील राजकारण वेगाने बदलले. त्याआधी खुद्द आमदार … Read more

निवडणुकीतून आता माघार नाही, निर्णयाशी विखेंचा संबंध नाही !

कोपरगाव :- शहर पन्नास वर्षांत दोन कुटुंबांच्या ताब्यात सत्ता असताना पाणी प्यायला मिळत नसेल, तर शरम वाटली पाहिजे. मी कोणाच्या एका विरोधातला नाही. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव व वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. व्यक्तीद्वेषाने निवडणूक लढवत नसून तालुक्यातील जनतेच्या मनातील स्वप्नपूर्तीसाठी निवडणूक लढवत आहे. निवडून दिलेला उमेदवार शासनाचा पैसा जनतेच्या विकासासाठी खर्च करत असेल, … Read more

सत्य नेहमी कडू असते पण ते सत्यच असते साहेब…

तालुक्यातील लोकांनी पदरमोड करून, उपाशी राहून, बायकोचे मंगळसूत्र मोडून कारखाना उभा करायला पैसे दिले होते. कारखाना हा तालुक्यातील लोकांच्या घामाच्या पैशावर उभा राहिलेला आहे, त्यासाठी साहेबांनी आपल्या घरातून कीती पैसे दिले याचा हिशोब आहे का.? कसा असणार, कारण अनेक शेतकऱ्यांनी आपल्या काळजाचा तुकडा असलेले बैल विकून कारखान्यासाठी पैसे दिले होते पण साहेबांचा एक शिंगाचा का … Read more

तिसऱ्यांदा राजळे-ढाकणे राजकीय संघर्ष होणार

शेवगाव-पाथर्डीत तिसऱ्यांदा राजळे-ढाकणे असा राजकीय संघर्ष होणार आहे. दोन्ही बाजूंनी सर्व यंत्रणा पाजळण्यास प्रारंभ झाला आहे. उमेदवारी माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार असले, तरी खरी लढत भाजप विरुध्द राष्ट्रवादी अशीच आहे. विजयाचे सूत्र मात्र माजी आमदार चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले यांच्याभोवती फिरणार आहे. १९८५ मध्ये बबनराव ढाकणे विरुद्ध अप्पासाहेब राजळे अशी लढत होऊन ढाकणेंचा … Read more

#Blog : ना. राम शिंदेचे राजकीय पालकत्व विखेंकडे !

अहमदनगर :- जिल्ह्याची भाजप आता विखे पाटील म्हणतील त्या दिशेला जाताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाकडे तिकीटाची मागणी करणारे डॉ. सुजय विखे यांनी लोकसभा निवडणूक होऊन सहा महिन्यातच अहमदनगर भाजप स्वताच्या ताब्यात घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात अतिशय वाईट वेळेत त्या वेळी भाजप वाढवली, मोठी केली आणि त्याचे फळ म्हणून २०१४ ला जिल्ह्यात ५ जागा भाजपला … Read more

पारनेरमध्ये भाजपकडून बंडखोरी

पारनेर विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी भाजपचे कार्यकारिणी सदस्य वसंत चेडे, बसपचे जितेंद्र साठे, जनता पार्टीचे प्रसाद खामकर व वंचित बहुजन आघाडीचे दगडू शेंडगे यांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर ९ उमेदवारांचे १७ अर्ज दाखल झाले. चेडे यांच्यासमवेत विश्वनाथ कोरडे, पोपट लोंढे, कृष्णाजी बडवे, सुभाष दुधाडे, बबन डावखर, नगरे, नगराध्यक्ष वर्षा नक्षरे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत … Read more

वकील संभाजी ताके खूनप्रकरणी ४ आरोपींना अटक

नेवासे :- जेऊर हैबती येथील वकील संभाजी ताके खूनप्रकरणी नेवासे पोलिसांनी सर्व चारही आरोपींना अटक केली. शरद शिवाजी ताके, शिवाजी राजाराम ताके, मंदा शिवाजी ताके व सोनल शरद ताके अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.शरद यास गुरुवारी, तर शिवाजी, मंदा, सोनल यांना शुक्रवारी नेवासे न्यायालयात हजर केले असता या सर्व आरोपींना येत्या ९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस … Read more

विखे आणि शिंदेंना मंत्रिपदे मिळतील पण आ.शिवाजी कर्डीलेना नाही!

कर्जत-जामखेड मतदारसंघातून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. जलसंपदामंत्री गिरिश महाजन, आ. मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी रॅली काढून मोठे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. त्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली. विखे, शिंदेंना मंत्रिपदे – कर्डिले भाजपचे आमदार कर्डिले यांनी मंत्री पदाचा मुद्दा उपस्थित करताच एकच हशा पिकला. ते म्हणाले, मुख्यमंत्री … Read more

आमदार वैभव पिचड आहेत ‘इतक्या’ कोटींचे मालक

अकोले – अकोलेत भाजपचे उमेदवार वैभवराव पिचड यांच्याकडे स्थावर – जंगम मालमत्ता व सर्व प्रकारचा उत्पन्नाचा “सोर्स’ ध्यानात घेता ते पाच कोटीचे मालक असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तर जवळपास कोटीच्या आसपास कर्जाचाही बोजा आहे. स्वयंचलित अशी दोन कोटी 89 लाख तर वारसाने आलेली दोन कोटी 95 लाख रुपयांची मालमत्ता त्यांच्याकडे असल्याचे त्यांनी त्यात … Read more

कोपरगावात कोल्हे गटाला पडले खिंडार !

कोपरगाव :- तालुक्याच्या दक्षिण भागातील बहादरपूर व अंजनापूर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बहादरपूर गावातील कोल्हे गटाला मोठे भगदाड पाडून असंख्य युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी आशुतोष काळे यांचे नेतृत्व मान्य करत त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये अंजनापूरचे भास्कर महाराज गव्हाणे, … Read more

महाविद्यालयीन युवतीचे श्रीगोंदे शहरातून अपहरण

श्रीगोंदे | मैत्रिणीसमवेत क्लासला जात असताना सतरा वर्षांच्या विद्यार्थिनीचे अपहरण झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. बारावीच्या वर्गात शिकणारी ही युवती मैत्रिणीबरोबर दौंड रस्त्याने क्लासला जात असताना पाठीमागून पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ आली. एकाने खाली उतरून विद्यार्थिनीला बळजबरीने गाडीत बसवले. मैत्रिणीसह अन्य विद्यार्थिनींनी आरडाओरडा केला. तथापि, आजूबाजूच्या नागरिकांना काही समजण्याच्या आतच स्कॉर्पिओ कर्जतच्या दिशेने … Read more

कोपरगावचा विकास फक्त फ्लेक्सवरच…

कोपरगाव मागील पाच वर्षांत नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत. मतदारसंघाचा विकास फक्त फ्लेक्सवरच झालेला दिसत आहे. २००४ ला ३५ वर्षांची सत्ता उलथवून टाकून मतदारांनी इतिहास घडवला. यावेळीही त्याची पुनरावृत्ती होणार आहे, असे राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी सांगितले. राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी कवाडे गट, शेकाप मित्रपक्षाच्या वतीने काळे यांनी शुक्रवारी आपला अर्ज दाखल केला. या … Read more

‘गुन्हेगार’ उमेदवाराचे पार्सल परत पाठवा !

‘गुन्हेगार उमेदवाराचे पार्सल परत पाठवा, व सुशिक्षित व अभ्यासू उमेदवाराला विधानसभेत पाठवा. रसातळाला गेलेले राज्य पूर्वपदावर आणण्यासाठी शरद पवार यांना ताकद द्यावी,’ असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केले. राष्ट्रवादी राहुरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी शुक्रवारी (४ ऑक्टोबर) रॅली काढून शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी संकल्प महाविजयाचा … Read more

आमदार राहुल जगताप यांनी माघार का घेतली ?

श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी यंदाच्या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. मागील २०१४च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना असे चारही पक्ष स्वतंत्र लढले असताना केवळ श्रीगोंद्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची पडद्याआड आघाडी होती. काँग्रेसच्या राहुल जगतापांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर शरद पवार, शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगतापांनी एकत्र येऊन उभे केले होते. पण … Read more

राष्ट्रवादी शंकरराव गडाखांच्या पायाशी !

राष्ट्रवादीच्या प्रदेशस्तरावरील काहीजणांशी व स्थानिक स्तरावर तत्कालीन जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्याशी न पटल्याने मागील जिल्हा परिषद निवडणुकीत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व त्यांचे चिरंजीव शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेऊन क्रांतिकारी शेतकरी पक्षाची स्वतंत्र चूल मांडली होती. त्यानंतर त्या परिसरातील बहुतांश निवडणुकांतून त्यांनी यश मिळविले. या पार्श्वभूमीवर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बाळासाहेब मुरकुटेंविरोधात क्रांतिकारी शेतकरी … Read more

आमदार झाल्यावर विकास निधी कसा आणायचा, हे दाखवून देईन – छिंदम

‘शहरातील एक जण २५ वर्षे आमदार होते तर दुसरे मागील पाच वर्षे होते, पण या दोघांनाही आमदारनिधी सोडता शहर विकासासाठी सरकारकडून भरीव निधी आणता आला नाही’, अशी टीका बहुजन समाज पक्षाचे उमेदवार श्रीपाद छिंदम यांनी केली. ‘या दोन्ही आजी-माजी आमदारांनी शहर सौंदर्य, शहर विकास, औद्योगिक विकास, बेरोजगारी यांच्या विकासाबाबत शहराचे विद्रुपीकरण केले आहे. विद्यमान आमदारांच्या … Read more