पंचायत समिती कार्यालयात पदाधिकाऱ्याच्या केबिनमध्ये दारूपार्टी !

अकोले :- पंचायत समिती कार्यालयात एका पदाधिकाऱ्याच्या केबिनमध्ये गुरूवारी दारूपार्टी झाली असून याची चौकशी करण्याची मागणी करत आचारसंहिता भंगाची तक्रार गटविकास करण्यात आली. या तक्रारीवर शिवसेनेचे रामहरी तिकांडे, भाऊसाहेब गोर्डे, प्रमोद मंडलिक, प्रदीप हासे, राम सहाणे, संजय साबळे, सखाराम लांडे, मारुती आभाळे, रजनिकांत भांगरे, महेश हासे, संदेश एखंडे यांची नावे आहेत. रात्री ८ वाजता झालेल्या … Read more

पिचडांच्या भ्रष्ट राजकारणाचा पाडाव करण्यासाठी विरोधक एकत्र

अकोले : ‘पिचडांच्या भ्रष्ट व संधीसाधू राजकारणाचा पाडाव करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत पिचडांच्या विरोधात एकच उमेदवार द्यावा, या लोकभावनेचा आदर करीत माकपने आपला स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय स्थगित केला. कॉ. एकनाथ मेंगाळ, कॉ. नामदेव भांगरे व कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी अर्ज दाखल करण्याची तयारी केली होती. मात्र, शुक्रवारी अखेरच्या दिवशी आपली उमेदवारी दाखल … Read more

अहमदनगर मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीवर नामुष्की !

अहमदनगर :- जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांपैकी राष्ट्रवादीने नऊ व काँग्रेसने तीन जागा लढवण्याचे ठरवले आहे. काँग्रेसच्या तीन जागांपैकी संगमनेरमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी पक्की होती. मात्र, श्रीरामपुरातील पक्षाचे संभाव्य उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यावर काँग्रेसला मग याच मतदारसंघात मागच्या २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी करणाऱ्या साहित्यिक लहू कानडेंना काँग्रेसमध्ये घेऊन … Read more

पक्षादेशाप्रमाणे काम करणार – महापौर बाबासाहेब वाकळे 

अहमदनगर :- भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांची नगर शहर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार इच्छा होती. त्यासाठीची आवश्यक तयारीही त्यांनी केली होती. पक्षाचा ‘एबी’ फॉर्म आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला होता.  या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी तसेच खासदार डॉ. सुजय विखेंचे दूत नितीन कुंकूलोळ व भंडारी यांनी वाकळेंना भेटून अर्ज न भरण्याची … Read more

आता संगमनेरात परिवर्तन अटळ !

संगमनेर : शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार, उद्योजक साहेबराव नवले यांनी शुक्रवारी (४ ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी शिवसैनिकांसह भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), रासप मित्र पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपली उमेदवारी सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी व नागरिकांसाठी असून संगमनेरात परिवर्तन अटळ असल्याचे मत उमेदवार नवले यांनी या वेळी … Read more

नगर, पुणे, मुंबई येथे मालमत्ता…अशी आहे अनिल राठोड यांची संपत्ती !

अहमदनगर :- माजी आमदार अनिल राठोड यांच्याकडे ३ कोटी ५९ लाख ७० हजार १६७ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी शशिकला यांच्याकडे ६३ लाख ७५ हजार ४८८ रुपयांची संपत्ती आहे. राठोड यांनी काल निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे उमेदवारी अर्जासह संपत्ती विवरणाचे शपथपत्र सादर केले. त्यानुसार त्यांच्याकडे १ कोटी २० लाख ६५ … Read more

आ.संग्राम जगताप यांची ‘इतकी’ आहे संपत्ती तर तीन कोटींचे कर्ज !

अहमदनगर : शहर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्याकडे ९ कोटी ३३ लाख ५७ हजार ४५७ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी शीतल कोट्याधीश आहे. जगताप यांनी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी संपत्तीचे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार ७ कोटी ११ लाख २० हजार ६३९ रुपयांची … Read more

उमेदवारांच्या ऐवजी पावसानेच केले शक्तीप्रदर्शन !

अहमदनगर – जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने उमेदवारांच्या आनंदावर पाणी फेरले गेले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अखेरचा दिवस होता. त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी करण्यात आली होती. मात्र, अचानक आल्याने पावसाने उमेदवारांचा निरूत्साह झाला. भर पावसात इच्छुकांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करावे लागले. या पावसामुळे शक्तीप्रदर्शनाचा बेत हुकला. दरम्यान, छत्रपती उदयनराजे भोसले … Read more

शक्तिप्रदर्शन करीत आ.शिवाजी कर्डिलेंचा अर्ज दाखल

राहुरी  : काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये बाराचे बारा आमदार युतीचेच निवडून येतील याबाबत कोणत्याही प्रकारची शंका नाही. आमदार शिवाजीराव कर्डिले हे मला लोकसभेत मिळालेल्या मताधिक्यपेक्षाही जास्त मतांनी निवडून येतील आणि आम्ही दोघे मिळून या मतदारसंघाचा आणखी कायापालट करू, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. येत्या दोन वर्षात … Read more

विधानसभा निवडणुकीत बारा-शून्य करणार : खा.विखे

श्रीगोंदा : जिल्हा काँग्रेसमुक्त करून राष्ट्रवादीची टीक टीक बंद करू. विधानसभा निवडणुकीत बारा-शून्य करणार असून, श्रीगोंदे मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार हा तोडपाणी करणारा असल्याची घणाघाती टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी केली. श्रीगोंद्यातून काल बबनराव पाचपुते यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांतर झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात खा.डॉ.विखे बालत होते. या मेळाव्यास पालकमंत्री राम शिंदे, पक्षनिरीक्षक … Read more

अकोल्याच्या विकासासाठीच पक्षांतर केले – आ. वैभव पिचड

अकोले : गेली पाच वर्षे तालुक्यातील प्रश्नांसाठी मोर्चे काढले. रस्त्यावर उतरलो. विधीमंडळातही आवाज उठविला. काही प्रश्नांची तड लागली; पण काही अजुनही प्रलंबित आहेत. सत्तेच्या विरोधात राहून कामे होत नाहीत, हे लक्षात आल्यावर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न आणि विकासाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठीच जनतेच्या आग्रहाखातर भाजपत प्रवेश केला असल्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी म्हटले आहे. भाजप, शिवसेना, … Read more

अपघातात कारचालकाचा मृत्यू

राहुरी : मनमाड-नगर रस्त्यावर चौधरी ढाब्यासमोरून पुढे जाताना ट्रक (क्र. एमएच ११ एम ५७५९) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून अविचाराने हयगयीने रस्त्याच्या उजव्या लेनवरून अचानक कोणतीही इंडिकेटर न देता व पाठीमागील वाहन न पाहता अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला लेनवर घेऊन एकदम ब्रेक मारला. त्याच्यावेळी पाठीमागून येणाऱ्याने हुंदाई कार (क्र. एमएच १४ … Read more

प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण जीवाचं रान करणार – आमदार स्नेहलता कोल्हे

कोपरगाव : कोपरगाव विधानसभेसाठी महायुतीच्या भाजप उमेदवार म्हणून आमदार स्नेहलता कोल्हे यांचे नाव घोषित केल्यानंतर काल गुरुवारी (दि. ३) ११.३० वाजता आ. कोल्हे यांनी कलश लॉन्स ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या रॅलीतील भगव्या झंझावाताने विरोधकांचे अवसान गळाले आहे.उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार स्नेहलता कोल्हे … Read more

गॅस टाकीचा स्फोट होवून घर जळाले

राहाता : तालुक्यातील खंडोबाची वाकडी येथे गुरुवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गॅस टाकीचा स्पोट झाला. यात संपूर्ण घर जळून खाक झाले. त्यामुळे शेजारील घरांचेदेखील नुकसान झाले. वाकडी येथील पूर्वेस असलेल्या चितळी रोड, शिरगिरे आखाडा भागात पाटबंधारे विभाग हद्दीत राहात असणाऱ्या हौशिराम तुकाराम पगारे यांच्या पत्नीने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास स्वयंपाक करण्यासाठी … Read more

भारत-पाक युद्धात जाणार साडेबारा कोटी लोकांचा बळी !

वॉशिंग्टन : ‘भारत-पाकमधील विद्यमान तणावाचे आण्विक युद्धात रूपांतर झाले तर त्यात दोन्ही देशांतील सुमारे १२.५ कोटी लोकांचा बळी जाऊन जगापुढे हिमयुगाचे गंभीर संकट उभे राहील’, असा इशारा अमेरिकन वैज्ञानिकांनी दिला आहे. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या मुद्यावरून भारत-पाकमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पाकने याप्रकरणी आतापर्यंत अनेकदा भारताला अणुयुद्धाची धमकी दिली आहे. या स्थितीत खरोखरच उभय … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

शिर्डी : शिर्डी शहरातील श्रीसाई निवारण आश्रम परिसरात हैदराबाद येथील एका अल्पवयीन मुलीला शिर्डी येथे तिच्या नातेवाईकाने आणले होते. यावेळी मुलीचा नातेवाईक असलेला पीजूस कांतीलाल चक्रवर्ती, रा. खरिदाबाद, हैदराबाद याने या मुलीवर अत्याचार केला. याबाबत जर कोणाला काही सांगितले तर खून करील, अशी धमकी त्याने दिली. कालपिीडित मुलीने शिर्डी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पीजूस कांतीलाल चक्रवर्ती … Read more

मोटारसायकल ओढून नेल्याने युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

श्रीरामपूर : हप्ते भरूनही फायनान्स कंपनीच्या एजंटांनी मोटारसायकल ओढून नेल्याने निराश झालेल्या तरुणाने दोन-तीन दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यातून तो वाचला असला, तरी त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या एजंटांवर व त्याची तक्रार न घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याकडे करण्यात आली आहे. अशोकनगर फाटा येथे राहात … Read more

अपघातात दुचाकीस्वार युवक व युवती जागीच ठार

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथे बोलेरो गाडीने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार युवक व युवती जागीच ठार झाले. कृष्णा अनिल शिंदे (वय २१) व मयुरी सोमनाथ दये (वय १९, रा. चिकणी, ता. संगमनेर) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी (दि. ३) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास लोणी-संगमनेर रस्त्यावर हा अपघात झाला. याप्रकरणी बोलेरो … Read more