गोहत्येमध्ये घट झाली म्हणूनच कुठेही दुष्काळ जाणवला नाही !

लखनौ : उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात मुबलक पाऊस पडला आहे. हा मुबलक पाऊस पडण्यामागे योगी सरकारच्या काळात गोहत्येमध्ये झालेली घट कारणीभूत आहे. गोहत्येमध्ये घट झाली म्हणूनच कुठेही दुष्काळ जाणवला नाही आणि पाऊसही समाधानकारक पडला असल्याचा दावा उत्तरप्रदेशचे पशुसंवर्धन मंत्री जयप्रकाश निषाद यांनी केला आहे. निषाद म्हणाले,जेव्हापासून उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार बनले आहे, तेव्हापासून राज्यातील … Read more

तब्बल ३५०० कोटींची संपत्ती जप्त !

मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी पहिली अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचे कर्ज बुडवणाऱ्या राकेश वाधवान आणि सारंग वाधवान या पिता-पुत्राला अटक केली. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचे कर्ज घेऊन बुडवणाऱ्या एकूण ४४ मोठ्या खात्यांपैकी १० खाती ही एचडीआयएल आणि वाधवान यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई … Read more

भाजपाचे अनेक नेते माझ्या संपर्कात : शरद पवार

ठाणे : ‘ते ज्या पक्षात काम करत आहेत, त्या ठिकाणी योग्य सन्मान मिळत नसल्याने काही महिन्यांपासून आमच्या संपर्कात आहे त,’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांचे नाव न घेता केला. आम्ही कार्यकर्त्यांचा सन्मान करतो, मात्र ते जिथे गेले तिथे तसे वातावरण नाही; हे माहीत असतानाही ते तिकडे गेले, असा टोला … Read more

‘मी आपली मनापासून माफी मागतो’ – आ.राहुल जगताप यांची फेसबुकवर भावनिक पोस्ट

श्रीगोंदा :- तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी निवडणुकीतून माघात घेतल्यानंतर समर्थक, कार्यकर्त्यांची माफी मागीतली आहे. ‘मी आपली मनापासून माफी मागतो’ अशी पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर टाकली आहे. भाजपाचे उमेदवार म्हणून बबनराव पाचपुते यांचे नाव जाहीर होताच, मतदारसंघातील राजकारण वेगाने बदलले. त्याआधी खुद्द आ.जगताप यांच्यासह राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांच्याकडू भाजपाच्या उमेदवारीसाठी चाचपणी … Read more

आमचंही ठरलं; पुन्हा राम शिंदेंच !

कर्जत तालुक्यात शिवसेनेने आयोज़ित केलेल्या निर्धार मेळाव्यात आता शिवसैनिकांचही ठरलंय…पुन्हा राम शिंदे…चं ! अशा घोषणा देण्यात आल्या. येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात तालुका शिवसेनेच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ना.प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या विकासकामांच्या अनुषंगाने तसेच जनसामान्यांचे हित पाहून कर्जत-जामखेडमधील सर्व शिवसेना नेते, पदाधिकारी व शिवसैनिकांनी युतीचा धर्म पाळत ना. शिंदे यांना साथ … Read more

जोरदार शक्तिप्रदर्शन करीत रोहित पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून युवा नेते रोहित पवार यांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. येथील निवडणूक कार्यालयात दुपारी एक वाजून २५ मिनिटांनी त्यांनी सहायक निवडणूक अधिकारी अर्चना नष्टे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दिला. त्यांच्या अर्जावर हभप वामन खराडे गुरुजी व हभप प्रकाशमहाराज जंजिरे यांनी अनुमोदक व सुचक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या वेळी जिल्हाध्यक्ष … Read more

माजी खासदार दिलीप गांधींचा अनिल राठोड यांना विरोध कायम

नगर शहरातून शिवसेना-भाजपा युतीची उमेदवारी माजी आमदार अनिल राठोड यांना पुन्हा मिळाली आहे. उद्या ते अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली. भाजप व सेना एकत्रित लढत असल्यामुळे आता सर्वांचीची मोट सेनेला बांधावी लागणार आहे. मागील काही काळात राठोड व गांधी यांच्यात सुरू असलेला … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकास अटक

नगर : पोलिसांना धक्काबुक्की केल्याच्या गुन्ह्यात फरारी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक समद खान याला गुरुवारी पहाटे भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली. खान मुकुंदनगर येथे घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. गेल्या महिन्यात मोहरम व गणेशोत्सवामुळे शहरातून तीनशेहून अधिक गुन्हेगारांना शहरबंदी करण्यात आली होती. त्यात खानचा समावेश होता. शहरबंदी असताना खान मुकुंदनगरमध्ये … Read more

फक्त जुमलेबाजी न करता काम करुन दाखवलंय – आ. संग्राम जगताप

नगर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी आयटी पार्कमधील युवक-युवती तसेच आई-वडिलांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. वडील तथा आमदार अरुण जगताप, आई पार्वतीबाई जगताप तसेच आयटीपार्कमध्ये नव्याने कार्यरत झालेले दर्शन गाडळकर, आकांक्षा भिंगारदिवे, फराह इनामदार, शुभम जोशी, अक्षय बांगर, साहिल सचदेव, सौरभ पवार, अजिंक्य आढाव, देवेंद्र वैद्य हे युवक-युवती … Read more

नगर शहराला उद्योग नगरी बनवण्याचा संकल्प करीत किरण काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नगर : वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार किरण काळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेली तीस वर्ष विकासापासून वंचित असलेल्या नगर शहरामध्ये उद्योग नगरी उभा करून त्या माध्यमातून तरुणाईला रोजगाराची उपलब्धता करून देण्याचे आपले ध्येय असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अशोक सोनवणे, सरचिटणीस सुनील शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे संघटक … Read more

ईडीने शरद पवारांवर केलेली कारवाई योग्य !

अहमदनगर :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने केलेली कारवाई योग्यच असून, त्यांचे पाप झाकण्याचे काम कोणी करू नये. पवार यांना पुढील दोन वर्षात जेलमध्ये घालण्याचे काम करणार असून पाटबंधारे खात्यातील त्यांच्या काळात झालेला भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे, असा घणाघात खा. सुजय विखे यांनी केला आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी येथे महायुतीचे उमेदवार आ. शिवाजी कर्डिले … Read more

महागड्या घड्याळांचे शौकीन आहेत रोहित पवार,तब्बल २८ लाख रुपयांची घड्याळे !

जामखेड :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज गुरूवारी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विशाल नाईकवडे यांच्याकडे दाखल केला. यावेळी प्रकाश महाराज जंजिरे, प्रतापराव खराडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह पवार यांची आई सुनंदा, पत्नी कुंती, बहीण सई, चुलते रणजित व चुलती शुभांगी … Read more

श्रीपाद छिंदम या पक्षाकडून लढविणार निवडणूक !

अहमदनगर :- छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले नगर महापालिकेचे नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना नगर शहर मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. पक्षाकडून ‘एबी’ फार्म मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले असून, आज (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही छिंदम यांनी स्पष्ट केले आहे. छिंदम यांना वादग्रस्त वक्तव्यामुळे उपमहापौर पद गमवावे लागले होते. त्यानंतर … Read more

आदित्य ठाकरेंविरोधात हा नेता लढणार !

मुंबई : आदित्य ठाकरेंच्या विरोधात वरळीतून राष्ट्रवादीचे सुरेश माने यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी वरळी मतदारसंघातून आपण विधानसभा लढवणार असल्याचे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले आहे. तसेच शिवसेनेच्या पहिल्या यादीत आदित्य ठाकरेंचे नाव होते. . वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु आदित्य ठाकरे यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांनी … Read more

राष्ट्रवादीची टिक टिक बंद करू…

श्रीगोंदे :- या निवडणुकीत जिल्हा काँग्रेसमुक्त करून राष्ट्रवादीची टिक टिक बंद करण्यात येईल, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी गुरुवारी श्रीगोंदे येथील जाहीर सभेत सांगितले. भाजपचे उमेदवार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संत शेख महंमद महाराज पटांगणात आयोजित विजयी संकल्प मेळाव्यात विखे बोलत होते. पालकमंत्री राम शिंदे, पक्षनिरीक्षक विठ्ठल चाटे, भगवानराव … Read more

समुद्रात प्रेमीयुगुल बुडाले

मुंबई : वांद्रे येथे बॅण्डस्टँडच्या समुद्रात खडकावर बसलेले एक युगुल दुपारच्या सुमारास समुद्रात खेचले गेल्याने बेपत्ता झाले. पोलीस आणि स्थानिक मच्छीमारांनी शोध घेतला असता तरुणी अत्यवस्थ अवस्थेत सापडली. तिच्यावर भाभा हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार सुरू आहेत. दरम्यान, तरुण अजून बेपत्ताच आहे.. हे युगुल बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास किनाऱ्यापासून १५० ते २०० फुटांवर असलेल्या खडकावर बसले … Read more

गांधीजींचा सत्याचा मार्ग अनुसरा, मगच बापूंबद्दल बोला

लखनौ : भाजपने राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी दाखविलेला सत्याचा मार्ग पहिल्यांदा अनुसरावा, त्यानंतरच बापूंविषयी बोलावे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी बुधवारी केली आहे.  गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे काँग्रेसने काढलेल्या ‘गांधी संदेश पदयात्रे’त प्रियंका गांधी यांनी सहभाग घेतला. शहीद स्मारकापासून काढलेल्या अडीच किमीच्या यात्रेत त्यांनी गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन … Read more

तरुणाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

संगमनेर :- तालुक्यातील पानोडी येथील महेश रामनाथ पवार (वय २७) या तरुणाचा बुधवारी (२ ऑक्टोबर) सकाळी येथील केटी वेअरमध्ये पाय घसरुन पडल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पानोडी शिवारातील बाभूळदरा येथे महेश पवार हा तरुण आपल्या आई- वडिलांसमवेत शेतात सोंगणीच्या कामासाठी गेला होता.  यावेळी एक हजार फूट अंतरावर … Read more