राधाकृष्ण विखेंना हरविण्यासाठी आ.बाळासाहेब थोरात आक्रमक

शिर्डी :- विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार व गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांना शह देण्यासाठी थोरात गटाने व्यूहरचना आखली आहे. आमदार डॉ. सुधीर तांबे शिर्डी विधानसभा मतदार संघातून काँग्रेस आघाडीचे उमेदवार असतील असे संकेत युवा नेते सत्यजित तांबे यांनी दिल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना शह देण्यासाठी मंत्री विखे यांनी संगमनेर … Read more

राधाकृष्ण विखे पाटलांना शिवसेनेचा मोठा धक्का

अहमदनगर :- संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचा दावा भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला होता. मात्र शिवसेनेने ही जागा आपल्याकडेच ठेवून मंत्री विखे यांना मोठा धक्का दिला आहे. भाजपने मंगळवारी दुपारी पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत संगमनेरचे नाव नाही. संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात भाजपकडून तगडा … Read more

सर्दी,ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले

श्रीरामपूर : तालुक्यातील पढेगाव येथे आठवडाभरापासून सर्दी, ताप तसेच खोकल्याच्या रुग्णात वाढ झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी गर्दी होत असल्याचे दैनंदिन चित्र दिसून येत आहे. पढेगाव परिसरात प्रत्येक घरात सर्दी, खोकला किंवा तापेचा रुग्ण आढळून येत आहे. त्यातच गावात एका मुलीस डेंग्यूसदृष्य आजाराची लागण झाल्याने नागरिक आणखीच भयभीत … Read more

बंधाऱ्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

श्रीरामपूर : पाण्याने तुडुंब भरलेल्या ओढ्यावरील बंधाऱ्यात रविवारच्या सुटीचा अन् पोहणे शिकण्याचा आनंद घेत असतानाच दोन भावंडांपैकी महेश संतोष मुठे (वय १५) या इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथे घडली. याबाबतची सविस्तर हकिगत अशी, मुठेवाडगाव येथील बेलापूर एज्युकेशन संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, … Read more

विहिरीत मृत बिबट्या आढळला

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक शिवारातील विनायक एकनाथ जऱ्हाड यांच्या गट नं. ३२० मध्ये असलेल्या विहिरीत सोमवारी सकाळी मृत बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडाली. या मृत बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याबाबत समजलेली माहिती अशी, आश्वी बुद्रुक शिवारात विनायक जऱ्हाड यांची आश्वी-मांची रस्त्यावर गट नं. ३२० मध्ये शेतजमीन आहे. सोमवारी सकाळी काही महिला … Read more

घटस्फोटासाठी सासरच्या मंडळींना मारहाण

राहुरी :- मुलीस घटस्फोट देत नाही, या कारणावरून राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे दोन कुटुंबात जोरदार हाणामाऱ्या झाल्या. यामध्ये चारजण गंभीर जखमी झाले आहेत. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी राहुरी पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक देशमुख (पूर्ण नाव माहीत नाही), सुनीता अशोक देशमुख, दीपक अशोक देशमुख (सर्व रा. … Read more

महिलेस खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा

अहमदनगर : महिलेस तिच्या प्लॉटमध्ये येण्यास मज्जाव करून सात-आठ जणांनी जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पंधरा लाख रूपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास प्लॉट खाली करणार नाही, अशी धमकी दिली. ही घटना सावेडी परिसरातील पाईपलाईन रोडवरील ढवणवस्ती येथे दि.३ जुलै ते २७ सप्टेंबर दरम्यान चार वेळा घडली.. याबाबतची माहिती अशी की, यमुनाबाई राधाकृष्ण सांगळे (वय … Read more

विखे व ससाणे गटाला धक्का.

श्रीरामपूर : काँग्रेसला जय महाराष्ट्र करत ऐन निवडणुकीच्या तोंडावर हाती शिवबंधन बांधत भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारीचा शब्द दिला होता. आता पक्षाने एबी फॉर्म दिल्याने त्यांच्या उमेदवारीला विरोेध करणाऱ्या विखे, ससाणे गटाला धक्का बसला आहे. आता या दोन्ही गटाकडून अपक्ष उमेदवाराला पाठबळ देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. … Read more

सोशल मीडियाचे खाते आधार क्रमांकाशी जोडा !

नवी दिल्ली : अलीकडच्या काळात फेसबूक, ट्विटर व इंस्टाग्राम आदी प्रकारचा सोशल मीडिया अभिव्यक्त होण्याचे महत्त्वाचे साधन बनले आहे; परंतु याद्वारे बनावट बातम्या अर्थात ‘फेक न्यूज’ मोठ्या प्रमाणावर दिल्या जात आहेत. त्यास चाप लावण्यासाठी सोशल मीडियाचे खाते आधार क्रमांकाशी संलग्नित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सोमवारी दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडियाद्वारे देण्यात आलेली … Read more

हा मंत्री म्हणतोय कांदा महाग झालाय तर मग कमी खा !

नवी दिल्ली : देशात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. दिवसेंदिवस कांदा भडकत चालला आहे. अशावेळी कांद्यासंदर्भात एका पत्रकाराने केलेल्या प्रश्नाला यूपीमधील मंत्र्याने आगळावेगळा सल्ला दिलेला आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेल्या अतुल गर्ग यांनी ‘दर वाढले तर कमी कांदा खावा’, असा सल्ला दिला आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले … Read more

डॉ.मनमोहन सिंगांना पाकचे निमंत्रण

इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या मुद्यावरून ‘भारत-पाक’मधील तणाव टोकाला पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर पाकने आपल्या हद्दीतील करतारपूर कॉरिडोरचे उद्घाटन करण्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ९ नोव्हेंबर रोजी या कॉरिडोरचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान, मनमोहन या कार्यक्रमाला जाणार किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, सूत्रांनी … Read more

कांदा सहाशे रुपयांनी गडगडला!

नाशिक : कांद्याच्या वाढत चाललेल्या किमतींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेचच सोमवारी कांद्याचे भाव सहाशे ते सातशे रुपयांनी गडगडले. लासलगाव आणि पिंपळगाव बसंवत बाजार समितीत लिलाव सुरू होताच दर खाली आले. राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये देखील अशीच स्थिती असल्याने कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड संतप्त झाले आहेत. सोमवारी … Read more

भीषण बस अपघातात २१ ठार

अंबाजी : गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात सोमवारी एक खासगी प्रवासी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात २१ ठार, तर ५० जण जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी या अपघातावर शोक व्यक्त केला.. बसमधील सर्वजण अंबाजी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. या बसमध्ये सुमारे ७० भाविक होते. दर्शनावरून परतत … Read more

विनायक मेटेंना धक्का

बीड : राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांना सोमवारी (दि.३०) मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एबी फॉर्म देण्यात आला. बीडची जागा सेनेकडे गेल्याने महायुतीतील मित्रपक्ष शिवसंग्रामचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांना मोठा धक्का बसला आहे. बीड मतदारसंघात महायुतीतील मित्रपक्ष शिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे यांना गतवेळी अल्पशा मतांनी पराभव स्वीकारावा लागला … Read more

मकरंद अनासपुरे ची स्टाईल मारताना अर्ज भरायला गेला आणि पाच हजारांचा दंड भरून आला

अहमदनगर : ‘गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा’ या मराठी सिनेमातील मकरंद अनासपुरे यांनी साकारलेल्या ‘नारायणा’च्या भूमिकेचा नेवासा निवडणूक शाखेने सोमवारी अनुभव घेतला. देडगाव येथील मच्छिंद्र देवराव मुंगसे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनामत रक्कम म्हणून घेऊन आलेली चिल्लर त्यांच्या चांगलीच अंगाशी आली. चिल्लरसाठी आणलेली प्लास्टिकची पिशवी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नजरेत आली आणि त्यांना पाच हजार रुपये … Read more

राष्ट्रवादीला हादरा …

बीड : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन केज मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता अक्षय मुंदडा यांनी सोमवारी परळीत भाजपामध्ये प्रवेश केला. नमिता मुंदडा आता केजमध्ये भाजपाकडून लढणार आहेत. . दरम्यान, नमनालाच राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारालाच भाजपामध्ये खेचून मंत्री पंकजा मुंडे यांनी बंधू विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना हादरा … Read more

नातीला सहाव्या मजल्यावरून फेकले !

मुंबई : सहाव्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून पडून मृत्यू झालेल्या मालाडमधील दोन वर्षांच्या चिमुरडीच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. नातवाशी खेळताना होणाऱ्या भांडणाचा राग मनात धरून आजीनेच नातीला सहाव्या माळ्यावरून फेकून हत्या केल्याची खळबळजनक बाब समोर आली. कुरार पोलिसांनी क्रूर आजीला अटक केली आहे.. मालाड येथील आप्पापाडा परिसरातील एसआरए बिल्डिंगमधील सहाव्या माळ्यावर रुक्साना अन्सारी … Read more

अजित दादा म्हणतात ‘अबकी बार आघाडी १७५ पार’

मुंबई : अनेक जण पक्ष सोडून जात आहेत. हरकत नाही. काट्याने काटा काढला जातो. सुरुवात त्यांनी केली. आम्ही हा खेळ संपवू, असा इशारा देतानाच ‘अबकी बार आघाडी १७५ पार’ असा नारा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सोमवारी दिला. काँग्रेसचे आमदार भारत भालके आणि शिवसेनेचे शहापूरचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस … Read more