माजी आ. अनिल गोटे शिवसेनेच्या वाटेवर

धुळे : गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेले माजी आ. अनिल गोटे यांनी महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाशी फारकत घेतली. त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून, होऊ घातलेल्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यातच अनिल गोटे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सोशल माध्यमांमधून होत आहे. अनिल गोटे शहर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा मोठ्या मताधिक्याने … Read more

भिडे गुरुजी म्हणतात भारताने जगाला दिलेला बुद्ध उपयोगाचा नाही !

सांगली : संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने जगाला बुद्ध दिला असल्याचे वक्तव्य केले होते. वास्तविक भारताने जगाला बुद्ध दिला परंतु तो अजिबात उपयोगाचा नाही. हिंदुस्थानचा संसार सुखाने चालवायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पंतप्रधान चुकीचे बोलले असल्याचे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केले. दुर्गामाता … Read more

‘लोकरंग मेगामार्ट’तर्फे ‘फ्री होम डिलिव्हरी’; बचत गट व शेतमाल ग्राहकांसाठी उपलब्ध

नगर : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वेळेला पैशापेक्षा जास्त महत्व आले आहे. हा सामाजिक बदल लक्षात घेऊन आणि अहमदनगर शहरामध्ये केलेल्या सर्वेक्षणातून लोकरंग कॉर्पोरेशन संस्थेने ‘फ्री होम डिलिव्हरी’ सेवा सुरू केली आहे. महिला बचत गट व शेतकरी गटांनी उत्पादित केलेला माल आणि ग्रामीण उद्योजकांच्या उत्पादित मालासह रोजच्या वापराचा किराणा नगरमधील ग्राहकांना घरपोहोच देण्यात येतो. 9551915050 या … Read more

बाळासाहेब थोरातांचा संगमनेरमधून उमेदवारी अर्ज दाखल

संगमनेर :- प्रतिनिधी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, आमदार डॉ. सुधीर तांबे, महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड आदी मान्यवर उपस्थित होते. युतीमध्ये ताळमेळ नसून संशयास्पद वातावरण … Read more

अखेर अनिल राठोड शिवसेनेचे उमेदवार !

अहमदनगर – अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून उपनेते व माजी आमदार अनिल राठोड यांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्षाचा एबी फॉर्म दिल्याची माहिती शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी माध्यमांना दिली आहे. दरम्यान अनिल राठोड हे येत्या दोन दिवसात शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. राठोड यांची लढत राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार संग्राम जगताप यांच्याशी लढत होणार आहे.

साहेबांच्या आदेशाला झुगारणाऱ्या आ. जगताप यांच्या विरोधात पवार कधी का बोलले नाही ?

अहमदनगर :- मी आज सकाळी दिलेल्या राजीनामा काहींच्या जिव्हारी लागला आहे. त्या अस्वस्थतेतूनच त्यांनी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष यांच्यावर दबाव आणून आता मी राष्ट्रवादी युवकचा पदाधिकारीच नव्हतो, असा खोटा कांगावा सुरु केला आहे, असा आरोप किरण काळे यांनी केला आहे. मेहबूब शेख यांची मध्यंतरी पक्षाने युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली. त्यावेळी आधीची कार्यकारिणी ही विसर्जित अथवा … Read more

श्रीपाद छिंदम आता विधानसभा निवडणूक लढविणार ?

अहमदनगर: छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. श्रीपाद छिंदमने महाराष्ट्र विधानसभेची तयारी केली आहे. नगर जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याने उमेदवारी अर्ज नेला आहे. श्रीपाद छिंदमला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र छिंदमने नगर महापालिका निवडणूक ज्याप्रमाणे अपक्ष लढून जिंकून दाखवली होती, तसंच … Read more

विधानसभेच्या आखाड्यात मनसे उतरणार, पहिला उमेदवारही जाहीर

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन, उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली. सर्वच पक्षांची लगबग सुरु झाली आहे, तर एक पाऊल पुढे जात काँग्रेस-राष्ट्रवादीने आपले काही उमेदवारही जाहीर केलेत.  राज ठाकरेंची मनसे निवडणूक लढवणार की नाही? याबाबत काहीही स्पष्ट होत नव्हतं. मात्र राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं आज स्पष्ट केलं आणि हळूहळू सगळं … Read more

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांचा राजीनामा

अहमदनगर :- विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये खिंडार पडायला सुरुवात झालेली असतानाच स्थानिक पातळीवर अंतर्गतवाद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उफाळला आहे. प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी आज आपल्यापदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला असल्याची माहिती किरण काळे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, मी … Read more

राम शिंदे यांच्यासाठी खासदार उदयनराजे भोसले कर्जतला !

कर्जत ;- राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत -जामखेड विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे प्रा. राम शिंदे असा संघर्ष होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून एकमेकांना शह-प्रतिशह देण्याचे काम सुरू झाले आहे. त्यावर पवार यांना शह देण्यासाठी नुकतेच भाजपमध्ये आलेले साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना कर्जतला बोलविण्यात आले … Read more

कंगनाने हृतिक रोशनबद्दल केले हे वक्तव्य !

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद थांबण्याचं नावच घेत नाही. पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे. कंगनाने अभिनेता हृतिक रोशनवर निशाणा साधला आहे. पुन्हा एकदा कंगनाने आपला राग व्यक्त करत एक वक्तव्य केलं आहे.  कंगना रानौत आपल्याकडून हृतिकवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. आता कंगनाने असं काही वक्तव्य केलंय … Read more

आदित्य ठाकरे ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार !

मुंबई : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ३ ऑक्टोबर रोजी आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आज सायंकाळी ७ वाजता महालक्ष्मीच्या लाला लजपतराय कॉलेजमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते या मेळाव्याला … Read more

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने तरुणाला उडवले; संतप्त जमावाकडून सावंतांच्या गाडीची तोडफोड

सोलापूर :- जलसंधारण मंत्र्यांच्या वाहनाने एका तरुणाचा जीव घेतल्यामुळे संतप्त जमावाने तानाजी सावंत यांची गाडी फोडली असल्याचं सांगण्यात येत आहे. तर जमावाकडून स्थानिक पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली आहे. भर दिवसा हा अपघात झाल्यामुळे रस्त्यावर एकच गर्दी पाहायला मिळत आहे. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहे. श्याम होळे असं मृत झालेल्या … Read more

भाजपच्या उमेदवारांची नावं निश्चित,पहिली यादी आज जाहीर होणार !

नवी दिल्ली : नवी दिल्लीत मोदी आणि शाहांच्या उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपली असून, या बैठकीत भाजपच्या उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची माहिती आहे. तसंच भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. दोन दिवसात युतीची घोषणा होईल असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी सांगितलेले युतीचे अनेक मुहूर्त टळले आहेत. मात्र युतीची घोषणा काही झाली … Read more

तर मी खासदारकीचा राजीनामा देईन…

राहुरी ;- राहुरीच्या ऊस उत्पादक सभासदांनी मोठ्या विश्वासाने साखर कारखाना आमच्याकडे दिलेला असून गेली दोन वर्षे हा साखर कारखाना चालवत असताना कुणी एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार दाखवून दिला, तर संचालक पदाबरोबरच खासदारकीचा देखील राजीनामा देईल, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या रविवारी आयोजित ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत … Read more

हॉटेलमधील कूकचा तिक्ष्ण हत्याराने वार करून खून

श्रीरामपूर :- तालुक्यातील भेर्डापूर शिवारात भेर्डापूर-पाथरे रस्त्यावरील अजिंक्यतारा हॉटेलमधील कूक मोहमंद शेख याचा तिक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. या कूकचा मृतदेह रविवारी हॉटेलच्या मागेच पडलेला आढळला. पोलिसांनी याच हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या एकास संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. दुपारी उशिरा या दोघांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाले. वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. त्यात मोहंमद … Read more

संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासाठी प्रयत्न

संगमनेर :- मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्ह्यात १२ विरुध्द ० असा निकाल लावण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. सर्व विरोधकांची एकत्र मोट बांधत थोरात यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. बदलती समीकरणे लक्षात घेता एकास एक उमेदवारीचा थोरात यांना फायदा होतो की … Read more

आमदार संग्राम जगताप यांच्या पक्षबदलाची चर्चा पुन्हा सुरू, मात्र…

अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा शहरात सुरू होती. जगताप धक्कातंत्र वापरून ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात होते. त्यातच जगताप यांनी सोमवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी साडेसहा वाजता शिल्पा गार्डन येथे पदाधिकारी व मोजक्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यामुळे जगताप यांच्या पक्षबदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, हा … Read more