कांबळे यांना श्रीरामपुरात काँग्रेसची उमेदवारी द्या

श्रीरामपूर – श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेस पक्षाने स्थानिक उमेदवार द्यावा, यासाठी तालुक्यातील खिर्डी गावचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच प्रभाकर कारभारी कांबळे या तरुण तडफदार नेतृत्वास द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांना भेटून करण्यात आली. खिर्डीचे लोकनियुक्त सरपंच प्रभाकर कांबळे यांच्यासह त्यांच्या उमेदवारीसाठी मागणी करणारे शिष्टमंडळ काल आ. थोरात यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यात अनिल … Read more

पती पाठोपाठ जखमी पत्नीचाही मृत्यू

श्रीगोंदा : तालुक्यातील शेडगाव येथील दोन सख्या भावांच्या जमिनीच्या वादात गंभीर जखमी झालेल्या गोरख भदे यांचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या गोरख भदे यांच्या पत्नी सुरेखा गोरख भदे यांचाही सोमवार दि.१६ रोजी पहाटेच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जमिनीच्या वादातून पती- पत्नीचा मृत्यू आणि आई- वडीलाविना पोरक्या झालेल्या मुलांना पाहुन अंत्यविधी … Read more

दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतरही रात्री चांगली झोप न येणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी

वॉशिंग्टन : दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतरही रात्री चांगली झोप न येणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शास्त्रज्ञांनी झोपेची गुणवत्ता वाढविण्यासाठी एक स्मार्ट ‘पायजमा’ तयार केला असून, हे वस्त्र झोपेत व्यक्तीच्या हृदयाचे ठोके व त्याच्या श्वासोच्छ्वासाच्या प्रक्रियेवर आपल्या सेन्सर्सद्वारे सूक्ष्म नजर ठेवणार आहे. याद्वारे मिळालेल्या डेटाचा वापर व्यक्तीच्या झोपेची गुणवत्ता वाढविण्यासाठी केला जाणार आहे.. अमेरिकेतील मेसाच्युसेट्स एमहर्स्ट विद्यापीठाच्या … Read more

महाजनादेश यात्रेत दहाजणांना अटक

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान निवेदन देण्यास जाणाऱ्या दहाजणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना अटक करण्यात आली. तौसिफ रशिद मुन्शी (वय ३०), रईक अब्दुल मजीद मुन्शी (वय ३१), अय्याज शकील शेख (वय ३०), इमाम शकील मुल्ला (वय २९), गौस फकरुद्दीन शेख (वय ३१), अझहर दाऊद लांबे (वय ३१), अशपाक इकबाल सय्यद (वय २९), … Read more

महापूर आणि दुसरीकडे दुष्काळ ही समस्या आता कायमस्वरूपी सोडवणार!

सांगली : एका बाजुला महापूर आणि दुसरीकडे दुष्काळ ही सांगली जिल्ह्याची समस्या आता कायमस्वरूपी सोडवणार आहे. पूराचे पाणी कॅनालच्या माध्यमातून वळवून दुष्काळी भागाला देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत केली. जागतीक बॅँकेने या योजनेला तत्वत: मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगीतले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सोमवारी सायंकाळी सांगलीत आली. या यात्रेचे आ. … Read more

भाजप नेत्याची जीभ घसरली, भर सभेत म्हणाले काँग्रेसचे आमदार ‘हिजडे’!

बंगळुरू : कर्नाटकात येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री असलेले के.एस. ईश्वरप्पा यांनी रविवारी एका जनसभेत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी काँग्रेसच्या आमदारांची वर्तणूक ही अगदी हिजड्यासारखी असल्याचे म्हटले आहे. या वक्तव्यानंतर ते आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या जनसभेत बोलताना ईश्वरप्पा म्हणाले, ‘आमचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेसचे काही आमदार … Read more

सात महिलांशी लग्न करणारा तोतया पोलीसास अटक

चेन्नई : तामिळनाडूतील एका ठगाने, आपण पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशल असल्याची बतावणी करत एक नव्हे,दोन नव्हे तर चक्क सात महिलांशी विवाह केला. या तोतया पोलिसाला चेन्नई पोलिसांनी अटक केली आहे. केवळ ७ वी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या तिरूपूर येथील राजेश पृथ्वी याने २०१७ मध्ये चेन्नईतील नेल्सन मणिक्कम रोडवर एक टेलिमार्केटिंग कपनी उघडली. तो या कंपनीच्या माध्यमातून … Read more

एक किलो प्लास्टिक द्या आणि मोफत जेवण मिळवा

छत्तीसगडच्या सरगुजा (अंबिकापूर) मध्ये प्लास्टिक कचरा मुक्त करण्यासाठी वेगळी योजना गांधी जयंतीपासून सुरू होत आहे. या अंतर्गत प्लास्टिक कचरा वेचणाऱ्यांना जेवण-नाष्ट्याची व्यवस्था केली आहे. यासाठी ‘गार्बेज कॅफे’ही बनवला जात आहे. अंबिकापूरच्या महापालिकेने शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त बनवण्यासाठी या योजनेची एक महिन्यापूर्वी घोषणा केली होती. या योजनेचा उद्देश शहराला संपूर्णपणे प्लास्टिकमुक्त बनवणे हा आहे. ही … Read more

या प्रेमीयुगुलाने लग्नाच्या पत्रिकेवर लिहिली अजब सूचना…वाचून तुम्ही म्हणाल हे तर?

नवी दिल्ली : आजकाल नागरिक चर्चेत येण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. चर्चेत येण्यासाठी एका प्रेमीयुगुलाने लग्नाच्या पत्रिकेवर अजब सूचना लिहिली असून सोशल मीडियावर ही पत्रिका खूप व्हायरल होत आहे. सोशल डिस्कशन वेबसाइट रेडड्ीटवर ही पत्रिका शेअर केली आहे.मात्र, या पत्रिकेवर कुणाचेही नाव देण्यात आलेले नाही. पाहुण्यांनी लग्नात येण्याची अथवा न येण्याची माहिती योग्य वेळी दिली … Read more

संतापजनक: एक लाखासाठी आईने केली मुलीची विक्री

दिल्ली : दिल्लीच्या बवानामधून एका १५ वर्षीय मुलीची सुटका करण्यात आली आहे. मुलीच्या आईने मागील आठवड्यात मुलीला विकले होते. दिल्ली महिला आयोगाने रविवारी ही माहिती दिली. आयोगानुसार, सुटका करण्यात आलेल्या मुलीने सांगितले की, तिच्या आईने एक वर्षाच्या भावालाही गेल्या महिन्यात तस्करांकडे सोपवून त्या मोबदल्यात पैसे घेतले. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईने १५ सप्टेंबरला तिला तिच्या … Read more

आता याला काय म्हणाव? चक्क बैलगाडीला दंड ठोठावला!

बिजनौर : वाहतूक नियमांचे पालन होण्यासाठी नवीन वाहतूक नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र, यात अनेक अजब प्रकार समोर येत आहेत. उत्तरप्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील साहसपूरमध्ये चक्क बैलगाडीला या नियमांतर्गत एक हजाराचा दंड ठोठावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी शनिवारी बैलगाडी मालकाला दंड ठोठावला. मात्र, मोटार व्हेईकल ॲक्टमध्ये बैलगाडीला दंड करण्याची तुरतूद नसल्याने पोलिसांनी हा … Read more

महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या!

सांगली : कडकनाथ घोटाळा प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा, पुरग्रस्त, दुष्काळग्रस्तांना योग्य तो न्याय द्यावा, अशा मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमीकावा करत मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकून आंदोलन केले. यावेळी भाजप सरकारचा निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांना खासगी सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की करत मार्गातून बाजूला केले. यात चार कार्यकर्ते जखमी झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कडकनाथ घोटाळा … Read more

भाजपा-शिवसेना विधानसभा एकत्रित लढवणार

कराड : शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये विधानसभा निवडणुकीतील युती संदर्भात नीटपणे संवाद सुरू आहे. कोणी काही म्हटले तरी येणारी निवडणूक आम्ही एकत्रितपणे लढवू, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाजनादेश यात्रेनिमित्त रविवारी कराड येथे मुक्कामी आल्यानंतर सोमवारी सकाळी ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रकांतदादा पाटील, … Read more

आमदार विजय औटी ठेकेदाराकडून बळजबरीने कमिशन घेतात !  

पारनेर : विधानसभा उपसभापती यांच्या विरोधात पारनेर मतदारसंघातुन विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या लंकेनीं भाळवणी येथे आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात विजय औटी यांच्यावर गंभीर आरोप केला.  विजय औटी हे विकास कामाच्या नावाखाली ठेकेदाराकडून बळजबरीने कमिशन घेत असल्याचा आरोप केला असून वेळप्रसंगी त्याची व्हिडिओ क्लिप देखील जनतेसमोर ठेवणार असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.  निलेश लंके हे … Read more

लोणी येथे गुरुवार पासून राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषद – डॉ. राजेंद्र विखे पाटील

प्रवरानगर :- प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस(अभिमत विद्यापीठ)च्या सेंटर फॉर सोशल मेडिसिन आणि सेंटर फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ अँड सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. १९ ते २१ सप्टेंबर २०१९ या कालावधी मध्ये लोणी येथे ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषदे’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठाचे प्र. कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी पत्रकार … Read more

सुजय विखे म्हणतात अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी गैरसमज करून घेऊ नये !

अहमदनगर :- भाषणात बोलताना आपण ‘देखणा माणूस’ असा शब्द वापरला आहे. देखणी महिला किंवा स्त्री असा शब्द प्रयोग नाही. त्यामुळे अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी गैरसमज करून घेऊ नये. मी त्यांना उद्देशून मु‌ळीच बोललो नव्हतो, तरीही त्यांना तसे वाटत असेल तर मी माझे शब्द मागे घेतो,’ असे खुलासा खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला आहे. ते … Read more

मुलींची सतत छेड काढतो, पाठलाग करतो म्हणून आरएसएसच्या कार्यकर्त्याचा खून !

लखनऊ | मुलींची सतत छेड काढतो, पाठलाग करतो म्हणून आरएसएसच्या कार्यकर्त्याचा शनिवारी उत्तर प्रदेशातील करवाडा गावात खून करण्यात आला. मुजफ्फरनगरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अभिषेक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी पंकज यांचा खून केल्याचे कबूल केले आहे. पंकज शनिवारी घरातून मोटारसायकलने त्याचा मित्र सोनूसोबत जात असताना त्याला मध्येच कॉल आला. पंकज घरी आला नाही म्हणून त्यांच्या … Read more

ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांनी विश्वासघात करून शेतकऱ्यांचा संप मोडून काढला !

कोपरगाव :- मागील पाच वर्षांत कोपरगाव तालुक्यातील शेतकरी रब्बीच्या अनुदानापासून वंचित राहिला. शेतकऱ्यांना डाळिंब, कांदा आदी पिकांचे अनुदान मिळाले नाही. कोपरगाव तालुक्याच्या शेजारील सर्व तालुके दुष्काळी जाहीर झाले असताना कोपरगाव तालुका मात्र वगळला गेला, ज्या विश्वासाने तुम्ही २०१४ ला तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांनी विश्वासघात करून शेतकऱ्यांचा संप मोडून काढला. हे केवळ २०१४ ला केलेल्या … Read more