मान्सूनच्या वेळापत्रकात बदल?

दिल्ली : हवामानाचे देशातील बदलते स्वरूप पाहून सरकारने मान्सून सक्रिय होण्याच्या (१ जून) व तो परत जाण्याच्या (१ सप्टेंबर) तारखांत बदल करण्याच्या मुद्यावर गांभीर्याने विचार सुरू केला आहे. नैऋत्य मोसमी वारे सक्रिय होण्याच्या व ते परत जाण्याच्या तारखांची समिक्षा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या गाडगीळ समितीने यासंबंधी सकारात्मक शिफारस केल्यास पुढील वर्षापासून मान्सूनच्या वेळापत्रकांत योग्य तो … Read more

केंद्र सरकारने रोजगार घालवण्याचे काम केले!

मुंबई : देशात बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे. अनेक कंपन्यांतून कामगारांना मुक्त करण्याचे आदेश दिले जात आहेत. सत्ता हातात असताना रोजगार वाढवण्याचे काम करण्याऐवजी केंद्र सरकारने रोजगार घालवण्याचे काम केले असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी भाजपा सरकारवर केली. नवी मुंबईतील सीवूड्स येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत पवारांनी पक्षांतर करणाऱ्यांनाही … Read more

विकासकामांचा धसका घेत विरोधकांनीच त्यांच्या पक्षबदलाच्या अफवा पसरवल्या!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप हे पक्ष बदलणार असल्याची चर्चा मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, ही चर्चा म्हणजे केवळ अफवा असून जगताप कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. ते राष्ट्रवादीत आहेत आणि पुढेही राहतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. जगताप यांनी पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा धसका घेत … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३६ कोटींचे अनुदान

नगर: खरीप २०१८ मध्ये दुष्काळामुळे नगर तालुक्यातील शेती पिकाच्या झालेल्या पिक नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण ३५ कोटी ८७ लाख ६२ हजार ६२५ इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे. उर्वरित अनुदान वाटप करण्याचे कामकाज सुरू असून यादीतील काही लाभाथ्यांचे बँक खाते क्रमांक चुकीचे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे खाते क्रमांक दुरूस्त करून संबंधित तलाठी … Read more

विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वतंत्र लढणार?

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्री बंगल्यावर सेनेचे पदाधिकारी, संपर्क व विभागप्रमुख यांचे म्हणणे रविवारी जाणून घेतले. युतीची बोलणी चालू असतानाच शिवसेनेने २८८ मतदारसंघांतील परिस्थितीची रविवारी चाचपणी घेतली. जागावाटप तोडग्याच्या चर्चेतून काहीच निष्पन्न होत नसल्यामुळे वेट अँड वॉच या भूमिकेतून शिवसेनेने आपल्या नेत्यांना या बैठकीत सबुरीचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे. मातोश्री निवासस्थानी … Read more

त्या पळपुट्यांचा नेत्यांचा लोकच समाचार घेतील: शरद पवार

मुंबई – काही जण चुकीच्या मार्गावर जातील असे वाटले नव्हते. पण त्यांनी पळपुटेपणा स्वीकारला. अशांचा लोकच आता समाचार घेतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी नवी मुंबईतील मेळाव्यात दिला. ‘मी १९६७ मध्ये प्रथम विधिमंडळात गेलो. तेव्हापासून आजपर्यंत ५३ वर्षे कोणत्या ना कोणत्या सदनात आहे. २७ वर्षे मी विरोधी पक्षात होतो. मला विरोधी … Read more

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

नगर : नगर तालुक्यातील देहरे येथील शेतकरी विक्रम उर्फ बाळासाहेब हरिदास काळे (वय ५०) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाऊस न झाल्याने नापिकी, कर्जबाजारीपणामुळे काळे यांनी आत्महत्या केली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. काळे यांच्या नावावर दोन एकर शेती आहे. पावसाळ्यात चांगला पाऊस न … Read more

थेट नगर-पुणे रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न – खा.डॉ सुजय विखे

‘दौंड रेल्वे स्थानकाला बायपास करणारी नगर-पुणे रेल्वे लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. याशिवाय औद्योगिक विकासासाठी दळणवळण सुविधांचा विस्तार व आधुनिकीकरण गरजेचे आहे. त्या अनुषंगाने नगर जिल्ह्याला पुणे व औरंगाबाद या दोन्ही महानगरांशी रेल्वेद्वारे जोडले जाणे आवश्यक असून त्यासाठी केंद्रात पाठपुरावा करीत आहोत’, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले नगर-बीड-परळी मार्गाचे काम जोरात सुरू … Read more

केवळ नारळ फोडून विकास होत नाही – प्रताप ढाकणे

पाथर्डी :- विकास काय असतो हे आम्ही प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून दाखवतो. केवळ नारळ फोडून विकास होत नाही, अशी खरमरीत टीका केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष व पाथर्डी बाजार समितीचे संचालक  प्रताप ढाकणे यांनी आमदार राजळे यांचे नाव न घेता केली. पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्ता डांबरीकरण, बैल बाजाराचे सुशोभीकरण व तिसगाव उपबाजार समिती येथील … Read more

‘अगस्ती’ च्या सभासदांची दिवाळी गोड – मधुकर पिचड

अकोले : अगस्तीच्या कार्यक्षेत्रात ऊस कमी आहे. तथापि, सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडता कामा नये, म्हणून कारखाना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. कार्यक्षेत्रातील ऊस व बाहेरून तितकाच ऊस उपलब्ध करून पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार अगस्तीने केला आहे. साखरेबरोबरच आर्थिक मदत करून सर्वांची दिवाळी गोड केली जाईल, असे आश्वासन अगस्तीचे अध्यक्ष … Read more

अन्यथा पी. चिदंबरम यांच्यासारखी तुमचीही अवस्था होईल

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांत आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर देशात सुपर इमर्जन्सीसारखी स्थिती लादल्याचा आरोप केला आहे. त्यावर भाजपने पलटवार करताना म्हटले की, सुपर इमर्जन्सी तर पश्चिम बंगालमध्ये आहे. तेथे ‘जय श्रीराम’ ही घोषणा दिल्यानंतर तुरुंगात डांबले जाते. दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील बलिया येथील … Read more

एकाच दुकानातून दूध आणि चिकन विकण्यास भाजपचा विरोध

भोपाळ: मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारने एकाच दुकानातून गाईचे दूध व कडकनाथ कोंबड्याचे मांस व अंडी विकण्याची योजना सुरू केली आहे. सरकारी पार्लरमधून मिळणारे चिकन व गाईचे दूध यांच्या शुद्धतेची १०० टक्के हमी आहे, असा सरकारचा दावा आहे. सरकारच्या वतीने पहिले दुकान भोपाळमधील नेहरूनगर भागात सुरू करण्यात आले आहे. परंतु या योजनेवर भाजपने आक्षेप घेतला आहे. … Read more

९ कोटी रुपये किमतीच्या सोन्याच्या टॉयलेटची चोरी

लंडन: ब्रिटनमध्ये ऑक्सफर्डशायर येथील ब्लेनहिम पॅलेसमध्ये असलेल्या सोन्याच्या टॉयलेटची चोरी झाली आहे. हे टॉयलेट १८ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आले होते. याची किंमत १.२५ मिलियन डॉलर (सुमारे ९ कोटी रुपये) आहे. ब्लेनहिम पॅलेसमध्येच ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा जन्म झाला होता. इटलीचे कलावंत मॉरीजिओ कॅटेलन यांच्या प्रदर्शनात ‘विजयास पर्याय नसतो’मध्ये हे टॉयलेट ठेवण्यात आले होते. … Read more

निलेश लंके यांचे दैवत अचानक बदलल्याने आश्चर्य वाटते !

पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठी मी गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले. मात्र, पक्षाने अचानक, कोणालाही विश्वासात न घेता तालुक्यातील पक्ष नेतृत्वाबाबत वेगळा निर्णय घेतला. पक्षातील काही ज्येष्ठ नेते याला जबाबदार आहेत. मी नव्हे, तर पक्षानेच मला फसविले, अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केली. पारनेर तालुक्यातील देवीभोयरे, ढवळपुरी, पुणेवाडी, … Read more

ब्लॉग : तत्वनिष्ठ राजकारणाचा सूर्यास्त…!!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सात दशकाहून अधिक काळापासून सक्रीय असलेले खताळदादांनी  सन १९४४ पासून समाजकारणात आणि १९५२ पासून निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केलेल्या दादांनी सन १९६२ ते १९८५ या काळात राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडलेली आहे. याकाळातील त्यांच्या कामाचा लेखाजोखा नुसता वरवर जरी अभ्यासला तरी कुणीही चकित होऊन जाईल. खरे तर महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर नवमहाराष्ट्र … Read more

अपक्ष लढण्याची वेळ आली तरी आता मागे हटणार नाही !

कोपरगांव ;- गेल्या पन्नास वर्षापासून दोन कुटुंबांच्या हातात गुरफटून पडलेल्या सत्तेला बाहेर काढण्यासाठी तालुक्यातील जनतेनेच आता पक्का निर्धार केला असून अपक्ष लढण्याची वेळ आली तरी आता मागे हटणार नाही, असा निश्चय जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे पाटील यांनी कोपरगांव येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलून दाखविला. कोपरगांव विधानसभेच्या निवडणुकीसाठी कोपरगाव शहरातील व्यापारी धर्मशाळेत सुरु करण्यात आलेल्या … Read more

ना.राधाकृष्ण विखेंविरोधात आ. थोरात यांची कन्या लढणार?

संगमनेर :- मतदार संघात आ. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना आता शिर्डी विधानसभा मतदार संघात गृहनिर्माण राज्यमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजयरथ रोखण्यासाठी आ. थोरात यांची मुलगी शरयू रणजितसिंह देशमुख यांनी शिर्डीतून उभे रहावे, असा कार्यकर्त्यांचा सूर आल्याने निवडणुकीत रंगत येणार आहे. दरम्यान, शिर्डी विधानसभा मतदार … Read more

पैशाच्या वादातून राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा ‘राडा’!

कोपरगाव :- शहरात नुकतेच नव्याने चालू झालेल्या सुदेश टॉकीज जवळील येवले अमृततूल्य चहाचे कोपरगाव शाखेचे संचालक संकेत गौराम मेंगडे (वय १८) यांना नितीन कोपरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप पगारे रा. संजय नगर कोपरगाव व अनोळखी दोन इसमांनी आर्थिक कारणावरून बेदम मारहाण केल्याचा घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संकेत गौराम … Read more