आदिवासी वाड्यावस्त्यांवरील सामाजिक प्रश्न अजूनही प्रलंबित!

अहमदनगर : देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली मात्र दुष्काळी पारनेर तालुक्यातील दुर्गम आदिवासी वाड्यावस्त्यांवरील सामाजिक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. शहरी भागाच्या तुलनेत तालुक्याच्या ग्रामीण भागातील अतिदुर्गम असणाऱ्या आदिवासी व दुर्लक्षित असणाऱ्या वाड्यावस्त्यांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत, असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, … Read more

माजी खासदारांना सरकारी बंगल्याचा मोह सुटेना

नवी दिल्ली : दिल्लीतील ल्युटियन्स झोनमधील सरकारी बंगल्यांचा मोह अद्यापही ८० हून अधिक माजी खासदारांना सुटत नसल्याचे समोर आले आहे. लोकसभा समितीनेदिलेल्या कडक इशाऱ्यांनंतरही हे बंगले रिकामे करण्यास अद्यापही या माजी खासदारांनी तयारी दाखविलेली नाही, अशी माहिती सूत्रांकडून समजते. त्यामुळे आता सरकार या माजी खासदारांवर कायद्याचा बडगा उगारण्याच्या तयारीत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.. सी.आर. पाटील यांच्या … Read more

मुलीच्या लग्नापूर्वी पित्याने उडवले घर

एजवूड : अमेरिकेच्या पिट्सबर्ग येथे एका मनोरुग्ण पित्याने मुलीच्या लग्नादिवशी स्वत:चे घर स्फोटकांनी उडविल्याने शनिवारी खळबळ उडाली. या स्फोटात नवरी मुलीचा पिता ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीच्या लग्नासाठी कुटुंबातील सदस्य व नातेवाईक लग्नस्थळावर लगबग सुरू असताना रात्रीच्या सुमारास पित्याने स्वत:च्या घरात स्फोट घडवून आणला. या स्फोटात ठार झालेल्या पित्याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

गर्भवती महिलेची रुग्णालयाच्या दारात प्रसूती

राहुरी : तालुक्यातील कणगर येथील गर्भवती महिला गुहा ग्रामीण रुग्णालयाच्या दारातच प्रसूत झाल्याची घटना काल (दि. १५) नऊ वाजता घडली. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या समयसूचकतेमुळे गर्भवती माता व नवजात बालकाचे प्राण वाचले. असे असले तरी महिला सहाव्यांदा गर्भवती असताना कणगर ते लोणी असा प्रवास केला केला जात होता असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

पती, पत्नी व मुलास मारहाण

संगमनेर : तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघा जणांनी पती, पत्नी व मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना शुक्रवार दि. १३ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंपळगाव कोंझिरा या ठिकाणी विमल बाळचंद आहेर ही महिला आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. … Read more

‘दूरदर्शन’ ला ६० वर्षे पूर्ण

दिल्ली : एकावेळी देशातील घराघरामध्ये आपली जागा निर्माण करणाऱ्या दूरदर्शनला रविवारी ६० वर्षे पूर्ण झाली. या औचित्यावर अनेकांनी सोशल माध्यमांवर दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील विविध आठवणींना उजाळा दिला. महाभारत, हम लोग, फौजी आणि मालगुडी डेजसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांद्वारे दूरदर्शनने लोकांच्या मनात आपला वेगळा कप्पा तयार केला होता. तर बदलत्या काळानुसार दूरदर्शननेदेखील आपली कात टाकत नवीन युगाशी जुळवून घेतले … Read more

…तर पाकचे तुकडे!

सूरत : ‘पाकने दहशतवादाला प्रोत्साहन देणे बंद केले नाही, तर त्याचे तुकडे होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही,’ असा निर्वाणीचा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी भारताविरोधात कुरापती करणाऱ्या पाकला दिला. ‘पाकच्या लोकांनी नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला, तर भारतीय लष्कर सज्ज आहे. आम्ही त्यांना परत जाऊ देणार नाही,’ असे ते म्हणालेत. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या … Read more

‘जायकवाडी’चे बारा दरवाजे उघडले

पैठण : जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरताच धरण प्रशासनाने रविवारी (दि.१५) सायंकाळी सहा वाजता धरणाचे चार दरवाजे व त्यानंतर रात्री ११.३० वाजता आणखी ८ असे एकूण १२ दरवाजे अध्र्या फुटाने वर उचलून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सध्या धरणात १७ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून महिन्याभरात सलग दुसऱ्यांदा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. … Read more

मान्सूनच्या वेळापत्रकात बदल?

दिल्ली : हवामानाचे देशातील बदलते स्वरूप पाहून सरकारने मान्सून सक्रिय होण्याच्या (१ जून) व तो परत जाण्याच्या (१ सप्टेंबर) तारखांत बदल करण्याच्या मुद्यावर गांभीर्याने विचार सुरू केला आहे. नैऋत्य मोसमी वारे सक्रिय होण्याच्या व ते परत जाण्याच्या तारखांची समिक्षा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या गाडगीळ समितीने यासंबंधी सकारात्मक शिफारस केल्यास पुढील वर्षापासून मान्सूनच्या वेळापत्रकांत योग्य तो … Read more

केंद्र सरकारने रोजगार घालवण्याचे काम केले!

मुंबई : देशात बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे. अनेक कंपन्यांतून कामगारांना मुक्त करण्याचे आदेश दिले जात आहेत. सत्ता हातात असताना रोजगार वाढवण्याचे काम करण्याऐवजी केंद्र सरकारने रोजगार घालवण्याचे काम केले असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी भाजपा सरकारवर केली. नवी मुंबईतील सीवूड्स येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत पवारांनी पक्षांतर करणाऱ्यांनाही … Read more

विकासकामांचा धसका घेत विरोधकांनीच त्यांच्या पक्षबदलाच्या अफवा पसरवल्या!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप हे पक्ष बदलणार असल्याची चर्चा मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, ही चर्चा म्हणजे केवळ अफवा असून जगताप कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. ते राष्ट्रवादीत आहेत आणि पुढेही राहतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. जगताप यांनी पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा धसका घेत … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३६ कोटींचे अनुदान

नगर: खरीप २०१८ मध्ये दुष्काळामुळे नगर तालुक्यातील शेती पिकाच्या झालेल्या पिक नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण ३५ कोटी ८७ लाख ६२ हजार ६२५ इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे. उर्वरित अनुदान वाटप करण्याचे कामकाज सुरू असून यादीतील काही लाभाथ्यांचे बँक खाते क्रमांक चुकीचे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे खाते क्रमांक दुरूस्त करून संबंधित तलाठी … Read more

विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वतंत्र लढणार?

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्री बंगल्यावर सेनेचे पदाधिकारी, संपर्क व विभागप्रमुख यांचे म्हणणे रविवारी जाणून घेतले. युतीची बोलणी चालू असतानाच शिवसेनेने २८८ मतदारसंघांतील परिस्थितीची रविवारी चाचपणी घेतली. जागावाटप तोडग्याच्या चर्चेतून काहीच निष्पन्न होत नसल्यामुळे वेट अँड वॉच या भूमिकेतून शिवसेनेने आपल्या नेत्यांना या बैठकीत सबुरीचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे. मातोश्री निवासस्थानी … Read more

त्या पळपुट्यांचा नेत्यांचा लोकच समाचार घेतील: शरद पवार

मुंबई – काही जण चुकीच्या मार्गावर जातील असे वाटले नव्हते. पण त्यांनी पळपुटेपणा स्वीकारला. अशांचा लोकच आता समाचार घेतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी नवी मुंबईतील मेळाव्यात दिला. ‘मी १९६७ मध्ये प्रथम विधिमंडळात गेलो. तेव्हापासून आजपर्यंत ५३ वर्षे कोणत्या ना कोणत्या सदनात आहे. २७ वर्षे मी विरोधी पक्षात होतो. मला विरोधी … Read more

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

नगर : नगर तालुक्यातील देहरे येथील शेतकरी विक्रम उर्फ बाळासाहेब हरिदास काळे (वय ५०) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाऊस न झाल्याने नापिकी, कर्जबाजारीपणामुळे काळे यांनी आत्महत्या केली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. काळे यांच्या नावावर दोन एकर शेती आहे. पावसाळ्यात चांगला पाऊस न … Read more

थेट नगर-पुणे रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न – खा.डॉ सुजय विखे

‘दौंड रेल्वे स्थानकाला बायपास करणारी नगर-पुणे रेल्वे लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. याशिवाय औद्योगिक विकासासाठी दळणवळण सुविधांचा विस्तार व आधुनिकीकरण गरजेचे आहे. त्या अनुषंगाने नगर जिल्ह्याला पुणे व औरंगाबाद या दोन्ही महानगरांशी रेल्वेद्वारे जोडले जाणे आवश्यक असून त्यासाठी केंद्रात पाठपुरावा करीत आहोत’, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले नगर-बीड-परळी मार्गाचे काम जोरात सुरू … Read more

केवळ नारळ फोडून विकास होत नाही – प्रताप ढाकणे

पाथर्डी :- विकास काय असतो हे आम्ही प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून दाखवतो. केवळ नारळ फोडून विकास होत नाही, अशी खरमरीत टीका केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष व पाथर्डी बाजार समितीचे संचालक  प्रताप ढाकणे यांनी आमदार राजळे यांचे नाव न घेता केली. पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्ता डांबरीकरण, बैल बाजाराचे सुशोभीकरण व तिसगाव उपबाजार समिती येथील … Read more

‘अगस्ती’ च्या सभासदांची दिवाळी गोड – मधुकर पिचड

अकोले : अगस्तीच्या कार्यक्षेत्रात ऊस कमी आहे. तथापि, सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडता कामा नये, म्हणून कारखाना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. कार्यक्षेत्रातील ऊस व बाहेरून तितकाच ऊस उपलब्ध करून पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार अगस्तीने केला आहे. साखरेबरोबरच आर्थिक मदत करून सर्वांची दिवाळी गोड केली जाईल, असे आश्वासन अगस्तीचे अध्यक्ष … Read more