आळशी जीवनशैली दुपटीने वाढविते मृत्यूचा धोका

लंडन : आजच्या काळात जीवनशैलीशी संबंधित समस्या सामान्य झाल्या आहेत. खराब दिनचर्येमुळे लोकांना विविध प्रकारचे आजार विळख्यात घेत असल्याचे डॉक्टरही सांगत आहेत. मात्र हे कुणीच फारसे मनावर घेत नाही. आता एका ताज्या अध्ययनातून काही अशा गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या तुम्हाला आपल्या जीवनशैलीत बदल करणे भागच पडेल. या अध्ययनानुसार, समजा तुम्ही सतत सुस्तावलेले जीवन जगत … Read more

जंक फूडच्या अतिसेवनामुळे हिरावली त्याची दृष्टी

लंडन : ब्रिटनमधील १७ वर्षाच्या मुलाची दृष्टी हिरावली गेली असून त्याला ऐकायलाही कमी येऊ लागले आहे. याचे कारण अतिशय विचार करायला लावणारे आहे. गेल्या दहा वर्षांपासून त्याने चिप्स, बर्गर, फ्रेंच फ्राइज याव्यतिरिक्त काहीच खाल्लेले नाही. म्हणजे गेले दशकभर तो फक्त जंक फूडवर जगत राहिला. माध्यमिक शाळेत प्रवेश घेतल्यापासून हेच त्याचे अन्न झाले. ब्रिस्टलमधील मुलांच्या रुग्णलयातील … Read more

मळणी यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू

जामखेड : तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे मळणी यंत्राव्दारे उडिदाची मळणी करत असताना,मळणी यंत्रात गेल्याने मंगल अशोक भाकरे (वय ४५) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथील हभप भाकरे महाराज यांच्या पत्नी मंगल अशोक भाकरे यांचा उडदाची मळणी करत असताना मळणी यंत्रात डोके गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू … Read more

दारू पिण्यास पैसे न दिल्याने राडा

अहमदनगर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दोघांनी मित्रालाच कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या हातातील अंगठी व गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली. ही घटना बोल्हेगाव येथील जॉगिंग ट्रॅक येथे घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गणेश शंकर वाकळे, आकाश गोरख कोलते (दोघेही रा. बोल्हेगाव, नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या … Read more

बघायचं नाही, बोलायचं हा नवा मंत्र : अभिषेक कळमकर

अहमदनगर : शहराला आधुनिकतेकडे नेण्यासाठी सर्वसामान्य नगरकरांचा आवाज उठणे गरजेचे आहे. अहमदनगर स्पीक्सच्या माध्यमातून नगरच्या सर्वांगीण विकासाचा आवाज बुलंद होणार आहे,असे स्पष्ट करीत अहमदनगर स्पीक्स या चळवळीची घोषणा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत केली. हि चळवळ राजकारणविरहित असून फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ चालणार आहे.यासाठी कळमकर यांनी पुढाकार घेतला आहे.बघायचं नाही,बोलायचं असा मंत्र या … Read more

कडकनाथ कोंबडी पालनात शेतकऱ्यांची फसवणूक

राहाता : तुम्ही फक्त कोंबडी वाढवा आणि परत द्या. बाजारातील इतर कोंबड्यांपेक्षा आम्ही तिला २०० ते २५० रुपये जास्त भाव देऊ, असे आमिष दाखवून कडकनाथ कोंबडी मार्केटिंगची साखळी चालविणाऱ्या एका कंपनीने राहाता व कोपरगाव तालुक्यातील सुमारे १५ शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. कडकनाथ कोंबडी चांगली असल्याचा मोठा गाजावाजा करीत एका कोंबडी मार्केटिंग कंपनीने शेतकऱ्यांना … Read more

नारायण राणे हद्दपार, त्यांना दुर्बिण घेऊन शोधावे लागेल

शिर्डी : राज्याच्या राजकारणातून नारायण राणे हद्दपार झाले असून, त्यांना राजकारणात दुर्बिण घेऊन शोधावे लागेल, असे स्पष्ट करत त्यांनी हवं तिथं जावं शिवसेना त्यांना भूईसपाट करण्यास सक्षम असल्याचे शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांनी सांगितले. कुचिक हे किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आहेत. नुकतेच त्यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईभक्त व कर्मचाऱ्यांसंदर्भात ते नेहमी … Read more

दामदुप्पटीच्या आमिषाने २९६ लोकांना गंडा

संगमनेर : संगमनेरात सुरुअसलेल्या फिनॉमिनल हेल्थ केअर स्व्हिहसेस कंपनीने २९६ लोकांना दामदुप्पटीचे आमीष दाखवून ८१ लाख २९ हजार ३८७ रूपयांची फसवणूक केली आहे. ही घटना दि. २८ फेब्रुवारी २००९ ते जून २०१६ या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी सातजणांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर याठिकाणी … Read more

७४ व्या वर्षी आजी झाली आई !

गुंटूर : वयाच्या ७४ व्या वर्षी एका महिलेने कृत्रिम गर्भधारणेच्या माध्यमातून जुळ्या मुलींना जन्म दिल्याची सुखद घटना गुरुवारी आंध्रप्रदेशच्या गुंटूर शहरात घडली. लग्नाच्या ५७ वर्षांनंतरदेखील बाळ होत नसलेल्या या वयोवृद्घ दाम्पत्याने आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करत बाळाला जन्म दिला. डॉक्टरांनुसार या वयात आई होण्याचा हा जागतिक विक्रम असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद होण्याची … Read more

फेसबुक पुन्हा वादात, ४१ कोटी यूझर्सचे फोन नंबर लीक !

 वॉशिंग्टन : जगातील आघाडीचे सोशल माध्यम असलेले फेसबुक डेटा चोरीवरून पुन्हा वादात आले आहे. फेसबुकच्या ४१.९ कोटी वापरकर्त्यांचे फोन नंबर चोरीला गेल्याचे वृत्त आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटी व्यक्तींच्या मोबाईल क्रमांकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे वापरकर्त्यांना फेक कॉल आणि सीम स्वॅपिंगसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो; परंतु फेसबुकने ही माहिती जुनी असून यामुळे घाबरण्याचे … Read more

नव्या पवारांचा उदय होतोय,उद्धव ठाकरेंकडून रोहित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

अहमदनगर :- बारामतीत नव्या पवारांचा उदय झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखामधून शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?’ या अमित शाह यांच्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिलेल्या उत्तरामध्ये विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत असंही या अग्रलेखात म्हटलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मते येत्या … Read more

राम शिंदेंची डोकेदुखी वाढली, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत विधानसभा लढणार ?

जामखेड: विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पळवापळवी सुरु असताना तिकीट न मिळाल्याने बंडखोरीलाही उधाण येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राम शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आधीच शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांचं संभाव्य आव्हान समोर राम शिंदें समोर आहे. त्यातच भाजपच्या गोटातील माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. नामदेव … Read more

प्रमाणपत्र देण्यासाठी ५ लाखांची लाच

शिर्डी : नाशिक अनुसूचित जमाती प्रवर्गाचे जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तब्बल पाच लाखांची लाच स्वीकारताना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे उपसंचालक रामचंद्र रतिलाल सोनकवडे, विधी अधिकारी शिवप्रसाद मुकुंदराव काकडे आणि दोन खासगी व्यक्ती विनायक ऊर्फ सचिन उत्तमराव महाजन, मच्छिंद्र मारुती गायकवाड पाच लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. शिर्डी येथील साई आसरा … Read more

सालकरी की मालक निवडायचा याचा निर्णय जामखेडकरांनी घ्यावा

जामखेड: सालकऱ्याचा मुलगा सालकरी राहतो, मालकाचा मुलगा मालकच राहतो. त्यामुळे कर्जत-जामखेडच्या जनतेने सालकरी निवडायचा की, मालक निवडायचा याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले. शेतीचा पाणीप्रश्र सोडवण्यासाठी ‘कृष्णा-भीमा-सीना स्थिरीकरण प्रकल्प’ राबवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. भारतीय जनता पक्षातर्फे बुधवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर जामखेड शहरातील राज लाॅन्सवर घेण्यात आले. या वेळी … Read more

कांद्याला २२०० ते २७०० रुपये बाजारभाव

राहुरी: शहर वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर गुरुवारी एक नंबर कांद्याला २२०० ते २७०० रुपये, तर गोल्टी कांद्याला १६०० ते २१०० रुपये क्विंटल भाव मिळाला. दोन दिवसांपूर्वी राहुरी बाजार समितीच्या मोंढ्यावर १ नंबरला २००० ते २६०० रुपये, तर गोल्टीला १८०० ते २४०० रुपये भाव मिळाला होता. त्या तुलनेत वांबोरीत १०० रुपये भाव वाढले असले, तरी गोल्टीच्या … Read more

रस्त्यावर राडा करणाऱ्या नगरच्या मद्यधुंद तरुणीला पुण्यात अटक

पुणे: गुरुवारी पहाटेच्या वेळी रस्त्यावर दारू पिऊन गोंधळ करणाऱ्या तरुणीला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मद्यधुंद तरुणीला अटक केली असून, सोनल सुनिल सद्रे (३०,रा. सद्रेवाडा भराड गल्ली अहमदनगर) असे तिचे नाव आहे. तरुणीला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात … Read more

पाच वर्षांत ५९ लाख नोकऱ्या – मुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्राने औद्योगिक राज्य म्हणून पहिला क्रमांक पुन्हा मिळवला आहे. देशातील औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर तर देशातील थेट विदेशी गुंतवणुकीतही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. नीती आयोग व रिझर्व्ह बँकेने घोषित केल्याप्रमाणे महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्रच आहे. राज्यात मागील पाच वर्षांत ५९ लाख ४२ हजार रोजगार निर्मिती झाली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

गणेश भक्ताचा मिरवणुकीत नाचताना मृत्यू

अंबाजोगाई : गणेश आगमना निमित्त काढलेल्या मिरवणुकीत नाचताना हृदयविकाराचा धक्का आल्याने एका ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२) रात्री साडेआठ वाजेदरम्यान शहरातील रविवारपेठेत घडली. श्याम महादेव गोंडे (रा. पटाईत गल्ली, रविवारपेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे.सोमवारी रविवार पेठेतील पटाईत गल्लीमधील तरुणांनी मूर्ती प्रतिष्ठापणा करण्यासाठी गणपतीच्या मूर्तीची खरेदी केली. त्यानंतर वाजत-गाजत तिची मिरवणूक … Read more