गणेश पूजेमध्ये सकारात्मकतेचं प्रतीक आहे स्वस्तिक, ते कसं असावं ?

उद्या सोमवार, 2 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु होत आहे. या दिवशी प्रत्येक घरामध्ये ढोल-ताशांच्या गजरात श्री गणेशाची मूर्ती स्थापित केली जाईल, यावर्षी हा उत्सव 11 दिवस म्हणजेच गुरुवार 12 सप्टेंबरपर्यंत साजरा केला जाईल.  श्रीगणेश पूजेमध्ये सर्वात प्रथम गणेशाचे प्रतीक चिन्ह स्वस्तिक काढले जाते. श्रीगणेश प्रथमपुज्य देवता असल्यामुळे पूजन कर्माच्या सुरुवातीला स्वस्तिक काढण्याची परंपरा असते. स्वस्तिक काढून … Read more

घरामध्ये डाव्या सोंडेच्या गणेशाचीच स्थापना का करावी?

उद्या  2 सप्टेंबरपासून गणेश उत्सव सुरु होत असून हा उत्सव 12 सप्टेंबरपर्यंत राहील. सोमवारी घराघरात श्रीगणेशाची स्थापना केली जाईल. श्रीगणेश मूर्तीच्या सोंडसंदर्भात वेगवेगळे मतभेद आहेत. उजव्या की डाव्या सोंडेचा गणपती शुभ राहतो याविषयी अनेक लोकांना माहिती नसावी. जाणून घ्या, घरातील श्रीगणेशाची सोंड डाव्या बाजूला असावी की उजव्या बाजूला. घरासाठी जास्त शुभ ठरतो डाव्या सोंडेचा गणपती  … Read more

…म्हणून घरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये

श्रीगणेशाला वक्रतुंडही म्हटले जाते. या शब्दाचा अर्थ वळवलेली सोंड. श्रीगणेशाचे हेसुद्धा एक सुंदर स्वरूप असून यामध्ये यांची सोंड उजव्या किंवा डाव्या बाजूला वळलेली असते. सोमवार 2 सप्टेंबरपासून गणेश उत्सव सुरु होत असून हा उत्सव 12 सप्टेंबरपर्यंत राहील. शास्त्रानुसार उजव्या बाजूला सोंड असलेले श्रीगणेश हट्टी स्वभावाचे असतात. यांचे पूजन कर्म सोपे नाही. अशाप्रकारच्या गणेश मूर्ती पूजेमध्ये … Read more

श्रीगणेशाची घरात प्रतिष्ठापना करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची दक्षता घेतलीच पाहिजे

श्री गणेशाला वक्रतुंडही म्हटले जाते. या शब्दाचा अर्थ वळवलेली सोंड. श्रीगणेशाचे हेसुद्धा एक सुंदर स्वरूप असून यामध्ये यांची सोंड उजव्या किंवा डाव्या बाजूला वळलेली असते.  उद्या सोमवार 2 सप्टेंबरपासून गणेश उत्सव सुरु होत असून हा उत्सव 12 सप्टेंबरपर्यंत राहील. गुरुवारी घराघरात श्रीगणेशाची स्थापना केली जाईल. भव्यदिव्य गजरात गणेशाचे स्वागत केले जाईल. परंतु अनेक जणांचे श्रीगणेश … Read more

जाणून घ्या गणेशोत्सवाची संपूर्ण माहिती

गणपती हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा केली जाते. गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा मानून त्याला सार्वजनिक रूप दिले. घरोघरी आणि मंडपोमंडपी येणारा हा बाप्पा येतांना सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण घेउन येतो. त्याच्या आगमनापुर्वीपासुनच कितीतरी दिवस आधीपासुन तयारी सुरू होते.  कुठे बाप्पा … Read more

गणेशोत्सव कसा साजरा कराल? निसर्गविरोधी की निसर्गस्नेही

निसर्गविरोधी प्लास्टरच्या मूर्ती : प्लास्टरच्या मूर्ती वजनाला हलक्या आणि लवकर सुकणार्‍या असतात. उत्पादन आणि वाहतुकीच्या दृष्टीने सोयीच्या; पण विसर्जनानंतर त्या पाण्यात विरघळत नाहीत. विषारी रंग      : मूर्तीचे रासायनिक रंग अत्यंत विषारी असतात. मूर्तिचा आकार   : मोठ्या आकाराच्या मूर्तीमुळे मातीचा आणि प्लॅस्टरचा वापर वाढतोे. या मूर्तीच्या विसर्जनानंतर नद्या, विहिरी, तळी यांमध्ये गाळ वाढतो. … Read more

कसा असावा गणेशोत्सव ?

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात, जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. सन १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणार्‍या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले. या उत्सवाच्या निमित्ताने भारतातील जनता एकवटेल. त्यातील सांस्कृतिक आणि बौद्धिक कार्यक्रमांच्या … Read more

गणपती अथर्वशीर्ष मराठी

ॐ नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि।। त्वमेव केवलं कर्त्ताऽसि। त्वमेव केवलं धर्तासि।। त्वमेव केवलं हर्ताऽसि। त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि।। त्वं साक्षादत्मासि नित्यम्। ऋतं वच्मि।। सत्यं वच्मि।। अव त्वं मां।। अव वक्तारं।। अव श्रोतारं। अवदातारं।। अव धातारम अवानूचानमवशिष्यं।। अव पश्चातात्।। अवं पुरस्तात्।। अवोत्तरातात्।। अव दक्षिणात्तात्।। अव चोर्ध्वात्तात।। अवाधरात्तात।। सर्वतो मां पाहिपाहि समंतात्।।3।। त्वं वाङग्मयचस्त्वं चिन्मय। त्वं … Read more

गणेशोत्सव आदर्श होण्यासाठी हे करा !

Photo : The Statesman

चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे, हे धमशास्त्रविरोधी आहे ! मूर्ती आकाराने लहान (एक फूट ते दीड फूट उंच) असावी ! मूर्ती पाटावर बसलेली, शक्यतो डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी ! श्री गणेशमूर्ती मूर्तीशास्त्रानुसार बनवलेली असल्यास पूजकाला सामान्य मूर्तींच्या … Read more

पर्यावरणपूरक गणेशोत्सव

भारतासह देशविदेशात पोहोचलेला गणेशोत्सव काळानुरूप बदलत आहे. मात्र आज साजरे होणारे गणेशोत्सव हे पर्यावरणाला हानीकारक तर ठरत नाहीत ना, याकडे मात्र लक्ष देण्याची वेळ आली आहे. गणपती हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा केली जाते. गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा मानून … Read more

श्रीगणेशाची आरती

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची। कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती। दर्शनमात्रें मनकामना पुरती ॥धृ.॥ रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा। चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।हिरे जडित मुकुट शोभतो बरा। रुणझुणती नुपुरें चरणी घागरिया ॥जय.॥२॥ लंबोदर पीतांबर फणीवरबंधना। सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट … Read more

नेवाशाला उद्योगनगरी बनवणार – आ. मुरकुटें

नेवासा :यापूर्वी नेवासा तालुक्यातील विकास फक्त कागदावरच दाखवला जायचा. निधी आणल्याच्या वल्गना व्हायच्या; परंतु प्रत्यक्षात काम दिसायचे नाही. ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार करुनच आपण २०१४ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली. पहिल्या दिवसापासून आमदारकीची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. मतदारसंघातील प्रत्येक गावाचा, वाड्या- वस्त्यांचा सखोल अभ्यास करून तेथील गरजा लक्षात घेतल्या. आपण आमदार होण्यापूर्वी तालुक्यातील ७५ टक्के रस्त्यांची … Read more

तरुणास कुऱ्हाडीने मारहाण

श्रीगोंदा : तालुक्यातील आढळगाव शिवारात एकास कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. ही घटना ३० ऑगस्ट रोजी घडली. श्रीरंग आश्रु मेटे (वय ६०) यांनी फिर्यरद दाखल केली. बाळू कुंडलिक जगदाळे यांच्याविरुध्द श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रोज रोज तु आमच्या सुनेच्या घरी का येतो? अशी विचारणा श्रीरंग मेटे यांनी केली असता त्याचा राग धरुन बाळु … Read more

धनादेश न वटल्याने महिलेला दोन महिने शिक्षा

अहमदनगर : हातउसने घेतलेला एक लाखाचा धनादेश न वटल्याप्रकरणी अति. मुख्य न्यायदंडाधिकारी भाविशा गाटे यांनी कांचन गोरख चंदन (रा.साई नगर, बोल्हेगाव) या महिलेस दोन महिने साधी कैद व आरोपीने फिर्यादीला दीड लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. या खटल्याची माहिती अशी की,फिर्यादी आशा सुनील जाधव (रा. नेप्तीनाका, नालेगाव) यांच्याकडून कांचन चंदन (रा.साईनगर, बोल्हेगाव) हिने दि.१७ … Read more

‘त्या’ प्रकरणात गडाखांना न्यायालयाकडून जामीन

नेवासा : तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे दोन वर्षांपूर्वी केलेल्या पाटपाणी, हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी नेवासा न्यायालयाने माजी आमदार शंकरराव गडाख यांना जामीन मंजूर केला आहे. यासाठी ३१ ऑगस्ट रोजी उपस्थित राहाण्यासाठी न्यायालयाने निर्वाणीचा इशारा दिलेला होता. गडाख यांच्यासाठी ही शेवटची संधी असल्याने याप्रकरणी न्यायालय त्यांच्याबाबतीत कोणती भूमिका घेते, किंवा त्यांना … Read more

दुष्काळी भागात सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावण्या ३० सप्टेंबरपर्यंत सुरू !

मुंबई : राज्य शासनाने दुष्काळी भागात सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावण्या ३० सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय शुक्रवारी घोषित केला. त्यामुळे दुष्काळात चाराटंचाईने हैराण झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात सध्या १,५८३ चारा छावण्या सुरू असून, त्यामध्ये लहान व मोठी अशी एकूण सुमारे साडेदहा लाखांहून अधिक जनावरे आहेत. छावण्यांमधील मोठ्या जनावरांना प्रतिदिन … Read more

एसटी वाहकाला मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा

पाथर्डी : एसटीच्या तिकीटासाठी सुटे पैसे द्या, असे सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी एसटीला मोटारसायकल आडवी घालून व एसटीत चढून एसटीच्या वाहकाला शिवीगाळ, मारहाण करत दमदाटी केली. पटेलवाडा परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. वाहक संजय सुडके यांच्या फिर्यादीवरून सुरेश परसराम पवार,राहुल परसराम पवार व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविला आहे. पाथर्डी आगाराचे वाहक संजय सुडके … Read more

महिलांना घरात घुसून मारहाण, दोन गटांत तुफान हाणामारी

कर्जत : तालुक्यातील नेटकेवाडी येथे दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे काही लोक जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या असून, पोलिसांनी आठ लोकांना अटक केली आहे. तालुक्यातील नेटकेवाडी येथे आज सकाळी ९:०० च्या सुमारास गावात दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. याबाबत अजय बापू धांडे व गहिनीनाथ भिवा धांडे यांनी परस्परविरोधांत … Read more