अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला

कर्जत : तालुक्यातील जलालपूर शिवारात एका अज्ञात तरूणाचे प्रेत शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून दोन दिवसांपूर्वी या व्यक्तीचा खून करून त्याचे प्रेत या ठिकाणी आणून टाकले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे याचा पोलिस तपास करत आहेत.जलालपुर गावच्या शिवारात नवनाथ आत्माराम बाबर यांच्या शेतातील बाजरीच्या पिकात … Read more

पाणी मागितले तर गोळ्या घातल्या हा इतिहास जनता कधीही विसरणार नाही!

कर्जत – राष्ट्रवादी हा काय पक्ष आहे असा प्रश्­न करीत ही तर केवळ गुंडांची टोळी असून मी तर त्या पक्षाचे नाव अलीबाबा चालीस चोर असे ठेवले असल्याचे प्रतिपादन पणन व कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. कर्जत तालुक्यातील राशीन येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत राशीन गावासाठी १३ कोटी ३१ लाख रूपयांच्या पाणी योजनेचा शुभारंभ मंत्री श्री. खोत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणाची हत्या करून मृतदेह फेकला पाण्यात !

श्रीरामपूर – श्रीरामपूर शहरातील सूतगिरणी रोड परिसरात राहणारे रामदास भिमराव कडनोर, वय ३४ यांचा टणक हत्याराने डोक्यात मारहाण करुन खून करण्यात आला. हा खुन करुन रामदास कडनोर यांचा मृतदेह प्रवरा कॅनॉलमध्ये वाहत्या पाण्यात टाकून देण्यात आला. हा प्रकार १५ ऑगस्ट रोजी वार्ड नं. २ येथील पाटाच्या पाण्यात हा मृतदेह आढळला व खुनाचा प्रकार उघड झाला. … Read more

भाजपमुळे देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक : आ. डॉ. तांबे

अहमदनगर : आज जे स्वार्थी लोक पक्षांतर करत आहेत ते कुठेच टिकणार नाहीत. काँग्रेस पक्षातून असे लोक बाहेर पडत असले तरी पक्ष पुन्हा मोठ्या ताकदीने उभा राहणार आहे. काँग्रेस पक्षाची उभारणी सामाजिक चळवळीतून झालेली असून याच चळवळीच्या माध्यमातून पक्षाने देशात काम केले आहे. आज देशावर मोठे संकट आलेले असून जेव्हा लोकांना हे संकट समजेल तेव्हा … Read more

१ सप्टेंबरला भाजपात मेगाभरती, काँग्रेस-राष्ट्रवादीला दुसरा मोठा झटका, हे दिग्गज नेते मंडळी करणार भाजप प्रवेश !

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपा काँग्रेस-राष्ट्रवादीला दुसरा मोठा झटका देण्यास सज्ज झाली आहे. १ सप्टेंबरला भाजपात आता मेगाभरती होणार असून या वेळी नारायण राणे, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे उस्मानाबादचे राणा जगजीतसिंह, जयकुमार … Read more

झेडपी पदाधिकाऱ्यांच्या निवडी पुढे ढकलल्या

अहमदनगर : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती तसेच पंचायत समितीच्या सभापतींच्या नव्याने होणाऱ्या निवडी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रम संपन्न होणार आहे. या विधानसभा निवडणूक कार्यक्रमात जिल्हा प्रशासन व पोलिस व्यस्त असल्याकारणाने नव्याने होणाऱ्या पधाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलली आहे. पदाचा कालावधी समाप्त झाल्यापासून १२० दिवसाच्या आत या … Read more

विरोधकांकडून पाण्याचे राजकारण : आ. राजळे

करंजी : पाथर्डी -शेवगाव मतदारसंघात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भरीव विकास निधी आणला. दुष्काळी परिस्थितीत पिकांना पाण्याची गरज असल्याने मुळा धरणातून डावा व उजवा कालव्याला पाणी सोडले, पाटाला पाणी सोडताना टेलकडून हेडकडे पाणी देण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिलेल्या असतान विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्याने त्यांनी पाणीप्रश्नाचे राजकारण पुढे करून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू … Read more

जामखेड शहरासाठी ११७ कोटींची पाणीयोजना मंजूर!

जामखेड : जामखेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगोत्थान महाअभियानांतर्गत ११७ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. याबाबत मंजुरीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथील महाजनादेश यात्रेच्या सभेत पालकमंत्री प्रा. राम शिंदे व नगराध्यक्ष निखिल घायतडक यांना दिले. यामुळे जामखेड शहरापुढील तीस वर्षांपर्यंतचा पाणीप्रश्न मिटणार आहे. गेल्या चार- पाच वर्षांपासून जामखेड तालुक्यात … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महीला जागीच ठार

पारनेर ;- प्रातंविधीसाठी शेजारील डाळींबाच्या बागेत गेलेल्या एका वृद्ध महीलेवर बिबट्याने हल्ला केल्याने ही महीला जागीच ठार झाली. पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथे आज (शनिवारी )पहाटे साडेपाच वाजता ही दुर्घटना घडली. राधाबाई कारभारी वाजे (वय 70) असे या महिलेचे नाव असुन या घटनेने पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत माहीती अशी की,वडनेर येथील राधाबाई कारभारी … Read more

विकासकामांमुळेच जनता माझ्यासोबत – आ.राहुल जगताप

श्रीगोंदा: श्रीगोंदा -नगर विधानसभा मतदारसंघाचा आमदार झाल्यापासून पाच वर्षांत श्रीगोंदा नगर तालुक्यात मोठया प्रमाणात विकासकामे केली आहेत, त्या विकासकामांमुळेच जनता आपल्यासोबत असल्याचे मत आमदार राहुल जगताप यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या सुरेगाव ते घुटेवाडी या २.५० कोटी रुपये खर्चाच्या रस्ता कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. आ. जगताप यांनी बोलताना सांगितले की, मतदारसंघातील … Read more

मुलासोबत झालेल्या भांडणातून श्रीगोंद्यातील सातवीच्या विद्यार्थिनींनीच केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव !

श्रीगोंदा :- शाळेत जाण्याचा कंटाळा व रस्त्याने जाताना वर्गातील मुलासोबत झालेल्या वादावरून शाळेत शिक्षक ओरडतील या भीतीमुळे शाळेत जायचे नाही म्हणून सातवी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मैत्रिणींनी घरी न जाता वाट सापडेल तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु एका शिक्षकाच्या जागरुकतेमुळे या मुली पुन्हा घरी सुखरूप पोहोचल्या खऱ्या परंतु पालक ओरडतील म्हणून या मुलींनी आयडियाची कल्पना करून … Read more

पाणी द्या; अन्यथा धडा शिकवू – खा. सदाशिव लोखंडे

राहुरी : तालुक्यातील ३२ गावातील व श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या उभ्या पिकांसाठी योग्य क्षमतेने पाणी मिळत नाही. टेल टू हेडवरील सर्व शेतकऱ्यांना समान न्याय मिळावा; अन्यथा शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही उभे राहून पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना धडा शिकवू, असा इशारा खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिला. मुळा व भंडारदरा धरणातून शेतीसाठी सोडले गेलेले आवर्तन योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना मिळत … Read more

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

कोपरगाव : तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील विवाहितेने वस्तीवरील कांद्याच्या चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक माहिती अशी पूजा मयूर नाईक (वय २०, रा. ब्राह्मणगाव) या विवाहितेने त्यांच्या वस्तीवरील कांद्याच्या चाळीत गुरुवारी (दि. २९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.  … Read more

लवकरच माझी भूमिका स्पष्ट करणार -राजेश परजणे

कोपरगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ३१) आयोजित करण्यात आलेली कार्यकर्त्यांची बैठक गोदावरी दूध संघाबरोबरच दोन्ही साखर कारखान्यांच्या वार्षिक सभांमुळे तूर्त स्थगित ठेवण्यात आली असून, कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात राजकीय दिशा आणि भूमिका स्पष्ट केली जाईल, अशी माहिती जि. प. सदस्य राजेश परजणे पाटील यांनी दिली. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात परजणे यांनी सांगितले, कोपरगाव … Read more

दिव्यांग मुलांचा विवाह पाहून कुटुंबीयांचे डोळे पाणवले

अहमदनगर :- मुला-मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे विवाह जुळवण्याच्या प्रक्रियेमध्ये अलीकडे अनंत अडचणी निर्माण होत आहेत. तर विवाह कशा पध्दतीने चांगला होईल यासाठी वारेमापपणे खर्च केला जातो. मात्र विवाह दिव्यांगांचा असल्यास या अडचणींमध्ये आणखीच भर पडते. घरची बिकट परिस्थितीमुळे अनामप्रेम संस्थेने आधार दिलेल्या दोन दिव्यांग जोडप्यांचा विवाह सेवाप्रीत सोशल फाऊंडेशन या महिला संघटनेच्या सदस्यांनी मोठ्या थाटात हॉटेल … Read more

रोहित पवारांची कर्जत तालुक्यात जमीन खरेदी !

अहमदनगर :- खासदार शरद पवार यांचे नातू आणि कर्जत – जामखेड तालुक्यातून निवडणूक लढवणार असल्याचे नुकतेच जाहीर केलेले रोहित पवार यांनी नुकतीच पिंपळवाडी येथील उमा महेश्वरी राजा प्रकाश यांच्याकडून दीड हेक्टर जमीन खरेदी केली. रोहित यांचे सासरे मगर परिवार यांची कर्जत तालुक्यामधील पिंपळवाडी येथे २०० एकर शेतजमीन आहे. आता स्वत: पवार यांनीही तेथे जमीन घेतली … Read more

पवारांचा पारा चढविणाऱ्या ‘त्या’ पत्रकाराने नाही मागितली माफी,दिले हे उत्तर

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीमुळे पक्षाचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार प्रचंड अस्वस्थ आहेत. याचा प्रत्यय शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आला. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत आता नातेवाईकही (डॉ. पद्मसिंह पाटील) सोडून जात असल्याबद्दल विचारले आणि पवारांचा पारा चढला. त्या पत्रकारावर डाफरून पवार चक्क उठून निघू लागले. नंतर काही जणांनी समजूत काढल्यावर त्यांनी … Read more

शरद पवारांना जेव्हा राग येतो,पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर पवार संतापले…करायला लावले ‘हे’ कृत्य

श्रीरामपूर :- नगर जिल्ह्याच्या दाैऱ्यावर असलेले शरद पवार यांचे आक्रमक रूप अहमदनगर करांना पाहायला मिळाले, एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी श्रीरामपूरमध्ये आले होते, यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हा प्रकार घडला. नेत्यांबरोबर नातेवाईकही पक्ष सोडून जात असल्याच्या पत्रकाराच्या एका प्रश्नावर पवारांचा … Read more