आता काँग्रेसची जिल्ह्यात कुठेच शाखा शिल्लक नाही…

श्रीरामपूर :- राहुल गांधी नगर जिल्ह्यात येत आहेत, पण त्यांचे स्वागत करण्यासाठी ना जिल्हाध्यक्ष ना विरोधी पक्षनेता अस्तित्वात आहे. काँग्रेसच्या अध्यक्षांना यापेक्षा काय मोठी भेट असेल, असा उपरोधिक टोला लगावत आता काँग्रेसची जिल्ह्यात कुठेच शाखा शिल्लक नसल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री … Read more

श्रीगोंद्यात तमाशा कलावंतांना बेदम मारहाण करत विनयभंग

श्रीगोंदे :- तालुक्यातील टाकळी लोणार गावातील १५-१६ गावगुंडांनी मद्याच्या नशेत शिवीगाळ व अरेआवी करत तमाशातील पुरुष व महिला कलावंतांशी असभ्य वर्तन व झटापट केली. लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून त्यांना जखमी केले. याबाबत श्रीगोंदे पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार सुमारे १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ एप्रिलला टाकळी लोणार येथील म्हसोबा यात्रेनिमित्त … Read more

विखे घराण्याची दादागिरी व हुकूमशाही कायमची संपवा

संगमनेर :- काँग्रेसमध्ये सत्तेची अनेक महत्त्वाची पदे ज्यांनी सांभाळली, ज्यांनी अनेकदा स्वकियांनाच त्रास देत सहकाराच्या माध्यमातून सगळीकडे हुकूमशाही राबवली, त्यांची दादागिरी संपवण्याची हीच योग्य वेळ आहे. आम्ही दक्षिणेत योग्य इंजेक्शन दिले, आता तुम्ही निर्णय द्या, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व नगरचे उमेदवार संग्राम जगताप यांनी सांगितले. जोर्वे या आमदार राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे … Read more

मला का विरोध केला याचे उत्तर मागण्यासाठी मी संगमनेरमध्ये – डॉ.सुजय विखे

संगमनेर :- नगर लोकसभा मतदारसंघात मला व्यक्तिद्वेषातून विरोध करण्यात आला. थोरातांनी मला का विरोध केला याचे उत्तर मागण्यासाठी मी संगमनेरमध्ये आलो आहे. ज्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने बघितली अशी दोन्ही माणसे माझ्या पराभवासाठी नगरमध्ये तळ ठोकून बसली. या सर्वांनी प्रयत्न केले, तरी निकाल काय लागेल हे सांगायची गरज नाही, अशा शब्दांत डॉ. सुजय विखे यांनी … Read more

शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचे पाप मोदी-फडणवीस सरकारने केले नाना पटोले यांची जोरदार टीका

संगमनेर : अन्नदात्या शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचे पाप मोदी आणि फडणवीस सरकारने केले. या सरकारने शेतकऱ्यांसह सामान्य माणसांना कोणत्याही योजनांचे अर्ज ऑनलाइन भरायला लावले. मात्र, रुपयाचाही फायदा पदरात पडला नाही. आपल्याला ऑनलाइन करणाऱ्यांना आता पाइपलाइनमध्ये टाकण्याची वेळ आली आहे. हे सरकार पुन्हा आले, तर आपण आर्थिक गुलामगिरीत जाऊ, अशी प्रखर टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी … Read more

न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची मोदींना सवय – शरद पवार यांची टीका

कोपरगाव : जिनिव्हा करारानुसार पाकिस्तानवर दबाव आला व अभिनंदन या जवानाची सुटका झाली. त्याबद्दल आपण ५६ इंच छाती फुगवून फुकटचं श्रेय घेता. नको त्या कामाच श्रेय घेण्याचे काम मोदी सरकार करीत असून देशाच्या संरक्षणाची जबाबदारी या सरकारची आहे. मी संरक्षण मंत्री असताना पाकिस्तानच्या हल्ल्यात जवान शहीद झाल्यानंतर प्रत्येक वेळी कुटुंबीयांचे सांत्वन केले. पण भांडवल केले … Read more

डॉ सुजय विखे यांनी पंकजा मुंढे यांच्या सभेकडे फिरवली पाठ

नेवासे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले डॉ. सुजय विखे हे नगरच्या निवडणुकीतून निवांत झाल्यावर शिर्डी मतदारसंघात प्रचाराच्या आघाड्या सांभाळतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. मात्र, मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेत त्यांच्या यंत्रणेतील कोणीही दिसले नाही.  सर्जिकल स्टाईक हा काही लोकसभा निवडणुकीचा विषय नाही, तर या सरकारच्या राजवटीत मिळणारे संरक्षण हा महत्त्वाचा विषय आहे, असे प्रतिपादन … Read more

मद्य पाजून तरुणाला भोकसले

शिर्डी : जुन्या वादातून शिर्डीतील एका तरुणाला मद्य पाजवून त्याची धारदार शस्त्राने भाेसकून हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली.  मनोज भीमा पाईक (२१) असे तरुणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा खून झाला. पोलिसांनी १० जणांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, मनोज पाईक याच्यावर धारदार शस्त्राने वार झाल्यानंतर त्याला रुग्णालयात … Read more

कॉंग्रेसला मोठा धक्का,विखे पाटील कॉंग्रेस सोडणार ?

शिर्डी : राज्याचे विरोधीपक्षनेते आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेस पक्षावर टीका केली आहे.  शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूरमध्ये आयोजित केलेल्या समर्थकांच्या मेळाव्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वत:च्या पक्षावर जाहीर टीका करताना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलाय असे वक्तव्य केले. दरम्यान स्वताच्याच पक्षावर टीका करताना उद्या सकाळी मी माझी भूमिका स्पष्ट करेन, … Read more

ट्रकचालकाची चाकूचा धाक दाखवून लुट

अहमदनगर :- कल्याण रोड चौकातून एमआयडीसी बायपासने जात असलेल्या ट्रकचालकास दोघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. याप्रकरणी ट्रकचालक किसन महादेव देसाई (रा. साबलखेड, ता. आष्टी, जि. बीड) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नालेगाव शिवारातील रेल्वे ब्रिजजवळ ट्रक आला असता पाठीमागून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी ट्रक थांबवून ट्रकचालकास चाकूचा धाक दाखवून … Read more

महायुतीला बहुमत मिळेल आणि पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच !

संगमनेर :- पाच वर्षे सरकारशी थोडेफार संघर्ष झाले असले, तरी आम्ही भाजपशी रोखठोक आणि जाहीरपणे युती केली आहे. ही युती देव, देश आणि धर्मासाठी केली. ती केवळ खुर्चीसाठी केलेली नाही. आम्हाला नेहमी पाकिस्तानची भीती दाखवली जाते. मात्र, आमच्याकडील अण्वस्त्रे ही दिवाळीसाठी नाहीत, असे पाकिस्तानला ठणकावून सांगणारा पंतप्रधान आम्हाला मिळाला. महायुतीला बहुमत मिळेल व पंतप्रधानपदी नरेंद्र … Read more

श्रीरामपुरात अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ

श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथील अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केल्याची घटना काल दुपारी एका खासगी दवाखान्यात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शहरातील मुख्य रस्त्यावरील एका खासगी दवाखान्यात कामाला असलेल्या सचिन उत्तमराव अमोलिक ( रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर ) याने काल दुपारी १२ वाजेच्या सुमारास बेलापूर येथील … Read more

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात ‘देश का महात्योहार’ 2030 मतदान केंद्रांवर 18 लाखाहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क

अहमदनगर :- 37-अहमदनगर लोकसभा निवडणूकीच्या तिस-या टप्प्यासाठी आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2019  रोजी मतदान होणार असून मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 6 ही मतदानाची वेळ असून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार संघातील 2030 मतदान केंद्रावर 18 लाख 54 हजार 248 मतदार मतदान प्रक्रियेत … Read more

लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात ‘ड्राय डे’ !

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दिवस पाळण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात श्रीरामपूर तालुका परमीट रुम अँड वाईन शॉप ओनर्स सोशल असोसिएशनने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागितली होती. त्यावर पुन्हा झालेल्या सुनावणीत जिल्हाधिकाऱ्यांनी कोरडा दिवस पाळण्याचे आदेश कायम ठेवले आहेत. असोसिएशनच्या याचिकेवर न्यायालयाने पुन्हा सुनावणी घेऊन संबंधितांच्या … Read more

डॉ. सुजय विखे विरुद्ध आमदार संग्राम जगताप यांच्यात काट्याची लढत रंगणार

अहमदनगर :- भाजपचे डॉ. सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यात काट्याची लढत रंगणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या, तरी गप्पांच्या फडात ‘तुमच्याकडे कोण चालणार’ हाच एकमेव प्रश्न चर्चेत आहे. चतूर मतदार कल जाणून घेऊ पाहणाऱ्यांचा अंदाज ओळखून उत्तर देत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते हवेत असून आपलाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वास व्यक्त करत आहेत.  … Read more

नगराध्यक्ष विजय वहाडणेंवर गुन्हा दाखल

कोपरगाव :- नगरपालिकेचा पाणी पुरवठ्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने जून २०१६ ते जुलै २०१७ दरम्यान पाणी टंचाईच्या काळात बनावट वाहने दाखवून खोटी कागदपत्रे तयार करून दोन लाख १० हजार १७८ रुपये उकळले. याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, नगराध्यक्ष विजय सूर्यभान वहाडणे, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक रवींद्र नामदेव पाठक, तत्कालीन पाणी पुरवठा अभियंता प्रकाश लोखंडे व ठेकेदार … Read more

शालेय तरुणीचा विनभंग करून भावाला कोयत्याने तोडून टाकण्याची धमकी

राहुरी – एका शालेय तरूणीस मोटारसायकलवर पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना घडली असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात एका तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुरी येथे शिक्षण घेत असलेली २० वर्षीय तरूणी घरी जात असताना गोट्या उर्फ राहुल पवार रा. चाकण, जि. पुणे ह. मु. धामोरी, ता. राहुरी हा … Read more

आमदार शिवाजी कर्डिले कुणाला टोपी घालणार ?

अहमदनगर :- नगर लोकसभा मतदार संघासाठी मंगळवार, दि. २३ रोजी होणा-या मतदनाची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दुसरीकडे दोन्ही प्रमुख उमेदवारांसह राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी शेवटच्या दोन दिवशी पक्षाचेच काम केले की जावई राष्ट्रवादीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांचे काम केले, यावरच बरीच राजकीय समीकरणे अवलंबून आहे. नेमकी … Read more