लोकसभेआधीच युवा नेते डॉ.सुजय विखे बनले ‘खासदार’!

अहमदनगर :- लोकसभेसाठी इच्छुक म्हणून गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चेत असलेले विरोधीपक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ.सुजय विखे पाटील यांना त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडीयावर निवडणुकीच्या आधीच खासदार म्हणून घोषित केलय. दररोज वेगवेगळ्या पक्षातून तिकीट मिळण्याबाबत बातम्या येत असताना ठोस काही निर्णय होत नसल्याने विखे समर्थकांची घालमेल वाढली असून विखे पाटील हाच एक पक्ष आहे, … Read more

उड्डाणपूलाच्या भूमीपुजनास नेत्यांसह नागरिकांनी फिरविली पाठ !

अहमदनगर :- कार्यारंभ आदेश नसलेल्या उड्डाणपुलाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे आज भूमिपूजन झाले. यावेळी खासदार दिलीप गांधी, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी,माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शिवाजीराव कर्डिले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास पालकमंत्री राम शिंदे,खा. सदाशिव लोखंडे,जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे,आ संग्राम जगताप,आ.अरुणकाका जगताप,व जिल्ह्यातील इतर सर्वच आमदार अनुपस्थित … Read more

आठ दिवसांत सुरू न झाल्याने ६ छावण्यांची मान्यता रद्द

अहमदनगर :- परवानगी मिळूनही आठ दिवसांत चारा छावणी सुरू न केल्याने सहा संस्थांची छावणीची परवानगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रद्द केली. एका गावात दोन-तीन छावण्यांना मान्यता दिली आहे. मान्यता मिळूनही छावण्या सुरू केल्या नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात १५१ चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर आठ दिवसांत छावणी सुरू होणे बंधनकारक … Read more

पालकमंत्र्यांच्या तालुक्यात पंधरा दिवसांआड पाणी !

जामखेड :- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावाने सध्या तळ गाठला असून तलाव कोरडा पडल्याने तलावातून पाण्याच्या मुख्य टाकीत पाणी येणे बंद झाले आहे. त्यामुळे सध्या मोटारी लावून पाणी चारीत सोडले जाते व चारीतून टाकीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे सध्या शहराला पंधरा दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरिकांना आता तीव्र पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा … Read more

लोकसभेसाठी मोनिका राजळेचां खा. दिलीप गांधीना पाठिंबा.

पाथर्डी :- ताई, तुम्हाला लोकसभेसाठी शुभेच्छा मतदारांमध्ये तुमची इमेज खूप चांगली आहे. लोकसभा, विधानसभा सगळीकडे वातावरण चांगले आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकर पालवे म्हणताच आमदार मोनिका राजळे यांनी लोकसभेची इच्छा नाही, मी आहे तेथेच बरी आहे. राजकारणात मी नवीन आहे, अजून शिकू द्या, असे सांगत लोकसभा उमेदवारीच्या स्पर्धेत नसल्याचे सांगत विधानसभेची निवडणूक पुन्हा लढवण्याची … Read more

डॉक्टर प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने युवकाची प्रेमभंगातून आत्महत्या.

संगमनेर :- तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील एमआरआय टेक्निशियन असलेल्या अमित अशोक मिंडे (वय २२) या युवकाने कौठेकमळेश्वर शिवारात विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. डॉक्टर असलेल्या प्रेयसी तरुणीने लग्नास नकार दिल्याने प्रेमभंगातून त्याने आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रहिवासी अमित … Read more

माजी खा.वाकचौरेंनी शिर्डी संस्थानचा राजीनामा देण्याची मागणी.

अहमदनगर :- सध्या भाजपमध्ये असणारे भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभा कोणत्याही परिस्थिती लढवायचीच ही भूमिका घेत आहेत. त्यांची ही भूमिका युती विरोधी व पक्ष विरोधी आहे. ही भूमिका घेण्यापूर्वी पक्ष्याने त्यांना दिलेले श्रीसाईबाबा संस्थानचे ट्रस्टी पद सोडणे गरजेचे होते. मात्र, आयुष्यात केवळ पद मिळवण्यासाठी झटणाऱ्या वाकचौरेंकडून ही अपेक्षा व्यर्थ असल्याने त्यांना ट्रस्टी पदावरून काढण्याची विनंती … Read more

अनुराधा नागवडेंच्या उमेदवारीस काँग्रेसच्याच नेत्यांचा विरोध

श्रीगोंदे :- नगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देण्यास तालुक्यातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचा विरोध असून ते डॉ. सुजय विखे यांच्यासाठी शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. नगरची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने शरद पवार व अजित पवार यांनी मागील आठवड्यात नागवडे यांना प्रचाराला लागा, असे सांगितल्याने नागवडे समर्थकांचा जनसंपर्क दौरा सुरू झाला. १ मार्चला … Read more

..तर मंत्र्याना जामखेडमध्ये नो एंट्री !

जामखेड :- कला केंद्र बंदच्या आदेशानंतर सहा दिवसांपासून सुरू असलेले केंद्रचालक व कलावंतांचे उपोषण सहाव्या दिवशी जिल्हा प्रशासनाला मागण्या कळवण्याच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. दहा दिवसांत आम्हाला न्याय दिला नाही, तर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालय व पालकमंत्र्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करू. जामखेडमध्ये एकाही मंत्र्याला पाय ठेवू देणार नाही, असा इशारा कलावंतांच्या वतीने अरुण जाधव … Read more

मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना २० वर्ष सक्तमजुरी.

कोपरगाव :- मतिमंद मुलीस जीवे मारण्याची धमकी देऊन सामूहिक अत्याचाराची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. या प्रकरणातील माहेगा देशमुख व कुंभारी येथील आरोपी रमेश ऊर्फ पिन्या म्हसू जाधव व किरण ऊर्फ गोट्या भागवत कदम यांना २० वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा कोपरगाव येथील सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी सुनावली. २३ … Read more

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर नगरकरांना उड्डाणपूलाचे ‘गाजर’ !

अहमदनगर :- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकाळात यापूर्वी तीन वेळा भूमिपूजन झालेल्या नगर शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा पुन्हा घाट घालण्यात आला आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने या उड्डाणपुलाच्या भूमिपूजनासाठी शुक्रवार (८ मार्च) चा मुहूर्त शोधला आहे. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती खासदार दिलीप … Read more

शेततळ्यात पडून पती-पत्नीचा मृत्यू.

शनिशिंगणापूर :- रवींद्र बबनराव जरे (वय ४५) व त्यांची पत्नी ज्योती (४३) या दाम्पत्याचा पाय घसरून शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना नेवासे तालुक्यातील लोहगाव शिवारातील गट क्रमांक ८४ मध्ये मंगळवारी मध्यरात्री घडली. आपल्या घराजवळ जरे यांनी शेततळे तयार केले होते. शेतीला पाणी देण्यासाठी मध्यरात्री जात असताना पाय घसरून पाण्यात बुडून या दाम्पत्याचा मृत्यू … Read more

…तर विखे पाटील लवकरच भाजपात.

शिर्डी :- राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे लवकरच भाजपात प्रवेश करण्याचे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिले आहे. राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधण्यापेक्षा भाजपचे मुलायम ‘कमळ’ हाती घेतलेले बरे! या विचाराप्रत आलेले विखे पाटील पिता-पूत्र लवकरच काँग्रेस पक्ष सोडतील, अशी माहिती या वृत्तात दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी … Read more

वाळूच्या डंपरखाली चिरडून तरुण जागीच ठार.

शेवगाव- पांढरीपूल राज्यमार्गावर आखतवाडे शिवारात वाळूच्या डंपरखाली चिरडून झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला. शेवगावहून मिरीमार्गे नगरकडे भरधाव वेगात जाणार्‍या वाळूने भरलेल्या डंपरने समोरून येणार्‍या दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याने शरद एकनाथ सोनवणे (वय 22 रा. आखतवाडे) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मयत शरद सोनवणे हा पुणे येथून रविवारी दुपारी चार वाजता ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन … Read more

खासदार दिलीप गांधींनी निवडणुकीच्या तयारीला लागावे !

अहमदनगर :- खासदार दिलीप गांधींनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली. देशात फक्त नरेंद्र मोदीच सर्वांचे उमेदवार आहेत. पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपची सत्ता येणार आहे, असा विश्वासही त्यांनी मंगळवारी व्यक्त केला. दानवे यांनी सकाळी खासदार गांधी यांच्या निवासस्थानी भेट दिली. खासदार गांधी, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. दानवे … Read more

आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर काळाने सूड उगवला !

अहमदनगर :- शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या भाग्यश्री मोकाटे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर काळाने सूड उगवला आहे. केडगाव हत्याकांडात त्यांच्या मुलीवरच आता आरोपी होण्याची वेळ आली आहे. नातेवाइकांमध्ये भांडणे लावणाऱ्या कर्डिले यांना येत्या विधानसभेला धूळ चारण्यासाठी मी सज्ज झालो आहे. सर्वांनी मला साथ द्यावी,’ अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केली. … Read more

अहमदनगर जिल्हापरिषदेत 729 जागांसाठी भरती !

अहमदनगर :- जिल्हा परिषदेत रिक्त असणार्‍या 729 जागांसाठी येत्या 26 मार्चपासून भरती प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. राज्य सरकार पातळीवरून होणार्‍या भरतीसाठी राज्यातून कोणत्याही जिल्ह्यातून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. भरतीचे पूर्ण अधिकारी आणि प्रक्रिया राज्य सरकार पातळीवरून राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेतील अनुसूचित्र क्षेत्राबाहेरी आणि अनुसूचित क्षेत्रातील गट क या संवर्गातील रिक्त पदांसाठी भरती … Read more

लग्नाच्या पंधरा दिवस अगोदर तरुणाची आत्महत्या.

राहुरी :- तालुक्यातील गोटुंबा आखाडा येथील गवंडीकाम करणाऱ्या तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. प्रवीण साळवे (२४ वर्षे) असे या तरूणाचे नाव असून पंधरा दिवसांवर त्याचे लग्न आले होते. मंगळवारी सकाळी राहुरी-शिंगणापूर रस्त्यावरील गोटुंबा आखाडा येथील विद्यापीठ प्रक्षेत्रावर आत्महत्येची ही घटना उघड झाली. गळफास लावून तरूणाने आत्महत्या केल्याची खबर परिसरात पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली … Read more