सुजय विखे ‘या’ पक्षाकडून लोकसभा लढविणार !

अहमदनगर :- विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. सुजय विखे पाटील यांचा आज किंवा उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ शकतो. तसंच ते राष्ट्रवादीकडून ते अहमदनगर मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमध्ये राज्यातील 48 जागांपैकी जवळपास सगळ्याच जागांवर सहमत झालं होतं. मात्र … Read more

राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली असताना, नगरमध्ये युतीत बिघाडी !

अहमदनगर :- राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली असतानाही, मनपा सभापती निवडणुकीत मात्र दोघांमध्ये युतीचे सूर जुळलेच नाहीत. भाजपने मित्रपक्ष शिवसेनेला पुन्हा एकदा धोबीपछाड दिली. ‘स्थायी’ सभापती निवडीत भाजपने शिवसेनेच्या विरोधात बसपला मतदान केले. राष्ट्रवादी बडतर्फ गटाने अर्ज माघारी घेत बसपला साथ दिली. बसपचे मुदस्सर शेख यांनी शिवसेना उमेदवार योगीराज गाडे यांचा पराभव करीत सभापतीपदावर कब्जा केला. … Read more

नगर शहरातील उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मुहूर्त !

अहमदनगर :- शहरातील प्रलंबीत उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. येत्या आठडाभरातच या कामाचा शुभारंभ होईल, असे समजते. सरकारी पातळीवरच त्यादृष्टीने हिरवा कंदील देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या पातळीवरच हे नियोजन सुरू आहे. शहरातील मोठ्या रहदारीच्या स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपूल गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबीत आहे. केंद्र सरकारच्या निधीतून आता हा उड्डाणपूल होणार असून या कामाचे उदघाटन … Read more

आता माघार नाही… तुमच्या साथीने नगर सर करणारच :- डॉ. सुजय विखे.

राहुरी :- आता माघार नाही… तुमच्या साथीने नगर सर करणारच. लवकर राजकीय भूमिका जाहीर करेन, असे युवानेते डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. गणेगाव, चिंचविहिरे, कणगर आणि वडनेर या गावांचा दौरा करून त्यांनी नागरिकांशी हितगुज साधले. त्यांच्या समवेत उदयसिंह पाटील, केशव कोळसे, मच्छिंद्र तांबे, विजय डौले, आर. आर. तनपुरे, कुलदीप पवार, जयसिंग घाडगे होते. डॉ. विखे … Read more

लोकसभेसाठी सर्व पक्षांकडून मला ऑफर – आ.शिवाजी कर्डिले.

राहुरी :- सलग पाच वेळा आमदार आणि निवडून येण्याची खात्री असल्यामुळे मला सर्वच पक्षांकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर येत आहे. परंतु मी भाजपमध्येच खूश आहे. लोकसभा लढवण्याचा कोणताही विचार नाही, असे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सोमवारी स्पष्ट केले. शिराळ येथे सुमारे पावणेचार कोटींच्या विविध विकासकामांना प्रारंभ करताना आमदार कर्डिले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवानेते अक्षय … Read more

नापिकीमुळे तरूण शेतकऱ्याची आत्महत्या.

राहुरी :- नापिकी, मुलीच्या लग्नाचे झालेले कर्ज फेडता आले नाही, यातून आलेल्या नैराश्यातून राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पटारे-पागिरे वस्तीवरील सुनील कारभारी पटारे (वय ४२) यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. काही महिन्यांपूर्वी थोरल्या मुलीचे लग्न करण्यासाठी उधारी व उसनवारीने पैशांची जुळवाजुळव केली आणि शेतीच्या उत्पन्नातून सर्व देणी देऊन टाकू, असे नियोजन पटारे यांनी केले होते. … Read more

आकाश अंबानी यांच्या विवाह समारंभात अहमदनगरचे जितेंद्र रोकडे यांचे बासरीवादन.

अहमदनगर :- उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि श्‍लोका मेहता यांचा विवाह 8 व 9 मार्च 2019 रोजी होणार आहे. या लग्नाचे सर्व विधी मुंबई स्थित अंबानी निवास एंटिलिया हाऊसमध्ये होणार आहे. या भव्य विवाह समांरभात अहमदनगरचे प्रसिद्ध बासरीवादक व संगीत दिग्दर्शक जितेंद्र रोकडे बासरीवादन करणार आहेत. ते दिल्लीमधील सुभाष ठाकूर यांची ‘पूनम फ्ल्युट’ … Read more

खोट्या सह्यांद्वारे धनादेशाचा गैरवापर करुन खातेधारकाच्या खात्यातून 12 लाख गायब.

अहमदनगर :- खोट्या सह्यांद्वारे धनादेशाचा गैरवापर करुन शहर सहकारी बँकेच्या माळीवाडा शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून खात्यातून बारा लाख रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याची तक्रार खातेधारक असलेले कुणाल अ‍ॅण्ड सन्सचे संचालक महेश कचरे यांनी शनिवार दि.2 मार्च रोजी कोतवाली पोलीस स्टेशनला केली. शहर बँकेने डॉ.निलेश शेळके यांना दिलेले 17 कोटी रुपयाचे बोगस कर्जप्रकरण … Read more

नागरिकांवर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद.

संगमनेर :- तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे नागरिकांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये शनिवारी रात्री एक बिबट्या अडकला. बिबट्यांची संख्या लक्षात घेता नागरिकांवर हल्ला करणारा हाच आहे का याबाबत मात्र संभ्रम आहे. गेल्या आठवड्यात बिबट्याने दुचाकीवरील चार जणांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले. एकाच रात्री झालेल्या बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यांतून सपना बाळासाहेब वाघमारे, वेणूनाथ सुखदेव … Read more

शाळेत जातो असे सांगून बाहेर पडल्या, त्या घरी परतल्याच नाहीत…

कोपरगाव :- शहरातील सुभाषनगर व दत्तनगर भागातील तीन अल्पवयीन मुली शाळेत जातो, असे सांगून बाहेर पडल्या, त्या घरी परत आल्याच नाहीत. १ व २ मार्चला या घटना घडल्या आहेत. एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुली पळून गेल्याचे समजते. सुभाषनगर येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीत तिच्या १७ वर्षांच्या मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे म्हटले आहे. हेड … Read more

अंधश्रद्धेतून पुतण्यानेच केली ‘त्या’ पुजाऱ्याची हत्या !

जामखेड :- तालुक्यातील खर्डा येथील शिकारेवस्तीवरील दत्त मंदिरातील कुशाबा तुळशीराम शिकारे ( वय ५० ) या पुजाऱ्याची धारदार शस्त्राने हत्या त्यांच्याच चुलत पुतण्याने केल्याचे निष्पन्न झाले. मृताची पत्नी रेखा शिकारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शंकर सोपान शिकारे विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्या-मुंबईहून येणाऱ्या भाविकांचा आजार महाराज बरा करतात, परंतु आपला आजार वाढत चालला आहे, … Read more

खा. गांधींचे ते कृत्य म्हणजे निर्लज्जपणचा कळस !

अहमदनगर :- नगर अर्बन बँकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षात टक्केवारी साठी अनेक नियमबाह्य कर्ज प्रकरणे मंजूर केल्यामुळे बँकेचा ढोबळ एनपीए तब्बल १६३ कोटीचा झाला. वाढलेल्या एनपीए मुळे रिजर्व बँकेने लाभांश वाटपास मनाई केली त्यामुळे सभासदांचे तब्बल ३ कोटी ५० लाखांचे नुकसान झाले. त्यामुळे सभासदांची फसवणूक बँकेने केली आहे. असा आरोप माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी … Read more

राहुरी मतदारसंघ असेपर्यंत मीच आमदार – आ.कर्डिले.

राहुरी :- सत्तेत असताना ज्यांना विकासाचे प्रश्न सोडवता आले नाहीत, असे पुढारी मी केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टीका आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली. प्रिंपी अवघड येथील २५ लाखांच्या विविध कामांचे भूमिपूजन करताना कर्डिले म्हणाले, मी दुष्काळी भागातील असल्याने पाण्याचे महत्त्व मला ठाऊक आहे. सोनई प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून प्रिंपी अवघड गावाला … Read more

धारधार शस्त्राने मंदिरातच पुजार्‍याची हत्या !

जामखेड :- तालुक्यातील खर्डा येथील दत्त देवस्थानचे प्रमुख कुशाबा तुळशीराम शिकारे (वय 50) यांचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने निर्घृण खून केला. शनिवारी (दि. 2) रात्री साडेआठ वाजता शिकारी वस्तीवर ही घटना घडली दत्त मंदिरात नेहमी प्रमाणे भजनाची तयारी करण्यासाठी गेलेल्या मंदिरातील पुजारी यांचा अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने वार करून हत्या केली. मात्र हत्या कशामुळे झाली हे अद्याप … Read more

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना रोखण्यासाठी आता बारामतीची पॉवर !

अहमदनगर :- पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना रोखण्यासाठी आता बारामतीकर पवार घराण्यातील व्यक्तीने उमेदवारी घ्यावी, अशी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मागणी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने जोरदार नियोजन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांना कर्जत-जामखेड मतदार संघाचे पक्षनिरीक्षक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड.अमरसिंह मारकड यांना नगर जिल्हा राष्ट्रवादी … Read more

डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारीवर संभ्रम कायम.

अहमदनगर :- नगर लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, नगर दक्षिणेची जागा ही राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केल्याने या जागेचा तिढा सुटण्याऐवजी आणखी वाढला आहे. नगर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडे आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने या मतदारसंघातून राजीव राजळे यांना उमेदवारी दिली होती. या जागेवर राष्ट्रवादी … Read more

भाजपकडून लोकसभेसाठी माजीमंत्री बबनराव पाचपुते ?

अहमदनगर :- आगामी लोकसभा निवडणुकीत खा.दिलीप गांधी यांच्यावरील नाराजीचा फटका भाजपाला बसू नये यासाठी भाजप सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करण्याबाबत माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनाविचारणा झाल्याची माहिती समजली असून माजी मात्री पाचपुते यांनी लोकसभा निवडणुकीत स्वारस्य नसल्याने सांगितले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत खा.दिलीप गांधी यांच्यावरील नाराजीचा फटका भाजपाला बसू नये यासाठी भाजप सक्षम … Read more

स्वाती नगरकर यांची नोटरी म्हणून नियुक्ती.

अहमदनगर :- ऍड.स्वाती शाम नगरकर यांची भारत सरकारकडून नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सदरची नियुक्ती आजपासून (गुरवार) देण्यात आली आहे. त्यांनी विविध ठिकाणी वकील म्हणून काम पहिले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दाखल घेत त्यांना हि नियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्ती बद्दल विविध मान्यवर क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक,व मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.