निळवंडे धरण उजव्‍या कालव्‍याच्‍या कामास निधी कमी पडू दिला जाणार नाही

अहमदगर :-  राहुरी तालुक्‍यातील वडनेर येथे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे उर्ध्‍व प्रवरा निळवंडे धरण उजव्‍या कालव्‍यांच्‍या कामाचे भूमीपूजन करुन शुभारंभ करण्‍यात आला. या कालव्‍याच्‍या कामासाठी निधी कमी पडून दिला जाणार नाही असे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन म्‍हणाले. या कार्यक्रमा प्रसंगी महाराष्‍ट्र राज्‍याचे मृद व जलसंधारण, राजशिष्‍टाचार, विमुक्‍त जाती, … Read more

अहमदनगर ते सोलापूरवाडी रेल्वे धावण्याची चाचणी यशस्वी

अहमदनगर :- नगर तालुक्यातील नारायणडोह येथे अहमदनगर ते सोलापूरवाडी दरम्यान गतीने रेल्वे धावणे चाचणीचा शुभारंभ झाला.

यावेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त (मध्य रेल्वे) ए.के. जैन, मुख्य प्रशासकीय अधिकारी निर्माण (मध्य रेल्वे) एस.के. तिवारी, मुख्य अभियंता निर्माण (मध्य रेल्वे) दिनेश कटारिया, मंडल रेल्वे प्रबंधक (सोलापूर) हितेंद्र मल्होत्रा, रेल्वेचे उप मुख्य अभियंता (नगर) चंद्र भुषण, कार्यकारी अभियंता व्ही.पी. पैठणकर, वरिष्ठ अनुभाग अभियंता विद्याधर धांडोरे, एस.आर. कुंवर, श्रीराम कंट्रक्शनचे संचालक सुरेश पेनसीलवार, आनंद पेनसीलवार, दिलीप पेनसीलवार आदि उपस्थित होते.

अहमदनगर – नारायणडोह – सोलापूरवाडी या रेल्वेमार्गावर ताशी 120 किमी या वेगाने रेल्वे धावली. ही चाचणी यशस्वी झाली असून, अहमदनगर ते सोलापूरवाडी रेल्वे आता धावू शकणार असल्याचे रेल्वे विभागाच्या वतीने जाहिर करण्यात आले. तर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते लोणी (ता.नगर) येथे वृक्षरोपण करण्यात आले.

 

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

संगमनेर :- नापिकी व कर्जाच्या वसुलीच्या तगाद्याला कंटाळून युवकाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रकार तळेगाव दिघे येथे घडला. सचिन जगन्नाथ बढे (वय २९) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. बढेवस्ती (तळेगावदिघे) येथे सचिन आपल्या कुटूंबियांसह राहत होता. कुटूंबिय एका लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून शुक्रवारी त्याने घरात कोणी नसतांना शेतातील विहीरीनजीक तणनाशक विषारी … Read more

घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी अधिकारी व खा.गांधी यांनी केली जागेची पाहणी.

अहमदनगर :- पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून लॅण्ड पुलिंगद्वारे संयुक्त भागीदारी तत्वावर घरकुल वंचितांचा प्रकल्प साकारण्यासाठी म्हाडाचे नाशिक विभागाचे मुख्य अभियंता दिनेश श्रेष्ठ, घनश्याम सोनार व खासदार दिलीप गांधी यांनी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या शिष्टमंडळासह सोमवारी निंबळक, इसळक शिवारातील खडकाळ पड जमीनीची पहाणी केली. यावेळी कॉ.बाबा आरगडे, अ‍ॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, … Read more

नगरची कन्या झाली साताऱ्याची पोलीस अधीक्षक !

अहमदनगर :- शेवगाव तालुक्यातील तेजस्वी सातपुते यांची नुकतीच साताऱ्याच्या पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. मीरा बोरवणकर यांनी 3 जुलै 1996 रोजी सातारा पोलिस अधिक्षक म्हणून काम केले होते. त्यानंतर साताऱ्याला लाभलेल्या या दुसऱ्या महिला पोलिस अधिक्षक आहेत. तेजस्वी यांनी लहानपणी पायलट व्हायचे स्वप्न पाहिले होते पण चष्मा लागल्याने पायलट होता येणार नाही, असे सांगण्यात आल्याने त्यांच … Read more

मागील भांडणाच्या कारणावरून तरुणाचा खून.

अहमदनगर :- तालुक्यातील वाकोडी येथे मागील भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादातून तलवार, कटावणी व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने विजय पवार या २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, याप्रकरणी सोनू … Read more

तापमानाचा पारा वर चढल्याने उन्हाळ्याची चाहुल.

अहमदनगर :- गारव्यामुळे दिवसा उबदार कपडे आणि रात्री खिडक्या, गॅलरीची दारे बंद करून झोपणाऱ्या घरांमध्ये आता बऱ्याच दिवसांनंतर पंखे सुरू झाले आहेत. नगरमध्ये गेल्या आठवडाभरात तापमानाचा पारा वर चढल्याने नगरकरांना उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. रात्रीचाही गारवा गायब झाला असून, सूर्योदयापासूनच उकाडा जाणवतो आहे. . शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून कमाल तापमान ३५ ते ३६ … Read more

उसाच्या ट्रकखाली दबून मामा-भाच्याचा मृत्यू.

राहुरी :- तालुक्यातील वांबोरी येथील पांढरीपुल रस्त्यावरील डाक बंगल्याजवळ शनिवारी रात्री उसाचा ट्रक पलटी होऊन त्याच्याखाली दबून मामा-भाच्याचा जागीच मृत्यू झाला. बाबासाहेब बाजीराव ससे (वय ४५) व रवींद्र तुकाराम उर्फ बाळासाहेब दांगट (वय ३०, दोघे रा. कात्रड, ता. राहुरी) अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. याबाबत वांबोरी दूरक्षेत्र येथे दीपक तुकाराम ऊर्फ बाळासाहेब दांगट यांनी अज्ञात … Read more

घनश्याम शेलार यांनी पक्ष सोडल्याने शिवसेना संपली असे समजू नये !

श्रीगोंदे :- घनश्याम शेलार शिवसेनेत आले , ते केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी. शिवसेना-भाजपची युती झाल्याने त्यांचा भ्रमनिरास झाल्याने त्यांनी सेना सोडली. ते गेल्याने तालुक्यातील शिवसेना संपली, असे शेलारांनी समजू नये. असे मुंगूसगावचे सरपंच आणि आजी-माजी सैनिक संघटनेचे तालुकाप्रमुख रामदास कानगुडे यांनी रविवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. आपल्याबरोबर तालुक्यातून अनेक कार्येकर्ते गेल्याचे शेलार भासवत आहेत. … Read more

राहात्या घरात गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या.

अकोले :- बारावीमध्ये शिकत असलेल्या सौरभ तात्यासाहेब मंडलिक (वय १८) या विद्याथ्र्याने राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, अकोले शहरातील सारडा पेट्रेलपंपाच्या मागे डॉ.मंडलिक हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर सौरभ याने स्लॅबच्या हुकाला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. इयत्ता बारावीची परीक्षा सुरू … Read more

नगरच्या पोलीस अधीक्षकपदी इशू सिंधू.

अहमदनगर :-  पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा ह्यांची बदली झाली आहे इशू सिंधू हे नगरचे नवीन पोलीस अधीक्षक असतील. ते सध्या नवी दिल्ली येथे महाराष्ट्र निवासी उपायुक्त होते. नगरचे पोलीस अधीक्षक शर्मा यांची नागपूर येथे पोलिस अधीक्षक CIDम्हणून बदली करण्यात आली आहे.

दुधाच्या बिलाचे पैसे न दिल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

आश्वी :- खासगी दूधसंघाला घातलेल्या दुधाच्या बिलाची रक्कम वारंवार तगादा करूनही डेअरी मालकाने देण्यास नकार दिल्याने शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील रहिमपूर येथे घडली आहे. नितीन शिंदे (वय २८, रा. रहीमपूर, ता. संगमनेर) असे शेतकऱ्याचे नाव आहे. नितीन शिंदे हे शेतकरी असून आपल्या घरचे संकलित दूध एका खासगी दूध डेअरीला देत होते. यापोटी … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक

पारनेर :- तालुक्यात एका 17 वर्षिय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. फसवणूक झाल्याने मुलीने विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रविण पोपट खरात (वय 24, रा. कारेगाव,ता.पारनेर) याच्याविरूध्द सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला जेरबंद केले आहे. पारनेर तालुक्यातील कारेगाव येथील … Read more

विहिरीत आढळला विवाहितेचा मृतदेह.

राहुरी :- तालुक्यातील ब्राह्मणी येथील मंगल पोपट भिसे या २९ वर्षांच्या विवाहितेचा मृतदेह गुरुवारी रात्री गावातील एका विहिरीत दगडाला बांधलेल्या स्थितीत आढळला. मंगल ३ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाल्याची फिर्याद पती पोपट भिसे याने राहुरी पोलिस ठाण्यात दिली होती. मंगलचा सासरा धोंडिराम सवाजी भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीत अमोल चंद्रकांत साठे (३०, ब्राह्मणी) व भागोजी तुळशीराम वीरकर (३८, … Read more

अवजड वाहतुकीमुळे दोन अपघातांमध्ये दोघे ठार.

राहाता :- अवजड वाहतुकीमुळे राहाता व अस्तगाव माथ्यावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जण ठार, तर एकजण जखमी झाला. गुरूवारी रात्री सातच्या सुमारास कोपरगाव नाक्याजवळ संजय छबू गिधाड (राहाता) बाजार करून घरी येत असताना रस्त्याच्या कडेला उभा असताना नगरहून शिर्डीकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकची (युपी ७७ एएन ५८०४) त्याला धडक बसली. तो गंभीर जखमी झाले. शिर्डी … Read more

माझी उमेदवारी ही सर्वसामान्यांची उमेदवारी : डॉ. विखे

अहमदनगर :- जगदगुरू तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे नाठाळांना किती समजून सांगितले तरी त्यांना समजत नाही, अशा वेळेला कठोर भूमिका घेऊनच स्पष्ट बोलूनच त्यांना वठणीवर आणावे लागते. प्रचारादरम्यान आपण सर्वसामान्यांचे कष्टकर्‍यांचे प्रश्न उपस्थित केले. हे काही नाठाळांना रुचले नाही व आपल्याला विरोध करण्यासाठी ही मंडळी आरोप करत आहेत व विघ्न निर्माण करत आहेत. परंतु आपल्याला संघर्षाचे बाळकडू मिळालेले … Read more

पदाधिकारी निवडीवरून शिवसेनेंत दोन गटांत राडा !

अकोले :- आमदार नरेंद्र दराडे व सुरेखा गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित संपर्क अभियान कार्यक्रमात शिवसेनेंतर्गत दोन गटांत पदाधिकारी निवडीवरून शुक्रवारी मोठा राडा झाला. शासकीय विश्रामगृहावर झालेल्या या घटनेच्या वेळी सुमारे पाचशे कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार दराडे यांचा सत्कार तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी केल्यानंतर सुरेखा गव्हाणे यांच्या सत्काराला सभापती रंजना मेंगाळ यांच्याऐवजी माजी जि. प. … Read more

मिस व मिसेस अहमदनगर 2019 सीजन 2 स्पर्धेचे ऑडिशन उत्साहात.

अहमदनगर :- महिलांचे सौंदर्य, अदाकारी, कलागुण व बुध्दीमत्तेच्या कसोटीवर आधारलेल्या व मॉडलिंग क्षेत्रात करिअर करु इच्छिणार्‍या महिला व युवतींना एक व्यासपिठ निर्माण करुन देण्याच्या हेतूने तसेच सर्वसामान्य महिलांना मॉडलिंग क्षेत्राचा अनुभव घेण्यासाठी पेज थ्री मॉडलिंग इन्स्टिट्यूट व बीयू इव्हेंटच्या वतीने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी मिस व मिसेस अहमदनगर 2019 सीजन 2 चे आयोजन … Read more