किरकोळ कारणातून महिलेस विवस्त्र करुन मारहाण.

अहमदनगर :- शहरात एका महिलेला किरकोळ कारणातून विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून मारहाण झाली. ही घटना भिंगारमधील एका चप्पल दुकानात घडली. याप्रकरणी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, स्टेशन रोडवरील अक्षता गाईन भागात राहणारी एक ५० वर्षांची महिला भिंगार येथील वेशीजवळ असलेल्या दीपक भिटोरीया यांच्या चप्पल … Read more

माझी लोकसभेची हौस फिटली – आ.शिवाजी कर्डिले

अहमदनगर :- माझी लोकसभेची हौस फिटली आहे. त्यामुळे मी कधीही लोकसभा लढवणार नाही. औटी अभ्यासू आहेत. त्यांचे हिंदी, इंग्रजीवर प्रभुत्व आहे. त्यांनी लोकसभा लढवावी. मी त्यांचे काम करेन, असे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगताच कर्डिले मुरब्बी आहेत. मला पुढे काढून दिले म्हणजे मंत्रिपदाचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांना वाटत असेल. पण मी लोकसभा लढणार नाही, … Read more

हकालपट्टी होण्याअगोदरच घनश्याम शेलार यांनी शिवसेना सोडली !

श्रीगोंदा :- घनश्याम शेलार यांनी पक्षात येऊन संघटना खिळखिळी केली. स्वतः बरोबर पक्ष बदलत फिरणाऱ्यांना त्यांनी प्रमुख पदे दिली. पक्षाचा मनमानी वापर केला. बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना एकही जागा निवडून आणता आली नाही. नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा जाणीवपूर्वक लंगडा पॅनेल उभा केला. नगराध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार माघारी घेतले. त्याचे योग्य उत्तर त्यांना पक्षश्रेष्ठींना … Read more

शरद पवार हेच खरे जाणते नेते -घनश्याम शेलार.

श्रीगोंदा :- लोकसभेसाठी तिकीट मिळणार नसल्याचे सेना-भाजपचा युतीमुळे स्पष्ट झाल्याने घनश्याम शेलार यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत असल्याचे गुरूवारी पत्रकार परिषेदत जाहीर केले. त्यांचे समर्थक असलेले तालुकाप्रमुख संजय आनंदकर, बाळासाहेब पवार, राजाराम जठार आदींनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. शिवसेनेने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले, स्वबळाचा नारा दिला, मात्र ऐनवेळी युती केल्याने शिवसैनिकांचा भ्रमनिरास झाल्याचे शेलार यावेळी … Read more

रेल्वेरूळावर मृतदेह आढळला.

कोपरगाव :- शहरातील हनुमाननगरमध्ये राहणाऱ्या सुनील बागले (वय ३८) यांचा मृतदेह २० फेब्रुवारीला तालुक्यातील शिंगणापूर शिवारात रेल्वेरुळावर आढळून आला. कोपरगावचे रेल्वेस्टेशन मास्टर विजयपाल सिंग यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. बागलेचे नातेवाईक, मित्र परिवाराने तेथे मोठी गर्दी केली होती.

श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा लवकरच होणार !

श्रीरामपूर :- अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा होणार असून येत्या २२-२३ फेब्रुवारीला ही घोषणा होण्याची शक्यता आहे. जिल्हा कृती समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळेच श्रीरामपूर जिल्हा होणार असल्याचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले. येथील एमआयडीसीत ५ कारखाने लवकरच सुरु होणार असून त्यामुळे २ ते ३ हजार युवकांना रोजगार मिळेल, असेही कांबळे म्हणाले. नगर परिषद, दीनदयाळ अंत्योदय … Read more

लोकसभा विकासाच्या मुद्यावर लढविणार :- डॉ. सुजय विखे

राहुरी :- सत्तेतून संधी मिळण्यासाठी विखे कुटुंबाने लाचारी कधीही पत्करली नाही, असे विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. प्रभागनिहाय बैठकीत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची अनेकजण वाट पहात आहेत. मात्र, राजकीय पक्षांचे आज काही खरे राहिले नाही. काल शिवसेनेची उमेदवारी करणारे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत. राजकारणात संघर्ष अटळ असला, तरी … Read more

‘त्या’ माजी सरपंचाची एटीएसकडून चौकशी.

श्रीगोंदा :- पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत देशविरोधी वक्तव्य करणारा विसापूरचा माजी सरपंच जब्बार सय्यद याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभर त्याची नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) चौकशी केली. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे हुतात्म्यांच्या श्रद्धांजली सभेत सय्यद याने देशविरोधी वक्तव्य केले होते. … Read more

आईचा विरह सहन न झाल्याने मुलाचेही निधन.

अकोले :- आईचा विरह सहन न झाल्याने शनिमंदिर परिसरातील बांगड्यांचे व्यावसायिक विश्वनाथ पुरुषोत्तम शेटे यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मातु:श्री सीताबाईंचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे विश्वनाथ दुःखी होते. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांना त्रास जाणवू लागला. काही वेळातच त्यांनी प्राण सोडला. त्यांच्यावर संगमनेर येथील प्रवरातीरी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, … Read more

टँकरची धडक बसल्याने वृद्धाचा मृत्यू.

शेवगाव :- पैठणकडे चाललेल्या टँकरची धडक बसल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. येथील क्रांतिचौकात बुधवारी सकाळी हा अपघात झाला. पोलिसांनी टँकरचालकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत गणेश राम दारकुंडे यांनी फिर्याद दिली आहे. टँकर क्रमांक एमएच १७ ए जी ३५१३ पैठणकडे जात असताना उजव्या बाजूचे चाक उत्तमराव काशिनाथ दारकुंडे (वय ८५, दादेगाव) यांच्या दोन्ही … Read more

शिवसेनेने फोडलेल्या सगळ्या डरकाळ्या पोकळ :- आ.बाळासाहेब थोरात.

संगमनेर :- शिवसेनेने फोडलेल्या सगळ्या डरकाळ्या पोकळ निघाल्या आहेत. गेल्या चार वर्षांत भाजपकडून शिवसेनेची सर्वात जास्त अवहेलना झाली आहे. जे बोलतो ते खरे करतो, असे सांगणाऱ्यांनी त्यांचेच वक्तव्य खोटे करून दाखवण्याचे काम केले आहे. जनतेला भाजप-शिवसेना युती मान्य होणार नाही. शिवसेनेला कशाची भीती वाटली की त्यांनी युती केली, असा सवाल आमदार बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी … Read more

आ.शिवाजी कार्डिलेंकडून आ.राहुल जगतापांचे कौतुक !

अहमदनगर :- मागील ५ वर्षाच्या कालावधीतील अनुशेष भरुन काढण्याचे काम चालू आहे. मतदार संघातील सर्व रस्ते उत्कृष्ट करण्याचा माझा निर्धार आहे. कामांचा दर्जा चांगल्या ठेवण्यावर माझा भर आहे.चालू वर्षी दुष्काळ फार मोठा आहे, सर्वांनी ही परिस्थिती गांभीर्याने घ्यावी, लवकरच टँकर व छावण्या देखील सुरु करणार आहे. साकळाई योजनेचा देखील पाठपुरावा चालू आहे.राळेगण म्हसोबा येथे धनगरवाडी … Read more

रोहित पवार म्हणतात आदेश दिला तरच विधानसभा लढवू,अन्यथा….

जामखेड :- तालुक्यातील युवकाच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. वरिष्ठांनी आदेश दिला तरच विधानसभा लढवू, अन्यथा पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे युवा नेते रोहित पवार यांनी सांगितले. आरणगाव येथे नागरी सत्काराला उत्तर देताना पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपध्यक्ष दत्तात्रय वारे, जिल्हा … Read more

किरकोळ वादातून वडिलांसह सावत्र भावास मारहाण.

अहमदनगर :- किरकोळ वादातून सावत्र आई व सावत्र भावाने वडिलांसह युवकाला लाकडी दांडक्यासह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. सारसनगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कँप पोलिस ठाण्यात सुनील रघुनाथ कदम, सोमनाथ सुनील कदम, अमोल सुनील कदम, रुक्मिणी सुनील कदम (सर्व रा. सारसनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत सचिन सुनील … Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल.

राहाता :- अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अस्तगाव येथील दोन जणांविरोधात राहाता पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत राहाता पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की, अस्तगावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे आई वडील बाहेरगावी गेले होते. आरोपी राजेंद्र रतन वाणी व इंद्रभान भाऊसाहेब गव्हाणे यांनी पीडित मुलीच्या राहत्या घरात पीडित मुलगी आणि तिची बहीण घरात एकट्याच असल्याचा … Read more

मावस बहिणीशी विवाह करण्यासाठी विवाहीतेचा छळ.

अहमदनगर :- पत्नीच्या मावस बहिणीशी विवाह करण्यासाठी विवाहीतेकडे घटस्फोटाची मागणी करीत तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी सासरच्या १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुरुवार दि. १४ रोजी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पती जालिंदर निवृत्ती बडे, दीर भास्कर बडे, नंणद कस्तुरा … Read more

शिक्षिका अभ्यासावरून रागवल्या म्हणून आत्महत्या.

अकोले :- तालुक्यातील देवठाण येथील आढळा विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह रविवारी सायंकाळी नदीपात्रातील विहिरीत आढळला. सौरभ मच्छिंद्र सोनवणे (वय १७) असं त्याचं नाव आहे. १२ फेब्रुवारीला तो बेपत्ता झाला होता. शिक्षिका रागावल्यानं मुलानं आत्महत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला असून, त्यांच्या तक्रारीवरून शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सौरभला दहावीच्या सराव परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले होते. त्यामुळे पालकांना … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत आई आणि मुलाचा मृत्यू.

संगमनेर :- कोल्हार महामार्गावरील अस्मिता डेअरी फाट्यावर रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दाढ बुद्रुक (ता. राहाता) शिवारातील तांबेगोठा येथील महंमद उर्फ अफ्रोज कासम शेख व फरीदा कासम शेख या माय लेकांचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास महंमद शेख व त्याची आई फरीदा हे सादतपुर … Read more