फळांचा राजा आंबा बाजारपेठेत दाखल.

अहमदनगर :- फळांचा राजा आंबा नगरच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. इतरवर्षांच्या तुलनेत यंदा काहीसे लवकरच आंब्याचे बाजारात आगमन झाले आहे. मागील काही वर्षांपासूनचा इतिहास पाहता तब्बल २५ वर्षांनंतर यंदा प्रथमच सकाळी धुके पडले नाही. तसेच आंब्यांच्या मोहराच्या काळात मोहरावर रोगराईचा प्रार्दुभाव झाला नाही. त्यामुळे यावर्षी आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन निघेल असा अंदाज व्यापारी वर्गाने वर्तवला … Read more

वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या हॉटेलवर छापा; दोघांना अटक.

शिर्डी :- साईमंदिरापासून जवळ असलेल्या पिंपळवाडी रस्त्यीवरील हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याचे सोमवारी टाकलेल्या छाप्यात उघड झाले. हॉटेलचा मँनेजर योगेश अण्णासाहेब पवार (२७, माळीनगर, वैजापूर), ग्राहक म्हणून आलेला विजय एकनाथ गायकवाड (३८, कोपरगाव) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हॉटेलचालक नाना शेळके फरार झाला. आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. शिर्डीत नव्याने हजर झालेले पोलिस उपअधीक्षक … Read more

तर भाजप अल्पमतात… राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भाजपचा पाठिंबा काढणार ?

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेथे शिवसेना आणि भाजप बरोबर पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन केल्या असतील तेथे पाठिंबा काढून घ्या असे आदेश दिले आहेत. मनपात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला असला, तरी सत्तेत सहभाग घेतलेला नाही, पण राष्ट्रवादीने दिलेला आदेश बडतर्फ १८ नगरसेवक पाळून भाजपचा पाठिंबा काढण्याची घोषणा करणार का ? यावर चर्चा सुरू झाली … Read more

आईचा गळा दाबून खून करुन मुलाची आत्महत्या.

अहमदनगर :- आईचा गळा दाबून खून केल्यानंतर २४ वर्षीय मनोरुग्ण मुलाने स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. भिंगार येथील लकारगल्लीत रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. भिंगार कॅम्प पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहचले. या घटनेने भिंगार परिसरात खळबळ उडाली आहे. नंदा बापू बेंद्रे (वय ४५), राहुल … Read more

न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स विद्यालय महा क्रीडा वार्षिक वितरण समारंभ संपन्न.

अहमदनगर :- कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऑलिम्पिक खेळाडू पटू दत्तू भोकनळ व खो खो खेळाचे राष्ट्रीय खेळाडू व पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त व चार्टर्ड अकाउंटंट श्री अशोक जी पितळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हा … Read more

शिक्षक भरतीवर अनिश्‍चिततेचे सावट

अहमदनगर :- आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभाग तसेच राज्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे, परंतु शिक्षक भरतीसाठी आवश्यक बिंदूनामावली विभागीय मागासवर्ग कक्षाकडून तपासणे अद्याप बाकी आहे. त्यातच राज्यात अनेक जिल्ह्यात एसईबीसी प्रवर्गासाठी जागाच रिक्त नाहीत. त्यामुळे संबंधित प्रवर्गातील विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तर काही विद्यार्थी शिक्षकांच्या पात्रतेवरून न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीवर … Read more

७० हजार रुपयांच्या खंडणीसाठी पतीचे अपहरण पत्नीची पोलिसांत फिर्याद.

अहमदनगर :- ७० हजार रुपयांच्या खंडणीसाठी पतीचे अपहरण करण्यात आले आहे. याबाबत पत्नीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. नवनागापूर येथील शिवाजीनगर येथून आरोपीने पतीचे अपहरण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे मधुकर सुखदेव दुबे ( रा . शिवाजीनगर ) असे अपहरण झालेल्याचे नाव आहे. सोनू पराड ( पत्ता माहित नाही ) याने … Read more

चारा छावण्या सुरू होण्यासाठी शिवसेनेचा रास्तारोको

अहमदनगर :- दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याबाबत दि. २५ जानेवारी २०१६ रोजी परिपत्रक जारी केले. मात्र, त्यातील प्रशासनाने जाचक अटी शिथिल करून तात्काळ जिल्ह्यात चारा छावण्या सुरू कराव्यात अन्यथा मंगळवारी ( दि.१९) जिल्हाभरात रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत … Read more

हार्वेस्टींग मशिनखाली चिरडून एक ठार.

कोपरगाव :- तालुक्यातील भोजडे शिवारातील स्वत:च्या शेतात ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊस हार्वेस्टिंग मशीनच्या चाकाखाली चिरडल्याने एका जणाचा जागीच मृत्यू झाला. राधाकृष्ण निवृत्ती सिनगर (वय ४९ रा.भोजडे, ता.कोपरगाव) असे मृताचे नाव आहे. रविवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास हा अपघात मृत सिनगर यांच्या शेतात घडला. कर्मवीर शंकरराव काळे कारखाना यांच्या ऊस हार्वेस्टिंग मशीन मार्फत सिनगर … Read more

विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचारी आजपासून संपावर

अहमदनगर :- केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बीएसएनएलचे नुकसान होत असल्याचा आरोप करीत, विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया युनियन्स अ‍ॅण्ड असोसिशन ऑफ बीएसएनएलच्या वतीने पुकारण्यात आलेल्या तीन दिवसीय संपाला पाठिंबा देत नगर मधील बीएसएनएल अधिकारी व कर्मचार्‍यांनी सोमवारी बीएसएनएल कार्यालया समोर निदर्शने करुन संप पुकारला. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात जोरदार घोणबाजी करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने … Read more

खासदार दिलीप गांधी यांच्यावर बोलणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे !

अहमदनगर :- सभामंडपासाठी अर्धी टक्केवारी मागणारे खासदार हे देवाचे सुद्धा झाले नाही तर माणसांचे कसे होणार ? ‘विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्यावर बोलणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे.अशी टीका डॉ. सुजय विखे यांनी केली.तिसगाव येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. डॉ. विखे म्हणाले, ‘मला एखाद्या पक्षाने उमेदवारी दिली तर मी २५ वर्ष हटणार नाही. या … Read more

मोदीजी, परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो.

अहमदनगर :- पुलवामातील हल्ल्यावर प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानात जाऊन हल्ला करण्याची परवानगी मला देत असाल, तर मी जाण्यास तयार आहे, असे नगर जिल्ह्यातील कुशल महादेव घुले या माजी सैनिकाने म्हटले आहे. सध्या अहमदनगर शहरात वास्तव्यास असणारे घुले यांनी भारतीय सैन्यात 17 वर्षे सेवा केली आहे. पुलवामात झालेल्या हल्ल्याच उत्तर स्फोटकांनीच द्यावे लागेल, तरच पाकिस्तानला समजेल. पाकिस्तानचा … Read more

शिवसेना – भाजप युती झाल्यास शिवसैनिक खा. गांधीचे काम करणार नाही !

अहमदनगर :- नगर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मानणारा असून १९९८ पर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेकडेच होता. बाळासाहेब विखे याच मतदार संघातून खासदार झाले होते. नंतर ही जागा भाजपकडे गेली. शिवसेनेने प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच भाजपचे दिलीप गांधी या मतदार संघातून खासदार झाले. परंतु गांधी यांच्याविषयी नाराजी असल्याचे पत्रात नमूद करून ही जागा शिवसेनेकडे घ्यावी अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव … Read more

महिलेस शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी.

अहमदनगर :- जागेत येण्यास मनाई करून तिघांनी भिंगार येथील ३५ वर्षीय महिलेस शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. बॅट व लाकडी दांडक्याने बेदम मारहाणही केली. ही घटना पाइपलाइन रस्त्यावरील इस्कॉन मंदिराजवळ १४ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता घडली. कौशल्या दगडू तागड या इस्कॉन मंदिराजवळील जागेत गेल्या असता भाऊसाहेब धोंडिबा तागड, मंगेश भाऊसाहेब तागड, परिगाबाई दगडू … Read more

मनमाड रस्त्यावरील टोलनाक्यातील संगणक चोरीस !

अहमदनगर :- मनमाड रस्त्यावरील देहरे शिवारातील टोलनाक्याच्या केबिनमध्ये लावलेले तीन संगणक संच व सीपी प्लस कंपनीचे दोन कॅमेरे चोरट्यांनी लांबवले. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. टोलनाक्याच्या केबिनमध्ये असूस कंपनीचे तीन संगणक संच व सीपी प्लस कंपनीचे कॅमेरे बसवलेले होते. हा टोलनाका सध्या बंद आहे. त्या बंद टोलनाक्याच्या केबिनच्या दरवाजाचे कुलूप चोरांनी तोडून आत प्रवेश … Read more

वाकड्यात शिरणे हीच ‘विखे’ परिवाराची परंपरा !

संगमनेर :- संगमनेरचा विकास हा शेजारच्यांना पाहवत नाही. कुटनीतीचा वापर करून विकास कामांमध्ये आडकाठी निर्माण करणे व वाकड्यात शिरणे ही विखेंची परंपरा आहे, असे प्रत्युत्तर संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाषराव सांगळे यांनी दिले डॉ. सुजय विखे यांनी दोन दिवसांपूर्वी आ. थोरातांवर केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले. संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या … Read more

न्याय मिळावा, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी मयत शिंदे कुटुंबीयांची मागणी.

अहमदनगर :- सनी शिंदे या युवकाचा खून करुन, सदर प्रकरण मागे घेण्यासाठी संबंधीत आरोपी कुटुंबीयांना धमकावून मानसिक पिळवणुक करीत असताना त्यांना पोलीस प्रशासन पाठिशी घालत असल्याने इच्छा मरणाची परवानगी मिळण्याची मागणी शिंदे कुटुंबीयांनी केली. या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार माधुरी आंधळे यांना देण्यात आले. यावेळी शरद शिंदे, रेखा शिंदे, नंदा घोडके, बाळासाहेब शिंदे, अरुण घोडके, … Read more

आत्मघातकी हल्ल्याचा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध

अहमदनगर :- जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील मुस्लिम समाज व मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने कापड बाजार येथे आतंकवादीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण करण्यात आले. तर पाकिस्तान मुर्दाबाद…, भारत माता की जय…, इन्कलाब जिंदाबादच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी हाजी मन्सूर शेख, कासमभाई … Read more