शाश्‍वत जलस्त्रोतासाठी निंबळकच्या पाझर तलाव दुरुस्तीचे काम सुरु

अहमदनगर :- शाश्‍वत जलस्त्रोत नसलेल्या निंबळक गाव जलसंपन्न होण्यासाठी जि.प. सदस्य माधवराव लामखडे यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियानातंर्गत दोन पाझर तलाव दुरुस्तीच्या कामाचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी सरपंच साधना लामखडे, उपसरपंच धनश्याम म्हस्के, माजी सरपंच विलास लामखडे, ठेकेदार प्रमोद गायकवाड, ग्रामविकास अधिकारी अनिल भाकरे, उप अभियंता गायकवाड, शाखा अभियंता उदमले, ग्रा.पं. सदस्य … Read more

निमगाव वाघा येथे सीआरपीएफच्या शहीद जवानांना श्रद्धांजली

अहमदनगर :- निमगाव वाघा (ता.नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा निषेध करुन, या हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी प्र.मुख्यध्यापक किसन वाबळे, डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, काशीनाथ पळसकर, गोविंद बोरुडे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत … Read more

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात कॅन्डल मार्च

अहमदनगर :- जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा निषेधार्थ शीख, पंजाबी, सिंधी समाज, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, लायन्स प्राईड व जीएनडी ग्रुपच्या तारकपूरच्या वतीने दिल्लीगेट येथून हुतात्मा स्मारक पर्यंन्त कॅन्डल मार्च काढण्यात आला. या रॅलीत आरएसएस, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवान, स्नेहालय, पंजाबी सेवा समिती, भारत भारती आदि स्वयंसेवी संघटना सहभागी झाल्या होत्या. पाकिस्तान … Read more

“हमें एक जवान के बदलेमे दुष्मनोंके एक हजार सीर चाहिए”

शेवगाव :- शहरात आज सकाळी मोर्चा काढून “पाकिस्तान मुर्दाबाद.. शहीद जवान अमर रहे… पाकिस्तानला ठेचून काढा… हिंदुस्तान हम शरमिंदा है, हमारे जवानोंके कातील अभी जिंदा है..”अशा घोषणा देऊन सर्वसामान्य जनतेने आपला तिव्र संताप व्यक्त केला. मोर्च्याची सांगता शिवाजी चौकात सभा घेऊन करण्यात आली. या मोर्च्यामधे शेवगाव येथील अनेक मुस्लीम बांधवांनी भाग घेतला. सर्वप्रथम शहीद झालेल्या … Read more

चुकीची माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध करणाऱ्यांचा बंदोबस्त – डॉ. सुजय विखे.

राहुरी ;- डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्या संदर्भात खोट्या बातम्या पसरवू नका. ८० कोटी रुपयांची साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये पडून आहे. ऊस पुरवठादारांचे केवळ ६१ कोटी रुपये दोन हजार ४२५ रुपये एफआरपीप्रमाणे देयक आहे. यामुळे आरआरसीच्या कारवाईबाबत खोट्या बातम्या देणाऱ्यांनी कारखान्याची बदनामी थांबवावी; अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा डॉ. सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत दिला. सभासदांचा, … Read more

पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने शिक्षकाकडून गंडा.

अहमदनगर :- सात महिन्यांत रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून लोणीतील शिक्षकाने गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोणी पोलीसात याबाबत गुन्हा दाखल झाला असून त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. याबाबत पोलिसांकडून समजेली अधिक माहिती अशी : स्टॉक गुरू ही आर्थिक गुंतवणूक करणारी कंपनी सात महिन्यांत आपले पैसे दुप्पट करून देते असे आमिष दाखवत … Read more

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद.

अहमदनगर :- घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. मिथुन उबऱ्या काळे (वय १९, रा. सुरेगाव, ता.श्रीगोंदा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे. विसापूर फाटा (ता.श्रीगोंदा) येथून आरोपीला पकडण्यात आले आहे. १५ फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. चास येथील माजी … Read more

पाण्याचे बाटलीचे पैसे मागितल्याने नगरसेवकाने दुकान जाळले.

कोपरगाव :- पाण्याच्या बाटलीचे असलेली उधारी मागितल्याचा राग आल्याने नगरसेवकासह तिघांनी साईआस हे मेडिकल दुकान फेटवून दिल्याची घटना १४ फेब्रुवारी रोत्री रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान टाकळी रोडवर घडली. याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी : टाकळी रोडवर सचिन निबा शिरोडे यांचे साईआस नावाने मेडिकल आहे. १४ फेब्रुवारी रोजी … Read more

माजी आ.अनिल राठोड यांना हद्दपारीची नोटीस

अहमदनगर :- दोन वर्षांसाठी आपणास जिल्ह्यातून हद्दपार का करू नये,’ अशी विचारणा करणारी नोटीस माजी आमदार अनिल राठोड यांना उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी बजावली. उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे माजी आमदार अनिल राठोड यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून हा अहवाल शहर विभागाचे पोलिस उपाधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात … Read more

महाविद्यालयीन युवतीचा शेततळ्यात पडून मृत्यू.

राहाता :- हरभरा धुताना शेततळ्यात पडून १७ वर्षांच्या महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाला. ही घटना राहाता शहरातील पंधरा चारी भागात शुक्रवारी दुपारी घडली. सायली विजय सदाफळ ही विद्यार्थिनी इयत्ता अकरावीत कोऱ्हाळे येथील श्रीगणेश इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होती. शुक्रवारी दुपारी हरभरा खाण्याकरिता ती शेतात गेली होती. हरभरा घेतल्यानंतर तो धुण्याकरिता त्यांच्याच मालकीच्या शेततळ्यावर ती गेली. हरभरा धुताना … Read more

तीन दिवसांत छावण्या सुरू होणार !

अहमदनगर :- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार पशुधनाला दिलासा देण्यासाठी येत्या तीन दिवसांत छावणीसाठी दाखल परिपूर्ण प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीची मोहर उमटणार आहे. याच आठवड्यात छावणी सुरू होईल, अशी ठाम ग्वाही जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे.गतवर्षीच्या पाणकाळात जिल्ह्याच्या शिवाराकडे पावसाने पाठ फिरवली. खरीप पाठोपाठच रब्बीचा हंगामही बुडाला. घटलेल्या जलस्तरामुळे शेतकऱ्यांच्या सालचंदीचा आधार असणाऱ्या खळ्या-दळ्यांना … Read more

मुलीच्या विवाहाच्या विवंचनेत विषारी औषध प्राषन करून पित्याची आत्महत्या.

जामखेड :-  मुलीचा विवाह जमला, सुपारी फुटली. मात्र, विवाहाचा खर्च कसा करायचा, या विवंचनेत असलेल्या मुलीच्या पित्याने विषारी औषध प्राषन करून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील बावी शिवारात घडली. भैरवनाथ नवनाथ राक्षे (वय ४६) रा. धोंडपारगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भैरवनाथ राक्षे हे शेतीसाठी लाकडी अवजारे बनवायचा व्यावसाय करत होते. मात्र, बदल्या काळानुसार हा व्यवसाय … Read more

सुजय विखे म्हणतात तुम्ही जेवढे वाकड्यात शिराल, तेवढाच मी ही वाकड्यात शिरु शकतो…

संगमनेर :- थोरात गटाचा वाढता हस्तक्षेप आता सहनशिलतेच्या पलिकडे गेला आहे. इतकी वर्षे आम्ही तुमचा त्रास सहन केला. पण आता आमचा संयम सुटला आहे, अशी टीका डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे. निमोण येथे सरपंच संदीप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थित युवक व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  तुम्ही … Read more

वडिलोपार्जित शेतीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा केला खून.

राहाता :- तालुक्यातील शिंगवे गावात वडिलोपार्जित शेतीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा खून केला. ही घटना बुधवारी सकाळी घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रज्जाक बशीर शेख (वय ६०) हे गव्हाच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांचा पुतण्या मोहसीन यासीन शेख तेथे आला. वडिलोपार्जित शेतीच्या वादातून त्याने चुलत्यावर तीक्ष्ण हत्याराने पाठीत व डाव्या हाताच्या मनगटावर वार … Read more

‘आय लव्ह यू’ म्हणणार्‍याची महिलांसह नागरिकांकडून यथेच्छ धुलाई !

श्रीरामपुर :- एका महिलेकडे पाहून ‘आय लव्ह यू’ म्हणणार्‍या एका आंबट शौकिनाची या महिलेसह जमलेल्या महिलांनी व नागरिकांनी यथेच्छ धुलाई केल्याची घटना घडली. श्रीरामपूर शहरातील डावखरवस्ती परिसरात काल सकाळी एक महिला जात असताना परिसरातील एका आंबट शौकिनाने सदर महिलेस ‘आय लव्ह यू’ म्हणत अश्‍लिल चाळे केले. येता-जाता नेहमी त्रास देणार्‍या या आंबट शौकिनाचे हे वर्तन … Read more

एकटी असल्याचे पाहून कॉलेज तरुणीवर बलात्कार.

जामखेड :- तालुक्यातील भोगलवाडी येथे घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने अकरावीच्या तरुणीवर बलात्कार केला. या प्रकरणी जामखेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील भोगलवाडी (कुसडगाव) येथील ही घटना आहे. पीडिता ही आजी आजोबा व भावासोबत राहते. तर आई-वडील ऊसतोडणीसाठी इंदापूरला गेले होते. रविवारी अकरावीत शिकणारी पीडिता घरात … Read more

मोबाईलमध्ये अश्‍लिल चित्रीकरण करणारा तो तरुण फरार !

अहमदनगर :- महिलेचे मोबाईलवर अश्‍लिल चित्रीकरण केल्याचा प्रकार पाथर्डीत घडला आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून देविदास मोरे याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल होताच, या तरुणाने शहरातून पोबारा केला आहे. या प्रकाराचा सर्वच थरातून निषेध होत आहे. पीडित महिला मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, “मोबाईलमधील कॅमेरा चालू करून, तो लपवून … Read more

बाळासाहेब नाहाटासह १३ जणांवर गुन्हे दाखल.

श्रीगोंदा :- मयत सभासदाच्या विमा रकमेत संगनमताने अपहार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बाळासाहेब नाहाटा यांच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी वि.का .सेवा संस्थेच्या तत्कालीन 13 संचालकाच्या संगनमताने 7/2/2015 ते 26/9/2018 या तीन वर्षांच्या काळात सदर अपहार प्रकरण घडले आहे. यात संस्था रोज किर्द, व्हाऊचर आणि मयताची पत्नी यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र यामध्ये विसंगती … Read more