शेतकऱ्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला.

पारनेर :- तालुक्यातील करंदी येथे रावजी कारभारी चौधरी (वय ५१) यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात सोमवारी दुपारी संशयास्पद स्थितीत आढळला असून त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. ते सकाळी त्यांच्या वस्तीमागील शेरी येथे लसूण व कांद्यास पाणी देण्यासाठी गेले होते. थोडेच पीक असल्याने ते बराच वेळ का थांबले, म्हणून त्यांची पत्नी दुपारी साडेतीनच्या सुमारास … Read more

आ.शिवाजी कर्डिलेंकडून जीवे मारण्याची धमकी !

अहमदनगर :- आ. शिवाजी कर्डिले यांनी पिस्तूल रोखत डॉ. प्रकाश कांकरिया व मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी साक्ष प्रत्यक्षदर्शी मिलिंद मोभारकर यांनी न्यायालयात दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर हद्दीतील जमिनीच्या व्यवहारातील ९२ लाख रुपये परत मागितल्याने कर्डिले यांनी ही धमकी दिल्याचे मोभारकर यांनी सोमवारी न्यायालयासमोर सांगितले. फसवणूक प्रकरणी … Read more

संत भगवानबाबांची मूर्ती जाळल्याप्रकरणी स्वप्निल शिंदेला अटक.

अहमदनगर :- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओ मध्ये सूरु असलेल्या संत भगवानबाबा यांच्या मूर्तीच्या काही भागांची अज्ञात इसमाने स्टुडिओ तुन बाहेर शेतात आणून जाळल्याची घटना घडली होती. यासंदर्भात शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी पारनेर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती त्या अनुषंगाने पारनेर पोलिसांनी या जागेचा मालक असलेला स्वप्निल सुरेश शिंदे, वय ३५ … Read more

आ.बाळासाहेब मुरकुटेंची बदनामी करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा.

नेवासे :- तालुक्यातील मुरकुटे व गडाख गटातील कार्यकर्ते एकमेकांच्या नेत्यांची व पक्षाची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मागील काही दिवसांपासून करत आहेत. त्याची परिणीती रविवारी गुन्हा नोंदवण्यात झाली. आमदार बाळासाहेब मुरकुटे राष्ट्रवादीच्या वाटेवर, माजी आमदार चंद्रशेखर घुले, अजित पवार आणि आमदार मुरकुटे यांची पुण्यात गुप्त बैठक अशी बातमी व घुले हे आमदार मुरकुटे यांचा पुष्पगुच्छ … Read more

नवऱ्याला मारण्यासाठी गुप्तांगावर केमिकलचा प्रयोग !

अहमदनगर :- लष्कराच्या सेवेत असलेल्या पतीच्या गुप्तांगावर केमिकलचा प्रयोग करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील रांजणी गावात ठरली आहे. नगर तालुका पोलिसांनी सदर पतीच्या तक्रारीवरून सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न म्हणून फिर्यादीची पत्नी आणि तिचा प्रियकर डमरे याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. या प्रकारामुळे नगर तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर असे कि, फिर्यादी … Read more

संक्रातीला ठरणार नगर लोकसभेचा उमेदवार.

अहमदनगर :- नगर लोकसभेचा उमेदवार फायनल करण्यासाठी आता १५ जानेवारीचा मुहूर्त मिळाला आहे,उद्या १५ जानेवारीला दिल्लीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या दोन्ही काँग्रेसच्या जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. नंदुरबार, नगर, औरंगाबाद या तीन जागांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरु असून चर्चेच्या … Read more

लोकसभा मतदारसंघातील २५ रस्त्यांसाठी ५३ कोटींचा निधी : खा. गांधी

अहमदनगर :- नगर लोकसभा मतदार संघातील वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्याचे कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. त्याबाबत पाठपुरावा केल्यामुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण ८०.३२ किमीच्या एकूण २५ रस्त्यांच्या कामासाठी ५३ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली. ग्रामीण भागातील या प्रलंबित रस्त्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी नागरिकांची … Read more

वाळूच्या डंपरने चिरडले,तिघांचा मृत्यू.

पारनेर :- तालुक्यातील खडकवाडीजवळ वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने मायलेकासह तिघांना जोरदार धडक दिली. यात तिघांचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकारामुळे वाळू तस्करांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. डम्परने चिरडल्याने तिघांचाही जागीच मृत्यू एमएच 16 वाय 1914 या क्रमांकाच्या मोटारसायकल वरून जात असलेल्या … Read more

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा खुलासा गायब !

अहमदनगर :- महापौर निवडणुकीत पक्षादेश डावलून भाजपला साथ दिल्याप्रकरणी २८ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस यांच्या स्वाक्षरीने ७ दिवसांत खुलासा करण्याची नोटिस १८ नगरसेवकांना बजावून कारवाईचा इशारा दिला होता. खुलासा गायब झाला की गायब केला ? त्यानुसार नगरसेवकांनी खुलासाही पाठवला होता, तथापि, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी १८ नगरसेवकांनी खुलासा न दिल्याचे कारण पुढे करत … Read more

वर्ल्ड टिचर फोरमची स्थापना.

अहमदनगर :- शिक्षक हा राष्ट्राचा शिल्पकार असतो. समाज व माणूस घड़विताना इतर संस्कृतींबरोबरच शैक्षणिक संस्कृती देखील विकसित होत असते. जगाच्या कानाकोपऱ्यात विविध प्रादेशिक परिस्थितींमध्ये अध्ययन अध्यापनाच्या अनोख्या शिक्षण संकल्पना एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन नवशिक्षकांनी नवसर्जनाचे सुलभक व्हावे म्हणून राष्ट्रपती पदक प्राप्त व जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेता कलाकार व हरहुन्नरी शिक्षक डॉ.अमोल बागूल यांनी “वर्ल्ड टिचर … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारकडून १० हजार रुपये?

वृत्तसंस्था :- पाच राज्यांच्या निवडणुकीत पराभवाचा झटका बसल्यानंतर केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी लवकरच पॅकेज देण्याच्या प्रयत्नात आहेत. येत्या कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी १० हजार जमा करणार आहे. ही रक्कम बियाणे, शेती साहित्यासाठी देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठीच्या योजनेची घोषणा येत्या २६ जानेवारीला होवू शकते. या योजनेबाबत अर्थ आणि कृषी … Read more

कर्जत जामखेड मधून रोहित पवार निवडणूक लढवणार ?

जामखेड :- पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात आता खासदार शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणूक लढविणार असल्याचे संकेत त्यांनी कर्जत – जामखेडच्या दौर्यात केले आहेत. पवार घराण्यातील चौथ्या पिढीचे राजकीय नेतृत्व करत असलेले पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे जामखेड तालुक्‍यातील चोंडी दौऱ्यावर आले होते. कर्जत – जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवाल का असे … Read more

कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला सक्तमजुरी.

नेवासा :- 2014 साली शेतामधून जाण्यासाठी रस्ता द्यावा म्हणून सांगीतल्याचा राग आल्याने एकास कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी ए. एल. टिकले यांनी विलास श्यामराव कर्डिले (रा. जेऊर हैबती ता. नेवासे) याला दोषी धरून तीन वर्षे सक्तमजुरी व ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  फिर्यादी कर्डिले यांना शेतात जाण्यासाठी … Read more

काँग्रेसची सत्ता आल्यावर धान्याला २५०० रूपयांचा भाव!

मुंबई :- आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सत्तांतर अटळ असून, काँग्रेसची सत्ता आल्यानंतर तातडीने धान्यला २५०० रूपये प्रती क्विंटल इतका भाव जाहीर केला जाईल, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील जाहीर केले आहे. भंडारा येथे जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, अखिल … Read more

नगरसेवकांचे निलंबन केले पण आमदार जगताप पितापुत्रांचे काय ?

देशात आणि राज्यात भाजप विरोधी आघाडी करण्यात पुढे असलेल्या शरद पवारांच्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी अहमदनगर महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत ‘जातीयवादी’ भाजपला पाठिंबा दिला. स्थानिक नेत्यांची भाजपला साथ. राज्यात या बाबत चर्चा होतात सर्वानीच हात झटकले. महापौर निवडीत झालेल्या ह्या अभद्र युतीबाबत अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पक्षनेतृत्वाचा विरोध असतानाही राष्ट्रवादीच्या स्थानिक … Read more

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या सर्व नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी !

अहमदनगर : महापौर निवडणुकीत भाजपला पाठींबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनाही पदावरून हटविले आहे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत आदेश दिले आहेत. अहमदनगरमध्ये महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला धोबीपछाड महापौरपद काबीज केले होते. शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष असला तरी इतर सर्वपक्षीयांनी भाजप उमेदवाराला … Read more

नगरच्या तरुणीचा प्रेमभंगातून लातूर शहरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न.

लातूर :- प्रियकराने दिलेला धोका आणि त्यातून आलेले नैराश्य यामुळे एका १७ वर्षीय तरुणीने चौथ्या मजल्यावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला , गुरुवारी रात्री औसा रोडवर तब्बल दोन तास हा थरार सुरु असताना अत्यंत चपळाईने पोलिसांनी घेतलेली अॅक्शन आणि मदतीला आलेली अग्निशमन विभागाची यंत्रणा यामुळे तिला वाचविण्यात यश आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की लातूर … Read more

शेतातील विद्युत तारेचा झटका बसून तरुणाचा मृत्यू.

अहमदनगर :- नगर तालुक्यातील नांदगाव येथे एका शेतातील विद्युत तारेचा झटका बसून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. शिवाजी वसंत जगधने (वय ३१ रा. पिंप्री अवघड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. विद्युत प्रवाहाचा झटका बसून मृत्यू याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी सकाळी नांदगाव येथील … Read more