मनपाच्या कामगारांना आंदोलन पडले महागात !

परस्पर गैरहजर राहिलेल्या २१ कामगारांना निलंबित करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त-जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरुवारी सायंकाळी प्रशासनाला दिले आहेत.

ब्रेकिंग : लष्कर प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी करणाऱ्या तिघांना अटक

आर्म्ड कॉप्स सेंटर अँड स्कूल या लष्करी प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडे बनावट मिलिटरी कार्ड आढळून आले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

केडगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार…

याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, केडगाव मधील एका उपनगरातील १५ वर्षे वयाची अल्पवयीन मुलगी शाळेत व क्लासला जात येत असताना तिची ओळख शुभम रा. केडगाव या तरुणाशी झाली. त्याने मुलीचा विश्वास संपादन करून तिला चास येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला तसेच तिला शिवीगाळ दमदाटी करून तुझ्या आई वडिलांना सांगेल असा दम दिला.

Read more

शेतक-यांना आर्थिक स्‍थैर्य देण्‍यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्‍यावा

शेतक-यांच्‍या शेती उत्‍पादनात वाढ होऊन त्‍यांना शाश्‍वत आर्थिक स्‍थैर्य मिळवून देण्‍यासोबतच जे विकते ते पिकवायला शिकविण्‍यासाठी राज्‍यातील कृषी विद्यापिठांनी पुढाकार घ्‍यावा, असे  आवाहन वित्‍त व नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.  महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाला 151 कोटी रुपयांचा निधी देणार असल्‍याची घोषणाही त्‍यांनी यावेळी  केली.

तुला पाहते रे’ मालिका बंद करण्याची मागणी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :–  ‘तुला पाहते रे’ या मालिकेवर सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवल्याने झी मराठी वाहिनी अडचणीत येण्याची चिन्ह आहे. एकतर ही मालिका बंद करावी अथवा त्यात बदल करावेत, अशा आशयाचं निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकारी राम किशोर नवल यांना दिलं आहे. या मालिकेत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 20 वर्षीय तरुणीचे 40 वर्षीय व्यक्तीसोबत प्रेमसंबंध दाखवले … Read more

दळणवळणासाठी रस्ता नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालया समोर ग्रामस्थांचा आक्रोश

अहमदनगर (प्रतिनिधी)- दळणवळणासाठी रस्ता नसल्याने डोंगरी भागातून पायावाटातून प्रवास करणार्‍या पारनेर तालुक्यातील काटवन दलित वस्ती भागातील ग्रामस्थांनी दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन आक्रोश केला. ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांना दळवळणाची सोय होण्यासाठी काटाळवेढा डोंगरवाडी ते काटवन दलित वस्ती पर्यंन्त मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याचे काम होण्याची मागणी करण्यात आली. सदर रस्त्याचे काम सुरु न झाल्यास … Read more

महापौर निवडणुकीवरून राष्ट्रवादीत खळबळ

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :– महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीवरून राष्ट्रवादीअंतर्गत खळबळ उडाली आहे. राज्य व देश पातळीवर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सत्ताधारी भाजपच्या विरोधात देशभरातील विरोधकांची एकत्रित आघाडी तयार करण्याच्या प्रक्रियेत असताना स्थानिक नगरच्या पातळीवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला मतदान करून निवडून आणल्याच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. सर्व १८ नगरसेवकांसह शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांना कारणे दाखवा … Read more

पाथर्डीत दोन मित्रांमध्ये किरकोळ वादातून गोळीबार.

पाथर्डी येथील शेवगाव रस्त्यावर हा प्रकार घडला. त्या भागातील एका हॉटेलवर बबलू कांबळे आणि संतोष गायकवाड हे दोघे जेवण करायला गेले होते. तेथे त्यांच्यात वाद निर्माण झाला. या वादातच संतोष गायकवाड याने त्याच्याजवळील एअरगनमधून गोळीबार केला. यातच कांबळे जखमी झाले. कांबळे यांना गोळी लागली का गनच्या दस्त्याने मारहाण झाल्यामुळे ते जखमी झाले, हे रात्री उशीरापर्यंत … Read more