नगर जिल्ह्यात उष्णतेची लाट,दैनंदिन जीवन विस्कळीत

अहमदनगर :- एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात तापमानाने उसळी घेतल्याने पारा ४४ ते ४५ अंशांवर कायम आहे. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी नगरचे ४४.९ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने दिवसभर उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे दुपारी शहरातील रस्ते ओस पडले आहेत. तापमानाचा पारा चढाच असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे घरातून बाहेर … Read more

छिंदम बंधुंसह १५ टोळ्यांतील एकूण ६७ गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार !

अहमदनगर :- श्रीपाद व श्रीकांत शंकर छिंदम (तोफखाना) यांच्यासह जिल्ह्यात संघटितपणे गुन्हे करणाऱ्या १५ टोळ्यांतील एकूण ६७ गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले. पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी हे आदेश काढले, अशी माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. भाऊसाहेब लक्ष्मण कराळे, ओंकार भाऊसाहेब कराळे, ऋषिकेश नरेंद्र सिंग परदेशी, मनोज भाऊसाहेब कराळे, रशीद दंडा, चंद्रकांत आनंदा … Read more

पिण्यास पाणी न दिल्याने मुलीचा विनयभंग

राहुरी : पिण्यास पाणी दिले नाही या कारणावरून अल्पवयीन मुलीला मारहाण करत विनयभंग करणाऱ्या ७ तरुणांविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. राहुरी फॅक्टरी येथे २७ एप्रिलला ही घटना घडली. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, घरात असताना परिसरातील तरुणांनी पिण्यासाठी पाणी मागितले होते. यावेळी पाणी नसल्याचे सांगितल्याने संबंधित तरुणांनी घरात घुसून लाथाबुक्क्याने … Read more

लोकप्रतिनिधी व नगरसेवकांना बूट फेकून मारून विकासाचा जाब विचारा !

अहमदनगर :- अधिकाऱ्यांना बूट फेकून मारण्यात काहीच शूरपणा नाही. त्याऐवजी आपणच पिढ्यानपिढ्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी व नगरसेवकांना बूट फेकून मारून विकासाचा जाब विचारण्याचे धाडस नागरिकांनी करावे,’ असा सल्ला जागरूक नागरिक मंचाने दिला. महापालिकेत बोल्हेगाव रस्ता कामावरून झालेल्या आंदोलनात महापालिका अधिकाऱ्यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याच्या घटनेचा निषेध जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे व अन्य सदस्यांनी … Read more

पत्रकारास गुंडांकडून बेदम मारहाण

अहमदनगर :- दुकानासमोर सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेले पत्रकार अन्सार सय्यद यांनाच गुंडांनी बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना कोठला येथील राज चेंबर परिसरात शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी अजिम हनिफ शेख व इतर ५-६ जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला. आरोपी अजिम व इतरांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. एकाने त्यांच्या डोक्यात गज … Read more

सेल्फी घेण्याच्या नादात तरुणाचा पाय घसरुन मृत्यु

राहुरी :- लोणावळा येथील हिल स्टेशनवर सेल्फी काढल्यानंतर पाय घसरून राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथील एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. रवींद्र काशीनाथ शेटे (वय २३) हा लोणी येथील नर्सिंग महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. शनिवारी पहाटे रवींद्र आपल्या काही मित्रांसह लोणावळ्याला फिरण्यासाठी गेला होता. दुपारी दोनच्या सुमारास रवींद्र व … Read more

….ती राजकीय आत्महत्याच

शिर्डी :- राष्ट्रवादीकडून आम्ही निवडणूक लढवली असती तर ती राजकीय आत्महत्याच ठरली असती,’ अशा शब्दांत माजी विराेधी पक्षनेते राधाकृ‌ष्ण विखे पाटील यांनी पक्षावर नाराजीचे कारण शनिवारी जाहीरपणे सांगितले. ‘नगरची जागा काँग्रेसला सुटल्यास पक्षाचा एक खासदार वाढेल म्हणून मी जिवाचे रान करीत हाेताे. त्याच वेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधी मात्र सुजयने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याचा सल्ला देत होते. … Read more

श्रीगोंद्यात कर्ज फेडण्यास पैसे न दिल्याने मुलाची आई-वडिलांना मारहाण !

श्रीगोंदे :- शहरातील एका निदर्यी मुलाने आपले कर्ज फेडण्यास बापाने पैसे देण्यास नकार दिल्याने चक्क वृद्ध आई-वडिलांना या माथेफिरू मुलाने बेदम मारहाण केली.  याबाबत वृद्ध पित्याने दत्तात्रय सदाशिव दहातोंडे (वय ६०) यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीगोंदे शहरातील दत्तात्रय सदाशिव दहातोंडे (बगाडे कॉर्नर, श्रीगोंदे) येथे राहत असून त्यांना २ मुले … Read more

शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी आरोपीस अटक

अकोले :- तालुक्यातील जामगाव येथील वाल्मिक शिवाजी आरोटे (३६) या तरुण शेतकऱ्याने २३ एप्रिलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.  या घटनेनंतर राजूर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांना मृताकडे एक चिठ्ठी मिळून आली होती. यातील मजकुरावरून एक आरोपी विलास दादाजी गोसावी यास अटक केली. त्याला न्यायालयानेसहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील आरोपी … Read more

निरोगी राहायचे असेल तर वापरा ह्या टिप्स.

सूर्योदयापूर्वी उठल्यामुळे शरीराला चांगली ऊर्जा मिळून दिवस चांगला जातो. नियमित चालणं, तसंच योगासनं हे व्यायाम केल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतं. दिवसभराच्या कामांचं सकाळीच नियोजन करून ती कामं शक्यतो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे कामाचा अतिरिक्त तणाव येत नाही. पौष्टिक आणि संतुलित आहाराचं पालन करावं. दररोजच्या आहारात फळं, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. दोन वेळच्या जेवणात साधारण सात … Read more

आता काँग्रेसची जिल्ह्यात कुठेच शाखा शिल्लक नाही…

श्रीरामपूर :- राहुल गांधी नगर जिल्ह्यात येत आहेत, पण त्यांचे स्वागत करण्यासाठी ना जिल्हाध्यक्ष ना विरोधी पक्षनेता अस्तित्वात आहे. काँग्रेसच्या अध्यक्षांना यापेक्षा काय मोठी भेट असेल, असा उपरोधिक टोला लगावत आता काँग्रेसची जिल्ह्यात कुठेच शाखा शिल्लक नसल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री … Read more

श्रीगोंद्यात तमाशा कलावंतांना बेदम मारहाण करत विनयभंग

श्रीगोंदे :- तालुक्यातील टाकळी लोणार गावातील १५-१६ गावगुंडांनी मद्याच्या नशेत शिवीगाळ व अरेआवी करत तमाशातील पुरुष व महिला कलावंतांशी असभ्य वर्तन व झटापट केली. लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून त्यांना जखमी केले. याबाबत श्रीगोंदे पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार सुमारे १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ एप्रिलला टाकळी लोणार येथील म्हसोबा यात्रेनिमित्त … Read more

विखे घराण्याची दादागिरी व हुकूमशाही कायमची संपवा

संगमनेर :- काँग्रेसमध्ये सत्तेची अनेक महत्त्वाची पदे ज्यांनी सांभाळली, ज्यांनी अनेकदा स्वकियांनाच त्रास देत सहकाराच्या माध्यमातून सगळीकडे हुकूमशाही राबवली, त्यांची दादागिरी संपवण्याची हीच योग्य वेळ आहे. आम्ही दक्षिणेत योग्य इंजेक्शन दिले, आता तुम्ही निर्णय द्या, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व नगरचे उमेदवार संग्राम जगताप यांनी सांगितले. जोर्वे या आमदार राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे … Read more

मला का विरोध केला याचे उत्तर मागण्यासाठी मी संगमनेरमध्ये – डॉ.सुजय विखे

संगमनेर :- नगर लोकसभा मतदारसंघात मला व्यक्तिद्वेषातून विरोध करण्यात आला. थोरातांनी मला का विरोध केला याचे उत्तर मागण्यासाठी मी संगमनेरमध्ये आलो आहे. ज्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने बघितली अशी दोन्ही माणसे माझ्या पराभवासाठी नगरमध्ये तळ ठोकून बसली. या सर्वांनी प्रयत्न केले, तरी निकाल काय लागेल हे सांगायची गरज नाही, अशा शब्दांत डॉ. सुजय विखे यांनी … Read more

शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचे पाप मोदी-फडणवीस सरकारने केले नाना पटोले यांची जोरदार टीका

संगमनेर : अन्नदात्या शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचे पाप मोदी आणि फडणवीस सरकारने केले. या सरकारने शेतकऱ्यांसह सामान्य माणसांना कोणत्याही योजनांचे अर्ज ऑनलाइन भरायला लावले. मात्र, रुपयाचाही फायदा पदरात पडला नाही. आपल्याला ऑनलाइन करणाऱ्यांना आता पाइपलाइनमध्ये टाकण्याची वेळ आली आहे. हे सरकार पुन्हा आले, तर आपण आर्थिक गुलामगिरीत जाऊ, अशी प्रखर टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी … Read more

न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची मोदींना सवय – शरद पवार यांची टीका

कोपरगाव : जिनिव्हा करारानुसार पाकिस्तानवर दबाव आला व अभिनंदन या जवानाची सुटका झाली. त्याबद्दल आपण ५६ इंच छाती फुगवून फुकटचं श्रेय घेता. नको त्या कामाच श्रेय घेण्याचे काम मोदी सरकार करीत असून देशाच्या संरक्षणाची जबाबदारी या सरकारची आहे. मी संरक्षण मंत्री असताना पाकिस्तानच्या हल्ल्यात जवान शहीद झाल्यानंतर प्रत्येक वेळी कुटुंबीयांचे सांत्वन केले. पण भांडवल केले … Read more

डॉ सुजय विखे यांनी पंकजा मुंढे यांच्या सभेकडे फिरवली पाठ

नेवासे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले डॉ. सुजय विखे हे नगरच्या निवडणुकीतून निवांत झाल्यावर शिर्डी मतदारसंघात प्रचाराच्या आघाड्या सांभाळतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. मात्र, मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेत त्यांच्या यंत्रणेतील कोणीही दिसले नाही.  सर्जिकल स्टाईक हा काही लोकसभा निवडणुकीचा विषय नाही, तर या सरकारच्या राजवटीत मिळणारे संरक्षण हा महत्त्वाचा विषय आहे, असे प्रतिपादन … Read more

मद्य पाजून तरुणाला भोकसले

शिर्डी : जुन्या वादातून शिर्डीतील एका तरुणाला मद्य पाजवून त्याची धारदार शस्त्राने भाेसकून हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली.  मनोज भीमा पाईक (२१) असे तरुणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा खून झाला. पोलिसांनी १० जणांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, मनोज पाईक याच्यावर धारदार शस्त्राने वार झाल्यानंतर त्याला रुग्णालयात … Read more