प्रेमविवाह करू नकोस असे म्हणत तरुणास मारहाण

अहमदनगर :- प्रेमविवाह करू नकोस असे म्हणत तिघांनी तरुणास शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना लालटाकी परिसरातील सिद्धार्थनगर येथे सोमवारी घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी स्वप्निल शेलार याच्या फिर्यादीवरून सुनील शेलार, सचिन शेलार, रुपेश शेलार यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. स्वप्नील घरासमोर उभा असताना तू प्रेमविवाह करू नकोस, असे म्हणत आरोपींनी मारहाण केली. त्याच्या तोंडावर … Read more

जिल्हा न्यायालयात तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या वकिलास दंड.

अहमदनगर :- न्यायालयात थुंकणाऱ्या एका वकिलासह चौघांविरुद्ध बुधवारी कारवाई करण्यात आली. प्रत्येकाकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आवारात तंबाखू, पान, मावा, गुटखा खाऊन थुंकून भिंती खराब करण्यात आल्या आहेत. न्यायालयातील भिंतीवर थुंकू नये, अशा सूचना लावण्यात आल्या आहेत. त्यानंतरही वकील, पक्षकार व इतर जण तंबाखू खाऊन थुंकून भिंती खराब करत … Read more

संग्राम जगताप यांच्यासाठी राज ठाकरे अहमदनगर मध्ये !

अहमदनगर :- नगर लोकसभेची जागा भाजप व राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच विखेंना येथून उमेदवारी दिली असल्याने त्यांचे विशेष लक्ष या मतदारसंघावर आहे. दुसरीकडे पवार यांनी डॉ. विखेंना उमेदवारी नाकारताना आमदार संग्राम जगताप यांना उतरवून त्यांच्यासाठी आपलीही जिल्ह्यातील राजकीय ताकद एकवटली आहे. त्यामुळे येत्या १५-२० दिवसात या मतदारसंघात दोन्ही बाजूंनी स्टार प्रचारकांच्या … Read more

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेही भाजपवासी होणार ?

अहमदनगर :- ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा काँग्रेसमध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पुढील पंधरा दिवसांत काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. एका वृत्तवाहिनीवर बुधवारी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे संकेत दिले. राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डाॅ. सुजय नुकताच भाजपत गेला आहे. भाजपने त्याला दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. विखे … Read more

सुवेंद्र गांधींचा ‘यु टर्न’ निवडणुकीतून माघार

नगर : लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विरोधात उमेदवारी करण्याची घोषणा केल्यानंतर खा.दिलीप गांधी यांचे सुपूत्र सुवेंद्र गांधी यांनी आता ‘यु टर्न’ घेतला आहे. पक्षाचा आणि खा.दिलीप गांधी यांचा आदेश मानून आपण उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला असून, पक्षाच्याच उमेदवाराचे काम करणार असल्याचे सुवेंद्र गांधी यांनी निर्णय घेतला आहे. खा. दिलीप गांधी यांचे तिकीट कापल्यानंतर … Read more

‘त्या’फोटोमुळे सुजय विखे नेटीझन्सकडून ट्रोल…व्हायरल फोटोमुळे सुजय विखेंविरोधात नाराजी !

अहमदनगर : जिल्हा परिषद सदस्य व राहूरी तालुक्यातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शिवाजी गाडे पाटील यांचे मंगळवार दि.२ रोजी पहाटे दुःखद निधन झाले. निधनानंतर त्यांचे पार्थिव देह अंतिमदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्या दु:खद प्रसंगी डॉ.विखे पार्थिव देहाच्या अंतिमदर्शन घेण्यासाठी पोहचले. अंतिम दर्शन घेतांना विखे यांनी हार अर्पण करतांना काढलेला फोटो सर्वत्र व्हायरलं झाला आहे. श्रद्धांजली देतांना … Read more

…त्यांचे नाव ‘सु’जयऐवजी ‘कु’जय ठेवायला हवे होते !

अहमदनगर :- सरकारने पाच वर्षे खोटी आश्वासने देत सव्वाशे कोटी जनतेची फसवणूक केली. ज्यांना जनतेने चौकीदार केले त्यांच्या डोळ्या देखत मल्ल्या आणि निरव मोदी पळून गेले. पाच वर्षांत लोकांच्या खात्यात पंधरा लाख, तर दूरच साधे पंधरा पैसे देखील जमा झाले नाहीत. एवढेच नाही, तर मोदी सरकारने चौकीदाराचे नाव देखील बदनाम केले, अशी टीका विधान परिषदेचे … Read more

आमदार संग्राम जगताप आहेत ‘इतक्या’ कोटींचे मालक

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्याकडे ८ कोटी ५१ लाख ५३ हजार, तर त्यांची पत्नी शीतल यांच्याकडे ९३ लाख ४३ हजार रुपयांची संपत्ती आहे.  जगताप यांच्यावर २ कोटी ९१ लाखांचे कर्ज असून त्याच्यावर केडगाव हत्याकांडप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. जगताप यांच्याकडे १ लाख ९८ हजार रुपयांची रोकड असून स्टेट … Read more

भाजपच्या व्यवस्थापन समितीतून खा. गांधीना वगळले!

नगर : भारतीय जनता पक्षाच्या नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या व्यवस्थापन समितीची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा निवडणूक प्रमुख राम शिंदे यांनी केली. या समितीतून खा. गांधी यांना वगळण्यात आले. संयोजकपदी प्रसाद ढोकरीकर, निवडणूक सहप्रमुखपदी अभय आगरकर, प्रचार प्रमुखपदी नामदेव राऊत, आचारसंहिता प्रमुखपदी (कायदेशीर) अ‍ॅड.युवराज पोटे यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून नगर दक्षिण … Read more

आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचार रॅलीत चोरट्यांचा धुमाकूळ !

अहमदनगर :- अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे कॉग्रेस -राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी मुहूर्त साधून मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी शहरातून प्रचार रॅली काढली होती, या रॅलीत चोरट्याचा धुमाकूळ दिसून आला.चोरटयांनी रॅलीतील तब्बल २० जणांच्या चैन ,मोबाईल व रोख रक्कमेवर डल्ला मारला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून दोन … Read more

अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता हा स्मार्टफोन

मुंबई :- शाओमीने भारतात आपला ‘एमआय फॅन फेस्टिवल’ सुरू करण्याचं ठरवलं आहे. या सेल 4 एप्रिल 2019 ते ६ एप्रिल 2019 दरम्यान असणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला शाओमी कंपनी विविध स्मार्टफोन्स अवघ्या 1 रुपयात उपलब्ध करुन देणार आहे. शाओमी कंपनीने भारतीय बाजारात आपलं एक वर्चस्व निर्माण केलं आहे. Mi Fan Festival या सेलमध्ये कंपनी अवघ्या … Read more

शेतकरी जोडप्याच्या हस्ते आ.संग्राम जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल !

अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघातून कॉंग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मतदारसंघातील पारनेर तालुक्यातील जवळा येथील बबनराव रासकर व अंजनाबाई रासकर शेतकरी जोडप्याच्या हस्ते मुहूर्त साधत त्यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. दरम्यान थोड्याच वेळात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची क्लेरा ब्रूस मैदानावर सभा होणार आहे. यावेळी काँग्रेस- … Read more

जावयाला सोडून आ.शिवाजी कर्डिले सुजय विखेंसोबत !

अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातुन भाजपाचे उमेदवार डॉ सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांनी विराट शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे विरोधी उमेदवार संग्राम जगताप यांचे सासरे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले उपस्थित होते. दिल्लीगेट येथून भव्य रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. डॉ.सुजय विखे पाटील यांनी तीन उमेदवारी भरले. ही निवडणूक … Read more

आ.संग्राम जगतापांच्या प्रचारार्थ आज धनंजय मुंडेंची नगरमध्ये सभा

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस आघाडीचे दक्षिणेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप व उत्तरेतील उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे हे दोन्ही उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी दहा वाजता जुना बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रचार रॅलीस सुरुवात होईल. नगर शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली जाणार असून कलेक्टर कचेरी येथे दोन्ही उमेदवार अर्ज भरणार आहेत. … Read more

रेल्वेखाली उडी घेऊन तिघांची आत्महत्या.

राहुरी :- दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर वांबोरी रेल्वेस्थानकानजीक रेल्वेखाली तिघांनी आत्महत्या केली. त्यात दोन महिला व एका लहान मुलाचा समावेश आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली. माय-लेकराची ओळख पटवण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. मात्र, ५२ वर्षांच्या महिलेची ओळख अजून पटू शकलेली नाही. आत्महत्येचे कारणही समजू शकले नाही.  वर्षा गिरीराज तिवारी-ठुबे (वय ४३), मुलगा अनुप गिरीराज तिवारी (वय … Read more

हेलिकॉप्टरमधून फिरणाऱ्या डॉ.सुजय विखेंकडे स्वतःची गाडी नाही !

अहमदनगर :- हेलिकॉप्टरमधून फिरणारे उमेदवार म्हणून ओळख असणारे सुजय विखे यांच्याकडे प्रत्यक्षात स्वतःच्या मालकीचे एकही वाहन नसल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. सोमवारी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला असून या वेळी त्यांनी २८ पानांचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. डॉ. सुजय विखे हे कोट्यधीश असले तरी त्यांच्याकडे स्वतःच्या नावावर एकही गाडी नाही. उमेदवारी अर्ज भरताना … Read more

सुजय विखे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी नगरमध्ये सभा घेणार !

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये सभा घेणार आहेत. ही सभा सावेडीतील संत निरंकारी भवनाशेजारच्या मैदानावर होणार आहे. या मैदानाची पोलिस प्रशासनाने पुन्हा पाहणी केली. मोदी यांच्या सभेसाठी झेड प्लस सिक्युरिटी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हे मैदान योग्य असल्याने तेथे सभा घेण्याचे नियोजन … Read more

डॉ.सुजय विखे आहेत ‘इतक्या’ कोटीचे मालक !

अहमदनगर :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून डॉ. सुजय राधाकृष्ण विखे यांनी आज मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांच्या अर्ज दाखल केला. ते 11 कोटी 17 लाखांचे मालक आहेत.  तर त्यांच्या पत्नी धनश्री या 5 कोटी 7 लाखांच्या मालकीण आहेत. विशेष म्हणजे सुजय यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. मात्र त्यांच्या पत्नी धनश्री विखेंकडे प्रवरा बँकेचे 26 लाख … Read more