लग्नासाठी नकार दिल्याने अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या.

अकोले : तालुक्यातील मान्हेरेत लग्नासाठी नकार दिल्याने अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. अकोले तालुक्यातील मान्हेरे गावातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले व त्यानंतर लग्नास ऐन वेळी नकार दिला. त्यानंतर सदर अल्पवयीन मुलीने विहिरीत गुरुवारी दि.२८ मार्च रोजी उडी मारून आत्महत्या करून स्वताचे जीवन संपविले. याप्रकरणी … Read more

खासदार होवू पहाणाऱ्या सुजय विखेंची उमेदवारी अर्ज भरताना फजिती !

अहमदनगर : भाजपचे दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज भरताना चांगलीच फजिती झाल्याचा प्रकार घडला. पहिल्यांदा अर्ज दाखल करताना ऐनवेळी अर्ज पाठीमागेच राहिल्याने सुजय विखे संतापल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपचे उमेदवार सुजय विखे अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी बारा वाजेच्या दरम्यान आले होते. भाजप चे तीन मंत्री, तीन … Read more

उमेदवारी अर्ज भरताना सुजय विखे पाटील भावूक…

अहमदनगर :- डॉ. सुजय विखे पाटील आज मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना विखे भावूक झाले. तुम्हाला कोणाची आठवण येते असे विचारताच आईवडिलांच्या आठवणीने ते भावूक झाले. अर्ज दाखल करताना आजोबा आणि आईवडिलांची आठवण येते, मात्र माझ्यासोबत असलेले हेच माझे आईवडील आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जोरदार शक्तिप्रदर्शन करत सुजय विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल !

अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत सोमवारी उमेवारी अर्ज दाखल केला. दिल्लीगेट पासून पायी रॅली काढून सुजय विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. डाॅ.सुजय विखे पाटील यांनी शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेतले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, … Read more

अहमदनगर भाजपा कार्यालयाला जागा मिळेना !

अहमदनगर :- सत्तेवर असलेल्या भाजपच्या जिल्हा ग्रामीण कार्यालयासाठी गेल्या पाच वर्षांपासून जागेचा शोध सुरू आहे. काही जागा पाहून झाल्या, मात्र पक्षाकडे आर्थिक बजेट नसल्याने हे व्यवहार फिसटकले. त्यामुळे पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर कुणी पक्ष कार्यालयासाठी जागा देता का जागा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. नगरमध्ये गांधी मैदान येथे पक्षाचे कार्यालय आहे. या पक्षाची कार्यालयाची चावी विद्यमान … Read more

पाचपुते यांच्या सभेला गर्दी होत नाही, म्हणून दुसऱ्याच्या लग्नात ते आपला साखरपुडा करून घेतात !

श्रीगोंदे :- माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या सभेला गर्दी होत नाही, म्हणून दुसऱ्याच्या लग्नात ते आपला साखरपुडा करून घेतात. मागील ३५ वर्षांत पाचपुते यांनी व साडेचार वर्षांत मी काय केले, हे पाहण्यासाठी संत शेख महमंद महाराज पटांगणात समोरासमोर या. चुकीची कामे सांगितली, तर विधानसभेला मी अर्ज भरणार नाही, असे आमदार राहुल जगताप यांनी रविवारी पिंपळगाव … Read more

शिवाजी कर्डिलेंचे कार्यकर्ते संग्राम जगतापांच्या प्रचारात !

अहमदनगर :- भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे नगर तालुक्यातील कार्यकर्ते भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या विरोधातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचे काम करीत आहेत. असा दावा नगर तालुका शिवसेनेने रविवारी केला. लोकसभा निवडणुकीवरून राहुरीचे आमदार कर्डिले यांचे नगर तालुका भाजपतील समर्थक व तालुका शिवसेनेत सध्या जुंपली आहे. भाजपचे उमेदवार डॉ. विखे यांच्या प्रचारार्थ भाजप … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना स्वाइन फ्लूची लागण.

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड स्वाइन फ्लूने आजारी आहेत. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपासून उपचार सुरू आहेत. उपचार घेत असतानाही त्यांनी एका व्हिडिओ क्लिपद्वारे आपण कदापि राष्ट्रवादीचा त्याग करून भाजपात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. बरे झाल्यावर प्रचारात सहभागी होणार असून जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पिचड यांनी केले आहे. … Read more

विखे पाटील परिवाराची जनसेवा फक्त सांगण्यापुरती…

अहमदनगर :- डोनेशन दिल्यावर विळद घाटात ॲडमिशन मिळते. पेशंट घेऊन त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर दारातच १० रुपयांची पार्किंगचे पावती फाडावी लागते. जे पार्किंगचे १० रुपये सोडत नाहीत ते काय मोफत उपचार करतील. फक्त सांगायला जनसेवा आहे. जनसेवेचे नाटक करून सर्वसामान्य जनतेची लूट करून विरोधी उमेदवार मोठे झाले आहेत. या लुटीतूनच त्यांनी हेलिकॉप्टर घेऊन आमच्या छातीवर … Read more

अरूणकाकांनी सभागृहात कधी तोंड देखील उघडले नाही !

श्रीगोंदा :- शरद पवार हे फक्त हुल देतात. मी त्यांच्या पक्षासाठी एवढा त्याग करूनही त्यांनी मला व माझ्या कुटुबीयांना खूप त्रास दिला आहे. असल्याची टीका माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी केली. काष्टी येथे युतीच्या प्रचारमेळाव्यात ते बोलत होते. नगर दक्षिणमध्ये जगताप नावाचे तीन आमदार आहेत. मात्र, अरूणकाकांनी सभागृहात कधी तोंड देखील उघडले नाही. तर, इतर दोघांनी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आघाडीच्या दोन्ही जागा अडचणीत !

शिर्डी : काँग्रेसचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे अडचणीत सापडले आहेत. कांबळेंचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या श्रीरामपूर येथील विखे समर्थक कार्यकर्त्यांनी कांबळेंना मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. दक्षिण लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये झालेल्या बिघाडीनंतर शिर्डीतही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेस नेते राधाकृष्ण पाटील यांचे चिरंजीव आणि नगर दक्षिणचे भाजप उमेदवार सुजय … Read more

संग्राम जगताप यांनी आमदार झाल्यावर काय केले, याचा हिशोब द्यावा !

अहमदनगर :- ‘मी स्वकर्तृत्वावर निवडणुकीत उतरलो आहे. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा असताना नगरच्या जागा यांनी प्रतिष्ठेची केली. मात्र, पवार यांना विखे कुटुबांबद्दल असलेला द्वेषामुळे काँग्रेसला ही जागा सोडण्यात आली नाही. माझ्या पराभवासाठी शरद पवार, बाळासाहेब थोरात हे नगरमध्ये येऊन थांबले होते. माझे आव्हान आहे, की आणखी कोणी असतील तर त्यांनाही आणा. जनता त्यांना मतपेटीतून निकाल … Read more

शरद पवारांचा मटका आता लागणार नाही, हे निश्चित !

अहमदनगर :- भाजप सरकार शेतकऱ्यांचे असून सत्तेचा वापर जनतेसाठी करण्यात येतो. कुकडीचे आवर्तन हे पोलिसांच्या संरक्षणात सोडण्यात येणार आहे. दक्षिण नगरमध्ये सुजय विखे यांची सुनामी लाट आली आहे.’ या वेळी पार्थ पवार यांच्या भाषणाची नक्कल करून राम शिंदे म्हणाले की, ‘जर साधे भाषण करणेही जमत नसेल तर ते आधी शिकून घ्यावे, जमत नसेलतर त्यात पडू … Read more

पुत्र हट्टापुढे खासदार दिलीप गांधी हतबल…

अहमदनगर :- पुत्राच्या हट्टासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे भाजपसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटी घेत असताना दुसरीकडे पुत्रहट्टापुढे आता भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हतबल झाले आहेत. खासदार गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज नेल्याने राजकीय समिकरणे पुन्हा बदलली आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये … Read more

ब्रेकिंग : अहमदनगरमध्ये 84 लाख रुपयांची रोकड सापडली !

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सावेडी उपनगर परिसरात वैदुवाडी येथे तब्बल 84 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. अहमदनगर पोलिसांकडून याबाबत तपासणी सुरू असून चौकशीसाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.

भाजपचा नगर जिल्ह्यतील विजयश्री खेचून आणणारा योद्धा-प्रसाद ढोकरीकर

कर्जत तालुका पहिल्यापासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. परंतु आपल्या रणनीतीने स्थानिक राजकारणातील गटबाजी आणि नेत्यांच्या सोयीच्या राजकारणात तो कधी भाजपाकडे गेला हे लक्षातच आलं नाही. अर्थातच, या कर्जत तालुक्यातील पंचवीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतील तयार झालेलं एक समीकरण कुणी विसरू शकत नाही. ते समीकरण आहे, आपल्या 27 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतील एका भाजप सरचिटणीसाची आणि त्यांच्या उपस्थितीत भाजपाला … Read more

पुन्हा CRPF च्या बसला स्फोटकांची कार धडकली !

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगर-जम्मू महामार्गावर पुलवामासारखा हल्ला होता होता राहिला. स्फोटकाने भरलेल्या एका कारने सीआरपीएफच्या बसला मागून धडक दिली. मात्र सुदैवाने ही बस पुढे निघून गेली आणि त्या कारमध्येच हा स्फोट झाल्याने मोठी जीवितहानी टळली. या स्फोटात कारचा चक्काचूर झाला आहे.  धक्कादायक बाब म्हणजे सीआरपीएफच्या 6-7 बसचा ताफा निघाला होता. त्यामध्ये जवळपास 40 जवान … Read more

…म्हणून संग्राम जगताप यांचा फॉर्म भरायला जाणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आघाडी धर्म पाळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार संग्राम जगताप यांचा उमेदवारी फॉर्म भरायला जाणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. बंडाचा झेंडा फडकवत मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर नवा पेच उभा राहिला आहे.  भाजपचे नगर … Read more