अहमदनगर जिल्ह्यातील आघाडीच्या दोन्ही जागा अडचणीत !

शिर्डी : काँग्रेसचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे अडचणीत सापडले आहेत. कांबळेंचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या श्रीरामपूर येथील विखे समर्थक कार्यकर्त्यांनी कांबळेंना मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. दक्षिण लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये झालेल्या बिघाडीनंतर शिर्डीतही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेस नेते राधाकृष्ण पाटील यांचे चिरंजीव आणि नगर दक्षिणचे भाजप उमेदवार सुजय … Read more

संग्राम जगताप यांनी आमदार झाल्यावर काय केले, याचा हिशोब द्यावा !

अहमदनगर :- ‘मी स्वकर्तृत्वावर निवडणुकीत उतरलो आहे. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा असताना नगरच्या जागा यांनी प्रतिष्ठेची केली. मात्र, पवार यांना विखे कुटुबांबद्दल असलेला द्वेषामुळे काँग्रेसला ही जागा सोडण्यात आली नाही. माझ्या पराभवासाठी शरद पवार, बाळासाहेब थोरात हे नगरमध्ये येऊन थांबले होते. माझे आव्हान आहे, की आणखी कोणी असतील तर त्यांनाही आणा. जनता त्यांना मतपेटीतून निकाल … Read more

शरद पवारांचा मटका आता लागणार नाही, हे निश्चित !

अहमदनगर :- भाजप सरकार शेतकऱ्यांचे असून सत्तेचा वापर जनतेसाठी करण्यात येतो. कुकडीचे आवर्तन हे पोलिसांच्या संरक्षणात सोडण्यात येणार आहे. दक्षिण नगरमध्ये सुजय विखे यांची सुनामी लाट आली आहे.’ या वेळी पार्थ पवार यांच्या भाषणाची नक्कल करून राम शिंदे म्हणाले की, ‘जर साधे भाषण करणेही जमत नसेल तर ते आधी शिकून घ्यावे, जमत नसेलतर त्यात पडू … Read more

पुत्र हट्टापुढे खासदार दिलीप गांधी हतबल…

अहमदनगर :- पुत्राच्या हट्टासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे भाजपसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटी घेत असताना दुसरीकडे पुत्रहट्टापुढे आता भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हतबल झाले आहेत. खासदार गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज नेल्याने राजकीय समिकरणे पुन्हा बदलली आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये … Read more

ब्रेकिंग : अहमदनगरमध्ये 84 लाख रुपयांची रोकड सापडली !

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सावेडी उपनगर परिसरात वैदुवाडी येथे तब्बल 84 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. अहमदनगर पोलिसांकडून याबाबत तपासणी सुरू असून चौकशीसाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.

भाजपचा नगर जिल्ह्यतील विजयश्री खेचून आणणारा योद्धा-प्रसाद ढोकरीकर

कर्जत तालुका पहिल्यापासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. परंतु आपल्या रणनीतीने स्थानिक राजकारणातील गटबाजी आणि नेत्यांच्या सोयीच्या राजकारणात तो कधी भाजपाकडे गेला हे लक्षातच आलं नाही. अर्थातच, या कर्जत तालुक्यातील पंचवीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतील तयार झालेलं एक समीकरण कुणी विसरू शकत नाही. ते समीकरण आहे, आपल्या 27 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतील एका भाजप सरचिटणीसाची आणि त्यांच्या उपस्थितीत भाजपाला … Read more

पुन्हा CRPF च्या बसला स्फोटकांची कार धडकली !

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगर-जम्मू महामार्गावर पुलवामासारखा हल्ला होता होता राहिला. स्फोटकाने भरलेल्या एका कारने सीआरपीएफच्या बसला मागून धडक दिली. मात्र सुदैवाने ही बस पुढे निघून गेली आणि त्या कारमध्येच हा स्फोट झाल्याने मोठी जीवितहानी टळली. या स्फोटात कारचा चक्काचूर झाला आहे.  धक्कादायक बाब म्हणजे सीआरपीएफच्या 6-7 बसचा ताफा निघाला होता. त्यामध्ये जवळपास 40 जवान … Read more

…म्हणून संग्राम जगताप यांचा फॉर्म भरायला जाणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आघाडी धर्म पाळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार संग्राम जगताप यांचा उमेदवारी फॉर्म भरायला जाणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. बंडाचा झेंडा फडकवत मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर नवा पेच उभा राहिला आहे.  भाजपचे नगर … Read more

मोदी, पवार, फडणवीस यांच्या होणार सभा

नगर : मतदारसंघात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या स्टार नेत्यांच्या सभा होणार अाहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे नियोजन असून सावेडीतील संत निरंकारी भवनाशेजारील मोकळ्या जागेत ही सभा होण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासाने पंधरा दिवसांपूर्वीच या मैदानाची पाहणी केली आहे. ही जागा उपलब्ध झाली नाही, तर वाणीनगर येथील मैदानावर सभा घेण्यात येईल.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह … Read more

मी पक्षांतर केले म्हणजे काय गुन्हा केला होता ? – वाकचौरे

अकोले : मी पक्षांतर केले म्हणजे काय गुन्हा केला होता का? आताही कोण कोणत्या पक्षात फिरतात हे आपण पाहतोय. या वेळी लोकांच्या भावना लक्षात घेऊन मी साईबाबांना सांगून अपक्ष लढण्याची शपथ घेतली आहे. असे असले तरीही मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे व भाजपबरोबरच राहणार आहे. मागच्या निवडणुकीत मी काँग्रेसचा उमेदवार असताना … Read more

…..पण टोपीची औकात काय ? – राठोड

नगर :आमदार शिवाजी कर्डिले जे बोलतील ते कधीच करत नाहीत. डॉ. सुजय विखे कोणाला बरोबर घेऊन फिरत आहेत, त्यांना ठावूक नाही.  कर्डिले हे विखे यांचे कधी सर्जिकल स्ट्राईक करतील समजणार देखील नाही. टोपीची महती काय आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यांचा आजवरचा इतिहास पाहिल्यास लक्षात येईल, असे टीकास्त्र नगर तालुक्यातील महाआघाडीचे माजी आमदार अनिल राठोड, … Read more

अहमदनगरमध्ये संग्राम जगतापांना धक्का !

अहमदनगर :- भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर नगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असलेल्या सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देण्याची घोषणा नगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब हराळ यांनी जाहीर केली. नगर जिल्हा काँग्रेसने जाहीर केलेल्या धक्कादायक भूमिकेमुळे बाळासाहेब थोरात गटाला जबरदस्त धक्का … Read more

उन्हाळ्यातही कूल रहायचे असेल हे नक्की वाचा !

उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या उन्हापासून वाचण्यासाठी शरीराला आंतर्बाहय़ थंड ठेवणं आवश्यक आहे. यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? उच्च तापमान आणि हवेत असलेली आद्र्रता यामुळे हा उन्हाळा अधिकच तापदायक होऊ लागला आहे. शरीराच्या आंतर्बाहय़ उष्णतेमुळे लोकांना डोकेदुखी, थकवा येणे, चक्कर येणे अशा उष्णतेच्या विकारांचा सामना करावा लागतोय. थोडासा आराम, शरीराला थंड वातावरणात ठेवणे … Read more

प्रेमी युगुल नको त्या स्थितीत सापडलं,बेदम मारहाण करुन लग्न लावलं!

बिहार : आक्षेपार्ह स्थितीत असलेल्या प्रेमी युगुलांना पकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर त्यांचं जबरदस्तीने लग्नही लावण्यात आलं. बिहारमधील झाझा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. बिहारमधील बोडवा गावातील ही घटना असून याबाबतचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या घटनेला कित्येक दिवस उलटल्यानंतरही पोलिस प्रशासन मात्र दोषींवर कोणतीही कारवाई करताना दिसत … Read more

दिलीप गांधी सुजय विखेंचा प्रचार करणार ?

अहमदनगर : भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. नगर दक्षिणमधून भाजपकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने, विद्यमान भाजप खासदार दिलीप गांधी नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी काल काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील गेले होते. त्यानंतर आज स्वत: सुजय विखे पाटील यांनी … Read more

माजीमंत्री पाचपुतेंकडून सुजय विखेंसाठी शाकाहारी व मांसाहारी जेवणावळीचे नियोजन !

श्रीगोंदे :- माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या विजया साठी शुक्रवारी (२९ मार्च) कार्यकर्ता मेळावा व जेवणावळीचा कार्यक्रम काष्टीमध्ये आयोजित केला आहे. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा प्रचार करण्याऐवजी भाजपच्या गोटात दिसत आहेत. डॉ. विखे हे लोकसभेची ३ वर्षांपासून तयारी करत असल्यामुळे त्यांचा श्रीगोंद्यामध्ये मोठा जनसंपर्क … Read more

माझी भविष्यवाणी कधीच खोटी ठरत नाही – आ.शिवाजी कर्डिले.

अहमदनगर :- माझ्यावर राजकीय द्वेषातून काही लोक आरोप करत आहेत. काही आमदारकीचे स्वप्नच पहात आहेत, तर काही लोक आपण आमदारकीला पडलो आहोत हे मान्य करायला तयारच नाहीत. अशा सर्व लोकांना मी वेळोवेळी त्यांची जागा दाखवून दिली आहे, असा टोला प्रा. गाडे, माजी आमदार राठोड, तनपुरे यांचे नाव न घेता आमदार शिवाजी कर्डिले यांनी लगावला. नगर … Read more

लोकसभा निवडणूक वाद : माजी नगरसेवक आणि शिक्षक नेत्यामध्ये तुंबळ मारामारी.

पाथर्डी :- लोकसभा निवडणुकीत कोण निवडून येणार, या मुद्यावरून बुधवारी रात्री माजी नगरसेवक व प्राथमिक शिक्षक संघटनेच्या नेत्यामध्ये तुंबळ मारामारी झाली. ही घटना शेवगाव रस्त्यावरील एका हॉटेलसमोर घडली. हा वाद उशिरा पोलिस ठाण्याच्या दारापर्यंत गेला. मात्र, कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही. याबाबत माहिती अशी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीत स्थान असलेले एक माजी नगरसेवक रात्री … Read more