संग्रामच्या डोक्यात कधी हवा जाणार नाही – खा.शरद पवार.

नगर: “नगरचा उमेदवार कसा असावा, हे ठरवतांना मी विचार केला की, उमेदवार नम्र असावा, आलेल्यांशी माणुसकीने वागणारा, मिळालेल्या पदाची व अधिकाराची हवा डोक्‍यात गेलेली नसावी. यासर्वांचा विचार करुन तरुण कार्यकर्त्यास नगर दक्षिणची उमेदवारी दिली.  संग्रामच्या डोक्यात कधी हवा जाणार नाही. नगर मतदारसंघात माणसाला माणुसकीने वागविणारा संयमी उमेदवार हवा होता, म्हणून त्याला उमेदवारी दिली आहे,’ अशा … Read more

खा.सदाशिव लोखंडे यांच्याबद्दलची नाराजी दूर होईना…

नेवासा :- लोकसभेच्या मागील निवडणुकीनंतर खासदार सदाशिव लोखंडे यांनी नेवासे तालुक्याकडे विशेष लक्ष दिले नाही. तालुक्यात त्यांचे संपर्क कार्यालय शेवटपर्यंत झाले नाही. त्यामुळे नागरिक त्यांच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. ही नाराजी लोखंडे यांनी अजून दूर केलेली नाही. लोखंडे चार-साडेचार वर्षे तालुक्यात फारसे दिसले नाहीत. खासदार निधीतून तालुक्यात विशेष भरीव कामे केली नसल्याने नाराजी आहे. … Read more

लग्नात आहेर नको, पण सुजय विखेला मत द्या !

पारनरे :- तालुक्यातील निघोजच्या फिरोज शेख या तरुणाने त्याच्या लग्न पत्रिकेतून सुजय विखेंसाठी मतं मागितली आहेत. येत्या 31 मार्च रोजी फिरोज आणि मोसिना या उच्चशिक्षीत जोडप्याचं लग्न होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे अहमदनगरचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासाठी एक तरुणाने त्याच्या लग्नपत्रिकेतून मतं देण्याची मागणी केली आहे. लग्नात आहेर नको, पण सुजयला मत द्या, असं … Read more

भाजपच्या जिल्हापरिषद सदस्याला अटक.

कर्जत :- जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल घोडके यांना मंगळवारी स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाने स्पेशल सेल वॉरंटप्रकरणी अटक केली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, राशिन येथील जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल घोडके यांची जगंदबा कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स प्रमोटर्स या नावाने पुणे येथे बांधकाम क्षेत्रात काम करणारी संस्था होती.  २०१२ साली या संस्थेच्या माध्यमातून पुणे येथील मांगलेवाडी परिसरात घोडके … Read more

शरद पवारांच्या दौर्यानंतर अनिल राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला !

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरमध्ये बैठका घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना-भाजप कामाला लागली आहे. राष्ट्रवादीने नगरमध्ये केलेली फोडाफोडी आणि जिल्ह्यातील राजकारणावर चर्चा करण्यासाठी अनिल राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तातडीने रवाना झाले. भाजपचे नगरचे उमेदवार सुजय विखे यांना निवडून आणण्यासाठी रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादीचे नगरचे उमेदवार … Read more

आ.संग्राम जगतापांची बदनामी

अहमदनगर :- सोशल मीडियावरील फेसबुक अकाऊंट होल्डर सुजयपर्व, विनायक सोबले आणि डॉ. सुजय दादा विखे पाटील फँन्स यांनी विद्यमान आमदार संग्राम जगताप यांची बदनामी करणारा, चारित्रहनन करणारा मजकूर टाकला असून त्याबाबत निवडणूक आयोगाकडे सीव्हीजल ॲपद्वारे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केल्याची माहितीॲड. प्रसन्ना जोशी, नीलेश बांगरे यांनी दिली. चारित्रहनन करणारा मजकूर टाकला असून त्याबाबत निवडणूक आयोगाकडे … Read more

लग्नसोहळ्यातही ‘पब्जी’चीच धूम !

अहमदनगर :- ऑनलाईन गेम पब्जीचे वाढते प्रमाण सर्वश्रुत आहे. या गेमची क्रेझ कोणत्याही वयोगटापर्यंत मर्यादित राहिलेली नाही, तर सर्वच वयोगटांपर्यंत या गेमचे चाहते झाले आहेत. मात्र या गेमचे व्यसन सर्वाधिक तरुणाईत दिसून येत आहेत. हे व्यसन आजवर अनेकांच्या जीवावर देखील उठलेले आहे. तर कधी स्वत:च्या आरोग्यासह नातेवाईक, आजूबाजूची मंडळी यांच्यासाठी त्रासदायक ठरत असल्याचे दिसून येत … Read more

अपघातात पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू.

अहमदनगर :- रस्त्याने पुढे चालेल्या मोटारसायकलला पाठीमागून वेगात आलेल्या मोटारसायकलस्वाराने जोराची धडक दिली. या अपघातात पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर महिला जखमी झाली आहे. ही घटना रविवारी (दि. २४ रोजी) नगर मनमाड रस्त्यावरील नाईक हॉस्पिटलजवळ घडली. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, सचिन भाऊसाहेब कडूस (रा.सारोळा कासार) … Read more

सुजय विखेंविरोधात खा. शरद पवारांकडून नेत्यांसह कार्यकर्त्यांना कानमंत्र !

अहमदनगर :- राजकीय आखाड्यातील पट्टीचे वस्ताद असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदराव पवार यांनी काल सोमवार रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार तास सलग प्रदीर्घ बैठक घेतली. विधानसभा मतदारसंघनिहाय घेतलेल्या बैठकीत थेट तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांशी शरद पवारांनी हितगुज केले. जिल्हा परिषद, पंचायत समितीतील स्थिती, एकूण मतदान, सध्याचे वातावरण अशा गुजगोष्टी करत लोकसभा निवडणुकीचा संग्राम जिंकण्यासाठी आघाडीचा धर्म … Read more

आ. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ‘स्टार’ प्रचारक !

संगमनेर :- आगामी लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली. देशात व महाराष्ट्रात सध्या लोकसभेची धाम धूम सुरु असून काँग्रेस पक्षाच्या वतीने देशातील व महाराष्ट्रातील दिग्गज नेते प्रचारात सहभागी होणार आहेत. यामध्ये  सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष खा.राहूल गांधी, सरचिटणीस पियंका गांधी, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक … Read more

निष्ठावंत भाजप कार्यकर्ते डॉ. सुजय विखेंच्या प्रचारापासून दूर.

अहमदनगर :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत.  डॉ. सुजय यांना भाजपकडून दक्षिणेची उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून ही उमेदवारी देण्यात आली.  या पार्श्वभूमीवर गांधी यांनी मेळावा घेतला. या मेळाव्यात गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करत अपक्ष … Read more

…तर आ.जगताप आणि आ.कांबळे यांना द्यावा लागणार आमदारकीचा राजीनामा !

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीसाठी नगर शहराचे आ. संग्राम जगताप व व श्रीरामपुरचे आ. भाऊसाहेब कांबळे हे दोन विद्यमान आमदार निवडणूक लढवीत आहेत. लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाल्यास त्यांना निकालानंतर पंधरा दिवसात ‘खासदार’ किंवा ‘आमदार’ यापैकी एका पदाचा राजीनामा द्यावा लागेल.  नगर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर शहराचे विद्यमान … Read more

सुजय विखेंना हरवण्यासाठी शरद पवार मैदानात !

अहमदनगर :-  सुजय विखे यांच्या विरोधात राजकीय व्यूहरचना ठरवण्यासाठी खुद्द शरद पवार सोमवारी दुपारी नगर शहरात दाखल झाले.  जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला.विशेष म्हणजे नगरला मुक्काम ठोकत पवार यांची रात्री उशिरापर्यंत राजकीय खलबते सुरू होती.  नगरची जागा काँग्रेसला न सोडण्याच्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहिलेल्या शरद पवार यांनी नगरच्या निवडणुकीत स्वत: … Read more

माजीमंत्री पाचपुतेंचे कुकडीच्या आवर्तनासाठी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांना साकडे.

श्रीगोंदा :- सध्या दुष्कळाची धग वाढत आहे. या परिस्थितीत शेतकरी टिकला पाहिजे, यासाठी कुकडी आवर्तन अत्यंत महत्वाचा घटक ठरू शकतो. मात्र फळबागा जळण्यापूर्वीच पाणी सुटले पाहिजे. कुकडीचे आवर्तन लवकर न सुटल्यास अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होईल. या सर्व गोष्टींचा विचार करता दि.१ एप्रिल पासून कुकडीचे आवर्तन सोडावे. अशी आग्रही मागणी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी … Read more

काँग्रेस पक्ष सोडून गेले ते संपले आहेत हा इतिहास आहे !

अहमदनगर :- जे काँग्रेस पक्ष सोडून गेले ते संपले आहेत हा इतिहास आहे, असे म्हणत जे उडाले ते कावळे, असा अप्रत्यक्ष टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी विखे यांना लगावला. जे सोडून गेले त्यांच्यामुळे नवीन लोकांचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तुषार गार्डन येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी … Read more

श्रीगोंद्यात भीषण अपघातात दोघे ठार

श्रीगोदें :- तालुक्यातील औटेवाडीजवळ रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चारी नं. १२ येथे स्विफ्ट व हायवाची समोरासमोर टक्कर होऊन दोन जण जागीच ठार झाले. अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची स्थिती चिंताजनक आहे. श्रीगोंदे-कर्जत रस्त्यावर असलेल्या लहानशा पुलावर ही दुर्घटना झाली. श्रीगोंद्याहून स्विफ्ट (एमएच १२ जीएफ … Read more

सुवेंद्र गांधी लोकसभा निवडणूक लढविणार !

अहमदनगर :- नगर दक्षिणचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना लोकसभेचे तिकीट नाकारल्याने त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. नगर दक्षिण लोकसभा जागेसाठी डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार दिलीप गांधी समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान आज खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत नगर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आजवर पक्षाशी … Read more

जावयाची सासुरवाडीला जाऊन आत्महत्या.

अकोले :- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुतोडी येथील राजेंद्र देवराम आहेर (वय २७) या तरुणाने गुरुवार दिनांक २१ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विषारी औषध सेवन केले. राजूर येथे त्याच्या सासुरवाडीला तो पत्नीला आणायला गेला होता. त्यास नाशिक येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथे त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की राजेंद्र आहेर … Read more