…म्हणून झाला आमचा पराभव : माजीमंत्री बबनराव पाचपुते.

श्रीगोंदे :- नगरपालिका निवडणुकीत झालेला भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांचा पराभव आम्ही स्वीकारला. विरोधकांनी प्रभाग सात व नऊमध्ये अमाप पैसा वापरल्याने आमच्या उमेदवाराचा पराभव झाला. पालिकेत भाजपचे ११ नगरसेवक निवडून आले असल्याने मनमानी कारभार होऊ देणार नाही. गावाच्या विकासासाठी व चांगल्या कामाला सहकार्यच करू, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. … Read more

श्रीगोंदा तालुक्यात ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार.

श्रीगोंदे :- तालुक्यातील अजनुज गावात अकरा वर्षांच्या शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी राहुल दत्तू रोकडे याच्यावर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दुपारी एकच्या सुमारास ही मुलगी जेवणाच्या सुटीत घरी आली होती. जेवण करून पुन्हा शाळेत जात असताना जुन्या इंग्लिश शाळेजवळ रोकडे ऊर्फ बोंबल्या (२२) याने तिला अडवले. बळजबरीने मोटारसायकलीवरून शाळेच्या आवारात … Read more

‘या’ गावाने घेतला खा. गांधी यांना गावात पाय ठेऊ न देण्याचा निर्णय !

राहुरी :- तालुक्यातील देसवंडी येथील ग्रामसभेत खा. दिलीप गांधी यांनी 15 वर्ष गावाकडे केलेल्या दुर्लक्षित भूमिकेमुळे संताप व्यक्त करण्यात आला. ग्रामस्थांनी खा. गांधी यांना गावात पाय ठेऊ न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. देसवंडी गावामध्ये सरपंच दीपक खेवरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसेवक व्ही. आर. जगताप यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करीत प्रास्ताविक … Read more

भीषण अपघातात नगर जिल्ह्यातील चार तरुण ठार.

अहमदनगर :- नाशिक महामार्गावर शुक्रवारी ( दि . २५ ) रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील पांगरी शिवारात बाबा ढाब्यासमोरील वळणावर एसटी बस व मारूती आय २० कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील चारही युवक जागीच ठार झाले. अपघतानंतर बसने पेट घेतल्याने तीच्यातील १० ते १२ प्रवासी जखमी झाल्याचे समजते. शिर्डी – … Read more

सरपंचासह ग्रामसेवकाविरूद्ध अपहाराचा गुन्हा.

संगमनेर :- तालुक्याच्या पठार भागावरील सावरगाव घुले येथील सरपंच तान्हाजी मारुती घुले व ग्रामसेवक सुनील शंकर शेळके या दोघांनी संगनमताने शासकीय योजनांचे बनावट बिले, तसेच मजुरांचे खोटे अंगठे घेवून शासकीय रकमेचा अपहार केल्याची घटना सन २०१५ ते २०१७ या कालावधीमध्ये घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, … Read more

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नगरमध्ये गारठा.

अहमदनगर :- गेल्या तीन दिवसांपासून नगरमध्ये किमान तापमान ८ ते ९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले जात आहे, तर कमाल तापमान २८ ते ३० च्या दरम्यान आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून नगरमध्ये गारठा चांगलाच जाणवत आहे. हवामान ढगाळ असल्याने सूर्यप्रकाशही कमी पडत असल्याने दिवसभर थंडी जाणवत आहे. आणखी एक-दोन दिवस थंडी राहण्याचा अंदाज … Read more

पंधरा वर्षांपासून तुम्ही तुमचा खासदार पाहिला आहे का?

अहमदनगर :- गेल्या पंधरा वर्षांपासून तुम्ही तुमचा खासदार पाहिला आहे का? त्यामुळे तुम्ही पक्षाकडे पहाण्यापेक्षा व्यक्तीकडे पहा, परिस्थिती बदलायची असेल तर माणूस बदला. दोन वर्षांपासून मी मतदार संघात फिरत आहे. त्यामुळे कोणत्याच पक्षाने तिकीट दिले नाही, तरी मी अपक्ष म्हणून मी लोकसभा लढविणारच आहे,’ असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी खर्डा येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले. … Read more

संगमनेरमध्ये अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार.

संगमनेर :- तालुक्यातील मांडवे खुर्द शिवारात मुळा नदीवरील मांडवे पुलावर ट्रक आणि मोटार सायकल यांच्यात धडक झाली. या अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे.  भरधाव जाणाऱ्या रिकाम्या मालट्रकची धडक बसून दुचाकीस्वाराचा जागीच चिरडून मृत्यू झाला. दुचाकीवरील त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी अपघातस्थळी मालट्रक पेटवून दिला. … Read more

दुष्काळी परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठिशी- पालकमंत्री प्रा. शिंदे

अहमदनगर :- दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी जिल्ह्यास 684 कोटी 26 लाख रुपयांचा निधी जाहीर झाला असून त्यापैकी 140 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी भागात चारा छावण्या सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन राज्याचे मृद … Read more

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू.

अहमदनगर :- निंबळककडून सनफार्मा चौकाकडे येणाऱ्या मोटारसायकलला समोरुन वेगात येणाऱ्या टेम्पोने जोरात धडक दिली. या धडकेत मोटारसायकलस्वार राजेंद्र लक्ष्मण निकम (वय ३५, रा.विळद) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मनमाड रोडवरील दादा पाटील पेट्रोल पंपासमोर, सनफार्मा चौक, निंबळक रोड येथे मंगळवारी दि.२२ सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, राजेंद्र लक्ष्मण निकम … Read more

महिलेच्या विनयभंगप्रकरणी एका जणावर गुन्हा दाखल

संगमनेर :- तालुक्याच्या पठार भागावरील हनुमानवाडी, सारोळे पठार येथे एका २९ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग झाल्याची घटना मंगळवार दि. २२ जानेवारी रोजी सकाळी घडली. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही विवाहित महिला आपल्या कुटुंबासोबत हनुमानवाडी, सारोळे पठार याठिकाणी राहते. गावातीलच हसन बनेमियाँ मोमीन याने मंगळवारी सकाळी घरी येऊन या महिलेचा हात धरुन लज्जा … Read more

डायल 100 कार्यप्रणालीचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे हस्‍ते उदघाटन

अहमदनगर :- जनतेला तात्‍काळ पोलिस सेवा देण्‍यासाठी नियंत्रण कक्ष डिजिटल करुन डायल 100 ही सेवा अत्‍याधुनिक पध्‍दतीने कार्यान्वित करण्‍यात आली आहे. या यंत्रणेला मोबाईल App जोडण्‍यात आले असून या सेवेचे उदघाटन आज जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. जिल्‍हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला खासदार दिलीप गांधी, जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्‍हा पोलिस अधीक्षक … Read more

जिल्‍हा रुग्‍णालयासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्‍ध करुन देणार

अहमदनगर :- जिल्‍हयातील सर्वसामान्‍य रुग्‍णांना आरोग्‍य सेवा देण्‍याचे कार्य जिल्‍हा रुग्‍णालयाच्‍या माध्‍यमातून होत आहे. जिल्‍हयात सामान्‍य रुग्‍णालयासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्‍ध करुन देणार असल्‍याचे जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी आज सांगितले. जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात जिल्‍हा नियोजन अंतर्गत सिटीस्‍कॅन, सीएसआर अंतर्गत डि‍जिटल एक्‍सरे व व्‍हॅन्‍टीलेटर मशिनचा लोकापर्ण सोहळा पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्‍या उपस्थित झाला. यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या … Read more

चाकूहल्ला करून सव्वादोन लाख रुपये लंपास.

जामखेड :- तालुक्यातील राजुरी येथील ओम साई संगमनेश्वर पेट्रोल पंपावर दोघांना चाकूने मारहाण करून सव्वादोन लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की जामखेड-खर्डा रस्त्यावर दहा कि.मी अंतरावर राजुरी या ठिकाणी ओम साई संगमनेश्वर … Read more

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या.

संगमनेर :- कर्जबाजारीपणाला कंटाळून संगमनेरच्या कनोली येथील शेतकऱ्याने राहात्या घरात विष पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दत्तात्रेय नानासाहेब वर्पे (३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने राहत्या घरात विष पिउन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी पत्नी शेतात पाणी भरण्यासाठी गेली असता घरात कोणी नसल्याचे बघून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. घरी आलेल्या पत्नीला औषधाचा वास … Read more

निलेश लंके राष्ट्रवादीत, आता सुजित झावरे पाटलांचे काय होणार ?

पारनेर :- शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले निलेश लंके कोणत्या पक्षात जाणार याबाबत ब-याच दिवस चर्चेला उधाण आले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने डाव टाकून लंके यांना आपलेसे करून घेतले आणि पोकळ उठणा-या वावड्यांना पूर्णविराम दिला. तालुकाध्यक्ष निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार … Read more

शरद पवारांचा विखे पाटलांना ‘धक्का’ !

अहमदनगर :- प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील महासंचालक व माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ते नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी डॉ. निमसे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. त्यानंतर निमसे यांनीही यासाठी तयारी दर्शविली होती. शिक्षण क्षेत्रातील गाढा अनुभव असलेला डॉ. निमसे … Read more

तब्बल 423 नागरिकांवर फसवणुकीचा गुन्हा !

श्रीरामपूर :- शौचालयाचे बांधकाम न करता शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहरातील सुमारे 423 नागरिकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2015 पासून श्रीरामपूर पालिका हद्दीत स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहर हागणदारीमुक्त व स्वच्छ करण्याच्या उद्देशाने शासनाची वैयक्तीक शौचालय योजना संपूर्ण राज्यात राबविली जात आहे. तेव्हापासून आजपर्यंत नागरिकांनी केलेल्या अर्जापैकी 3314 पात्र लाभार्थ्यांना त्यांनी दिलेल्या बँक … Read more