बँकेची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार ! स्वयंघोषित एजंटांपासून सावध रहाः आ. कर्डिले यांचे आवाहन; ७०० जागांसाठी २८ हजार अर्ज

१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : जिल्हा बँकेसाठी गुरुवार पासून पुणे येथे भरती प्रक्रिया सुरू झाली असून, ७०० जागांसाठी सुमारे २८ हजार अर्ज आलेले आहेत.आपल्या मुलाला अथवा मुलीला जवळच्या नातेवाईकाला या भरतीच्या माध्यमातून नौकरी मिळावी म्हणून गेल्या काही दिवसांपासून बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांच्याकडे कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्र परिवार, नातेवाईक यांची मोठी वर्दळ वाढल्याने बँकेच्या पदाधिकाऱ्यांची यामुळे … Read more

पालवे बंधुवर दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई ; पाथर्डीचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी काढले आदेश

१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी किसन पालवे व त्यांचे चुलत बंधू शहादेव भानुदास पालवे (दोन्ही. रा. कोल्हार, ता. पाथर्डी) यांच्यावर तडीपारच्या कारवाईचे आदेश काढण्यात आले आहेत. पाथर्डीचे उपविभागीय दंडाधिकारी प्रसाद मते यांनी नुकताचा हा आदेश काढला असून, दोघांना नगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे … Read more

पतीवरील गुन्हा रद्द करा; पत्नीचे पोलीस प्रमुखांना निवेदन

१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : पती जितेंद्र चव्हाण व पुतण्या रोहन चव्हाण यांच्यावर ९ डिसेंबर रोजी कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असून तो रद्द करण्यात यावा असे निवेदन पत्नी अनिता जितेंद्र चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. अनिता चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,माझे पती जितेंद्र … Read more

महिलेची संगमनेर न्यायालयात शिवीगाळ

१० जानेवारी २०२५ संगमनेर : एका मद्यपी महिलेने धुमाकूळ घालून शिवीगाळ केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास येथील न्यायालयात घडली.याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर न्यायालयात हेड कॉन्स्टेबल सविता सोळसे या कोर्ट ऑर्डर्ली म्हणून कामकाज करत होत्या. दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक एक महिला न्यायालयामध्ये मोठ-मोठ्याने आरडाओरड करत होती. महिलेचा आवाज ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी … Read more

पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा कालव्यात बुडून मृत्यू ; राहुरी कृषी विद्यापीठ परिसरातील घटना

१० जानेवारी २०२५ राहुरी : येथील कृषी विद्यापीठ परिसरातून जाणाऱ्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या पाच विद्यार्थ्यांपैकी संकेत तरटे हा दहावीचा विद्यार्थी बुधवारी सायंकाळच्या सुमारास कालव्याच्या पाण्यात बुडाला होता.काल गुरूवारी (दि. ९) सकाळच्या दरम्यान त्याचा शोध घेण्यात यश आले आहे.तालुक्यातील डिग्रस येथे एका तरुणाला घटना स्थळापासून सुमारे दोनशे फूट अंतरावर कालव्याच्या पाण्यात मृतदेह तरंगताना सापडला आहे. याबाबत … Read more

नगदी पिकांमुळे शेवगावमध्ये ज्वारीच्या क्षेत्रात घट

१० जानेवारी २०२५ हातगाव : शेवगाव तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारी पिकाला महत्वाचे स्थान दिले जात असे.त्याचे कारण असे सध्या तालुक्यात कपाशी पिकाचा जो पेरा होत आहे, त्यापेक्षाही कितीतरी पटीने या पूर्वी ज्वारी पिकाचा पेरा होत होता; परंतु आता ऊस व कपाशी या दोन नगदी पिकांकडे शेतकरी वळल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शेवगाव तालुक्यातील ज्वारी पिकाच्या क्षेत्रात … Read more

काय सुरू आहे… मोदींच्या चौकशीने भामाबाई अचंबित ! पंतप्रधानांनी सभापती प्रा. शिंदेंच्या कुटुंबाशी साधला मराठीत संवाद ; अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीचे दिले निमंत्रण

१० जानेवारी २०२५ जामखेड: देशाच्या पंतप्रधानांना प्रत्यक्ष पाहण्याची त्यांची पहिलीच वेळ… अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना मराठीत विचारले… काय सुरू आहे… आपल्याशी ते बोलत असल्याचे जाणवल्याने खूष झालेल्या भामाबाई शिंदे यांनी… चांगले चालले आहे… असे त्यांना सांगितले.या संवादाने शिदे परिवाराच्या चेहऱ्यावर हास्य पसरले… निमित्त होते महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या परिवाराशी पंतप्रधान … Read more

वृध्दाचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

१० जानेवारी २०२५ श्रीगोंदा : तालुक्यातील आरणगाव दुमाला येथील ७८ वर्षाच्या गणपत बजाबा शिंदे यांना शेतीच्या कारणातून दगडाने मारहाण करून जीवे ठार मारल्या प्रकरणी शिवराम मारुती शिंदे (वय ५५ वर्षे) याला श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी जन्मठेप तसेच ५००० रूपये दंड अशी शिक्षा सुनावली.सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा कापसे यांनी काम पाहिले … Read more

पालेभाज्यांची आवक जास्तच; लसूण, शेवगा महागला

१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर: मोठ्या प्रमाणावर पुन्हा थंडी सुरू झाली आहे. याचा परिणाम पालेभाज्यांवर झाला आहे.तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध असल्याने बाजारात पालेभाज्यांची आवक अद्यापही जास्त आहे.यामुळे पालेभाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणावर कमी झालेले आहेत.बाजारात शेवगा व लसून, हिरव्या मिरचीचेही भाव काहीसे वाढले आहेत.लसणाच्या भावात वाढ झालेली आहे. शेवग्याचे बाजारभाव टिकून आहेत.मात्र, … Read more

गुलमोहर रोडवरील कॅफेवर छापा; चालकावर गुन्हा दाखल

१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : कॉफी शॉपच्या नावाखाली मुला मुलींना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्या गुलमोहर रोड वरील पारिजात चौकातील कॅफेवर तोफखाना पोलिसांनी बुधवारी (दि.८ जानेवारी) दुपारी छापा टाकत कारवाई केली. याप्रकरणी कॅफेचालक ओंकार दत्तात्रय कोठुळे (रा. भूतकर वाडी, भिंगारदिवे मळा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की,सावेडी उपनगरात गुलमोहर … Read more

शेवगाव येथे परप्रांतीय महिलेचा खून

१० जानेवारी २०२५ शेवगाव : एका परप्रांतीय महिलेचा तिच्या पतीने खून केल्याची घटना शेवगाव शहरात नेहरूनगर (शिवनगर) येथे बुधवारी रात्री घडली.याबाबत पोलिसांनी तिच्या पतीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.शहरातील नेहरूनगर (शिवनगर) येथे एका २९ वर्षांच्या महिलेचा तिचा पती इस्माईल मकसूद मालिक दोघे (रा. मनोहरपूर, मलिकपारा, दनकुनी, जि. हुगळी, पश्चिम बंगाल), याने कौटुंबिक कारणावरून तोंडावर, छातीवर … Read more

११ गावांमध्ये शंभरावर लोकांना पडले टक्कल ! अज्ञात रोगाने आरोग्य यंत्रणा हतबल : प्रयोगशाळेत पाठविले पाण्यासह त्वचेचे नमुने

१० जानेवारी २०२५ बुलढाणा : शेगाव तालुक्यातील अकरा गावांमध्ये केस गळती होऊन टक्कल पडण्याच्या अज्ञात रोगामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.गुरुवारच्या तपासणीत सहा गावांमध्ये ५२ रुग्ण आढळले,त्यात आज आणखी पाच गावांमधील ४८ टक्कलग्रस्तांची वाढ होऊन रुग्णसंख्या शंभरावर पोहोचली आहे.अजूनही केस गळतीचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या पथकांनी घरोघरी सर्वेक्षण सुरू … Read more

टोरेसच्या कार्यालयातून कोट्यवधींची रोकड जप्त ; फसवणूक प्रकरणात मुंबई पोलिसांकडून धाडसत्र

१० जानेवारी २०२५ मुंबई : गुंतवणूकदारांकडून कोट्यवधींची रक्कम स्वीकारून फसवणूक करणाऱ्या टोरेस ब्रँड चालवणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रा. लि. कंपनीविरोधात गुन्हा दाखल होऊन तपास हाती येताच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी कंपनीच्या कार्यालयांसह आरोपींच्या निवासस्थानांवर छापेमारी केली. या कारवाईत आर्थिक गुन्हे शाखेने तीन कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम आणि महत्त्वपूर्ण दस्तावेज ताब्यात घेतले. प्लॅटिनम हर्न प्रा. लि. कंपनी … Read more

मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए…राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण ? विचारल्यावर अजितदादा भडकले…

१० जानेवारी २०२५ मुंबई : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांचा धुरळा उडवून देणारे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीतील बडी मुन्नीचा उल्लेख केल्यामुळे हंगामा सुरू झाला आहे. बडी मुन्नीबरोबरच धस यांनी डार्लिंगचाही उल्लेख केला होता.यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ही बडी मुन्नी कोण, तिची डार्लिंग कोण, याबद्दल प्रसार माध्यमांनी … Read more

संगमनेरसाठी इंटरचेंज प्रस्तावित करा ; आमदार सत्यजित तांबे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

१० जानेवारी २०२५ संगमनेर : नाशिक-पुणे औद्योगिक महामार्गाचे काम लवकरात लवकर तडीस नेण्यासह या महामार्गाच्या रेखांकनात संगमनेर शहरासाठी इंटरचेंज प्रस्तावित करावा व इतर मागण्यांच्या संदर्भात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. संगमनेर शहरातील अतिक्रमणीत झोपडपट्टी भागात व भाड्याच्या घरात राहणाऱ्या २,५०० कुटुंबांना हक्काचं स्वमालकीचे घर मिळावे,यासाठी प्रधानमंत्री आवास … Read more

अल्पवयीन मुलींचा पाठलाग करुन तरुणाकडून विनयभंग

१० जानेवारी २०२५ संगमनेर : खासगी शिकवणी संपवून बसस्थानकाकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलींची छेड काढत लज्जास्पद वर्तन केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी संगमनेरात घडला.याप्रकरणी शहर पोलिसांनी आदेश राजेंद्र वाडेकर याच्यावर विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता,एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून,पीडित अल्पवयीन … Read more

घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला वृद्धाचा मृतदेह

१० जानेवारी २०२५ नगर : शहरातील स्टेशन रोडवर आनंदनगर – परिसरात एका वृद्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत त्यांच्या राहत्या घरात बुधवारी (दि.८ जानेवारी) दुपारी ४ च्या सुमारास आढळून आला आहे.अशोक मोतीलाल मंत्री (वय ६१) असे मयताचे नाव आहे. मयत अशोक मंत्री हे अविवाहित होते.ते घरात एकटेच राहात होते. त्यांना १ भाऊ, २ विवाहित बहिणी, पुतणे, भाचे … Read more

स्वप्निल निखाडे यांचे उपचारादरम्यान निधन ; विष प्राशन करून केला होता आत्महत्येचा प्रयत्न

१० जानेवारी २०२५ कोपरगाव : माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी मंगळवारी सात जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास आपल्या वाहनामध्ये बसून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि मित्रांनी त्यांना कोपरगाव शहरातील मुळे हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले. डॉक्टर मुळे यांनी प्राथमिक उपचार केले परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी संजिवनीच्या … Read more