Budget Smartphone:- स्मार्टफोन खरेदी करताना कोणतेही व्यक्ती सगळ्यात अगोदर त्याचा बजेट बघतो आणि त्या बजेटनुसार किंवा त्या बजेटमध्ये उत्तम वैशिष्ट्ये असलेला स्मार्टफोन मिळेल याचा शोध घेत असतो. जर आपण बाजारामध्ये बघितले तर अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन आपल्याला दिसून येतात व अनेकांच्या किमती या परवडणाऱ्या स्वरूपामध्ये असतात.
परंतु कमीत कमी किमतीमध्ये चांगली वैशिष्ट्य असलेला स्मार्टफोन आपल्याला मिळेलच याची कुठल्याही प्रकारचे शाश्वती नसते व अशामध्ये योग्य त्या स्मार्टफोनची निवड करणे खूप गरजेचे असते. स्मार्टफोन विकत घेताना त्याची स्टोरेज, बॅटरीची कॅपॅसिटी इत्यादी अनेक वैशिष्ट्ये खूप महत्त्वाचे ठरतात

व ही वैशिष्ट्ये ज्या स्मार्टफोनमध्ये मिळतात तो स्मार्टफोन खरेदी करण्याकडे आपल्याला ग्राहकांचा कल दिसून येतो. त्यामुळे तुम्हाला देखील जर नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल व तुमचा बजेट सात ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान असेल तर या लेखामध्ये आपण अशाच काही स्मार्टफोनची माहिती बघणार आहोत जे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळतील.
हे आहेत कमी बजेटमधील उत्तम असे स्मार्टफोन
1- सॅमसंग गॅलेक्सी M05- तुम्हाला जर कमी बजेटमध्ये उत्तम स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्याकरिता हा स्मार्टफोन एक उत्तम पर्याय आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.7 इंचाची एचडी+ स्क्रीन मिळते व मागच्या बाजूला 50 मेगापिक्सलचा हाय क्वालिटी ड्युअल कॅमेरा सेटअप देखील दिला आहे.
तुम्हाला जर स्वस्तमध्ये चांगला कॅमेरा कॉलेटी असलेला फोन घ्यायचा असेल तर हा फोन तुमच्यासाठी उत्तम ठरेल. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंगसह हा सर्वात कमी स्मार्टफोन आहे.
इतकेच नाहीतर या फोनमध्ये कंपनीने 2 रे जनरेशन अँड्रॉइड अपग्रेड आणि चार वर्षाची सुरक्षा अपडेट देखील यामध्ये दिले आहे. चार जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची ॲमेझॉन वरची किंमत जर बघितली तर ती 6499 रुपये आहे.
2- पोको C61- भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये पोको या कंपनीचे स्मार्टफोन देखील खूपच लोकप्रिय असल्याचे आपल्याला दिसून येते. या पोकोच्या स्मार्टफोनमध्ये पोको सी 65 देखील अतिशय अप्रतिम असा स्मार्टफोन असून याला चार स्टार युजर रेटिंग मिळाले आहे.
दिसायला देखील हा फोन अतिशय स्टाईलिश आणि स्लिम आहे. या स्मार्टफोन मध्ये कंपनीने 6.71 इंचाचा HD+90Hz डिस्प्ले आणि मीडियाटेक हिलिओ G36 प्रोसेसर दिला आहे व अनेक वेगवेगळ्या रंगांमध्ये ही श्रेणी उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली असून ती चार्ज करण्यासाठी 10W USB टाईप सी चार्जर मिळते. पोको सी 65 या स्मार्टफोनचा चार जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेले व्हेरिएंट ॲमेझॉन वर 5999 उपलब्ध आहे.
3- लावा YUVA3- हा स्मार्टफोन देखील उत्तम बजेट स्मार्टफोनच्या यादीमध्ये उत्तम असा स्मार्टफोन असून हा स्मार्टफोन ४ जीबी रॅमसह येतो व यामध्ये तुम्ही अतिरिक्त 4GB रॅम वाढवू शकतात.
या स्मार्टफोनच्या मागच्या पॅनलवर तेरा मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जात आहे व त्याचा 64 जीबी स्टोरेज व्हेरियंट सध्या ॲमेझॉन वर 6999 मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये Unisoc T606 प्रोसेसरने सुसज्ज आहे.













