सरकारमध्ये आलाय आता राज्याच्या समस्या तरी सोडवा; अजितदादांचा भाजपला खोचक टोला

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. असे असले तरी शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीकडून घोषित केलेल्या अनेक योजनांचा निधी रोखला आहे किंवा स्थगिती दिली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री??? अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणतात….

पुणे : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होणार असल्याची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे. त्यावर आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निष्ठावंत मानले जाणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे जिल्हा हा पवारांचा बालेकिल्ला आहे. हे महाराष्ट्रासह देशाला माहित आहे. पुण्यासह महाराष्ट्रासाठी पवार यांचे योगदान कोणीही कदापी विसरू शकणार … Read more

भाजपला दूर ठेवण्यासाठी आगामी निवडणूक एकत्र लढणार; शरद पवारांची घोषणा

मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी सेनेत मोठी फूट पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कार्यकारणी बैठक घेतली. या बैठकीमध्ये शिवसेनेसोबतच आगामी निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकत्र लढणार’ … Read more

जिथं आपली ताकद जास्त तिथं कोणाचीही मदत न घेता जागा लढवायची- अजित पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आढावा बैठक पार पाडली. या बैठकीमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ‘आज अनेक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भाषणे केली. पण आपापल्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची जागा निवडून येण्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी’, असे आवाहन अजित पवारांनी केले. ‘राज्यात कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या तर त्या लढविण्याची … Read more

आम्ही निवडून येण्याची चिंता अजितदादांनी करु नये; गुलाबराव पाटलांचा खोचक सल्ला

मुंबई : राज्यातील विशेष अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशना दरम्यान सभागृहामध्ये पहिल्या दिवशी सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी पहायला मिळाली. आजच्या दुसऱ्या दिवशी देखील सत्ताधारी आणि विरोधपक्ष नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पहायाला मिळत आहे. सभागृहामध्ये शिंदे गटातील शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ‘जे शिवेसना सोडून गेलेत त्यांना कोणी पुन्हा … Read more