अहमदनगर जिल्ह्यात हे काय चाललंय ? सराईत गुन्हेगारांनी केला गोरक्षकावर गोळीबार

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील ममदापुर कत्तलखाण्याचे केंद्र बनले आहे. बुधवारी शिर्डी, श्रीरामपूर, लोणी पोलीस व प्राणी कल्याण अधिकाऱ्यांनी येथे छापा टाकला असता कत्तलीसाठी आणलेल्या गायी आढळल्या.येथे धाड टाकताच येथील सराईत गुन्हेगारांनी गोरक्षकावर गोळीबार केला. त्यांच्या वाहनांची मोडतोड करून धारदार शस्त्राने वार देखील केले. यात एक जण गंभीर जखमी असून त्यास अतिदक्षता विभागात दाखल करण्यात … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! वाद पेटला, घरावर दगडफेक; गाड्यांची तोडफोड, जाळपोळ ४०० ते ५०० च्या जमावाचा दोन कुटुंबावर …

Ahmednagar News

Ahmednagar News : ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या वादातून राहाता तालुक्यातील निर्मळपिंप्री गावात ४०० ते ५०० जमावाने दोन कुटुंबावर जीवघेणा हावा चढविला. जमावाने घराची तोडफोड करून जाळपोळही केली. ही घटना बुधवार दि.६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात ७१ जणांविरुद्ध मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ला झालेल्या दोन्ही कुटुंबांनी लोणी पोलीस … Read more

‘आधी स्वतः निवडून येण्याची गॅरंटी घ्या’.. विखेंना थेट इशारा ! कोल्हेंनी विखेंबाबत केला एक मोठा गौप्यस्फोट

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणेतील वातावरण लोकसभेवरून तापलेले असतानाच आता उत्तरेत मात्र थेट विधानसभेचीच तयारी सुरु केल्याचे चित्र आहे. यावरून सध्या विखे पाटील विरोधात कोल्हे असे राजकीय वाक्युद्ध पेटले आहे. कोल्हे व विखे विरोधक थोरातांची जवळीकता व याने अस्वस्थ झालेले विखे व कोल्हे यांचे राजकीय विरोधक काळे यांची एकी सध्या चर्चेचा विषय झाला आहे. … Read more

आमदार मोनिका राजळे म्हणाल्या केवळ प्रसिध्दीसाठी विरोधकांची नौटंकी !

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करोडी ते टाकळीमानूर रस्त्याचे काम मंजूर झालेले आहे. मुंडे कन्सट्रक्शन, शेवगाव या ठेकेदारास काम मिळाले आहे. फक्त तांत्रीक बाबीमुळे ठेकेदारास कार्यारंभ आदेश मिळाला नाही. ठेकेदाराने कागदपत्रांची पूर्तता केल्यावर प्रशासकीय प्रक्रिया पुर्ण होऊन ठेकेदारास कार्यारंभ आदेश मिळताच रस्त्याच्या कामाला सुरवात होईल. मात्र, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक ज्या रस्त्याचे काम मंजुर … Read more

अहमदनगर किल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीचा लवकरच विस्तार !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर दक्षिण उत्तर विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार लवकरच करण्यात येणार असल्याचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड व उत्तर जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रांतध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विचारांनुसार तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोचण्यासाठी पक्ष कार्य कार्यकारणीचा करण्याचा विस्तार करून पक्षाशी … Read more

अहमदनगरच्या एसटी बसचालकाच्या मुलीची महाराष्ट्र क्रिकेट संघात एन्ट्री

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी गावची कन्या तेजश्री विष्णू डमाळे हिची भारतीय क्रिकेट नियमक मंडळाकडून महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. तामिळनाडू, बिहार, पश्चिमबंगाल, सिक्कीम, गोवा, या ठिकाणी पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत तेजश्रीला महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. पाथर्डी तालुक्याच्या ग्रामीण भागातील या १४ वर्षाच्या युवतीने पाथर्डी येथील एम. एम. निराळी … Read more

Ahmednagar News : अज्ञात वाहनाच्या धडकेत परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : मोटारसायकलवरुन चाललेल्या परप्रांतीय कामगाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.४) सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडली. विरेंद्र सिंग (वय-२९, हल्ली रा.नगर, मूळ रा. मध्यप्रदेश) असे मयत कामगाराचे नाव आहे. तो बाबुर्डी घुमट शिवारात असलेल्या विद्यापीठ उपकेंद्रात सुरु असलेल्या कामावर कामगार होता मयत विरेंद्र सिंग हा सोमवारी (दि.४) सायंकाळी … Read more

अहमदनगर शहरात राहायचं तरी कसं ? दररोज २५ ते ३० जणांवर मोकाट कुत्र्यांकडून…

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहर व उपनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद सुरूच आहे. लहान मुले व पायी चालणाऱ्या वृद्धांवर मोकाट कुत्र्यांकडून हल्ले होण्याचे प्रकार सुरू असून, चालल्या वाहनावरही मोकाट कुत्री हल्ला करीत आहेत. तारकपूर परिसरात शाळेतून घरी जात असलेल्या १० वर्षीय मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. याप्रकरणी शिवसेनेने महापालिका आयुक्तांना जाब विचारत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त … Read more

कोपरगाव मतदारसंघातील साडेतीन लाख सूज्ञ मतदार आमची गॅरंटी घेतील – विवेक कोल्हे

Ahmednagar News

Ahmednagar News : पालकमंत्र्यांनी कोपरगावच्या लोकप्रतिनिधींना पाठबळ देत त्यांना पुन्हा आमदार करण्याची गॅरंटी घेतली आहे. ज्यांची गॅरंटी घेतात त्यांचे काय होते, हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण नगर जिल्ह्याने पाहिले आहे. गेल्या एक-दीड वर्षांपासून ते मंत्री आहेत. आतापर्यंत त्यांचे कोपरगावकडे लक्ष नव्हते. मग आताच त्यांना कोपरगावची आठवण का झाली, असा सवाल सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष … Read more

आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे – आमदार मोनिका राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मतदारसंघात विकासकामासाठी मोठा निधी मिळत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी व भारतीय जनता पार्टीवर लोकांनी विश्वास दाखवून भरघोस असे मतदान दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खा. डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून आपल्या मतदार संघात चांगल्या प्रमाणात … Read more

कोपरगावला कर्तृत्वान नेतृत्व लाभले : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव मतदारसंघाचा मागील चार वर्षात झालेला विकास पाहता आ. आशुतोष काळे यांनी मतदारसंघाच्या विकासाची केलेली कामगिरी उल्लेखनीय असून त्यांच्या रूपाने कोपरगावला उमदं, कर्तृत्वान, गतिमान नेतृत्व लाभले. याचा स्थानिक जनतेबरोबर मला देखील आनंद वाटत आहे, असे गौरवोद्गार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले. तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे आ. आशुतोष काळे यांनी आयोजित केलेल्या … Read more

Ahmednagar News : धुक्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव ! नागरिक वातावरणामुळे आजारी

Ahmednagar News

Ahmednagar News : गारपिटीच्या पावसाने निघोज परिसरात झालेली अपरिमित हानी झाली असून, यातून शेतकरी सावरत असताना दररोज सकाळी पडणाऱ्या धुक्याने संपूर्ण शेती व शेतातील पिकांवर रोगांचे प्रमाण वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे तर नागरिक या विषम वातावरणामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. निघोज, पठारवाडी, जवळा, राळेगण सिद्धी, वडुले, सांगवी सुर्या, गटवाडी, गुणोरे व परिसरात नुकत्याच … Read more

गरजूंना मिळणार माफक दरात वाळू : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे शासकीय वाळू केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या चार ते पाच गावांतील गरजू लोकांना विशेषतः शासनाच्या योजनेअंतर्गत घरकुल, शासकीय व इतर कामासाठी एकलहरे केंद्रातून माफक दरात वाळू मिळणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील एकलहरे येथे शासकीय वाळू केंद्राचे काल मंगळवारी मंत्री विखेंच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण झाले. त्यावेळी … Read more

मराठ्यांना देण्यात येणारे आरक्षण हे हक्काचे व न्यायालयात टिकणारे मिळाले पाहिजे !

Maratha Reservation

संविधानात अनुसूचित जाती, जमातीसाठी दिलेले आरक्षण हे संविधानिक आहे. ते इतर बाकीच्या कोणाला देणे शक्य नाही. तेव्हा धनगर समाजाला जरूर आरक्षण द्या, पण ते स्वतंत्रपणे देण्यात यावे. ते अनुसूचित जमातीतून देण्यात येऊ नये, मराठा आरक्षण मिळाले पाहिजे. हिवाळी अधिवेशनात या मुद्द्द्यांवर सरकारकडून सकारात्मक मार्ग काढून ते मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मराठ्यांना देण्यात येणारे आरक्षण … Read more

११ वर्षीय शाळकरी मुलगा घरातून बेपत्ता ! अज्ञात व्यक्तीने…

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील नेप्ती गावातून एक ११ वर्षीय शाळकरी मुलगा घरातून बेपत्ता झाला आहे. त्या मुलाला अज्ञात व्यक्तीने त्याच्या राहत्या घरातून फूस लावून पळवून नेले असल्याचा संशय कुटुंबियांना असून, याबाबत मुलाच्या वडिलांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना शनिवारी (दि.२) सकाळी नऊ ते दुपारी … Read more

शेतकऱ्याच्या सोयबीनची चोरी ! पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील भातोडी शिवारातील शेतकऱ्याच्या घराच्या पडवीतून ६९ हजार रूपये किंमतीचे ३० सोयाबीनच्या गोण्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि.२) पहाटे एक ते चार वाजेच्या दरम्यान घडली असून, याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. शेतकरी बाबासाहेब पंढरीनाथ काळे (वय ६१, रा. भातोडी) यांनी फिर्याद दिली आहे. काळे … Read more

Ahmednagar News : आई-वडिलांना सांभाळा; अन्यथा वारस नोंदींना लागणार ब्रेक

Ahmednagar News

Ahmednagar News : आई – वडीलांची हेळसांड करणाऱ्या अपत्यांना जरब बसावी, यासाठी आई – वडीलांचे पालन पोषण न करणाऱ्या वारसांच्या नोंदी न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जामखेड तालुक्यातील दिघोळ माळेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीनी घेतला आहे. जामखेड तालुक्यातील दिघोळ माळेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच रंजना पिराजी दगडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत आई-वडिलांचे पालन पोषण न करणाऱ्या … Read more

‘या’ विविध मागण्यांसाठी संगणक परिचालक संपावर, नागरिकांचे काम वाऱ्यावर ! ग्रामपंचायतींचे काम ठप्प

Ahmednagar News

Ahmednagar News : विविध मागण्यांसाठी आक्रमक होत ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक संपावर गेले आहेत. मागील १५ दिवसांपासून बेमुदत संपावर हे सर्व कर्मचारी गेले आहेत. त्यामुळे सध्या नागरिकांचे विविध ऑनलाईन कामे रखडली आहेत. कोपरगाव तालुक्याचा विचार करता तब्बल ७५ ग्रामपंचायतींमध्ये विविध प्रकारचे दाखले व ग्रामपंचायत स्तरावरील नमुने ऑनलाइन केले गेले आहेत. परंतु या संपामुळे हे सगळे … Read more