सत्यजित तांबे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा : म्हणाले आता तरी सरकाराला जाग येणार का ?

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा हत्याकांडाने हादरला आहे,कोपरगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्याची काल संध्याकाळी निर्घुण हत्या झाली. या घटनेवरून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ह्या हत्येनंतर तरी सरकाराला जाग येणार का ? असा सवाल सत्यजित तांबे यांनी उपस्थित केला आहे. अहमदनगर सारख्या संवेदनशील व राज्यातील सर्वात … Read more

धक्कादायक : अवघ्या एका महिन्यात अहमदनगरमधून 37 अल्पवयीन मुलींला पळविले !

जिल्ह्यामध्ये जानेवारीत 37 अल्पवयीन मुलींला पळविले असल्याचे समोर आले आहे. या 37 मुलीपैकी 18 मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. जानेवारीमध्ये आठ मुलांचे देखील अपहरण झाल्याचे गुन्हे जिल्ह्यातील संबंधीत पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे. या आठ पैकी तीन मुलांचा शोध लागला आहे. श्रीरामपूर पोलीस ठाणे हद्दीतून सार्वाधिक चार, पारनेर, पाथर्डी, कोतवाली, एमआयडीसी पोलीस ठाणे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अहमदनगर : हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात अहमदनगर पोलिसांना यश आले आहे. हाॅटेल सन राइज वाकोडी फाटा अहमदनगर येथे हायप्रोफाइल वेश्याव्यवसायावर धाड टाकून 2 आरोपिंना अटक करण्यात आली 2 पिडीत तरुणींची सुटका केली. या बाबत सविस्तर माहिती अशी कि, अहमदनगरमधील वाकोडी फाटा येथील सन राईस लाॅजीग येथे आज संध्याकाळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री,सागर पाटील … Read more

‘त्या’ मुलांच्या शोधासाठी पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान

अहमदनगर : विशेष पोलिस महानिरीक्षक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग महाराष्ट्र, मुंबई यांनी ऑपरेशन मुस्कान दि.२८ नोव्हेंबर रोजी हरविलेल्या बालकाच्या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार ऑपरेशन मुस्कान-७ ही शोधमोहिम दि.१ ते ३१ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र राज्यात दरवर्षी प्रमाणे राबविण्याचे आदेश पारीत केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात मुस्कान-७ शोधमोहिम दि.१ पासुन सुरू केली असल्याची माहिती अनैतिक मानवी … Read more

…असे घडले हुंडेकरी यांचे अपहरण थरारनाट्य ….

अहमदनगर :- शहरातील प्रसिद्ध उद्योजक आणि हुंडेकरी लॉन्सचे प्रमुख करीम हुंडेकरी यांचे आज भल्या पहाटे अज्ञात चार ते पाच जणांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण केले. त्यामुळे नगरसह जिल्ह्यात खळबळ उडाली.या अपहरणाचे थरारनाट्य एखाद्या चित्रपटासारखेच होते. नगर येथील ६४ वर्षाचे हाजी करीमभाई हुंडेकरी हे मोठे उद्योजक, व्यावसायिक असून हुंडेकरी लॉन्स, टाटा शोरुम तसेच सिमेंट, हॉटेल असे … Read more

पोलिस निरीक्षकास माहिती आयोगाची २५ हजार रुपये दंडाची नोटीस

संगमनेर :-  माहिती अधिकारांतर्गत अर्जदारास वेळेत माहिती दिली नाही, या कारणावरुन शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना माहिती आयोगाने २५ हजारांंचा दंड का करु नये, अशी नोटीस बजावली आहे. माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने निरीक्षकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष अजिज शेख यांनी २०१५ मध्ये मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणाऱ्या एका दैनिकातील … Read more

नगर शहरातून २८८ जण हद्दपार, ५७ जण अटी, शर्तीत; उल्लंघन केल्यास कारवाई

अहमदनगर : अयोध्या निकाल, ईद आणि गुरुनानक जयंतीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने नगर प्रांताधिकारी तथा नगर उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी तब्बल २८८ जणांना हद्दपार केले आहे.  याचबरोबर ५७ जणांना अटी, शर्ती लादून शहरात वास्तव्याची मुभा दिली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ (२) अन्वये श्रीनिवास यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करीत हे … Read more

नादुरुस्त ट्रकला धडक, तिघांचा मृत्यू

पारनेर – नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारची रस्त्यात उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला धडक बसून दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी झाला. चौघेही पारनेर तालुक्यातील सुपे येथील रहिवासी आहेत. मृतांमध्ये सुपे येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, उद्योजक संदीप पवार यांचा समावेश आहे.संदीप किसन पवार (४२), भरत भाऊसाहेब नन्नवरे (२२, दोघेही … Read more

नगरच्या पोलीस अधीक्षकपदी इशू सिंधू.

अहमदनगर :-  पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा ह्यांची बदली झाली आहे इशू सिंधू हे नगरचे नवीन पोलीस अधीक्षक असतील. ते सध्या नवी दिल्ली येथे महाराष्ट्र निवासी उपायुक्त होते. नगरचे पोलीस अधीक्षक शर्मा यांची नागपूर येथे पोलिस अधीक्षक CIDम्हणून बदली करण्यात आली आहे.

डायल 100 कार्यप्रणालीचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे हस्‍ते उदघाटन

अहमदनगर :- जनतेला तात्‍काळ पोलिस सेवा देण्‍यासाठी नियंत्रण कक्ष डिजिटल करुन डायल 100 ही सेवा अत्‍याधुनिक पध्‍दतीने कार्यान्वित करण्‍यात आली आहे. या यंत्रणेला मोबाईल App जोडण्‍यात आले असून या सेवेचे उदघाटन आज जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. जिल्‍हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला खासदार दिलीप गांधी, जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्‍हा पोलिस अधीक्षक … Read more