डॉ. अनिल बोरगे यांनी अपहार उघड झाल्यानंतरही पोलिसात फिर्याद देऊन गुन्हा दाखल का केला नाही ?

AMC News : आरोग्य विभागातील अपहार प्रकरणातील गुन्ह्यातून डॉ. अनिल बोरगे यांचे नाव वगळण्याबाबत पोलिस प्रशासनाने न्यायालयात दाखल केलेल्या पत्राला महानगरपालिकेमार्फत कायदेशीर हरकत व आक्षेप घेतला जाणार आहे. गुन्ह्यातून त्यांचे नाव वगळण्याचा निर्णय अद्याप न्यायालयाने दिलेला नाही. या प्रकरणी महानगरपालिका न्यायालयात योग्य ती भूमिका मांडेल, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे. … Read more

सर्जेपुरातील रंगभवन व्यापारी संकुलात तीन मजले फक्त पार्किंगसाठी राखीव ठेवणार

AMC News : अहिल्यानगर – सर्जेपुरा येथील महानगरपालिकेचे रंगभवन व्यापारी संकुल पाडून त्याजागी व्यापारी संकुल, सांस्कृतिक सभागृह व पार्किंग व्यवस्था असलेले बहुमजली संकुल उभारण्यात येणार आहे. मध्य शहर व बाजारपेठेतील पार्किंग समस्या मार्गी लावण्यासाठी या संकुलात व्यवस्था करण्यात आली आहे. संकुलातील तीन मजल्यावर ४१० दुचाकी व १०० चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे … Read more

AMC News : अहिल्यानगर महानगरपालिकेने शटडाऊनदरम्यान पाणीपुरवठा व्यवस्थेच्या दुरुस्तीवर भर दिला

AMC News : २८ एप्रिल २०२५, अहिल्यानगर: २६ एप्रिल रोजी नियोजित विजेच्या शटडाऊनचा वापर करून अहिल्यानगर महानगरपालिकेने शहरभरातील पाणीपुरवठा यंत्रणेच्या दुरुस्ती व देखभालीची मोठी कामे हाती घेतली. यामुळे पाण्याच्या गळतीत लक्षणीय घट झाली असून पुरवठा व्यवस्था अधिक कार्यक्षम बनली आहे. आयुक्त तथा प्रशासक श्री. यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही पार पडली. मुळा नगर येथील … Read more

AMC News : अहिल्यानगर करांनी करून दाखवलं ! सीना नदी होतेय स्वच्छ…

अहिल्यानगर, दि. २७ एप्रिल – जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने अहिल्यानगर महानगरपालिकेने ‘आराधना वसुंधरेची’ या विशेष उपक्रमांतर्गत शहरातील जलस्त्रोत स्वच्छता मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दोन दिवस चाललेल्या या मोहिमेची यशस्वी सांगता होत असताना, सीना नदी परिसराच्या सौंदर्यीकरणाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पालाही सुरुवात झाली आहे. २७ एप्रिल रोजी नगर-कल्याण महामार्गावरील सीना नदीपात्र तसेच शहरातील … Read more

AMC News : अहिल्यानगर करांसाठी Good News ! महानगरपालिका कचऱ्यातून तयार करणार ‘ही’ वस्तू, उभारला मोठा प्रोजेक्ट

अहिल्यानगर शहरातील बांधकाम व पाडकामाचा राडारोडा, टाकाऊ साहित्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने सावेडी येथील कचरा डेपोच्या जागेत सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प उभारला आहे. सुमारे ४.७० कोटी रुपये खर्चून उभारलेला व ५० टन क्षमता असलेला हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. त्याची चाचणी सध्या सुरू आहे. खासगी संस्थेमार्फत हा प्रकल्प चालवण्यात येणार आहे. त्यातून निर्मिती … Read more

AMC News : उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे – प्रशासक यशवंत डांगे

अहिल्यानगर – उन्हाळा सुरू झाला असून पारा ३८ ते ३९ अंशावर पोहोचला आहे. या काळात उष्माघाताच्या घटना घडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे उन्हाळ्यात काय करावे व काय करू नये, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच, नागरिकांनी उन्हात बाहेर पडणे शक्यतो टाळावे, व्यापारी संकुले, सार्वजनिक … Read more

अहिल्यानगर महानगरपालिकेकडून शहरातील ४७ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण नव्याने घेतलेल्या मोजमापांमुळे बांधकाम क्षेत्राच्या नोंदीत ४० टक्क्यांनी वाढ

अहिल्यानगर – महानगरपालिकेमार्फत शहरातील नागरिकांच्या सर्व प्रकारच्या मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू आहे. मालमत्तांची नव्याने मोजमापे घेऊन त्यानुसार कर आकारणी करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत शहरातील ४७ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यात इमारती, घरांच्या बांधकाम क्षेत्राच्या नोंदींमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे घरपट्टीतून मिळणारे उत्पन्न वाढणार आहे. नागरिकांनी सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, … Read more

AMC News : कापड बाजार, शहाजी रोड, गंज बाजारसह संपूर्ण बाजारपेठेत अतिक्रमणांवर कारवाई सुरू

AMC News : अहिल्यानगर शहरात स्टॉल लावण्यावरून अतिक्रमणधारक व दुकानदारांमध्ये झालेल्या वादानंतर आमदार संग्राम जगताप यांनी बाजारपेठेत व्यापाऱ्यांशी संवाद साधला. पोलिस प्रशासन व आमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार बाजारपेठ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे. बाजारपेठेत अतिक्रमणे थाटली जाऊ नयेत, यासाठी महानगरपालिकेचे स्वतंत्र विशेष पथक बाजारपेठेत नियुक्त करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत … Read more

AMC News : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची नगररचना विभागासह सर्व विभागात झाडाझडती

AMC News : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागासह इतर विभागात आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी शुक्रवारी अचानक भेट देऊन झाडाझडती घेतली. यावेळी अनेक कर्मचारी जागेवर नसल्याने त्यांना आयुक्तांनी धारेवर धरत खडेबोल सुनावले. नगररचनासह इतर विभागात अनेक फायली, रेकॉर्ड अस्ताव्यस्त आढळून आले. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सर्व रेकॉर्ड येत्या आठवडाभरात व्यवस्थित लावण्याच्या, तसेच अनावश्यक … Read more

Ahmednagar City News : रस्ते घोटाळा प्रकरणी कारवाई न झाल्यामुळे किरण काळे करणार जिल्हाधिकाऱ्यांच्या दालना समोर आत्मदहन !

Kiran Kale INC

Ahmednagar City News :- रस्ते घोटाळा प्रकरणात बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्टच्या आधारे मनपात सुमारे ₹ २०० कोटींच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शहर काँग्रेसच्या वतीने मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे काँग्रेसने केली होती. काँग्रेसने १५ दिवसांचा दिलेला अल्टीमेटम संपला आहे. मात्र हे प्रकरण तीन आठवड्यांपूर्वी चव्हाट्यावर येऊन देखील दोषींवर फौजदारी … Read more

म्हणून अहमदनगरच्या महापौरांसमोरील राजदंड गायब

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar Politics  :- महापालिकांच्या सर्वसाधरण सभेत सभेचे अध्यक्ष असलेल्या महापौरांसमोर राजदंड, बाजूला खास पोषाख परिधान केलेला चोपदार उभा. असं दृष्य सर्व महापालिकांच्या सभेत पहायला मिळतं. अहमदनगरमध्ये मात्र, काल झालेल्या सर्वसाधारण सभेत ना राजदंड दिसला ना चोपदार. त्याचं कारणही तसंच आहे. यासंबंधी नगरसेवक अनिल शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा … Read more

मनपाची थकबाकी न भरल्याने केली ‘ही’ कारवाई..!

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- सध्या खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी अवस्था मनपाची झाली आहे. त्यातच परत प्रभागात एखादी सुविधा कमी असेल तर मनपा प्रशासनाच्या नावाने गळा काढला जातो तर दुसरीकडे मालमत्ता कर भरण्याकडे काना डोळा करणारे देखील अनेकजण आहेत. मात्र आता मनपा प्रशासनाने अशा थकबाकीदारांवर कठोर कारवाई केली जात आहे. नुकतीच प्रभाग … Read more

मोकाट जनावरांमुळे शहरातील वाहतुकीस अडथळा; पालिकेचे दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  शहर व उपनगरांमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली असून वाहचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने एकविरा चौकात मोकाट जनावरे मोठ्या संख्येने रस्त्यावर उभी रहात असल्याने वाहतुकीला अडथळे येत आहे. शहरातील नगर-मनमाड, औरंगाबाद-नगर-पुणे, अशा … Read more

चिंताजनक : अहमदनगर मनपाच्या १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणासह विविध उपाय योजना राबवणाऱ्या कोविड योद्ध्यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने चिंता वाढली आहे. मनपाच्या आरोग्य विभागातील सुमारे १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.(AMC News) त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमी मनुष्यबळात काम करण्याचा ताण वाढला आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी मनपा आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा थेट … Read more

महापालिका: स्थायी समितीच्या सभेत पथदिव्यांच्या उजेडावरून ठेकेदारावर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- शहरात महापालिकेकडून बसविण्यात आलेल्या पथदिव्यांच्या उजेडावरून स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी ठेकेदारावर नाराजी व्यक्त केली. 60 वॅटचे दिवे बसविण्यात येतील असे सांगितले गेले होते. प्रत्यक्षात मात्र 16 अन् 24 वॉटचे दिवे बसविले जात आहेत. ठेकेदार मनमानी पध्दतीने कारभार करत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांच्या … Read more

विकास कामात लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा – आ.संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- अहमदनगर महानगरपालिकेचे आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शहरांमध्ये एकाच वेळी विकास कामे करणे शक्य नाही यासाठी खाजगीकरणातून व लोकसहभागातून उड्डाणपुलाला जोडणारे सहकार सभागृह रस्ता, कोठी रस्ता व इम्पेरियल चौक रस्ता या कामासाठी खाजगीकरण व लोकसहभागातून निधी उपलब्ध केला आहे. उड्डाण पुलाच्या कामामुळे या जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.यामुळे … Read more

मार्च एन्ड वसूलसाठी मनपाचा ‘हा’ आहे प्लॅन

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  मार्च एण्ड जवळ आला असल्याने आता नगर महानगर पालिकेला वसुलीचे वेध लागले आहेत. नऊ महिन्यात विविध कारणांनी वसुलीचे प्रमाण केवळ १६.९८ टक्के आहे. वसुलीवरच महापालिकेचे इतर खर्च अवलंबून असल्याने आता जप्ती, वॉरंट अन लिलावाचा फंडा वापरण्यात येत आहे. एव्हढेच नव्हे, तर चौकाचौकात मोठ्या थकबाकीदारांच्या नावाचे फलकही लावण्याचे नियोजन … Read more

सक्तीने वसुली करण्यासाठी महापालिका काय काय करणार घ्या अधिक जाणून

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- जसा जसा मार्च महिना जवळ येईल तसे महापालिकेला वसुलीचे वेध लागतात. गेल्या नऊ महिन्यात वसुलीसाठी महापालिकेने विविध प्रयत्न केले परंतु पाहिजे त्या प्रमाणात वसुली झाली नसल्यामुळे महापालिका आता कडक पावले उचलत आहे असे महापालिकेने सांगितले. नऊ महिन्यात वसुलीचे प्रमाण फक्त १६.९८ टक्के आहे. मागणी २२३.३२ कोटींची आहे. वसुली … Read more