मार्च एन्ड वसूलसाठी मनपाचा ‘हा’ आहे प्लॅन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  मार्च एण्ड जवळ आला असल्याने आता नगर महानगर पालिकेला वसुलीचे वेध लागले आहेत. नऊ महिन्यात विविध कारणांनी वसुलीचे प्रमाण केवळ १६.९८ टक्के आहे.

वसुलीवरच महापालिकेचे इतर खर्च अवलंबून असल्याने आता जप्ती, वॉरंट अन लिलावाचा फंडा वापरण्यात येत आहे. एव्हढेच नव्हे, तर चौकाचौकात मोठ्या थकबाकीदारांच्या नावाचे फलकही लावण्याचे नियोजन होत आहे.

दरम्यान मागणी २२३.३२ कोटींची आहे. वसुली मात्र केवळ ३७.४१ कोटी झाली आहे. शहरात बहुतेक उपनगरांत गुंतवणूक म्हणून प्लाट घेण्यात आलेले आहेत.

त्यावर बांधकामे नसली, तरीही त्यांच्याकरडून कर येणे असते. संबंधित प्लाटधारक नियमित कर भरत नाहीत. थेट खरेदी-विक्रीच्या वेळी ही रक्कम भरली जाते.

व्यवहार झाल्यानंतर महापालिकेकडे नाव नोंदणी होत नाही. त्यामुळे नेमका मालक कोण, हे लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे वसुलीस अडचण येते.

शास्ती माफी देऊनही वसुली नाहीच… महापालिकेचे बहुतेक खर्च घरपट्टी, पाणीपट्टी, प्लाटवरील कर अशा रकमेंवर अवलंबून असतात. अनेकदा कर्मचाऱ्यांच्या पगार देण्याचीही अडचण होते.

सफाई कर्मचारी पगारासाठी कायम आंदोलन करतात. विकास कामांसाठी निधी कमी पडतो. प्रशासनाकडून वारंवार वेगवेगळे प्रयोग होत असतात. मागील वर्षी शास्ती माफी दिली होती; परंतु वसुली हव्या त्या प्रमाणात झालीच नाही.