बीडमध्ये ‘अशी’ आहे जातनिहाय आकडेवारी ! मराठा विरुद्ध ओबीसी वादात पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे तरणार? जातीय आकडेवारीनुसार..

Ahmednagarlive24 office
Published:
MUNDE

महाराष्ट्रात सध्या लोकसभेचा राजकीय संघर्ष पेटून उठला असून जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतशे वातावरण आणखी तेज होत चालले आहे. महाराष्ट्रातील काही लढती अशा आहेत की ज्याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे. यातील एक महत्वाची लढत म्हणजे बीडची लढत.

येथे भाजपकडून पंकजा मुंडे यांना तर शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान या लढतीस जातीय रंग देण्याचे का सुरु असल्याची शोकांतिका आहे. बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत येथे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीचा बीड हा केंद्रबिंदू राहिलाय त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जातीय रंग पहायला मिळत आहे.

याठिकाणी आता पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये थेट लढत होत असल्याने मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद जास्त वाढल्याचे दिसते. धनंजय मुंडेंनी देखील आजपर्यंतच्या खासदारांची यादी वाचून दाखवत यापूर्वी जेवढे खासदार निवडून आले त्यांची जात कधीच काढली नाही आणि आता आमची जात का काढली जातेय,

असा प्रश्न देखील उपस्थित केला होता. याउलट बजरंग सोनवणे यांनी या निवडणुकीमध्ये आमच्यासाठी जात हा मुद्दा नसून आम्ही सेक्युलर विचाराचे असल्याचे सांगितले होते. दरम्यान या ठिकाणी जातीय आकडेवारी कशी आहे याबाबत एक दृष्टिक्षेप टाकुयात ….

बीडमध्ये ‘अशा’ पद्धतीची आहे जातनिहाय मतांची आकडेवारी (अंदाजित)
– बीडमध्ये मराठा समाजाचे अंदाजे सात ते साडेसात लाख मतदान असेल
– वंजारी समाजाचे अंदाजे साडेचार ते पाच लाख मतदान असेल
– दलित समाजाचे दोन ते सव्वा दोन लाख मतदान असेल

– मुस्लिम समाजाचे सव्वा दोन ते अडीच लाख मतदान असेल
– ओबीसी समाजाचे म्हणजेच माळी आणि धनगर दोन ते अडीच लाख मतदान असेल

जातीयवाद एक खंत..
बीडमध्ये झालेल्या मराठा आरक्षणाचे तीव्र आंदोलन हेच खरे तर बीड जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये जातीचा मुद्दा समोर येण्याचे महत्वाचे कारण आहे. मराठा आणि ओबीसी उमेदवार एकमेकांसमोर उभे असल्याने याची तीव्रता आणखी वाढलेली दिसते. परंतु तसे जर पाहिले तर लोकसभा निवडणुकीला जातीय रंग देणे ही एक मोठी खंत असल्याचे जाणकार सांगतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe