काय सांगता ! किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या राणे, तटकरेंसह ‘या’ ५ जणांना महायुतीकडून खासदारकीची उमेदवारी

KIRIT SOMAYYA

लोकसभेची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या व महायुतीचे उमेदवार फायनल झाले. महायुतीमध्ये अजित पवार गटास चार जागा, शिवसेना शिंदे गटास १५ तर भाजपने २८ जागा स्वतःकडे ठेवल्या. दरम्यान या उमेदवारांमध्ये पाच असे उमेदवार आहेत की ज्यांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलेला होता.

१) नारायण राणे : भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे. किरिट सोमय्या यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि बेहिशोबी संपत्तीचे आरोप केल्यानंतर ईडीने चौकशी केली होती. यामध्ये काही शेल कंपन्यांची चौकशी देखील केल्याचे सर्वश्रुत आहे.

२) सुनेत्रा पवार : किरिट सोमय्यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या व्यवहारात घोटाळे झाल्याचा आरोप केला होता. या कारखान्याशी सुनेत्र पवार संलग्न होत्या असे सांगितले जाते. तसेच नुकतेच त्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात क्लीन चिट देण्यात आली आहे.

३ ) सुनील तटकरे : तटकरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत बोगस कंपन्या स्थापन करून त्यादवरे जिल्ह्यातील विविध भागात शेतकऱ्याकडून कवडी मोलाने शेतजमिनी खरेदी केल्या. या जमिनी नंतर चढ्या दराने दुसऱ्या कंपन्यांना विकल्याचा आरोप केलेला होता.

४) रवींद्र वायकर : अनेक राजकीय घडामोडीनंतर उत्तर पश्चिम मुंबई मधून शिवसेना शिंदे गटाने रवींद्र वायकर यांना खासदारकीची तिकीट दिले. उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याविरोधात त्यांचा सामना रंगणार आहे. याच वायकर यांच्यावर मुंबई महापालिकेच्या दोन लाख वर्ग फूट जमिनीवर अनधिकृत कब्जा करून तेथे ५०० कोटींचं पंचतारांकित हॉटेल उभे केले जात असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.

५) यामिनी जाधव : यांना शिवसेना शिंदे गटाने दक्षिण मुंबईतून उमेदवारी दिली आहे. दरम्यान त्या जेव्हा उद्धव ठाकरे गटात होत्या तेव्हा आयकर विभागने त्यांच्या व पती यशवंत जाधव यांच्या घरावर छापा टाकत चार दिवस आयकर विभाग त्यांच्या घरी ठिय्या मांडून होता हे सर्वानी पाहिले आहे. सोमय्या यांनी मुंबईतील कोव्हिड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe