Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये पुण्यावरून आलेल्या खासगी प्रवासी बसला भीषण आग !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून दुर्घटनेबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची माहिती समजली आहे. ही बस पुण्यावरून आली होती.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री येथे आज (दि.२ मे) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही आग लागण्याची घटना घडली आहे.

अधिक माहिती अशी : पुण्यावरून राजस्थानला निघालेली एक खासगी बस अहमदनगरमधील राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री येथे आली असता तेथिल एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गाडी उभी राहिली. सुदैवाने गाडीतील सर्वच लोक जेवणासाठी खाली उतरलेले होते.

सर्व प्रवासी हॉटेलमध्ये असतानाच या हॉटेलसमोर बसला भिषण आग लागली. प्रवाशी जेवणासाठी उतरल्यानंतर बसला आग लागल्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही. दरम्यान बसला आग लागताच अग्निशमन दलाला कळवण्यात आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु या आगीमध्ये बस जळून झाली होती.

आग लागण्याचे कारण
अद्याप ही आग का लागली हे कळले नाही. परंतु उष्णतेचा कडाका फार आहे. ही उष्णता व गाडीमध्ये झालेले शॉर्टसर्किट यामुळे गाडीला आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जेवणासाठी उतरले असल्याने अनर्थ टळला
पुण्यावरून राजस्थानला ही बस निघाली होती. जेवणासाठी ही बस हॉटेलवर थांबल्याने प्रवासी खाली उतरले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी यामध्ये झाली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe