श्रीपाद छिंदमकडून ‘त्या’ निर्णयास आव्हान !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महापालिकेतील नगरसेवकपद रद्द करण्याच्या नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयास श्रीपाद छिंदमने न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याच्याकडून याबाबत काही सांगितले जात नाही, पण महापालिकेला यासंदर्भात म्हणणे मांडण्याची नोटीस आली असून, १६ मार्चला पुढील सुनावणी होणार असल्याचे महापालिका सूत्रांकडून सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याने छिंदमचे विद्यमान नगरसेवकपद रद्द करण्यात आले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मनपाच्या आयुक्तपदी श्रीकांत मायकलवार

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महापालिका आयुक्तपदी श्रीकांत मायकलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकृष्ण भालसिंग निवृत्त झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. डिसेंबरपासून मनपा आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे होता. महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळावा यासाठी प्रयत्न सुरू होते. शासनाने शुक्रवारी मायकलवार यांची नियुक्ती करून या विषयावर पडदा टाकला आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / … Read more

अहमदनगर शहरात तब्बल तीन टन प्लॅस्टिक जप्त

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- बालिकाश्रम रोड परिसरातील एका घरातून महापालिकेच्या पथकाने गुरुवारी (दि.5) कारवाई करत बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा मोठा साठा जप्त केला आहे. सुमारे तीन टन माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मनोज कासलीवाल यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर यांनी दिली. शासनाने सिंगल युज प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी घातलेली … Read more

दोन भैय्यांच्या ‘हट्टा’मुळे झाला महाविकास आघाडीचा पराभव !

अहमदनगर :-  राज्यात महाविकास आघाडी असतांना महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली. त्यामुळे महाविकास आघाडी कुठे कमी पडली याची चौकशी वरिष्ठ करणार का प्रश्न समोर आला आहे. महापालिकेच्या प्रभाग क्र. 6 “अ’ मधील पोटनिवडणुकीत भाजपच्या पल्लवी जाधव यांनी शिवसेनेच्या अनिता दळवी यांचा दारून पराभव केला. दोन्ही भैय्यांच्या हट्टापाई महाविकास आघाडीने जागा गमावली असल्याची जोरदार चर्चा शहरात … Read more

माजी आमदार अनिल राठोड यांच्यासाठी धक्का देणारा निकाल !

प्रभाग सहा अ च्या पोटनिवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या महाविकास आघाडीला भाजपने धक्का दिला आहे. या निवडणुकीत भाजपच्या पल्लवी जाधव यांनी एक हजार 712 एवढ्या बलदंड मताधिक्याने विजय मिळविला आहे. त्यांना 2 हजार 915 मते मिळाली. महाविकास आघाडीच्या अनिता दळवी (शिवसेना) यांना एक हजार 203 मते मिळाली. नोटाला 119 जणांनी पसंती दिली. महापौर बाबासाहेब वाकळे प्रतिनिधित्व … Read more

स्वीकृत नगरसेवक पदावरून अहमदनगर शहर भाजपात ‘आर्थिक’ वाद !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर महानगर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून अहमदनगर शहर भाजपात चांगलेच वाद झाल्याचे समोर आले आहे. पक्षाकडून एक नाव आले, अन् स्वतःच्या अधिकारातच महापालिकेच्या दोन पदाधिकार्‍यांनी दुसर्‍याचाच अर्ज दाखल केल्याने भाजपमध्ये चांगलीच रणधुमाळी निर्माण झाली. हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले…. रात्री … Read more

नगरसेवक गुंड आहेत काय ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महापालिकेची महासभा सुरू झाली आणि द्विवेदींनी स्वीकृत नगरसेवकपदांसाठी आलेल्या पाचही प्रस्तावांची छाननी केली असून, कागदपत्रांच्या त्रुटी असल्याने हे पाचही प्रस्ताव अमान्य करत तशी शिफारस महापौरांना करीत असल्याचे स्पष्ट केल्यावर महासभेत सन्नाटा पसरला व सर्वच नगरसेवक सुन्न झाले. अखेर आयुक्तांनी अमान्य केलेल्या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब करणेच महापौर वाकळेंनी पसंत केले. पण त्यानंतर भाजप, … Read more

आमदार संग्राम जगताप यांची अजितदादांकडे तक्रार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदांच्या निवडीत अजित पवार यांनी दिलेला आदेश डावलल्याने माजी नगरसेवक संजय घुले यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये ट्रकने महिलेला चिरडले ! राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकपदांच्या दोन नावांपैकी एक नाव माजी नगरसेवक संजय घुले यांचे करावे व दुसरे … Read more

ब्रेकिंग न्यूज : अहमदनगर शहरात राजकीय भूकंप !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर शहरात आज राजकीय भूकंप झाला आहे,महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीसह शिवसेना आणि भाजपाच्या गटनेत्यांनी बंद पाकीटाद्वारे सुचविलेली पाचही नावे जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरविली आहेत. शिवसेनेकडून संग्राम शेळके, मदन आढाव, राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाबा गाडळकर, विपुल शेटिया आणि भारतीय जनता पक्षाकडून रामसदार आंधळे यांची नावे सादर करण्यात आली होती. ही नावेच महापालिकेचे … Read more

तर नगरला 25 कोटींचे पारितोषिक मिळेल : महापौर बाबासाहेब वाकळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- स्वच्छ सर्व्हेक्षणात सर्वच नगरकरांनी सहभागी व्हावे. मनपाकडे घंटागाड्या आहेत. कचरा घंटागाडीत टाकावा. इतरत्र कचरा टाकू नये. या संदर्भात प्रबोधन व जनजागृती करावी. कुणी ऐकत नसेल, कचरा टाकत असेल तर दंडात्मक कारवाई केली जाईल. आपण ‘थ्री स्टार’ रँकींगच्या शर्यतीत असून, सर्वांनी सक्रिय सहभाग दिल्यास शहराला 25 कोटींचे पारितोषिक निश्चित मिळेल, असा … Read more

सर्वेक्षणात नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा; प्रभाग पंधरा मधील नगरसेवकांचे आवाहन

अहमदनगर : शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील घरघुती स्वरुपाच्या कचऱ्याचे घरातच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करुन तो वेगवेगळ्या कचरा पेटीत साठवून ठेवावा. कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीमध्येच ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकावा. ओला कचऱ्याचे घरीच कंपोस्टींग करुन खत तयार करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहकार्य करावे. सर्वेक्षणावेळी नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची सकारात्मक … Read more

घंटागाडीची माहिती आता मोबाईलवर! नागरिकांसाठी अँड्रॉईड अ‍ॅपची निर्मिती

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शहरातील कचरा संकलनाचे काम खासगीकरणातून सुरू केल्यानंतर आता महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी आणखी एक पाऊल टाकले आहे. नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर घंटागाडीची माहिती मिळावी, यासाठी मनपाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या सहकार्याने अँड्राईड अ‍ॅप महापालिकेने तयार केले असून, लवकरच हे अ‍ॅप नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. महापालिकेचे अपुरे कर्मचारी, कचरा … Read more

सर्वेक्षणात सकारात्मक प्रतिसाद द्यावा; प्रभाग सहा मधील नगरसेवकांचे आवाहन

अहमदनगर :- शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील घरघुती स्वरुपाच्या कचऱ्याचे घरातच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करुन तो वेगवेगळ्या कचरा पेटीत साठवून ठेवावा. कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीमध्येच ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकावा. ओला कचऱ्याचे घरीच कंपोस्टींग करुन खत तयार करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहकार्य करावे. सर्वेक्षणावेळी नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची सकारात्मक … Read more

प्लॅस्टिकच्या वापराविरोधात कारवाईसाठी महापालिकेची पथके पुन्हा एकदा सज्ज

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वापराविरोधात कारवाईसाठी महापालिकेची पथके पुन्हा एकदा सज्ज झाली आहेत. व्यापार्‍यांच्या आडकाठीमुळे थांबलेली कारवाईही पुन्हा सुरू झाली असून, सोमवारी (दि.30) एकाच दिवसांत मनपाने 42 हजारांचा दंड वसूल केला आहे. काही दिवसांपूर्वी बाजारपेठेत कारवाईवेळी व्यापार्‍यांनी पथकातील कर्मचार्‍यांना अरेरावी केली होती. दंड भरण्यास नकार देत कर्मचार्‍यांना हुकसकावून लावले होते. व्यापारी … Read more

अब की बार, थ्री स्टार : स्वच्छता सर्वेक्षणात नगरकरांनी सक्रिय सहभाग घ्यावा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- महानगरपालिकेने स्वच्छता सर्वेक्षण 2020 मध्ये सहभाग घेतलेला आहे. महापालिकेच्या वतीने स्वच्छता विषयक उपाययोजनांसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. यंदाच्या सर्वेक्षणात ‘थ्री स्टार’ मानांकन मिळविण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने नागरिकांच्या सहकार्यातून प्रयत्न सुरू आहेत. उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, स्वच्छता सर्वेक्षणात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठीही प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू … Read more

कचरामुक्त शहरासाठी विद्यार्थी, पालकांमध्ये जागृती करावी – महापौर बाबासाहेब वाकळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- माझे शहर स्वच्छ व सुंदर असले पाहिजे, अशी मानसिकता सर्वांनीच तयार करणे आवश्यक आहे. शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक हे नवीन पिढी घडविण्याचे महत्वाचे काम करतात. त्यांनी विद्यार्थ, पालकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिल्यास जनजागृती होईल. शहर कचरामुक्त होण्यासाठी शाळांचे व शिक्षकांचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले. … Read more

प्लॅस्टिक बंदीला अडथळा आणणाऱ्या दोन बड्या व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल

अहमदनगर : बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वापराविरोधात महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांमार्फत सुरू असलेल्या कारवाई मोहिमेत अडथळा आणल्याप्रकरणी कापड बाजारातील दोन व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि.17) कापडबाजारात मनपा कर्मचार्‍यांना कारवाईस मज्जाव करुन हालकून लावण्यात आले होते. दरम्यान, मनपाच्या कठोर कारवाईमुळे … Read more

मनपाच्या त्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची तयारी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- मनपाच्या प्रभाग ६ (अ) मधील एका जागेसाटी पोटनिवडणूक होणार आहे. या प्रभागात मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडमूक आयोगाने जाहीर केला आहे. २७ डिसेंबरला मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. पोटनिवडणुकीसाठी ४ ऑक्टोबरला अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार … Read more